Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 23
________________ केलेली दिसत नाही. वैकुंठ, कैलास, पितृलोक यांचे स्वर्गातील नेमके स्थान स्पष्ट होत नाही. जाति-वर्णव्यवस्था स्वीकारल्यामुळे, चारही वर्णांचा व चारही आश्रमांचा व्यवस्थित आचार, हिंदू परंपरेने व्यवस्थित सांगणे अपेक्षित होते. तथापि हिंदू धर्मशास्त्रात बराचसा आचार, ब्राह्मण केंद्री दिसतो व ब्राह्मणांच्या बाजूने पक्षपातीही दिसतो. याउलट जैनांचा साधुआचार व गृहस्थाचार अनेक ग्रंथात विस्तृतपणे सांगितला आहे. सारांश काय, तर सूक्ष्मता व चिकित्सा ही जैन परंपरेची वैशिष्ट्ये मानावी लागतात. * उपसंहार व निष्कर्ष शोधलेखात दिलेल्या सर्व मुद्यांचा साकल्याने विचार करता, असे म्हणावेसे वाटते की, जैनधर्म आणि हिंदुधर्म यांच्यात कमीत कमी गेली २६०० वर्षे तरी, बाह्यआचारामध्ये क्रियाप्रतिक्रियात्मक आंदोलणे चालू आहेत. वरकरण पाहता जैनधर्मीय हे, अनेक बाबतीत हिंदू धर्मीयांच्या कितीही जवळ गेल्यासारखे वाटले तरी, त्यांच्या सैद्धांतिक भूमिका व जीवनविषयक दृष्टिकोण, यात मूलगामी भेद असल्यामुळे, जैनधर्मी हे अल्पसंख्य असूनही, हिंदू धर्मामध्ये विलीन होऊन गेले नाहीत. अल्पसंख्य असूनही जैनत्व अबाधित ठेवण्यासाठी, त्यांना कुटुंबातून मिळणारे संस्कार, साधुवर्ग, तीर्थक्षेत्रे व मंदिरे, श्रावक संघ आणि जैन समाजाची घट्ट असलेली वीण, हे घटक प्रामुख्याने उपयोगी पडत आले आहेत. आजूबाजूच्या समाजाशी समरस होऊनही, आपली पृथगात्मकता ते अशाच प्रकारे टिकवून ठेवतील, असा विश्वास वाटतो.

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25