Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi
Catalog link: https://jainqq.org/explore/009844/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ जैनविद्येचे विविध आयाम ( स्फुट - चिंतनात्मक लेख) भाग - ४ * लेखन व संपादन डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ ऑगस्ट २०११ Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ १७. जैन धर्मातील वैज्ञानिकता (दशलक्षणपर्वानिमित्त विशेष व्याख्यान, बारामती, ऑगस्ट २००९) प्रस्तावना : जैन धर्मातील वैज्ञानिकता या विषयावर बोलण्याचा अधिकार वस्तुत: एखाद्या वैज्ञानिकाचा अथवा शास्त्रज्ञाचाच आहे. भाषा, धर्म आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास असलेल्या माझ्यासारख्या सामान्य अभ्यासकाला हा अधिकार पोहोचत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. तथापि खऱ्या अर्थाने वैज्ञानिक संशोधक हे जैन धर्मतत्त्वांची माहिती असणारे मिळणे हे दुरापास्त आहे. याउलट धर्माच्या अभ्यासकाला वैज्ञानिक संशोधन पद्धती आणि वैज्ञानिक सूत्रे अचूक सांगता येणे फार अवघड आहे. तरीही संयोजकांनी दाखविलेल्या विश्वासाला मान देऊन जैन धर्मातील वैज्ञानिकता शोधण्याचा व त्याचे मूल्यमापन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. वैज्ञानिक असल्याचा दावा : केवळ जैन परंपराच नव्हे तर वैदिक अथवा हिंदू परंपरा सुद्धा वेद, उपनिषदे, दर्शने, रामायण, महाभारत यांमध्ये अतिप्रगत वैज्ञानिकता आढळते असा दावा करते. त्यांच्या मते प्रगत अस्त्रे, शस्त्रे, विमानतळ, पुष्पक विमानासारखी विमाने, सागरी सेतू बांधण्याचे प्रगत तंत्रज्ञान, भूगोल, ज्योतिष, वास्तू यांसंबंधीचे सर्व प्रगत ज्ञान आमच्या प्राचीन ऋषिमुनींना होतेच. संस्कृतमध्ये असलेल्या विविध शास्त्रविषयक ग्रंथसंपत्तीवर नजर टाकली असता असे दिसते की एकेकाळी आपल्या भारतीय शिक्षणपद्धतीत अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिष, खगोल, गणित, नाट्यशास्त्र, आयुर्वेद, योग या विषयांवर आधारित प्रमाणित ग्रंथांचा समावेश झालेला होता. या सर्व बाबतीत आपण एकेकाळी प्रगत होतो. परंतु मध्ययुगानंतर सामाजिक विषमता, परकीय आक्रमणे, युद्धे, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांनी ही शिक्षणपद्धती लोप पावत गेली. आज आता विविध शास्त्रे व कला यांची जी शिक्षणपद्धती आहे, ती सर्वस्वी पाश्चात्य शिक्षण-पद्धतीवरच बेतलेली आहे. आपण ज्या ज्या सुखसुविधा व उपकरणे वापरतो ती जवळजवळ सर्वच प्रथमतः विदेशी शास्त्रज्ञांनी बनविलेली आहेत. अशा परिस्थितीत आपला वैज्ञानिकतेचा दावा पुन्हा एकदा तपासून पाहाण्याची वेळ आली आहे. जी गोष्ट हिंदूंबाबत तीच गोष्ट जैनांच्या बाबतही खरी आहे. निर्विवादपणे वैज्ञानिक असलेली जैन जीवनशैली : काही मुद्दे मानवी आरोग्य उत्तम राखण्यासाठी जैन जीवनशैलीतील काही मुद्दे अतिशय उपयुक्त आहेत. आज जगातील ९०% लोक मांसाहारी असले तरी शाकाहाराचे महत्त्व सर्वांनाच हळूहळू पटू लागले आहे. बर्ड फ्ल्यू, स्वाइन फ्ल्यू आणि इतरही अनेक संसर्गजन्य रोग मांसाहारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या माध्यमातूनच मानवांपर्यंत पोहचत आहेत. प्राण्यांची कृत्रिम पैदास करण्यामुळे तयार झालेल्या नव्या प्रजाती, निसर्गातील प्राण्यांसारख्या रोगप्रतिकारक्षम नसतात. त्यामुळेच गायी-गुरे-मेंढ्या - कोंबड्या - डुक्करे इ. मध्ये नवनवीन रोग पसरतात. त्यानंतर संसर्गाने ते मानवापर्यंत पोहोचतात. संपूर्ण शाकाहारी भोजनशैली स्वीकारल्यास हे सर्व टळू शकते. अर्थात् शाकाहारासंबंधी सुद्धा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. धान्याच्या विविध प्रकारांच्या संकरित जाती आणि भरपूर धान्य उत्पादनासाठी वापरण्यात येणारी हानिकारक रासायनिक खते यामुळे शाकाहार सुद्धा अनेक प्रकारे प्रदूषित झाला आहे. म्हणून आरोग्याची जाणीव असलेले शाकाहारी, नैसर्गिक खतांवर पोसलेले धान्य व भाजीपाल्याची निवड करू लागलेले आहेत. रात्रिभोजनत्याग अर्थात् सूर्यास्तापूर्वी भोजन घेणे, आरोग्यविज्ञानाशी संपूर्णतः सुसंगत आहे. तरीही आपल्या व्यस्त शहरी जीवनशैलीत हे तत्त्व प्रत्यक्ष व्यवहारात पाळणे शक्य होत नाही. जी व्यक्ती रात्रीचे भोजन आणि Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ झोप यांमध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर ठेवते ती व्यक्ती रात्रिभोजनत्याग व्रताचे अंशत: तरी पालन करते असे म्हणावे लागेल. गरम करून गार केलेले व गाळलेले पाणी पिणे व पावसाळ्याच्या चार महिन्यात कटाक्षाने ऊनोदरी, उपवास इ. करणे हे आरोग्याला फायदेशीर आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. वैज्ञानिक पद्धती : विज्ञानात सर्वात महत्त्वाचे असते ते निरीक्षण. अनेक निरीक्षणे नोंदवून त्या प्रयोगांच्या आधारे सर्व परिस्थितीत लागू पडेल असा सर्वसामान्य सिद्धान्त शोधून काढला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितींना अॅप्लाय केला जाता तो सिद्धान्त जीवनोपयोगी असेल तर त्याच्या आधारे विविध उपकरणेही तयार केली जातात. विजेचा मूलगामी शोध लागल्यावर अशीच विविध उपकरणे तयार झाली. भौतिकशास्त्रात जसे संशोधन होते तसेच संशोधन समाजविज्ञान व मानसशास्त्रातही होत असते. जैन शास्त्राने आरंभापासूनच उद्घोषिलेला अहिंसातत्त्वाचा सिद्धान्त महात्मा गांधींनी अशाच प्रकारे समाजविज्ञान व मानसशास्त्रात अॅप्लाय केला. महात्मा गांधींचा जैन धर्माशी असलेला निकटचा संबंध आणि अभ्यास सुपरिचित आहेच. त्यांचे ‘सत्याचे प्रयोग' सुद्धा असेच प्रसिद्ध आहेत. अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग धरून त्यांनी संपूर्ण भारतीय मनांवर त्यांचा पगडा बसविला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या तत्त्वांचा समयोचित वापर केला. कवी म्हणतो - दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।। अनेकान्तवाद आणि सापेक्षतावाद : जर्मन संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन हा सापेक्षतावादाचा जनक आहे, हे सर्वविश्रुत आहे. जैन शास्त्रात सांगितलेल्या अनेकान्तवाद' या शब्दाचे इंग्रजी भाषांतर सुद्धा Theory of Relativity of Truth असे केले जाते. जैन परंपरेविषयी आईनस्टाईनने काढलेले गौरवोद्गारही सुप्रसिद्ध आहेत. परंतु “जैनांचा अनेकान्तवाद त्यालसापेक्षतावाद शोधून काढण्याच्या आधी माहीत होता की नंतर", याविषयी खुलासा आतापर्यंत झालेला नाही. ह्या सिद्धान्ताचे रूपांतर त्याने E=mc या सूत्रात केले. (यातील E= Energy, m-mass आणि c=velocity) हे सूत्र शोधून काढल्यावर त्याच्या आधारे पुढील वैज्ञानिक संशोधनास चालना मिळाली. दुर्दैवाने हे नमूद करावेसे वाटते की अनेकान्तवदाचा जैन सिद्धान्त मात्र विचारापुरताच मर्यादित राहिला. म्हणजे वैज्ञानिक उपकरणे बनविण्यासाठी तो वापरणे तर दूरच पण सांप्रदायिक भेद मिटविण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला गेला नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम : ___विश्वात असलेली विशिष्ट नियमितता कोणत्या नियमानुसार आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न न्यूटन या शास्त्रज्ञाने केला. त्याने गती, क्रिया, प्रतिक्रिया, गुरुत्वाकर्षण इ. अनेक विषयांसंबंधीची महत्त्वाची सूत्रे शोधली. भूगोल व खगोलविषयक अनेक रहस्ये त्याने उलगडली. न्यूटनपूर्वी सुमारे २५०० वर्षापासून प्रचलित असलेल्या जैन परंपरेत आपल्या दृश्य विश्वाची उपपत्ती लावून सहा द्रव्यांमध्ये त्याची विभागणी केलेली दिसते. जगातील कोणत्याही धर्माने न सांगितलेली दोन तत्त्वे या सहा द्रव्यात समाविष्ट आहेत. ती तत्त्वे म्हणजे गतिशील पदार्थांना गतिशील ठेवणारे 'धर्म' तत्त्व आणि स्थितिशील पदार्थांना स्थितिशील ठेवणारे 'अधर्म तत्त्व'. अवकाशस्थ सर्व ग्रहगोलांना गतिशील ठेवूनही विशिष्ट नियंत्रणात राखणारी ही दोन द्रव्ये आहेत. दुर्दैव असे की ती धार्मिक ग्रंथांतच मयादित राहिली. स्मरणशक्ती व पाठांतराने ती पुढील पिढ्यांना पोहोचवली. बहुधा 'धर्म' व 'अधर्म' या शब्दांनी संभ्रमावस्था निर्माण केली असावी. ती तत्त्वे वैज्ञानिक नसून बहुधा नैतिक मानली गेली असावी. त्यातील पारिभाषिकता विसरली. Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ कोणाही भारतीयाने ती वैज्ञानिक अंगाने विकसित केली नाहीत, परिणामी गुरुत्वाकर्षणाच्या शोधाशी न्यूटनचेचनाव निगडित राहिले. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जेव्हा सामान्य माणसांसाठी लिखाण करतात तेव्हा ते पाजञ्जलयोग आणि गीता वारंवार उद्धृत करतात. नोबेलप्राईझ विनर अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन जेव्हा नवा अर्थविषयक सिद्धान्त शोधतात तेव्हा चार्वाकांच्या मताचा विशेषत्वाने विचार करतात. 