Book Title: Manav Dharma Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 16
________________ मानव धर्म सिनेमा बघायला गेलास तर कोणी बोट दाखवणार का? आणि जर परस्त्रीसोबत गेलास तर? प्रश्नकर्ता : अमेरीकेत यावर आक्षेप घेत नाही. दादाश्री : अमेरीकेत आक्षेप घेत नाही, परंतु हिंदुस्तानात तर आक्षेप घेणार ना? ही गोष्ट खरी आहे, पण तेथील लोक ही गोष्ट समजत नाहीत. आपण ज्या देशात जन्म घेतला आहे, तेथे अशा व्यवहारावर आक्षेप घेतला जातो ना! आणि असे आपत्तिजनक कार्य हाच गुना आहे. येथे तर ऐंशी टक्के मनुष्य जनावरगतिला जाणारे आहेत. वर्तमानातील ऐंशी टक्के मनुष्य! कारण मनुष्य जन्म मिळाल्यावरही काय केले? तर भेसळ केली. बिनहक्काचे उपभोगले, बिनहक्काचे लूटले, बिनहक्काचे मिळावे अशी इच्छा केली, असे विचार केले किंवा परस्त्रीवर नजर बिघडवली. मनुष्याला स्वता:ची पत्नी भोगण्याचा हक्क आहे, पण बिनहक्काच्या, परस्त्रीवर नजर बिघडवू नये, त्याचा सुद्धा दंड मिळतो. फक्त नजर बिघडवली, तरी सुद्धा दंड, त्याला जनावरगति मिळते. कारण ती पाशवता म्हटली जाते. (खरोखर) मानवता असायला हवी. __ मानव धर्म याचा अर्थ काय ? हक्काचे उपभोगणे तो मानव धर्म. असे तुम्ही स्वीकार करता की नाही? प्रश्नकर्ता : बरोबर आहे. दादाश्री : आणि बिनहक्काच्या बाबतीत? प्रश्नकर्ता : नाही स्वीकारले पाहीजे. जनावर गतित जाणार, याचा काही पुरावा आहे ? दादाश्री : हो, पुराव्यासोबत आहे. पुराव्याशिवाय, अशीच थाप मारु शकत नाही. मनुष्यत्व कुठपर्यंत राहणार ? हक्काचे नसलेले किंचित सुद्धा भोगत

Loading...

Page Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42