Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 5
________________ खातात'. याचा अर्थ असा की, 'सजीव सजीवांचाच आहार करतात' या निष्कर्षाशी हा जुळतो. मातीबाबतचे हे तथ्य कदाचित इतरही एकेंद्रियांना लागू पडेल. डॉ. कर्वे यांना वरील संशोधनापूर्वी एकेंद्रियविषयक जैन मान्यता माहीत असणे बहुधा संभवत नाही. जैन शास्त्रातील जीवविषयक सिद्धान्त जीवशास्त्राच्या अभ्यासकापर्यंत पोहोचले तर कदाचित जीववैज्ञानिकांना नवीन दिशा प्राप्त होईल. वनस्पतिविषयक विचार : डॉ. जगदीशचन्द्र बसू यांनी केलेले वनस्पतिविषयक संशोधन सुप्रसिद्ध आहे. त्यांनी वनस्पतींचे सजीवत्व आणि त्यांना असणाऱ्या भावभावना पद्धतशीर प्रयोगांनी सिद्ध करून दाखविल्या. अर्धमागधी ग्रंथ आचारांग (श्रुतस्कंध १) यामध्ये वनस्पती आणि माणूस यांची तुलना भ. महावीरांनी प्रस्तुत केली आहे. त्यातील वनस्पतिविषयक निरीक्षणे डॉ. बसूंच्या निरीक्षणाशी प्राय: जुळतात. ___‘महावीरवाणी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनेक अर्धमागधी ग्रंथांत तसेच दिगंबरीय ग्रंथांत, सृष्टीविषयक विविध निरीक्षणे बारकाईने नोंदविलेली दिसतात. त्यांनी काढलेले निष्कर्ष हे प्रत्यक्ष निरीक्षण व त्याविषयीचे चिंतन यावर आधारलेले होते असे न मानता, जैन परंपरेने अशा महापुरुषांच्या निरीक्षणाला व चिंतनाला त्यांच्या सर्वज्ञत्क्मे आविष्कार' मानले आहे. નૈન ગ્રંથાંત સર્વ વનસ્પતીના નપુંસઋત્રિી માનન્ને બહેત. બાન અને દ્વિતે જી સપુષ્પ વનસ્પતીંમધ્યે નર વ માવી अशा वेगवेगळ्या वनस्पती असतात. शिवाय प्राय: सर्व फुलांमध्ये स्त्रीकेसर व पुंकेसरही असतात. सर्व वनस्पतींच्या नपुंसकलिंगत्वाचा नव्याने शोध घेण्याची जरुरी आहे. जैन अभ्यासकांनी नपुंसकलिंगत्वा'चा अर्थ नव्याने समजावून घेण्याची जरूरी आहे. पपईसारख्या झाडांमध्ये नर आणि मादी असा भेद असतो हे सामान्य माणूसही जाणतो. मग हे तथ्य आगमांमधील निरीक्षकांच्या कक्षेतून सुटले असेल असे मानणे योग्य ठरत नाही. म्हणून नपुंसकलिंग' या शब्दाची चिकित्सा व्हायला हवी. जैन मान्यतेनुसार वनस्पतीचा मूल जीव एक आहे आणि त्याच्या विभिन्न अवयवांमध्ये अलग अलग विभिन्न असंख्यात जीव असतात. वनस्पतिशास्त्रानुसार, 'वनस्पती केवळ विभिन्न अवयवांच्या पेशींचा एकदुसऱ्याशी जोडलेला संघात आहे'. विज्ञानाने, पूर्ण वनस्पतीत व्याप्त एका जीवाला मान्यता दिलेली नाही. वृक्षाच्या कोणत्याही अवयवाच्या पेशीचा डी.एन्.ए. पाहून आपण त्या वृक्षाची जात ओळखू शकतो. पेशींचे अलग अलग अस्तित्व असूनही त्यात जे साम्य आहे, ते लक्षात घेऊन, जैन ग्रंथांमध्ये एक मूल जीव' आणि 'बाकी असंख्यात जीवांची' कल्पना सांगितली असावी. वैज्ञानिक मान्यतेनुसार वनस्पतींना विविध इंद्रिये नाहीत. प्राय: सर्व इंद्रियांची कार्ये त्या त्वचेमार्फत करतात. म्हणूनच जैन शास्त्राने वनस्पतींना त्वचा अथवा स्पर्शनेंद्रिय हे एकच इंद्रिय मानले असावे. वैदिक परंपरेत उत्तरकाळात आयुर्वेदशास्त्र खूप प्रगत झाले. जैन परंपरेतही अगदी प्रारंभकाळात आयुर्वेदविषयक ग्रंथ असावेत असे उल्लेख काही ग्रंथांत दिसतात. परंतु हिरव्यागार वनस्पतिसृष्टीचा मानवाच्या रोगनिवारणासाठी वापर करून घेणे हे बहुधा अहिंसातत्वाच्या विरुद्ध वाटले असावे. म्हणून सजीव वनस्पतींची मुळे, साली, पाने, फळे इ. यापासून काढे, लेप, चूर्ण इ. तयार केले गेले नाहीत. औषधयोजना करताना प्रासुकतेकडे लक्ष दिले गेले. जीवांची इंद्रियांनुसार विभागणी : जैन मान्यतेनुसार पृथ्वी ते वनस्पती या जीवांना एकच इंद्रिय आहे (स्पर्शन). कृमि, जळू आणि अळ्या यांना दोन इंद्रिये आहेत (स्पर्शन + रसन). मुंगी, ढेकूण इ. हे त्रींद्रिय आहेत (स्पर्शन + रसन + घ्राण). भुंगा, माशी, विंचू आणि डास इ. ना चार इंद्रिये आहेत (स्पर्शन + रसन + घ्राण + नेत्र). मनुष्य, पशु, पक्षी इ. ना पाच इंद्रिये आहेत. जैन मान्यतेनुसार सर्प हा पंचेंद्रिय आहे. आजचे सर्पतज्ज्ञ स्पष्ट सांगतात की सापाला श्रोनेंद्रिय' नाही.

Loading...

Page Navigation
1 ... 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25