'पाणी' या विषयावर सध्या जगभरात सेमिनार्स आणि कॉन्फरन्सेस् चालू आहेत. अपेक्षा अशी आहे की अपकायाविषयीचा मूलगामी आणि सूक्ष्म विचार करणाऱ्या जैन ग्रंथांचा पार्श्वभूमी म्हणून तरी निदान संदर्भ दिला जावा. याचाच अर्थ असा की जैन धर्मातील मूलगामी आणि सूक्ष्म विचार, जैन धर्माच्या अभ्यासकांनी विविध विज्ञानशाखांमध्ये संशोधन करणाऱ्या प्रगत संशोधकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत अन्वयार्थ उलगडून सांगण्यासाठी तरी त्यांच्यापुढे जायला हवेत. आपण जर आपल्या मुलांना जैन धर्मातील धारणा समजावून सांगितल्या तर आजची जैन युवा पिढी त्यांच्या संपर्कात असलेल्या संशोधक युवा पिढीपर्यंत त्या धारणा पोहोचवत राहील. सौरऊर्जा : सोलर हीटर व सोलर कुकर ही दोन साधने पूर्णत: सौरऊर्जेवर चालतात. वर्षातील जवळजवळ दहा ते अकरा महिने ती आपण वापरू शकतो. सूर्याची वाया जाणारी उष्णता त्यात वापरली जाते. ही साधने वापरणे हे पूर्णतः अहिंसेचेच पालन आहे. शिवाय विजेची बचत होतेच. जे जे अनुदिष्ट आहे त्याचा वापर करण्याच्या जैन तत्त्वाचेही पालन होते. प्रत्येक जैन घरात निरपवादपणे दिसलीच पाहिजे अशी ही उपकरणे आहेत. विशेष नोंद घेण्याजोगी गोष्ट अशी की, कुमारपालप्रतिबोध नावाच्या जैन ग्रंथात ‘सूर्यपाकरसवती' अर्थात् सूर्याच्या उष्णतेवर बनविलेल्या चवदार स्वयंपाककलेचा उल्लेख येतो. उत्सर्ग समिति आणि कचरा : जैन शास्त्रानुसार समिति पाच आहेत. ईर्या, भाषा, एषणा, आदाननिक्षेप आणि उत्सर्ग अशी त्यांची नावे आहेत. प्रासुक स्थंडिल भूमीवर मलमूत्र विसर्जन करणे, हे शहरी जीवनशैलीशी सुसंगत नाही. परंतु कचरा बाहेर फेकणे हाही उत्सर्गच होय. घरातील रोजचा ओला कचरा वापरून उत्तम फुलबाग फुलते. बागकामात कराव्या लागणाऱ्या हिंसेचा विचार येथे न केलेला बरा. कारण ओला कचरा उघड्यावाघड्यावर सडून कुजून लाखो बॅटरया निर्माण करतो. त्यापेक्षा ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करण्याचे तंत्र शिकून घेणे केव्हाही फायदेशीर आहे. यामुळे ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरणरक्षण आणि उत्सर्गसमितीचे पालन होऊन घरच्याघरी शुद्ध भाजीपालाही मिळेल. एकेंद्रियविषयक मान्यता : ___ जैन शास्त्रानुसार पृथ्वी, अप, तेज, वायु व वनस्पति हे एकेंद्रिय आहेत. जैन शास्त्रानुसार या सर्वांना एकच स्पर्शनेंद्रिय आहे. जैन शास्त्रात ही मान्यता कशी आली असेल ? सर्व सजीव जगण्याकरता एकेंद्रियांचा वापर करतात. सजीव हे सजीवांवरच जगू शकतात. निर्जीव वस्तू खाऊन जगू शकत नाहीत. द्वींद्रिय इ. जीव आणि हे चार एकेंद्रिय जीव पृथ्वी, अप् इ. एकेंद्रियांचा आहार करतात. त्याअर्थी हेही जिवंत असले पाहिजे. द्विन्द्रियांपेक्षा ते अप्रगत आहेत. म्हणून त्यांना एकेन्द्रिय मानले आहे. माती, पाणी, वायु इ. वैज्ञानिकांना सजीव वाटते की नाही, हा खरा प्रश्न आहे. माती व पाण्याच्या सूक्ष्म कणाच्या अथवा थेंबाच्या आधारे लाखो सूक्ष्म बॅक्टेरिया जगत असतात असे वैज्ञानिक म्हणतात. परंतु खुद्द माती अथवा पाणी सजीव असल्याचा निर्वाळा आतापर्यंत दिला जात नव्हता. दि. १.९.२००९ च्या दैनिक सकाळमध्ये डॉ. कर्वे यांच्या आलेल्या लेखानुसार, 'सूक्ष्म जीव हे दगड, माती Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ खातात'. याचा अर्थ असा की, 'सजीव सजीवांचाच आहार करतात' या निष्कर्षाशी हा जुळतो. मातीबाबतचे हे तथ्य कदाचित इतरही एकेंद्रियांना लागू पडेल. डॉ. कर्वे यांना वरील संशोधनापूर्वी एकेंद्रियविषयक जैन मान्यता माहीत असणे बहुधा संभवत नाही. जैन शास्त्रातील जीवविषयक सिद्धान्त जीवशास्त्राच्या अभ्यासकापर्यंत पोहोचले तर कदाचित जीववैज्ञानिकांना नवीन दिशा प्राप्त होईल. वनस्पतिविषयक विचार : डॉ. जगदीशचन्द्र बसू यांनी केलेले वनस्पतिविषयक संशोधन सुप्रसिद्ध आहे. त्यांनी वनस्पतींचे सजीवत्व आणि त्यांना असणाऱ्या भावभावना पद्धतशीर प्रयोगांनी सिद्ध करून दाखविल्या. अर्धमागधी ग्रंथ आचारांग (श्रुतस्कंध १) यामध्ये वनस्पती आणि माणूस यांची तुलना भ. महावीरांनी प्रस्तुत केली आहे. त्यातील वनस्पतिविषयक निरीक्षणे डॉ. बसूंच्या निरीक्षणाशी प्राय: जुळतात. ___‘महावीरवाणी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अनेक अर्धमागधी ग्रंथांत तसेच दिगंबरीय ग्रंथांत, सृष्टीविषयक विविध निरीक्षणे बारकाईने नोंदविलेली दिसतात. त्यांनी काढलेले निष्कर्ष हे प्रत्यक्ष निरीक्षण व त्याविषयीचे चिंतन यावर आधारलेले होते असे न मानता, जैन परंपरेने अशा महापुरुषांच्या निरीक्षणाला व चिंतनाला त्यांच्या सर्वज्ञत्क्मे आविष्कार' मानले आहे. નૈન ગ્રંથાંત સર્વ વનસ્પતીના નપુંસઋત્રિી માનન્ને બહેત. બાન અને દ્વિતે જી સપુષ્પ વનસ્પતીંમધ્યે નર વ માવી अशा वेगवेगळ्या वनस्पती असतात. शिवाय प्राय: सर्व फुलांमध्ये स्त्रीकेसर व पुंकेसरही असतात. सर्व वनस्पतींच्या नपुंसकलिंगत्वाचा नव्याने शोध घेण्याची जरुरी आहे. जैन अभ्यासकांनी नपुंसकलिंगत्वा'चा अर्थ नव्याने समजावून घेण्याची जरूरी आहे. पपईसारख्या झाडांमध्ये नर आणि मादी असा भेद असतो हे सामान्य माणूसही जाणतो. मग हे तथ्य आगमांमधील निरीक्षकांच्या कक्षेतून सुटले असेल असे मानणे योग्य ठरत नाही. म्हणून नपुंसकलिंग' या शब्दाची चिकित्सा व्हायला हवी. जैन मान्यतेनुसार वनस्पतीचा मूल जीव एक आहे आणि त्याच्या विभिन्न अवयवांमध्ये अलग अलग विभिन्न असंख्यात जीव असतात. वनस्पतिशास्त्रानुसार, 'वनस्पती केवळ विभिन्न अवयवांच्या पेशींचा एकदुसऱ्याशी जोडलेला संघात आहे'. विज्ञानाने, पूर्ण वनस्पतीत व्याप्त एका जीवाला मान्यता दिलेली नाही. वृक्षाच्या कोणत्याही अवयवाच्या पेशीचा डी.एन्.ए. पाहून आपण त्या वृक्षाची जात ओळखू शकतो. पेशींचे अलग अलग अस्तित्व असूनही त्यात जे साम्य आहे, ते लक्षात घेऊन, जैन ग्रंथांमध्ये एक मूल जीव' आणि 'बाकी असंख्यात जीवांची' कल्पना सांगितली असावी. वैज्ञानिक मान्यतेनुसार वनस्पतींना विविध इंद्रिये नाहीत. प्राय: सर्व इंद्रियांची कार्ये त्या त्वचेमार्फत करतात. म्हणूनच जैन शास्त्राने वनस्पतींना त्वचा अथवा स्पर्शनेंद्रिय हे एकच इंद्रिय मानले असावे. वैदिक परंपरेत उत्तरकाळात आयुर्वेदशास्त्र खूप प्रगत झाले. जैन परंपरेतही अगदी प्रारंभकाळात आयुर्वेदविषयक ग्रंथ असावेत असे उल्लेख काही ग्रंथांत दिसतात. परंतु हिरव्यागार वनस्पतिसृष्टीचा मानवाच्या रोगनिवारणासाठी वापर करून घेणे हे बहुधा अहिंसातत्वाच्या विरुद्ध वाटले असावे. म्हणून सजीव वनस्पतींची मुळे, साली, पाने, फळे इ. यापासून काढे, लेप, चूर्ण इ. तयार केले गेले नाहीत. औषधयोजना करताना प्रासुकतेकडे लक्ष दिले गेले. जीवांची इंद्रियांनुसार विभागणी : जैन मान्यतेनुसार पृथ्वी ते वनस्पती या जीवांना एकच इंद्रिय आहे (स्पर्शन). कृमि, जळू आणि अळ्या यांना दोन इंद्रिये आहेत (स्पर्शन + रसन). मुंगी, ढेकूण इ. हे त्रींद्रिय आहेत (स्पर्शन + रसन + घ्राण). भुंगा, माशी, विंचू आणि डास इ. ना चार इंद्रिये आहेत (स्पर्शन + रसन + घ्राण + नेत्र). मनुष्य, पशु, पक्षी इ. ना पाच इंद्रिये आहेत. जैन मान्यतेनुसार सर्प हा पंचेंद्रिय आहे. आजचे सर्पतज्ज्ञ स्पष्ट सांगतात की सापाला श्रोनेंद्रिय' नाही. Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ याविषयी एका जैन डॉक्टरांशी केलेल्या चर्चेनुसार वरील इंद्रियविषयक मान्यता आजच्या प्राणिशास्त्राशी सुसंगत नाहीत. द्रव्येंद्रिये व भावेंद्रिये ही जैन विभागणी सांगून सर्व प्रश्नांमधून सुटका करून घेता येणार नाही. मूलद्रव्यांची संख्या : जैन सिद्धान्तानुसार प्रत्येक पुद्गलावर एक वर्ण, एक रस, एक गंध व दोन स्पर्श राहतात. एकंदरित सर्व वर्ण, रस, गंध, स्पर्शांचा गुणाकार करून मूलद्रव्यांची संख्या २२० येते. स्पर्शांचा विचार करताना 'बंध' (Bonds) हा शब्दही महत्त्वाचा आहे. आत्ता उपलब्ध अणुविज्ञानानुसार मूलद्रव्यांची (Elements) संख्या ११४ आहे. महत्त्वाची बाब अशी की ‘नवीन मूलद्रव्य शोधून काढताना वर्ण-गंध-रस-स्पर्श या चार गुणांचा विचार केला जातो का ?' याची चिकित्सा रसायनशास्त्रज्ञाच्या मदतीने करणे आवश्यक आहे. तिर्यंचसृष्टीचा विचार : जैन शास्त्रानुसार तिर्यंचसृष्टीत एकेंद्रिय ते पंचेंद्रिय सर्व जीव येतात. येथे मात्र मर्यादित अशा पशुपक्षीसृष्टीचा विचार करणार आहोत. गेल्या २० वर्षात जीवसृष्टीच्या निरीक्षणाचे विज्ञान विशेषच प्रगत होत चालले आहे. स्थलचर, नभचर, जलचर असे विविध पशुपक्षी, कीटक, प्राणी यांच्यावर आधारित अभ्यास आणि फिल्म्स् या नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी इ. चॅनेलवर चोवीस तास प्रदर्शित होत असतात. प्रायः यांचे अभ्यासक विदेशीच असतात. भारतातील डॉ. सलीम अली, नीलिमकुमार खैरे, डॉ. किरण पुरंदरे इ. काही मोजकेच निसर्गनिरीक्षक प्रसिद्ध आहेत. भारतातही हा अभ्यास हळूहळू प्रगत होत आहे. जैन शास्त्रातून मिळणारे तिर्यंचविषयक वर्णन अतिशय सूक्ष्म, विस्तृत आणि स्तिमित करणारे आहे. इंद्रिये, गती, आहार, ज्ञान, संयम, लेश्या, कषाय, गुणस्थान व संलेखना इ. अनेक अंगांनी तिर्यंचांची जैन शास्त्रात निरीक्षणे दिली आहेत. एका फिल्ममध्ये जेव्हा Pride, Anger, Cruelty, Soberness अशी शीर्षके देऊन विविध प्राण्यांचे व्यवहार नोंदविण्यात आले तेव्हा साहजिकच जैन शास्त्राप्रमाणे हे कषायांचे आविष्कार आहेत असे वाटले. हिंस्र पशू कडकडून भूक लागल्याखेरीज शिकार करीत नाही. अन्नाचा परिग्रह करीत नाही. सिंह, वाघ हे पकडलेल्या पशूचे शरीर पूर्ण निष्प्राण झाल्याखेरीज आहार करीत नाहीत. अनेक पशुपक्ष्यांना मृत्यूची चाहूल लागल्यावर ते दूर एकांतत निघून जातात. जवळजवळ सर्वच प्राण्यांमधील वात्सल्यभावना अतिशय प्रबळ असते. स्थलांतर करणारे पक्षी विशिष्ट दिशेनेच जातातव परत येतात. पशुपक्ष्यांचे व्यवहार प्राय: अंत:प्रेरणेने चालत असले तरी प्रत्येकाची वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्येही दिसतात. तिर्यंचांना असलेले जातिस्मरण, त्यांनी धारण केलेली संलेखना, त्यांची गुणश्रेणींमध्ये चौथ्या गुणस्थानांपर्यंत प्रगती, असे उल्लेख विविध जैन ग्रंथांत विखुरलेले दिसतात. तिर्यंचांचे जैन शास्त्रनिर्दिष्ट वर्तन प्राण्यांच्या मनोवैज्ञानिक भाषेत नक्कीच मांडता येईल. सम्मूर्च्छिम जीव : जैन शास्त्रानुसार मुंग्या, किडे, अळ्या, ढेकूण, डास, माशी, भुंगा इ. अनेक कीटक सम्मूर्च्छिम आहेत म्हणजे मातापित्यांच्या संयोगाशिवाय ते उत्पन्न होतात. आधुनिक विज्ञानानुसार या सर्व कीटकांची सूक्ष्म अंडी असतात. मात्र माणसांच्या मलमूत्र इ. १४ अशुचिस्थानातून निर्माण होणारे 'सम्मूर्च्छिम मनुष्य' ही संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्याही विशेष लक्षणीय आहे. Genetic Science च्या आधुनिक संशोधनानुसार माणसाच्या मलमूत्र, गर्भजल इ. पासून त्या मनुष्याचा DNA मिळविता येतो. असा DNA विकसित करून कदाचित कृत्रिम मनुष्य तयार करण्यापर्यंत विज्ञान प्रगती करू शकेल. जनुकीय शास्त्राचा शोधनिबंध लिहिताना जैन शास्त्रातील एतद्विषयक विचार मांडले गेले पाहिजेत असे प्रामाणिक जैन अभ्यासकाला मनापासून वाटते. