Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 18
________________ मानव धर्म करेल! तुम्ही पुन्हा त्याचे नुकसान केले, तरीसुद्धा तुमचे काम असेल त्यावेळी तो तुमची मदत करतो. त्याचा स्वभावच मदत करण्याचा असतो. म्हणून आपण समजून जायचे की हा मनुष्य 'सुपर ह्यमन' आहे. यास दैवी गुण म्हणतात. असे मनुष्य तर क्वचितच असतात. आजकल तर असे मनुष्य सापडतच नाही ना! कारण लाखात एखादाच असा असतो, असे याचे प्रमाण झाले आहे. मानवतेच्या धर्मा विरुद्ध कोणत्याही धर्माचे आचरण केले, जर पाशवी धर्माचे आचरण केले तर पशुमध्ये जातो. जर राक्षसी धर्माचे आचरण केले तर राक्षसीपणात जातो अर्थात् नर्कगतित जावे लागते आणि जर सुपर ह्यमन धर्माचे आचरण केले तर देवगतिमध्ये जातो. मी काय सांगू इच्छितो, ते तुम्हाला समजले का? जे जेवढे जाणतात, तेवढा धर्म ते शिकवतात येथेच(भारतभूमिवर) संत पुरुष व ज्ञानीपुरुष जन्म घेतात आणि ते लोकांचे भले करत असतात. ते स्वतः पार उतरले आहेत व अनेकांना पार करतात. स्वतः जसे बनले आहेत तसेच दुसऱ्यांना बनवतात. स्वतः जर मानव धर्म पाळत असतील तर ते मानव धर्म शिकवतात. याहून पुढे जर ते दैवी धर्माचे पालन करत असतील तर ते दैवी धर्म शिकवतात. 'अति मानव'(सुपर ह्यमन) चा धर्म जाणत असतील तर अतिमानवाचा धर्म शिकवतात. म्हणजे जो धर्म ते जाणतात तोच ते शिकवतात. आणि जे या सर्व अवलंबनापासून मुक्ततेचे ज्ञान जाणत असतील, स्वतः मुक्त झाले असतील, तर ते मुक्तीचे ज्ञान सुद्धा शिकवतात. असा आहे पाशवतेचा धर्म प्रश्नकर्ता : खरा धर्म तर मानव धर्म हाच आहे. आता त्यात मुख्यतः हे जाणून घ्यायचे आहे की वस्तुत: मानव धर्म म्हणजे 'आपल्याकडून कुणालाही दुःख होऊ नये.' हाच त्याचा सर्वात मोठा पाया आहे. लक्ष्मीचा, सत्तेचा, वैभवाचा या सर्वांचा दुरुपयोग करु नये, त्याचा सदुपयोग करावा.

Loading...

Page Navigation
1 ... 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42