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ भूगोलविषयक मान्यता : ___जैन मान्यतेनुसार मध्यलोकात जम्बूद्वीपाच्या मधोमध मेरुपर्वत आहे. जम्बूद्वीपाच्या भोवती जम्बूद्वीपाच्या दुप्पट लवणसमुद्र आहे. त्याच्याभोवती त्याच्या दुप्पट धातकीखण्ड आहे. याप्रमाणे सात द्वीप आणि सात समुद्रांची रचना आहे. याचा अर्थ ही भूगोलरचना अतिशय आखीवरेखीव व प्रमाणबद्ध आहे. मुळातच हा भूगोल फक्त पृथ्वीचा आहे, की विश्वाच्या काही भागांचा आहे की, संपूर्ण विश्वाचा आहे, याबाबत शंका येते. __ भूमितिशास्त्रानुसार बिंदू, रेखा, चौकोन व वर्तुळे या सर्व गणिती संकल्पना आहेत. पूर्ण चौकोन, पूर्ण वर्तुळ अशी एकही आकृती निसर्गात निसर्गत: दिसून येत नाही. शिवाय जैन शास्त्रानुसार विश्व कोणी निर्माण केलेले नही. विश्वाचा नियामक ईश्वर मानला असता तर कदाचित या आखीवरेखीव क्रमाची पुष्टी करता आली असती. ईश्वरासारख्या सर्वज्ञ प्राण्याखेरीज आपोआप निर्माण झालेली सृष्टी वर वर्णन केल्याप्रमाणे अतिशय सुनियोजित व प्रमाणबद्ध कशी असू शकेल ? जैन शास्त्रातील द्वीप व समुद्रांचे, समकालीन द्वीप व समुद्राशी नाते जोडण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला दिसतो. जैनांनी तो श्रद्धेने मान्य केला तरी भूगोलतज्ज्ञ तो मान्य करणार नाहीत. आहारचिकित्सा : शाकाहार ही जैनांची ओळख आहे. केवळ शाकाहारच नव्हे तर त्याच्याही अंतर्गत प्रत्येक धान्याचा, भाजीचा, फळाचा, फुलाचा केलेला सूक्ष्म विचार हे जैन ग्रंथांचे वैशिष्ट्य आहे. भावनिक, मानसिक आणि धार्मिक दृष्टीने शाकाहार हा सात्त्विक मानला जातो. साधूंना प्रायोग्य अशा आहाराचे वर्णन करणारे अनेक ग्रंथ जैन शास्त्रात 'पिण्डैषणा' शीर्षकाने प्रसिद्ध आहेत. रोजच्या आहारात नियमोपनियमांची बंधने घालून घेणे हे जैन धार्मिकतेचे मुख्य अंग बनले आहे. यात आश्चर्यकारक बाब अशी की अनासक्ती अर्थात् निरासक्तीचे तत्त्व डोळ्यासमोर ठेवले तर जैन व्यक्तीला हे कल्पते की - जो, जसा, जेव्हा, जितका शाकाहार मिळेल त्यातील थोडा व योग्य आहार घ्यावा. आपले आहाराचे नियम इतरांना त्रासदायक ठरतील असे शक्यतो घेऊ नयेत. घेतल्यास आपल्या बलबुत्यावर निभावून न्यावेत. आपल्या खाण्यापिण्याचे 'टॅबू' निर्माण करणे जैन आचारपद्धतीत बसत नाही. खाण्यापिण्याबाबत सहजता व साधेपणा ही मूल तत्त्वे आहेत. __ डाएटिशियन जो आदर्श आहार सुचवितात त्यात गाजर-दुधी भोपळा इ. चे रस, कडुनिंबाची चटणी. उकडलेल्या भाज्या, मोड आणून वाफवलेली कडधान्ये, एक ग्लास दूध, सूप, ताक, सर्व फळे इ. गोष्टींचा समावेश असतो. काही विशिष्ट व्यक्ती वगळल्यास सर्वसामान्य माणसाला असा आहार सतत घेणे अशक्य आहे. आहाराच्या चर्वितचर्वणापेक्षा अनेक उत्कृष्ट गोष्टी जैन धर्माने आम्हाला वारश्याने दिल्या आहेत. त्यांचा योग्य दिशेने अभ्यास करून त्या समाजापुढे आणणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे पूर्णत: धार्मिक आहार, पूर्णत: आरोग्यसंपन्न आहार आणि पूर्णत: तामस आहार हे तीनही अतिरेक टाळून सामान्य गृहिणीला योग्य पोषणान्ये असलेला व चवदार आहार बनवावा लागतो. उपसंहार : ___सदाचरण आणि शांततामय सहजीवन हे धर्माचे व्यावहारिक उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी जी धार्मिक मूल्ये अत्यंत उपयोगी ठरतात ती श्रद्धेनेही मान्य करण्यास काही हरकत नाही. धार्मिक ग्रंथात लिहून ठेवलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध केलीच पाहिजे असा अट्टाहासही करण्याचे काही कारण नाही. शांततामय सहजीवनासाठी जैन धर्माने समग्र जीवसृष्टिविषयक निरीक्षणे त्या-त्या काळात नोंदवून ठेवलेली आहेत. जैन धमील सणे इतर समकालीन धर्मांच्या तलनेत त्यातल्या त्यात अधिक सक्ष्म व वैज्ञानिक आहेत ही मोठीच जमेची बाजू आहे. ********** Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ १८. भ. महावीरांचे तत्त्वज्ञान : आधुनिक संदर्भात (जैन-मराठी-साहित्य-संमेलनातील विशेष व्याख्यान, मिरज, मे २००३) २५ एप्रिल २००२ ला संपणारे वर्ष भ. महावीर जन्मकल्याणक वर्ष म्हणून सर्व भारतभर व संपूर्ण जगभर मोठ्या थाटामाटाने साजरे झाले. भव्य मेळावे, दिमाखदार उत्सव, भाषणे, प्रदीर्घ चर्चासत्रे, पुस्तकांचे प्रकाशन समारंभ, मिरवणुका, पूजा, अभिषेक, स्पर्धा, पुरस्कार अशा अनेकविध अंगांनी हे वर्ष साजरे झाले. जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या श्रेष्ठतेचा उद्घोष करणाऱ्या आवेशमय भाषणांचा एकंदर सूर पुढीलप्रमाणे होता - ‘दहशतवाद व युद्धसदृश परिस्थित जगाला अहिंसाच तारणार आहे. अहिंसा जैन विचारांची विश्वाला अमोल देणगी आहे. म. गांधींनी तिचा यथायोग्य वापर केला.नयवाद व अनेकान्तवाद जैन धर्माचे हृदय आहे, पंचमहाव्रते हे पंचप्राण आहेत. हा धर्म वैश्विक धर्म होण्याच्या योग्यतेचा आहे. शाकाहार व व्यसनमुक्तीच्या चळवळींच्या रूपाने हा परदेशातही घरोघरी रूजत चालला आहे. हा धर्म पूर्णांशाने वैज्ञानिक आहे. यात नाही असे जगात काहीच नाही.' इ.इ. महती गाणे, विशेषणे लावणे अथवा वर्णनेंकरणे अतिशय सोपे असते. थोडे भाषाकौशल्य व वक्तृत्व असले की घणाघाती विधानांनी तास-दोन तास व्यासपीठ गाजवणं काही फारसे अवघड नाही. जैन धर्माचा व तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त (विशेषतः अजैन) व्यक्तींना तो पटवून देणे आवश्यक आहे. 'गृहमयूर' बनून स्वत:च्याच पिसाऱ्यावर मोहित होण्यापेक्षा, या धर्माच्या श्रेष्ठतेची कारणमीमांसा देता येणे फार महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अगर वैश्विक पातळीवर पोहोचण्यापूर्वी आपण वेचक १२ मुद्यांच्या सहाय्याने, याच्या विशष्ट्यांची नोंद आधुनिक व विशेषत: वैयक्तिक संदर्भात घेऊ. व्यक्तिश: या तत्त्वाचे पालन करणे व ज्ञान मिळविणे अतिशय जरूरीचे आहे, भाषणबाजी नव्हे. १) केवलिप्रज्ञप्त परिपूर्ण धर्म : जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या इतिहासात डोकावता, असे दिसते की, बौद्ध धर्माप्रमाणे हा व्यक्तीप्रवर्तित नाही व वैदिक धर्माप्रमाणे विकसनशीलही नाही. महावीरच नव्हे तर ऋषभदेवांच्या काळापासून हा केवलिप्रज्ञप्त' आहे. तत्त्वज्ञान व मूल आचरणाच्या गाभ्यात आजतागायत नवी भर पडलेली नाही. उलट, क्षुल्लक गोष्टींचे निमित्त करून संप्रदाय निर्माण करण्याची गर्हणीय गोष्ट आम्ही अनेक शतके करीत आलो आहोत. श्वेतांबर, दिगंबर, त्यातही स्थानकवासी, मूर्तिपूजक, तेरापंथी, वीसपंथी, सोळापंथी अशा संप्रदायानिशी फुटीर स्वरूपात जैन धर्म विश्वाला सामोरा गेला, तर आपल्या एकसंध केवलिप्रज्ञप्त परिपूर्ण अनादि धर्मावर कोणी विश्वास तरी ठेवेल का ? 'स्वत:च्यर सुधारा व मगच आम्हाला सुधारा' असे जग आपल्याला नाही का म्हणणार ? २) धर्माची भाषा कोणती असावी? : संस्कृत भाषेचा आधार न घेता, लोकभाषा असलेल्या 'अर्धमागधी' नावाच्या प्राकृतात उपदेश देऊन महावीरांनी धर्मभाषेविषयीचा एक कायमचा दंडक घालून दिला, महावीरांचे भाषाविषयक कार्य पुढील ६ ओळीत परिणामकाकपणे सांगता येईल - धर्म आणि जीवनाची फारकत ही जाहली । घेउनी ध्यानी जिनांनी गोष्ट ही हो साधली ।। संस्कृताची बंद दारे धाडसाने उघडली । आणि त्यातुनि लोकभाषा सहज केली वाहती ।। Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ तुंबलेला धर्म सारा खळखळुनि झेपावला । वगळलेल्या जनमनांचा शिंपता केला मळा || महावीरांच्या या क्रांतीपासून स्फूर्ती घेऊन आपणही महावीरवाणी व तिचे चिंतन भारतातील व इतर देशातीलही बोलीभाषांमध्ये प्रभावीपणे आणू या. आपल्या मुलांना मातृभाषेत धर्म शिकवू. इंग्रजीत भाषांतर करून नको. ३) ज्ञानमीमांसा : जैन दर्शनाने ज्ञानाचे पाच भेद सांगितले. मति, श्रुत, अवधि, मन: पर्याय व केवलज्ञान. जैन दृष्टीनेInformation Technology च्या युगात कोणत्याही वैज्ञानिक साधनाने मिळविलेले ज्ञान फक्त माहितीचा धबधबा, महापूर आहे. मति-श्रुत नंतर त्याची मर्यादा संपते. पुढची ज्ञाने बौद्धिक कुवतीशी निगडित नाहीतच. प्रथम सम्यक्त्वाची जोड मिळाली तरच मति-श्रुतही सम्यक् बनते. शुद्ध चारित्राने आध्यात्मिक प्रगती केली, तरच पुढील ज्ञाने आविर्भूत होता. सॉक्रेटिसही 'knowledge is virtue', म्हणतो तो याच अर्थाने ! 'तो फार ज्ञानी, पंडित आहे. वक्तृत्व उत्तम आहे. त्याच्या खाजगी आयुष्यात तो काही का करेना !' हा दृष्टिकोण जैन दर्शनास संमत नाही. शुद्ध आचरण नसलेल्याचे ज्ञान, जैन दर्शनाच्या दृष्टीने पोकळ व आत्मघातक आहे. स्वत: भरपूर परिग्रह करणाऱ्या माणसाचे अपरिग्रहावरील व्याख्यान ऐकून इतर लोक कसे अपरिग्रही होणार ? प्रश्नच आहे. ४) समन्वयवाद : कार्यकारणसिद्धांत असो, सप्तभंगीनय असो अगर आत्मकल्याणाचा मार्ग असो, महावीरांनी इतरांचे सिद्धांत सर्वस्वी फुली मारून कधीच धिक्कारले नाहीत. इतरांच्या प्रतिपादनातील सत्य अंश सतत ग्रहण केले. बौद्ध वाङ्मया जो सतत इतरांवरील टीकेचा सूर दिसतो तसा जैन साहित्यात (विशेषतः आगमात) जवळजवळ नगण्य दिसतो. भगवद्गीतेने ज्ञानमार्ग, संन्यासमार्ग, भक्तिमार्ग, ध्यानमार्ग, कर्ममार्ग असे विविध अध्यायात कथन केलेले दिसतात. जैन धर्माने एकाच आचाराचे दर्शन, ज्ञान, चारित्र, तप व वीर्य असे पाच भेद कल्पिले. भगवती आराधनेने चतुष्कंध आराधना सांगितल्या. उत्तराध्ययनाने २८ व्या मोक्षमार्गगति अध्ययनात स्पष्टपणे नोंदविले. नाणेण जाणई भावे, दंसणेण य सद्दहे । चारित्तेण निगिण्हाई, तवेण परिसुज्झई ।। उत्त २८.३५ - उमास्वातींनी पहिल्याच सूत्रात दर्शन, ज्ञान, चारित्राचा समन्वय केला. कुटुंबात, परिवारात, गावात, व्यापारात, सर्व व्यवहारातच समन्वयवादी दृष्टिकोण व्यवहारनयाच्या दृष्टीनेही फायदेशीरच नाही काय ? केवळ नफ्याकडे बघू तत्त्वे गुंडाळून कसेही वागण्याचा 'समन्वयवाद' नको बरे का ! ५) विवेक व अप्रमाद : आत्मकल्याणाची कास धरलेल्या आराधकासाठी महावीरांनी सतत अप्रमाद (बेसावधपणाचा व बेफिकीरीचा अभाव) सांगितला आहे. गौतम गणधरांसारख्या पारगामी व्यक्तीलाही त्यांनी तो वारंवार सांगितला, तेथे तुमच्याआमच्यासारख्या सामान्यजनांचा काय पाड ? धर्माचरण करताना 'देहली-दीपन्याया'ने हा विवेकरूपी दिवा तेवत ठेवला तर आपोआपच तोंडून शब्द उमटतात - Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ माझ्या जीवा - एकासन ब्यासन, बेला, तेला जमेल तेवढेच कर तप । डोळ्यात तेल घालून दिवा, अंत:करणामध्ये जप ।। (ज्ञानदीप) सैरावैरा कुठे धावतोस, ठेच लागली पुढं बघ । बंद दार आहे पुढं, परत जरा मागे वळ ।। (प्रतिक्रमण) तुझे ज्ञान नुसती माहिती, पक्के ध्यानी धरून चल । ज्ञान तुझ्यात होईल प्रकट, शुद्ध केलंस तरच मन ।। (त्रिरत्न) ती भलत्यावर ठेवू नको, श्रद्धा मोठंच आहे बळ ।। (सम्यक्त्व) नीट पारखून ठेव स्वत:वर, सारे दूर करून सल ।। (शल्योद्धार) दर क्षणी, दर पावली, थोडा पुढं पुढं सर । प्रवास हळू झाला तरी, नक्की भेटेल शाश्वत घर ।। (गुणस्थाने अगर श्रेणी) वेळेवारी सारा पसारा, आता आवरून सावरून नीघ । मागे वळून पाहू नको, श्रद्धांजलीचीही रीघ ।। (अनासक्ती) दुसरे कंटाळण्याच्या आधी, बऱ्या बोलानं मुक्काम हलव ।। (पंडितमरण) इतकं सोपं समजू नको, कर्मोदयाचंच हवं पाठबळ ।। (संलेखना) ६) कषायांवर नियंत्रण : आपल्याला सर्वांना पाठ आहेत ही नावं ! घडाघडा म्हणून दाखवतो. क्रोध, मान, माया, लोभ, त्यांच्यावर राज्य मोहाचं, त्याच्या मुळाशी राग-द्वेष, त्यांना जिंकणारे जिन, आत्म्याला कसणारे कषाय. कषाय म्हणजे काढा अगर चहा. वैदिक दर्शनात षड्रिपु - काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, जैन दर्शनात अनंतानुबंधी ते संज्वलन से एकूण १६ प्रकार सांगितले आहेत. आपण आहोत सामान्य संसारी श्रावक. संपूर्ण वीतरागी, निर्विकार, मध्यस्थ अशी पत्नी, माता कोणाला तरी रूचेल काय ? आपल्यात कषाय रहाणारच. परंतु संज्वलनाच्या दिशेनं प्रवासाचा यत्न व्हावा' हीच सदिच्छा ! ७) स्वावलंबन : महावीरांनी सांगितलेले स्वावलंबन मुख्यत: आध्यात्मिक स्वावलंबन आहे. जगन्नियंता, तारणहार, अवतारधारी ईश्वर जैन दर्शनात संमत नाही. 'अप्पा कत्ता विकत्ता य' असे हे स्वावलंबन आहे. घरात आपण साधा पाण्याचा ग्लासही दुसऱ्याकडे सतत मागत असू, कुठलीच कामे स्वत:ची स्वत: करीत नसू, आजी-आजोबांची निंदा करीत असू, कोणतेही मत स्वतंत्रपणे मांडू शकत नसू तर हे काय स्वावलंबन झालं ? एकंदरीत शारीरिक व बौद्धिक पापणा जवळ असेल तर आत्म्याच्या स्वावलंबनाच्या गोष्टी आपण करू शकतो काय ? ८) अपरिग्रह : 'परि + ग्रह' म्हणजे चोहोबाजूने ग्रहण करणे. तत्त्वार्थसूत्रानुसार वस्तू म्हणजे परिग्रह नसून आसक्ती हा परिग्रह आहे. 'मुर्छा परिग्रहः' अपरिग्रहाचा आज आपल्याला उपयुक्त अर्थ लावू या. सामान्य माणसानं अपरिग्रही व्हायचं तरी कसं? धान्याचा साठा करणं हा जरी परिग्रह, तरी कीड मुळीच लागू न देता, कण न् कण मुखी घालणं हाच अपरिग्रह ! ।।१।। Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ भरपूर स्वयंपाक करणं हा जरी परिग्रह, तरी अपुरं अन्न न करणं, अन् शिळं न उरण्याची खबरदारी घेणं हाच अपरिग्रह ! ||२ || नवनवीन फॅशनचे कपडे घेत रहाणं, हा जरी परिग्रह, तरी जुन्याचा लोभ लचका न ठेवता, वेळेवारी देऊन टाकत रहाणं, हाच अपरिग्रह ! ||३ || आरडाओरडा करून, धपाटे घालून मुलांना अभ्यासाला बसविणं, हा जरी परिग्रह, तरी मुलांच्या बुद्धीच्या मर्यादा ओळखून, त्यांना रेसच्या घोड्यासारखं न पळविणं, व इतर हुषार मुलांचा द्वेष न करणं, हाच अपरिग्रह ॥ ४ ॥ जीव टाकून, जीव लावून, मुलं मुलं करून, लाड करणं व वळण लावणं हा जरी परिग्रह, तरी म्हातारपणची काठी म्हणून, डोळे लावून न बसणं, हाच खरा अपरिग्रह ।।५ । स्वत:च्या भोगोपभोगांची तजवीज हा जरी परिग्रह, तरी कोणाचे हिसकावून न घेण्याची जाण, व गरजूंना एक टक्का तरी देण्याची वृत्ती, हा अपरिग्रह || ६ || जीवन सुखकर करायला, खूपशी साधनं जमविणं, हा जरी परिग्रह, तरी त्यातलं एखाद-दुसरं नसलं, किंवा मोडलं, तरी निभावून नेता येणं हाच अपरिग्रह || ७ || घाण्याच्या बैलासारखं, उपजीविकेच्या साधनांमागं, चक्राकार फिरत रहाणं हा जरी परिग्रह, तरी दिवसाकाठी तासभर तरी स्वतंत्रपणे चिंतन, वाचन हाच अपरिग्रह ॥८ ॥ ९) पर्यावरण रक्षण व ऊर्जाबचत : आधुनिक युगाचे परवलीचे शब्द आहेत हे ! त्यासाठी आपण सौर ऊर्जा, ठिबक सिंचन, पाणी अडवा-पाणी जिरवा, वृक्षारोपण, वनसंवर्धन असे हजारो कार्यक्रम राबवीत असतो. जैन दर्शनानं या सर्व चळवळींना संपूर्णत: तत्त्वज्ञानाचाच पाया प्राप्त करून दिला आहे. जैन दृष्टीनं पंचमहाभूते ही जड व परमाणूंपासून बनलेली नसून, एकेंद्रिय जीव आहेत. पृथ्वीकायिक, अप्कायिक, तेजस्कायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक जीवांशी आपण कसे वर्तन करतो, काय बिनधास्त खेळ करतो ते जरा काव्यमय पद्धतीनं मांडते. वेष कवितेचा असला तरी गाभा तत्त्वांचा आहे, हे सूज्ञांस सांगणे नलगे ! 'आंदण' सर्व जगच जणू आंदण घेतल्यासारखे वागतो आपण । त्रस - स्थावर जीवांपैकी, स्थावरांचंच एवढं कथन । आता हे पृथ्वीकायिक जीव पृथ्वीकायिक जीव आपल्या पायाखालचा मामला । कसंही करून कुचला, खणा, काढा, उचला ।। - Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ कोळसाही आपला अन् सोनंही आपलं । बोअरिंगनं छेद घेऊ, ते पाणीही आपलं ।। डोंगर उडवून सारं काही भुईसपाट करू । शेत-मळे उखणून तिथं नव्या वस्त्या सजवू ॥ नवनवीन वाणांना, भरमसाठ खतं घालू । जमीन-कस जाऊ दे खड्डयात, 'कृषि - मित्र' सत्कार घेऊ ॥ १ ॥ आता हे अप्कायिक जीव - अप्कायिक सुद्धा आहे, आपल्याच बापाचा माल । हपापाचा माल म्हणून किती किती प्याल ? वहातं पाणी साठवू, साठलेलं पाणी वाहवू । समुद्र मागे हटवू, दिमाखात कॉलनी उठवू ।। मासे म्हणजे पाण-भाजी, जाता येता खुडून घेऊ । होड्या, जहाजे चाल-चालवून नद्या, समुद्र पार करू ।। जलसंपत्ती निसर्गाची वारेमाप कशीही लुटू । मिनरलच्या नावाखाली दहा रुपये लिटर विकू ॥ २ ॥ आता हे वायुकायिक जीव - फुफ्फुसाच्या पंपांनी, हवा आत घेऊ आणि सोडू । आपली शुद्ध हवा आपण अनेक कारणांनी बिघडवू तिच्या दाबावर आपण, लहानमोठी यंत्रे बनवू । चाकात भरून हीच हवा, जमिनीवर फिरत राहू || तेजस्कायिक उपकरणांनी, हवेलाही वेठीस धरू । आपल्या मर्जीनुसार तिला गरम-गार करीत राहू ||३|| आता हे अग्निकायिक जीव - पृथ्वीकाय कोळसापासून तेजस्काय वीज बनवू । वायुकायिक पवनचक्कीनं नवनवीन कामं राबवू ॥ अप्कायापासून वीज मोठ चा कौशल्यानं निर्मू । अग्निबाण अन् अणुस्फोटांनी स्वशक्तीची स्तोत्रं गर्जू ॥ जमीन - आकाश-पाताळात लक्षावधी वहानं चालवू । आपला निसर्ग-विजय म्हणून आपली आपलीच शेखी ॥४॥ आता हे वनस्पतिकायिक जीव 1 वनस्पतींचा आपल्याबाबत आहे नाजूक मामला । प्रश्न पोटाचा आहे, जरा हळू हळू बोंबला ।। जे जे दिसलं झाडावर, गुपचूप पोटात रिचवलं । टनावरी धान्य, फळं, भाजी, दुधही खूप चापलं ।। तृणभक्षी रूचकर जीव, जिभल्या चाटत पचविले । वस्त्रं विणली, घरं बांधली, बगीचेही उभारले ॥ प्रयोगशाळेत भावभावना वनस्पतींच्या सिद्ध केल्या । आमच्या बोथट मनापर्यंत कशा बरे त्या पोहोचाव्या ? Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ जिनेंद्रांनी दिली दृष्टी, ही तर एकेंद्रियांची सृष्टी । हिंसा - चौर्य - परिग्रहावरच, उभारलीय् मानवी संस्कृती | संस्कृती सोडू शकत नाही, बदलू शकतो आपली नजर । गौतमांची अप्रमत्तता ठेवू, मनाच्या तळाशी सदैव हजर !! सारांश काय ? एकेंद्रिय जीवांना अभय म्हणजे पर्यावरण रक्षण नव्हे काय ? १०) प्रतिकूल परिस्थितीशी सामना : या मुद्याला तत्त्वज्ञानात स्थान लाभलं आहे ते परीषह व उपसर्गांच्या रूपानं ! २२ परीषह व त्रिविध उपसर्गांना महावीरांनी कर्मनिर्जरेचे साधन मानले ! जरा मनाविरुद्ध, प्रतिकूल झालं की व्यवहारात आपला तोल जातो. चिडचिड होते. शीत-उष्ण-दंश-मशक यांचा भयंकर त्रास होतो. मानसिक परीषह तर आम्हाला मनोरुग्णतेच्या पातळीपर्यंत नेऊन पोहोचवितात. दुहेरी उपयोगी आहे हा कर्मनिजरेचा सिद्धांत ! शारीरिक, मानसिक आरोग्य ठेवतो वआत्म्याचीही उन्नती करतो. दहशतवादी कारवाया अगर शत्रूंच्या आक्रमणाला मात्र परीषह मानून कर्मनिजरेचे साधन मानणे भयंकर घातक ठरेल. राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांसाठी व्यवहारनयाने राष्ट्रीय अस्मिताच योग्य ठरेल ! ११) नि:शल्यीकरण : कोणतेही व्रत ग्रहण करण्यापूर्वी मानसिक शल्ये दूर करणं अत्यावश्यक आहे असे जैन दर्शनाचे प्रतिपादन आहे. ही एक प्रकारची शल्यक्रिया म्हणजे सर्जरीच आहे. कपट, ढोंग, अंधविश्वास, एकमेकांविषयीचे गैरसमज, किंतु त्याचे द्वेषात झालेले रूपांतर, या सर्वांमुळे आपली मनं नेहमी टाचणीघरासारख्या pin-holder) अवस्थेत असतात. ख्रिश्चन धर्मात confession ritual यासाठीच आहे. महाभारतात, भीष्मांचा “शरपंजर” मला कायम या शल्योद्धाराची आठवण करून देत आला आहे. १२) स्त्रियांना असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्थान : जैन आगमात, २६०० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या अनेक स्त्रियांचे यथार्थ दर्शन घडते. पुरुष आचार्यांनी हजारो वर्षे तोंडी परंपरेने जपलेल्या या आगमांमधून इतक्या प्रभावी स्त्रियांचे कार्य आपल्यापर्यंत पोहोचले आहे. तीर्थंकरमल्ली, साध्वी राजीमती, आर्या चंदना, राणी कमलावती, कनकध्वज राजाची पत्नी पद्मावती, थापत्या गृहपत्नी, शंख श्रावकाची पत्नी उत्पन्न, जिज्ञासू श्राविका जयंती, स्पष्टवक्ती अग्निमित्रा, भातशेतीत प्रवीण व अर्थसल्लागार स्नुषा रोहिणी, १८ देशी भाषात विशारद अशा देवदत्ता, अनंगसेना, कामध्वजेसारख्या गणिका असंख्य कर्तृत्ववान् स्त्रिया आहेत या आगम व आगमटीकाग्रंथांमध्ये ! हे स्थान त्यांनी मिळविले आहे आपल्या चारित्र्याच्या व कौशल्याच्या बळावर ! जै धर्मात असलेले हे स्त्रियांचे स्थान आधुनिक स्त्री चळवळींनाही स्फूर्तिप्रद ठरेल ! ... उपसंहार : वरील १२ मुद्दे केवळ दिग्दर्शनाखातर आहेत. या दर्शनातील जवळजवळ सगळ्याच गोष्टी सदासर्वकाळ स्वीकारणीयच आहेत. सर्वात महत्त्वाचा आहे प्रत्येकानं स्वयंप्रेरणेनं केलेला अभ्यास व त्यातून होणारी 'स्वसामर्थ्याची जाणीव' ! जय जिनेंद्र ! जय भारत !! ********** Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ १९. जैन आणि हिंदू धर्म : साम्य-भेदात्मक निरीक्षणे (ब्रह्ममहतिसागर जैन साहित्य संशोधन केंद्र : दहिगांव आणि जैन अध्यासन पुणे विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने __ आयोजित चर्चासत्रात वाचलेला शोधनिबंध, मार्च २०१०) लेखक : डॉ. अनीता बोथरा मार्गदर्शक : डजें. नलिनी जोशी प्रस्तावना: 'जैन व वैदिक परंपरा : साम्य-भेदात्मक निरीक्षणे', हा विषय एका मोठ्या प्रबंधाचाच विषय आहे. तथापि सुमारे गेल्या १५ वर्षातील वाचन व चिंतनातून, जैन व वैदिक परंपरा यांच्या साम्य-भेदांवर आधारित, जी निरीक्षणे डोळ्यासमोर आली, ती संक्षेपाने एकत्रित नोंदविण्यासाठी, हा शोधलेख लिहण्याचा प्रयास केला आहे. गेली किमान पाच वर्षे तरी, भारतभरातल्या अनेक सेमिनार आणि कॉन्फरन्सेसला जाऊन, जैन आणि वैदिक परंपरांमधील मुद्यांवर आधारित असे, तौलनिक शोधलेख प्रस्तुत केले. त्यावेळी असा अनुभव आला की, वैदिक, हिंदु व ब्राह्मण या तीनही शब्दांवर, अनेकदा आक्षेप घेतले गेले. जैन, बौद्ध आणि आजीवक या तीन विचारधारा, निश्चितपणे श्रमण परंपरेच्या मानल्या जातात. त्या सोडून वेदांपासून चालू होऊन ब्राह्मण, आरण्यक, उपनिषदे, रामायण, महाभारत, सहा दर्शने आणि शैव, वैष्णव इ. संप्रदाय, या सर्वांना एका विचारधारेत गुंफून, त्याला आम्ही वैदिक, हिंदू व ब्राह्मण संप्रदाय असे संबोधतो. साम्य-भेदात्मक निरीक्षणे * प्रवृत्तिपरकता आणि निवृत्तिपरकता * अतिशय साकल्याने अर्थात् संग्रहनयाने विचार केल्यास, जैन परंपरा व एकंदरीतच श्रमण परंपरा या, निवृत्तिगामी आणि वैराग्य व तपाला प्राधान्य देणाऱ्या आहेत. वैदिक परंपरा प्राधान्याने, प्रवृत्तिगामी आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य देणारी आहे. जैन परंपरेने नेहमीच साधुधर्म हा प्रधान मानून, अग्रस्थानी ठेवला आहे. अमृतचंद्राचार्यांनी यावर 'पुरुषार्थसिद्धयुपायात' चांगलाच प्रकाश टाला आहे. याउलट वैदिकांचे स्मृति इ. आचारविषयक ग्रंथ प्रामुख्याने गृहस्थधर्मालाच केंद्रस्थानी ठेवतात. जैन परंपरेत श्रावकाचार अर्थात् गृहस्थाचार देखील विस्ताराने सांगितला आहे. तरीही श्रावकाच्या प्रत्येक व्रतांमध्ये परिणाम अर्थात् मर्यादेला महत्त्व दिले आहे.४ वैदिक परंपरेतही तत्त्वचिंतनाला प्राधान्य देणारी उपनिषदे आणि संन्यासधर्माचे विवेचन करणारे ग्रंथ अर्थातच आहेत. तरी बहुसंख्येने असलेल्या गृहस्थांसाठी यज्ञ, पूजा-अर्चा, सण-वार, व्रत-वैकल्य यांच्या रूपाने एकंदर आचारातून प्रवृत्तिप्रधानतेचाच ठसा उमटतो. * कालानुरूप बदल * वैदिक परंपरेतील दैवतशास्त्राकडे नजर टाकली तर असे दिसते की, ऋग्वेदापासून ते उत्तरकालीन पुराणांपर्यंत त्यांचे दैवतशास्त्र विकसित होत राहिले. इंद्र, वरुण, रुद्र, विष्णु, उषा अशा वैदिक देवतांपैकी काही लोप पावत्या तर काहींचे व्यक्तिमत्व वेगवेगळे अंश मिसळून बदलत गेले. म्हणूनच वेदातील शिपिविष्ट 'विष्णु' हा, पुराणातील अवतारधारी विष्णुपेक्षा पूर्णत: बदलून गेलेला दिसतो. त्याचप्रमाणे ऋग्वेदामध्ये वादळी वाऱ्यांची देवता असलेले Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ 'रुद्र' हे, कालांतराने कैलासनिवासी शंकराचे पर्यायवाची नाव झाले.५ दैवत शास्त्राचे जसे बदलते स्वरूप दिसते, तसे यज्ञ संकल्पनेचेही बदलते स्वरूप आपल्याला वैदिक परंपरेत दिसते. आज ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो, तो स्पष्टतः देवीदेवतांच्या उपासनांवर आधारित असा भक्तिप्रधान धर्म आहे व तो अनेक संप्रदायांनी युक्त आहे. कालानुरूप बदल व परिवर्तने करून, जास्तीत जास्त लोकांना एकत्रितपणे टिकवून धरण्याचे काम, वैदिक परंपरेने केलेले दिसते. जैन परंपरेतही कालानुरूप परिवर्तने तर दिसतात पण षद्रव्ये, नवतत्त्वे, कर्मसिद्धांत, अनेकांतवाद आणि साधु व श्रावकाचार या मूळ गाभ्याला प्रदीर्घ कालावधीतही धक्का लागला नाही. परिवर्तने होत गेली तरी ती जैन परिभाषेत मांडायची झाली तर, पर्यायात्मक परिवर्तने आहेत द्रव्यात्मक नाहीत. पार्श्वनाथप्रणित चातुर्यामधर्म महावींनी पंचयाम केला. संघात सचेलक व अचेलक दोहोंनाही स्थान दिले. आजघडीला मंदिरमार्गी जैनांवर स्पष्टत: हिंदुधर्माच्या पूजाविधीचा प्रभाव दिसतो. तरीही षद्रव्ये, नवतत्त्वे इ. वरील सर्व मुद्दे अबाधित राहिले आहेत. पूजास्थानी आदर्शत् म्हणून वीतरागी जिनांचीच स्थापना केली जाते. बदलत्या काळानुसार सर्वस्वी वेगवेगळी नवीन आराध्य दैवते निर्माण झाली नाहीत. * मोक्ष व मोक्षमार्ग * ___ वैदिक परंपरा असो अथवा जैन परंपरा असो, दोन्ही भारतीय संस्कृतीचीच अपत्ये असल्याने, त्यांमध्ये नातिपालनाइतकेच (ethics) आध्यात्मिकतेलाही (spiritualism) महत्त्व राहिले. त्यामुळे दोहोंनीही मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय मोक्षच मानले. परंतु यातही फरक असा आहे की, जैन परंपरेने प्रारंभीपासूनच मोक्ष पुरुषार्थाला अधेखित केले आहे तर अभ्यासक असे म्हणतात की, धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांनाच वैदिक परंपरेत आरंभी प्राधान्य होते. श्रमण परंपरेच्या प्रभावानेच मोक्ष हा पुरुषार्थ, महाभारत काळापासून प्रामुख्याने नजरेसमोर आला. सांख्यमार्ग अथवा ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, निष्कमकर्मयोगमार्ग अथवा ध्यानमार्ग अशी मोक्षाकडे नेणाऱ्या मार्गांची विविधता आणि त्यांची स्वतंत्रता, हे वैदिक परंपरेचे वैशिष्ट्य आहे. भगवद्गीतेतील अध्यायांच्या नावांवरूनसुद्धा हे स्पष्ट होते. जैन परंपरेने मात्र आरंभापासूनच 'सम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः ।' हे सूत्र स्वीकारले. परंतु हे तीन वेगवेगळे मार्ग नसून, तिन्हींची समन्वित आराधनाच मोक्षमार्गात अपेक्षित आहे, असे प्रतिपादन केले आहे. * ईश्वर संकल्पना* वैदिक परंपरेतील विविध ग्रंथात, ईश्वर संकल्पनेविषयी संभ्रमावस्था दिसते. वेदात देवदेवता असल्या तरी त्यांना नक्की देव अथवा ईश्वर असे संबोधित केलेले नाही. ब्राह्मणग्रंथात अनेकदा 'यज्ञो वै देवः' असे वर्णन दसते. 'कस्मै देवाय हविषा विधेम ?' असाही प्रश्न उपस्थित केलेला दिसतो. रामायण व महाभारताच्या अखेरच्या भागात, त्यांना देवत्व आलेले दिसते. पुढे पुराणकाळात तर त्यांची अवतारातच गणना झाली. सांख्य दर्शनात पुरुषांचे असंख्यत्व सांगितले असले तरी, ईश्वराला स्वतंत्र स्थान नाही. योगदर्शनात मात्र ‘क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः । ११ अशी ईश्वराची व्याख्या दिली आहे. पण ते एक की अनेक याबाबत योगदर्शन मौन पाळते. __ वैदिक परंपरेतील पुराण ग्रंथात उत्पत्ती, स्थिती व प्रलयाचे प्रवर्तक असे तीन देव मानलेले दिसतात. आज प्रचलित हिंदुधर्मात ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. __जैन परंपरेने आरंभापासूनच सृष्टीच्या कर्ता-धर्ता-विनाशका ईश्वराची संकल्पनाच मानलेली नाही. सृष्टीला अनादि-अनंत मानून, जीवांचे नियंत्रण करणारे तत्त्व म्हणून, कर्मसिद्धांताला अग्रस्थानी ठेवले आहे. जैन परंपरा अंतिम शुद्ध अवस्था प्राप्त केलेल्या सर्व जीवांना, परमात्मा अथवा ईश्वर या नावाने संबोधते. पण हे ईश्वर सृष्टीची उत्पत्ती, पालन इ. कशामध्येही सहभाग घेत नाहीत. त्यांचे चैतन्यमय अस्तित्व मात्र सतत असते. Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ एकंदरीत वैदिक परंपरेत ईश्वर संकल्पनेविषयीची जी संभ्रमावस्था दिसते ती जैन परंपरेत दिसत नाही. कारण जैन परंपरेने देवलोकातील देव व मोक्षगामी परमात्मा या दोन्हीही सर्वथा वेगळ्या मानल्या आहेत. * कर्मसिद्धांत दोन्ही परंपरांनी कर्मसिद्धांताला महत्त्व दिले आहे. परंतु जैन परंपरेत त्याचे विश्लेषण व उपयोजन अतिशय सुसंबद्धपणे, तार्किकतेने व विस्ताराने केले आहे. वैदिक परंपरेत संचित, प्रारब्ध व क्रियमाण हे तीन शब्द मुख्यतः येतात. १२ भगवद्गीतेत कर्म, विकर्म आणि अकर्म या शब्दांचा वारंवार उपयोग केला आहे. १३ पण त्यातून कर्मसिद्धांताचे एकत्रित चित्र व स्वरूप मुळीसुद्धा स्पष्ट होत नाही. याउलट षट्खंडागमासारख्या प्राचीनतम ग्रंथातून, कर्मसिद्धांताच्या विवेचनाला सुरवात होऊन, पुढे पुढे दिगंबर व श्वेतांबर दोघांनीही यावर आधारित असे स्वतंत्र कर्मग्रंथच निर्माण केले. किंबहुना जैन साहित्यात कर्मसाहित्याची एक शाखाच निर्माण झाली. जैन दर्शनात असलेली सात तत्त्वांची साखळी, कर्मांच्या आधारेच जोडलेली आहे. जीव व अजीव यांच्या संयोग व वियोगाने कर्मांचा आस्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष होत असतो. जैन सिद्धांतानुसार प्रत्येक जीव हा, आपापल्या प्रत्येक कर्माचा कर्ता व भोक्ता असल्यामुळे, त्यात मध्यस्थी करणाऱ्या ईश्वराला कोणतेही स्थान नाही. 'त्यामुळे साहजिकच कर्मसिद्धांत अधिकाधिक पल्लवित झाला. १४ * पूर्वजन्म व पुनर्जन्मविषयक धारणा दोन्ही परंपरेत या धारण समान असल्या तरी, जैन परंपरेवर यांचा पगडा इतका दृढ आहे की, प्रत्येक जैन चरितग्रंथात आणि कथाग्रंथात अनिवार्यपणे पूर्वभवांचे व पश्चात्भवांचे वर्णन येतेच. कर्मसिद्धांत अग्रभागी असल्यमुळे पूर्वभव व पश्चातभवांचे वर्णन हा कथांचा अविभाज्य भाग ठरला. याउलट पूर्वजन्म व पुनर्जन्म मानले असले तरी वैदिक परंपरेतील कथाप्रधान ग्रंथांमध्ये पूर्वभव व पश्चात्भव यांच्या चित्रणावर भर दिलेला दिसत नाही. * दान संकल्पना * वैदिक व जैन दोन्ही परंपरेतील दान संकल्पनेत साम्य असूनही त्यांचे अविष्कार मात्र आपापल्या सिद्धांतांना अनुसरून वेगवेगळे झाले आहेत. दोन्ही परंपरेत दान हे धर्माचे आणि पुण्यप्राप्तीचे साधन आहे. दानाने मिळणारे जास्तीत जास्त फळ हे स्वर्गप्राप्ती आहे. नित्यदानाचे महत्त्व दोन्ही परंपरांमध्ये दिसते. परंतु नैमित्तिक आणि यदानांचा विचार ब्राह्मण परंपरेत दिसतो. ब्राह्मण परंपरेत 'ज्ञानदानाला' एक विशिष्ट पवित्र दर्जा दिलेला दिसतो. जैन परंपरेत 'अहिंसा' व सर्वजीवरक्षणाच्या भावनेतून 'अभयदानाचा' महिमा वर्णिलेला दिसतो. 'ग्रहण, पर्वकाळ, श्राद्ध, तीर्थक्षेत्र इ. प्रसंगी विशेष दान करावे', असे निर्देश ब्राह्मण परंपरेत आढळतात. तीथींचे व क्षेत्रांचे पावित्र्य, पितृलोक आणि तर्पण इ. संकल्पना जैन शास्त्रात बसत नसल्यामुळे, सागारधर्मामृतकाराने अशा प्रकारच्या दानांचा स्पष्टपणे विरोध केला आहे. जैन परंपरेने दान संकल्पनेला केवळ पुण्य संकल्पनेपर्यंत मर्यादित ठेवलेले नाही. दानाला सैद्धांतिक आधारही दिले. सम्यक्त्वाच्या आठ अंगामध्ये वात्सल्य व प्रभावनेच्या रूपाने १५, श्रावकाचारात अतिथीसंविभागव्रताच्या रूपानेद्द्, साधुआचारात उपदेशरूपाने ७, दान - शील-तप-भाव या चतुष्टयीतून धर्माच्या व्यावहारिक रूपाने“, प्रत्याख्यानाच्या क्रियेमध्ये अभयदानाच्या रूपानें, आठकर्मातील वेदनीय, अंतराय व तीर्थंकरनामकर्माच्या रूपाने २० जैनसिद्धांत व आचारात दानाचे असलेले अनन्य साधारण स्थान स्पष्ट दिसते. परिणामी अहिंसा व तपाइतकेच, दान हेही जैन परंपरेचे वैशिष्ट्य बनले. Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ * व्रतविचार * वैदिक परंपरेत ऋग्वेद काळात, 'धार्मिक अथवा पवित्र प्रतिज्ञा किंवा आचारणसंबंधी निबंध', या अर्थाने 'व्रत' शब्दाचा प्रयोग होत होता. ब्राह्मणग्रंथात 'व्यक्तीचा विशिष्ट वर्तनक्रम अथवा उपवास', या दोन्ही अर्थांनी 'व्रत' शब्द येऊ लागला.२२ स्मृतिग्रंथात प्रायश्चित्ताचे विधान' व्रतरूपाने आले.२३ पुराणग्रंथात तिसऱ्या-चौथ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत, व्रतांचे स्वरूप व उद्देश बदलत गेले व संख्या वृद्धिंगत होत गेली. व्रतांच्या मूळ अर्थांमध्ये संकल्पित कृत्य, संकल्प, प्रतिज्ञा व इच्छा हे अर्थ जोडले गेले. त्यामुळे व्रतांना ऐहिकता, काम्यता प्राप्त झाली. व्रते करण्यास स्त्रियांना व निम्न वर्णियांनाही स्थान मिळाले. ही व्रते अत्यंत आकर्षक स्वरूपाची होती. जैनधर्मात आगमकाळापासून ‘व्रत' शब्दातील ‘वृत्' क्रियापदाचा अर्थ मर्यादा घालणे, नियंत्रण करणे, रोकणे, संयम करणे असा होता. म्हणूनच जैन परंपरेत व्रतासाठी विरति, विरमण असे शब्द येतात. याच अर्थाने जैनांनी पूर्ण विरतीला ‘महाव्रत' व आंशिक विरतीला 'अणुव्रत' म्हटले आहे.२६ ही व्रते प्रासंगिक नसून आजन्म परिपालन करण्याची आहेत. हिंदुधर्मामध्ये पौराणिक काळात जसजसे व्रतांचे स्वरूप बदलत गेले, तसतसा जैन समाज व विशेषत: महिलावर्ग, त्याकडे आकृष्ट होऊ लागला असावा. त्यामुळे अकराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत, जैनसमाजातही आचार्यांनी विधि-विधानात्मक व्रतांचा प्रचार केला. जैनांच्या दोन्ही संप्रदायात प्रतिमा, पूजा, विधिविधाने, प्रतिछा, यंत्र-मंत्र इ. चा समावेश झाला. परिणामी लोकाशाहसारख्या श्रावकास, मूर्तिपूजेविरूद्ध स्थानकवासी संप्रदाय स्थापन करण्याची प्रेरणा झाली. हिंदू आणि जैन समाज सतत संपर्कात असल्यामुळे, त्यांच्यामध्ये अनेक गोष्टींचे आदान-प्रदान कसे होते गेले असावे, यावर वर वर्णन केलेला व्रतांचा इतिहास, हे एक बोलके उदाहरण आहे. * समाधिमरण * प्रायोपवेशन किंवा संजीवन समाधी इ. नावांनी धार्मिक मरणाचा स्वीकार करणे, हे हिंदुपरंपरेला काही नवीन नाही. तथापि हिंदू वातावरणात असे मरण स्वीकारल्याची उदाहरणे अगदी मोजकी आढळतात. शिवाय ह्या मरणासाठी स्वीकारलेल्या प्रक्रियेचा, विशेष बोध करणारे साहित्य निर्माण झालेले दिसत नाही. __ जैन परंपरेत आगमकाळापासून मृत्युविचाराला विशेष स्थान दिसते. भगवती आराधनेसारख्या दिगंबरग्रंथात आणि श्वेतांबरांच्या अनेक प्रकीर्णकात संलेखना, संथारा, समाधिमरण, पंडितमरण, अंतिम आराधना अशा विविध प्रकारे संथाऱ्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. साधु व गृहस्थ दोघांनीही केलेल्या संथाऱ्याचा स्वीकार आणि आजही या प्रथेचे असलेले प्रचलन, हे हिंदूंपेक्षा असलेले वेगळेपणच मानावे लागेल. * कर्मक्षयाचा विचार * भवकोटी संचित कर्मांचा या मानवी आयुष्यात, आपण आपल्या प्रयत्नाने क्षय करावयाचा आहे, ही संकल्पना दोन्ही परंपरेत दिसते. संचित कर्मे पुष्कळ असल्यामुळे व वेगवेगळ्या वेळी कर्मबंध झाल्यामुळे त्यांच्या क्षयाचा एक विशिष्ट क्रम सांगणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू परंपरेतील ग्रंथ ही अपेक्षा पूर्ण करीत नाहीत. 'ज्ञानाग्निः सकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।२८ हे विवेचन कर्मक्षयाबाबत पुरेसे ठरत नाही. जैन परंपरेने या कर्मक्षयाला 'निर्जरा' या नावाने तात्विक दर्जा दिला आहे.२९ म्हणून निजरेची व्याख्या, निर्जरेचे प्रकार,३१ निजरेचे अधिकारी,३२ संवरयुक्त तपाने होणारी निर्जरा,३३ गुणस्थान व निर्जरा,४ समुद्घात व निर्जरा,५ निर्जरेचा क्षपणविधि अशा प्रकारे केलेला विविधांगी विचार हे जैन परंपरेचे वैशिष्ट्य ठरले. Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ * समन्वयवादी दृष्टिकोण * नयवाद, स्याद्वाद, अनेकान्तवाद आणि समन्वयवाद हे जैन अभ्यासकांच्या मते, जैन परंपरेचे वैशिष्ट्य आहे. सर्व दार्शनिक प्रवाहांना जैनांनी एकेक नय स्पष्ट करणारा वाद म्हणून सामावून घेतले. 'ऋषिभाषिता'सारख्या ग्रंथात हिंदू आणि बौद्ध विचारवंतांचाही गौरव केला. सामान्य जीवन आणि अध्यात्म यांचा समन्वय व्यवहारनय आणि निश्चयनय सांगून केला. कार्य-कारण भावाचे स्पष्टीकरण देत असताना, कोणतेही कार्य स्वभाववाद, कालमद, पौरुषवाद, कर्मवाद व नियतिवाद या पाचांच्या समन्वयाने होते, असे सांगितले. जैनांचा उदारमतवाद दर्शविणारी अनेक उदाहरणे अशाप्रकारे देता येतील. परंतु याच बरोबर असेही लक्षात ठेवले पाहिजे की वैदिक म्हणा, ब्राह्मण म्हणा अथवा हिंदू म्हणा या परंपरेनेही तडजोड, बदल, परिवर्तने काळाच्या ओघात स्वीकारलेली दिसतात. ऋषभदेवांना आणि गौतमबुद्धांना पुराणांनी अवतारपद दिले. पशुबलीप्रधान यज्ञ कालांतराने हिंसारहित बनले. स्वाध्याय, ज्ञान, तप इ. ना यज्ञाचा दर्जा दिला.३८ शंकराचार्यांसारख्या अद्वैत वेदांताने प्रातिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा तीन सत्तांचा सिद्धांत मांला. कोणतेही कार्य पाचांच्या समवायाने होते, हे विधान तर भगवद्गीतेत जसेच्या तसे आहे.३९ वेदांपासून आरंभ झालेली ही परंपरा, प्रथम ब्राह्मण परंपरा म्हणून परिवर्तित झाली व नंतर तीच पुराणकाली भक्तिप्रधान झाली. म्हणजे द्रव्य-क्षेत्र-काल-भावाचा सिद्धांत फक्त जैनांनीच मांडला, असा अभिनिवेश सोडून देणे आवश्यक आहे. आता एकगोष्ट मात्र खरी की, कोणतेही विधान फक्त विशिष्ट अपेक्षेनेच सत्य असते, असे म्हणून आणि सद्वस्तूला अनंत धर्मात्मक मानून जैनांनी सापेक्षतावाद आणि अनेकांतवाद, सैद्धांतिक रूपाने यथार्थतेने मांडला. त्यासाठी ‘आइनस्टाइन' सारख्या वैज्ञानिकानेही जैनांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.४० यातील खरी मेख अशी आहे की, या सापेक्षतावादात दडलेली वैज्ञानिक समीकरणे व सूत्रे जैनही तयार करू शकले नाहीत व हिंदूही तयार करू शकले नाहीत. * स्त्रीविषयक दृष्टिकोण * मध्ययुगापर्यंतच्या काळात हिंदुधर्मात व समाजात, स्त्रियांचे स्थान अतिशय दुय्यम होते, असे अभ्यासक म्हणतात. जैन धर्माने प्रथमपासूनच साधुंबरोबर साध्वींना व श्रावकांबरोबर श्राविकांनाही संघात स्थान दिले. शिवाय बोलीभाषेत उपदेश देऊन, स्त्रियांनाही समजू शकेल अशा भाषेत धार्मिक कार्य केले. महावीरांचे चरित्र लिहताना अनेकांनी नारि जाती के उद्धारक' असा त्यांचा गौरव केलेला दिसतो. पण याबाबत असे म्हणावेसे वाटते की, महावीरांचे हे कार्य धार्मिक आणि आध्यात्मिक बाबतीत होते. आणि त्यातही कुंदकुंदांसारख्या दिगंबर आचार्यांनी स्त्री जन्मातून स्त्रीला मोक्ष नाही असेही नोंदविले आहे. जैन स्त्रीची कौटुंबिक आणि सामाजिक स्थिती मात्र भारतल्या हिंदू स्त्रीसारखीच होती. साध्वींना जरी धर्मात स्थान होते तरी साधूंच्या तुलनेने साध्वींना नेहमीच दुय्यम स्थानावर ठेवले गेले. आजतागायत साध्वींना दुय्यम लेखण्याची ही स्थिती कायम आहे. उत्तराध्ययनासारख्या अर्धमागधी ग्रंथात स्त्रीलिंगसिद्धा, पुरुषलिंगसिद्धा, नपुंसकलिंगसिद्धा असे उल्लेख येणे, ज्ञाताधर्मकथासारख्या ग्रंथात ‘मल्ली' ही स्त्री तीर्थंकर असणे,४२ जयंतीसारख्या बुद्धिमती श्राविकेचा सन्मानपूर्वक उल्लेख असणे, इ. उल्लेखांवरून असे म्हणावेसे वाटते की, आगमांमध्ये जैन स्त्रीचे स्थान दुय्यम असले तरी समकालीन हिंदू अगर बौद्ध स्त्रीपेक्षा त्यामानाने बरेच श्रेष्ठ होते. * यज्ञ संकल्पना * जैन ग्रंथात येणाऱ्या यज्ञविरोधी धोरणात, काळानुसार स्थित्यंतरे येत गेली, असे दिसून येते. आगमकाळात यज्ञाला स्पष्टत: विरोध न करता, हिंसा-अहिंसेच्या विवेचनातून तो व्यक्त होतो. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत, सर्व प्रकारच्या यज्ञांना होणाऱ्या विरोधाची धार, हळुहळू अधिकाधिक तीव्र होत गेली. धर्मोपदेशमालाविवरण ग्रंथात, यज्ञाला स्पष्टत: नरकगतीचे कारण मानले आहे. ४४ हिंसक यज्ञाच्या विरुद्ध दिलेल्या या तीव्र प्रतिक्रियांमुळे, ब्राह्मण परंपरेला यज्ञाचा पुनर्विचार करावा लागला. हिंसक यज्ञाचे प्रचलन कमी कमी होऊ लागले. यज्ञचक्रप्रवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या भगवद्गीतेलाही, द्रव्ययज्ञाबरोक्य ज्ञान, स्वाध्याय, तप इ. ची गणना यज्ञात करावी लागली. दहाव्या शतकानंतर ब्राह्मणधर्माच्या प्रभावाने, यज्ञपद्धती पूजारूपात व क्रियाकाण्डात्मक रीतीने जैनधर्मात येऊ लागली. आजही जैनांमध्ये मोठ्या प्रमाणात यज्ञाचे आयोजन होत नसले तरी छोटे होम, गृहस्थांच्याद्वारे केले जातात. शिवाय हिंदू धर्माच्या सानिध्याने विवाह प्रसंगी अमिहोम केला जातोच. अशा प्रकारे जैन व हिंदू समाजात अनेक बाबतीत आचाराचे आदान-प्रदान चालू असलेले दिसते. * अवतारवाद अवतारवाद प्रामुख्याने हिंदू पुराणग्रंथात स्पष्टपणे मांडला गेला. 'भगवान विष्णूने साधूंच्या परित्राणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी अवतार घेणे आणि अवतार कार्य संपताच निजधामी परत जाणे', ४५ ही संकल्पना पुराणांनी हिंदू मनात खोलवर रूजवली. जैन परंपरेत मात्र सर्व तीर्थंकर, जिन, केवली हे मनुष्ययोनीत जन्मतात व स्वत:च्या आत्मिक विकासाने निर्वाणपदास जातात. सिद्धगतीत गेल्यावर हे जीव पुन्हा जगाच्या अनुकंपेने परत भूतलावर अवतरत नाहीत. बौद्धधर्म हा स्वतंत्रधर्म असूनही, गौतमबुद्धांना पुराणांनी दहा अवतारात स्थान दिले. त्याची कारणे काहीही असोत. महावीरांचा मात्र हिंदुग्रंथात विशेषतः पुराणात, कोठेही नामनिर्देश सुद्धा नाही. भागवतपुराणात ऋषभदेवंचा २४ अवतारात समावेश केला गेला, कारण त्यांची प्रवृत्तिपरकता आणि एकंदर जीवनक्रम पुराणकारांना हिंदुधर्मासारखा वाटला असावा. भगवान महावीरांना मात्र पौराणिकांनी आपलेसे केले नाही. याचाच अर्थ असा की, महावीरवाणीतू प्रकट होणारी विचारधारा, पौराणिकांना मानवली नसावी. शिवाय महावीरांचा दृष्टिकोण टीका व उपहासात्मक नसल्यामुळे, त्यांना ते दखलपात्र वाटले नसावेत. शिवाय ज्या काळात गौतमबुद्धाला अवतार म्हटले गेले, त्याकाळात बौद्धधर्माचा प्रसार अधिक झाला असावा. ऋषभदेवांचा अवतारात समावेश असणे व महावीरांचा अवतारात समावेश नसणे, यातील कोणती गोष्ट श्रमणधर्माच्या स्वतंत्रतेला पोषक आहे व कोणती पोषक नाही, हा विचार करण्यायोग्य मुद्दा आहे. * पितर संकल्पना पितर, पिंड, श्राद्ध इ. संकल्पना वैदिक परंपरेत, ऋग्वेदापासून सर्व वेद, तैत्तिरीय ब्राह्मण व आरण्यक, छांदोग्यासारखी उपनिषदे, मनु, याज्ञवल्क्य इ. स्मृतिग्रंथ, कौटिलीय अर्थशास्त्र, रामायण, महाभारत, जवळजवळ सर्व पुराणे आणि पूर्वमीमांसा दर्शन या सर्वांमध्ये दिसून येते. श्राद्धविधिविषयक स्वतंत्र ग्रंथनिर्मितीही झालेली दिसते. भारतातल्या सर्व प्रदेशात, सर्व जातिजमातींमध्ये पितर संकल्पना आणि त्याच्याशी जुळलेले श्राद्ध इ. विधी केले जातात. जैन परंपरेने हिंदू संस्कार, व्रतवैकल्य, पूजाअर्चा हे सर्व विधी थोड्याफार फरकाने आत्मसात केले असले तरी, पितर संकल्पना ही जैन सिद्धांताच्या पूर्ण विपरीत असल्याने स्वीकारली नाही. जैन दार्शनिक मान्यतेनुसार मनुष्यगतीतील जीव पुढील जन्मात देव, मनुष्य, नारकी किंवा तिर्यंच कोणत्याही रूपाने आपल्या कर्मानुसार जन्मते. शिवाय वर्तमान जन्म व पुढचा जन्म यामध्ये फक्त काही समयाचेच (क्षणाचे) अंतर असते. त्यामुळे मधील काळात पितृलोक नावाच्या ठिकाणी वसती करणे इ. संकल्पना, जैन दर्शनात बसत नाही. द्रव्य-क्षेत्र - काल-भाव-भव अशा पंचविध संसारात, प्रत्येक जीव इतर जीवांच्या अनेक वेळा संपर्कात येऊन, क्रमाक्रमाने माता-पिता-पुत्रकन्या इ. झालेला आहे.४७ हिंदू दृष्टीने ज्या तीन पिढ्यातील पितरांना तर्पण इ. केले जाते, ते जीव जैन दृष्टीने केव्हाच Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ वेगवेगळ्या गतीत जन्मलेले असतात. अशा परिस्थितीत कोणाला आपले पितर मानून श्राद्ध, तर्पण अथवा पिंड प्रदान करणार ? असा कळीचा मुद्दा आहे. * पंचमहाभूते व पाच एकेंद्रिय जीव * वैदिक मान्यतेनुसार पृथ्वी, अप, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. ती जड अर्थात् निर्जीव आहेत.४८ तैत्तिरीय उपनिषदात त्यांचा एक विशिष्ट क्रम सांगितला आहे. तो असा - आत्मन: आकाश: संभूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्निः । अग्नेरापः । अभ्यः पृथिवी । पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात्पुरुषः ।४९ सांख्यदर्शनात प्रकृति, महत्, अहंकार, पंचतन्मात्रे व क्रमाक्रमाने पंचमहाभूते असा क्रम वर्णिला आहे.५० जैन परंपरेला हा दृष्टिकोण सर्वथा अमान्य आहे. त्यांनी पृथ्वीकायिक, अप्कायिक, तेजस्कायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक यांना एकेंद्रिय जीव मानले आहे. पहिला फरक असा की हे जड नाहीत. दुसरा फरक असा की आकाश हे जड म्हणजे अजीव आहे. परंतु त्याची गणना षद्रव्यांमध्ये केली आहे.५१ वनस्पतिकायिकाला पृथ्वी इ. चारांच्या जोडीने एकेंद्रिय मानले आहे. शिवाय चैतन्यमय आत्म्यापासून, चेतनाहीन पंचमहाभूते निर्माण होण्याचा वैदिकांवर असलेला अतयं प्रसंग, जैनांनी टाळला आहे. पृथ्वी इ. ना एकेंद्रिय मानल्यामुळे, अहिंसा तत्त्वाला भक्कम आधार मिळाला आहे. त्यामुळे जैनधर्म पर्यावरण रक्षणालाही अनुकूल बनला आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी परमेश्वराचे अस्तित्व मानण्यापेक्षा, जैनांनी खरोखरीचे चैतन्यरूपच त्यांच्याठिकाणी कल्पिले आहे. * पाण्याचा वापर * स्नान, संध्या, पूजा, स्वच्छता, पाण्यात उभे राहून केलेली पुरश्चरणे हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे. याउलट पाणी हे एकेंद्रिय जीव असल्याने, त्याचा अगदी गरजेपुरता, कमीत कमी वापर, हे जैन आचाराचे वैशिष्ट्य दिसते. त्यामुळे अर्थातच पाण्यात निर्माल्य अथवा अस्थींचे विसर्जन जैन आचाराच्या चौकटीत बसत नाही. 'पाण्याने शुद्धी मिळत असती तर सर्व जलचर जीव केव्हाच स्वर्गात पोहोचले असते', असे उपहासात्मक उद्गार, ‘सूत्रकृतांगा'सारख्या प्राचीन अर्धमागधी ग्रंथातही आढळतात.५२ * विज्ञानानुकूलता * प्राचीन जैन प्राकृत ग्रंथात, त्या काळाच्या मानाने कितीतरी प्रगत वैज्ञानिक धारणा आढळून येतात. उदा. षद्रव्यांमधील धर्म, अधर्म या द्रव्यांमध्ये अपेक्षित असलेली गुरुत्वाकर्षण शक्ती ; एका परमाणूवर राहणारे चार गुण, त्यांचे उपप्रकार व त्यातून निष्पन्न होणारी मूलद्रव्यांची संख्या ; तिर्यंचगतीच्या विवेचनात अंतर्भूत असलेला वनस्पतिविचार, प्राणिविचार व पक्षीविचार ; ध्वनी अर्थात् शब्दाला आकाशाचा गुण न मानता पौद्गलिक मानणे - हे सर्व विचार वस्तुतः आजच्या विज्ञानालाही त्यामानाने कितीतरी अनुकूल आहेत. अभ्यासक हेही मान्य करतात की जैनांचा पुद्गल व स्कंध विचार कणादांच्या परमाणूवादापेक्षा अर्थात् वैशेषिकांच्या परमाणूवादापेक्षा खचितच श्रेष्ठ आहे. हीच गोष्ट इतरही उदाहरणांबाबत सांगता येईल. प्रयोगशील विकासाची जोड या विचारांना न मिळायामुळे, प्रगत शास्त्रनिर्मितीची संभावना असूनही, जैन परंपरेत त्या त्या प्रकारची विज्ञाने निर्माण होऊ शकली नाहीत. याउलट आयुर्वेद, खगोल, भूगोल, ज्योतिष, गणित, परमाणुवाद, अर्थशास्त्र अशी शास्त्रे वैदिक परंपरेत तयार झाली व तत्कालीन शिक्षण पद्धतीत अंतर्भूतही झाली. * पुरुषार्थविचार * ___प्राच्यविद्यांचे अभ्यासक साक्षेपाने नोंदवतात की, प्रवृत्तिपर वैदिक परंपरेत आरंभी धर्म, अर्थ व काम हे तीनच Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ पुरुषार्थ होते. निवृत्तिवादी श्रमण परंपरांच्या प्रभावाने 'मोक्ष' हा चौथा पुरुषार्थ त्यात दाखल झाला. ५३ वैदिकांनी या चारही पुरुषार्थासंबंधी विपुल लेखन केले. धर्मशास्त्रे व मोक्षशास्त्रे तर निर्माण केलीच पण कामशास्त्रे व अर्थशास्त्री निर्माण केली. याउलट जैन परंपरेत 'मोक्ष' या पुरुषार्थाचेच सदैव प्राधान्य राहिले. अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थांसंबंधी फारसा गंभीर विचार झालाच नाही. * योग शब्दाचा विशेष अर्थ पातजंलयोगदर्शनाचा 'योग' म्हणजे 'चित्तवृत्तिनिरोध'. ५४ ' यमनियमादि आठ अंगांनाही' तेथे 'योग' म्हटले आहे.५५ भगवद्गीतेत योग शब्द वेगवेगळ्या अर्थांनी येतो. 'समत्वं योग उच्यते ' ५६, 'योग: कर्मसु कौशलम्' ५७ ही वचने तर सुप्रसिद्ध आहेत. त्याखेरीज भगवद्गीतेत अध्यायाच्या प्रत्येक नावालाही 'योग' शब्द लावला आहे. ५८ जैन परंपरेनेही आ. हरिभद्रकृत योगबिंदु, योगशतक इ. ग्रंथांच्या शीर्षकामध्ये वैदिक परंपरेतील हाच अर्थ दिसून येतो. पण याखेरीज मन-वचन-कायेच्या सर्व हालचाली म्हणजे कर्मे म्हणजे 'योग' होय. ५१ ह्या व्याख्येतून 'युज्' धातूशी जुळणाऱ्या, योग शब्दाच्या वेगळ्याच अर्थावर प्रकाश टाकला आहे. मन-वचन-कायेच्या हालचाली या अर्थाने योग शब्द वापरून, तीन योगांनी व तीन करणांनी अर्थात् 'तिविहं तिविहेणं' ही पदावली जैन तत्त्वज्ञानात व आचारातही अतिशय रूळली आहे. वैदिक परंपरेत रूढ असलेल्या अनेक शब्दांना जैन परंपरा वेगळेच पारिभाषिक अर्थ प्राप्त करून देते. त्यापैकी योग ही एक विशेष संकल्पना आहे. * 'सती' शब्दाचा विशेष अर्थ * हिंदू पौराणिक परंपरेत 'पतिव्रता' ह्या अर्थाने वापरण्यात येणारा सती हा शब्द, मध्ययुगीन काळात पतीच्या चितेवर आरूढ होणाऱ्या, पतिव्रता स्त्रीसाठी वापरण्यात येऊ लागला. गेल्या दोन-तीन शतकात तरी, हिंदू परंपरेत तो याच अर्थाने रूढ झालेला दिसतो. 'राजा राममोहन रॉय' आदि सुधारकांनी, या अनिष्ट रूढीबद्दल खूप आवाज उठवला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय संविधानात, या अनिष्ट रूढीला उत्तेजन देणाऱ्यांविरूद्ध कडक कायदा केलेला दिसतो. जैन परंपरेत काळाच्या कोणत्याच टप्प्यावर, अशा प्रकारच्या सती प्रथेला स्थान नाही. आदरणीय साध्वींना जैन परंपरा, सती अगर महासती संबोधते. अशा प्रख्यात सोळा महासतींचा गौरव, जैन परंपरेने आदरपूर्वक केला आहे. * संस्कृत आणि लोकभाषा * वेदांपासून आरंभ करून पुराणांपर्यंत वैदिक, ब्राह्मण अथवा हिंदू परंपरेत नेहमीच संस्कृतला अग्रस्थान मिळत राहिले. मराठी साहित्याबाबत बोलायचे झाले तर सुमारे दहाव्या-अकराव्या शतकापासून मुकुंदराज महानुभाव पंथ आणि नंतर बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी समकालीन धार्मिक रचनांना आरंभ केला. जैन परंपरेत मात्र लोकभाषेत धर्मोपदेश करण्याचा प्रघात आरंभापासूनच होता. केवळ महावीरांनीच नव्हे तर आधीच्या सर्व तीर्थंकरांनी सुद्धा, लोकभाषेतून उपदेश केला असावा. म्हणूनच जैनांचे इसवी सनापूर्वीचे आगम किंवा आम्नायग्रंथही, अर्धमागधी व शौरसेनी या लोकभाषातून लिहलेले दिसतात. म्हणजेच धार्मिक वाड्.मय लोकभाषेत असावे, ही संकल्पना जैन परंपरेत, हिंदू परंपरेपेक्षा १००० वर्षांनी जुनी दिसते. अर्थात् आम समाजाच्या मनोरंजनाचे साधन असलेली संस्कृत नाटके व काव्य यांच्यासाठी, हिंदू परंपरेनेही प्राकृत अर्थात् लोकभाषांचा वापर केलेला दिसतो. Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ * तिर्यंचगतीचा विशेष विचार * जैन परंपरेत सैद्धांतिक दृष्ट्या तिर्यंचगतीची व्याप्ती पुष्कळच आहे. प्रस्तुत ठिकाणी आपण केवळ पशु-पक्षी सृष्टीचा विचार करीत आहोत. आधुनिक काळात जगभरातील प्रणिशास्त्राचे अभ्यासक, वैविध्याने नटलेल्या पशुपक्षी सृष्टीचा, अनेकविध अंगांनी अभ्यास करून, त्यांचे चित्रीकरण करून, त्यांवर आधारित अशा उत्कृष्ट वैज्ञानिक ग्रंथांची निर्मिती करत आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, प्रज्ञापना, जीवाभिगम यांसारख्या अर्धमागधी ग्रंथात आणि त्रिलोकप्रज्ञप्ति, गोम्मटसार (जीवकांड) सारख्या शौरसेनी ग्रंथात, प्राणिसृष्टीविषयीचे मौलिक विचार नोंदविलेले दिसतात. बियांच्या देखील गति, जाति, इंद्रिये, शरीर, लिंग, पर्याप्ति, प्राण, कषाय, लेश्या, ज्ञान, आयुष्य इ. विविध अंगांनी विचार केला आहे. मुख्य म्हणजे कर्मसिद्धांतही त्यांच्याबाबत उपयोजित करून दाखविलेला आहे. केवळ सिद्धांतग्रंथातच नव्हे तर कथाग्रंथातही त्याची उदाहरणे सापडतात. ६० जैन ग्रंथातील हे मार्गदर्शन, प्राणिशास्त्राच्या आधुनिक अभ्यासाला पूरक ठरू शकेल असे वाटते. हिंदू ग्रंथांतून अशा प्रकारचे मार्गदर्शन अतिशय अल्प आढळते. * मुक्त जीवांचे अस्तित्व चार्वाक सोडून प्राय: सर्व भारतीय दार्शनिकांनी अथवा विचारवंतांनी मोक्ष संकल्पना मांडली आहे. मोक्षानंतर मुक्त जीवांचे अस्तित्व, स्वतंत्र स्वतंत्र स्वरूपात कायम राहते, हा सिद्धांत मात्र केवळ जैनांचाच आहे. अशा प्रकारे सिद्ध किंवा मुक्त जीवांची व्यवस्था, ब्राह्मण परंपरेत कुठेही लावलेली दिसत नाही. एकदा प्रत्येक जीवाची स्वतंत्र सत्ता अर्थात् अस्तित्व मानल्यानंतर, ती सत्ता नाहीशी करणे किंवा दुसऱ्यात विलीन करणे, जैन सिद्धांताला धरून नसल्याने मुक्त जीवांचे अशा प्रकारचे अस्तित्व मानले आहे. * व्यक्तिमत्वांचे जैनीकरण जैनांच्या समन्वयवादाचे एक बोलके उदाहरण म्हणजे त्यांनी राम, लक्ष्मण, रावण, हनुमान, कृष्ण, नारद, पांडव, जरासंध, सीता, अंजना, मंदोदरी, कैकेयी, द्रौपदी, रुक्मिणी या आणि अशा अनेक व्यक्तिमत्वाच्या जैनीक्णाचे प्रयत्न आपल्याला पुराणकाव्य व चरितग्रंथातून केलेले दिसते. २४ तीर्थंकर वगळता, शलाकापुरुष, कामदेव इ. ची जैन परंपरेने तयार केलेली चौकट, बहुधा या सर्व अजैन व्यक्तिरेखांचे जैनीकरण करण्यासाठीच, योजलेली युक्ती असावी असे वाटते. जैनांनी या सर्व व्यक्तींना कितीही आपलेसे केले तरी जैनेतरच काय, जैनांच्या मनातही त्यंच्यावर असलेला हिंदुधर्माचा प्रभाव कायम आहे. म्हणून वाल्मीकि रामायण हे मुख्य प्रवाहातील रामायण ठरले आणि जैन रामायणे त्याच्या प्रतिकृती ठरल्या. * वर्गीकरणाची सूक्ष्मता कोणताही एखादा मुद्दा विचारार्थ घेतल्यानंतर जैन परंपरेत त्याचे विवेचन अनेक प्रकार, उपप्रकार सांगून, तार्किकतेच्या शेवटच्या टोकापर्यंत, अतिशय सूक्ष्मतेने केले जाते. विचारांचा कोणताही धागा अपूरा ठेवणे, ही जैनधर्माची प्रकृति नाही. कर्मसिद्धांत सांगायला लागल्यानंतर, कर्माचे आठ प्रकार म्हणजे मूल प्रकृति, त्या प्रत्काच्या उत्तर प्रकृति, घाति-अघाति कर्म, कर्म आणि गुणस्थान या आणि अशा अनेक प्रकारे कर्मसिद्धांत सांगितला आहे? इतकेच नव्हे तर याविषयीची एक स्वतंत्र कर्मसाहित्यविषयक शाखाच तयार झाली आहे. दुसरे उदाहरण जीवतत्त्वाच्या विचारासंबंधीचे घेता येईल. जीवांचे संसाराच्या दृष्टीने, हालचालीच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने, इंद्रियांच्या दृष्टीने, गतीच्या दृष्टीने, शरीरांच्या प्रकारांच्या दृष्टीने, वेद अर्थात् लिंगांच्या दृष्टीने, योनि अर्थात् जन्मस्थानाच्या दृष्टीने वर्गीकरण आणि विवेचन केलेले दिसते. ६२ याउलट वैदिक परंपरेत वर वर्णन केलेली कर्मसिद्धांताची व जीवविचाराची संकल्पना, एवढ्या सूक्ष्मतेने स्पष्ट Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ केलेली दिसत नाही. वैकुंठ, कैलास, पितृलोक यांचे स्वर्गातील नेमके स्थान स्पष्ट होत नाही. जाति-वर्णव्यवस्था स्वीकारल्यामुळे, चारही वर्णांचा व चारही आश्रमांचा व्यवस्थित आचार, हिंदू परंपरेने व्यवस्थित सांगणे अपेक्षित होते. तथापि हिंदू धर्मशास्त्रात बराचसा आचार, ब्राह्मण केंद्री दिसतो व ब्राह्मणांच्या बाजूने पक्षपातीही दिसतो. याउलट जैनांचा साधुआचार व गृहस्थाचार अनेक ग्रंथात विस्तृतपणे सांगितला आहे. सारांश काय, तर सूक्ष्मता व चिकित्सा ही जैन परंपरेची वैशिष्ट्ये मानावी लागतात. * उपसंहार व निष्कर्ष शोधलेखात दिलेल्या सर्व मुद्यांचा साकल्याने विचार करता, असे म्हणावेसे वाटते की, जैनधर्म आणि हिंदुधर्म यांच्यात कमीत कमी गेली २६०० वर्षे तरी, बाह्यआचारामध्ये क्रियाप्रतिक्रियात्मक आंदोलणे चालू आहेत. वरकरण पाहता जैनधर्मीय हे, अनेक बाबतीत हिंदू धर्मीयांच्या कितीही जवळ गेल्यासारखे वाटले तरी, त्यांच्या सैद्धांतिक भूमिका व जीवनविषयक दृष्टिकोण, यात मूलगामी भेद असल्यामुळे, जैनधर्मी हे अल्पसंख्य असूनही, हिंदू धर्मामध्ये विलीन होऊन गेले नाहीत. अल्पसंख्य असूनही जैनत्व अबाधित ठेवण्यासाठी, त्यांना कुटुंबातून मिळणारे संस्कार, साधुवर्ग, तीर्थक्षेत्रे व मंदिरे, श्रावक संघ आणि जैन समाजाची घट्ट असलेली वीण, हे घटक प्रामुख्याने उपयोगी पडत आले आहेत. आजूबाजूच्या समाजाशी समरस होऊनही, आपली पृथगात्मकता ते अशाच प्रकारे टिकवून ठेवतील, असा विश्वास वाटतो. Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ २०. उत्तराध्ययन आणि धम्मपद ('सन्मति-तीर्थ वार्षिक पत्रिका', जून २००८) जैन आणि बौद्ध या श्रमण परंपरेच्या दोन धारा आहेत. बौद्धांच्या मानाने जैन परंपरा कितीतरी अधिक प्राचीन आहे. जैनांचे आज उपलब्ध असलेले साहित्य मात्र ‘महावीरवाणी' या नावानेच प्रसिद्ध आहे. श्वेतांबर संप्रदाय अर्धमागधी भाषेतील ४५ अगर ३२ आगमग्रंथांना प्रमाण मानतो. त्यांचे अंग, उपांग असे ६ उपविभाग केले आहेत. त्यापैकी मूलसूत्र' या उपविभागात उत्तराध्ययन, आवश्यक व दशवैकालिकाचा समावेश होतो. उत्तराध्ययनसूत्राचा अभ्यास श्वेतांबर परंपरेत विशेषच केला जातो. त्यातील विषयांची विविधता, मांडणी, पद्यमयता, काव्यगुण यामुळे त्याची लोकप्रियताही खूप आहे. उत्तराध्ययनाचा अभ्यास केवळ त्या ग्रंथापुरताच न राहता, त्याला काही तौलनिक अभ्यासाचे परिमाण लाभावे अशी नव्या युगाच्या ज्ञानसंकेतांची मागणी आहे. वैचारिक कक्षा रुंदावत आहेत. परस्पंख्या संकल्पना समजावून घेणे ही सामाजिक गरजही निर्माण झाली आहे. श्रमणपरंपरेतील दुसरा प्रवाह ‘बौद्ध दर्शन' हे अनेक दृष्टींनी जैन मान्यतांशी मिळतेजुळते आहे. वेदांची मान्यता व सर्वश्रेष्ठत्व नाकारणे, हिंसक यज्ञांना विरोध करणे, जात्याधार चातुर्वर्ण्याचा निषेध, स्वतंत्र श्रामणिक साहित्याची निर्मिती, अशी काही प्रमुख साम्ये दिसतात. भ. महावीर व भ. गौतम बुद्ध हे प्राय: समकालीन. त्यांच्या कार्यप्रवृत्तही प्राय: समान प्रांतात राहिल्या. दोघांच्या धर्मभाषाही ‘मागधी' भाषेशी संबंधितच होत्या. उत्तराध्ययनाशी ज्या बौद्ध ग्रंथाचे बहिरंग व अंतरंग साम्य आढळते, असा ग्रंथ म्हणजे पाली भाषानिबद्ध ‘धम्मपद' होय. दोन्ही ग्रंथ इसवी सनापूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या शतकात अंतिम संस्करणाच्या स्वरूपात आले. धम्मपद हा काही कोणा एका व्यक्तीने लिहिलेला ग्रंथ नसून तो केवळ एक गाथा-संग्रह आहे. वेगवेगळ्या बौद्ध आचार्यांनी त्या निरनिराळ्या प्रसंगी लिहिल्या आहेत. गौतम बुद्धाच्या विचारसरणीच्या त्या निदर्शक असल्यामुळे, त्या बुद्धाच्या नावावर घातल्या गेल्या. सुप्रसिद्ध त्रिपिटकातील ‘सुत्तपिटक' भागात, 'खुद्दकनिकाय' हा उपविभाग आहे. त्यात एकूण १५ ग्रंथ आहेत. त्यापैकी एक ग्रंथ 'धम्मपद' आहे. सुप्रसिद्ध जातककथाही ह्याच खुद्दकनिकायात आहेत जैन परंपरा उत्तराध्ययनास अंतिम महावीरवाणी मानते. तथापि त्याच्या ३६ अध्ययनांपैकी काहीच अध्ययने महावीरकथित असून, काही परवर्ती जैन आचार्यांनी रचून त्यात घातली आहेत, हे तथ्य आता विद्वज्जगतात मान्य झालेले आहे. उत्तराध्ययनात ३६ अध्ययने आहेत तर धम्मपदात २६ वर्ग (वग्ग) आहेत. उत्तराध्ययनामधील 'नमिप्रव्रज्या' या नवव्या अध्ययनातील दोन गाथा धम्मपदातील 'बालवग्ग' (७.११) आणि 'सहस्सवग्ग' (८.४) यातील दोन गाथांशी तंतोतंत जुळतात. 'युद्धात हजार पटींनी हजार माणसांना जिंकण्यापेक्षा, जा स्वत:स एकट्यास संयमपूर्वक जिंकतो, तो सर्वश्रेष्ठ होय'-हा विचार दोन्ही परंपरांनी शिरोधार्य मानला आहे धम्मपदातील पहिल्या ‘यमकवर्गातील परस्परविरोधी गाथांच्या जोड्या उत्तराध्ययनातील पहिल्या 'विनय' अध्ययनाची आठवण करून देतात. प्रमाद आणि अप्रमाद यांचे वर्णनही दोहोत समान आहे. धम्मपदात 'अप्पमादवग्ग' आहे तर उत्तराध्ययनामधील १० व्या द्रुमपत्रक अध्ययनात ‘समयं गोयम मा पमायए' अशी सूचना गौतमस्वामींना वारंवार दिलेली दिसते. अज्ञानी व्यक्तीला 'बाल' आणि ज्ञानी व्यक्तीला दोन्ही ग्रंथात ‘पंडित' अशी संज्ञा दिसते. 'तण्हावग्गा'त ज्या तृष्णेची निंदा केलेली दिसते, तोच आशय जहा लाहो तहा लोहो, लाहा लोहो पवड्डई' अशभाषेत उत्तराध्ययनामध्ये आढळतो. 'भिक्खुवग्ग' आणि 'सभिक्ख' अध्ययन यातील साम्य थक्क करणारे दिसते. दोहोतही काया-वाचा-मनाच्या संवराला (संयमाला) महत्त्व दिले आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा जन्मजात जातींचा विरोध करून दोन्ही ग्रंथात तं वयं बूम माहणं' अशा शब्दात खऱ्या ब्राह्मणाची लक्षणे दिली आहेत. भ. महावीर व बुद्ध यांची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समान असल्यामुळे दोन्ही ग्रंथात अनेक उपमा, दृष्टांतही समान दिसतात. वायने न हालणारा पर्वत (उत्त.२१.१९ ; धम्म.६.७); लोकांच्या गायी मोजणारा गुराखी Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ (उत्त.२२.४५, धम्म.१.२०) ; राखेत लपलेला अग्नी (उत्त.२५.१८, धम्म.५.१२) ; बेटासारखे स्थिर असणे (आचारांग 1.6.5.5, धम्म. 2.5) अशी शेकडो उदाहरणे देता येतील. भिडूंच्या आहाराविहाराविषयीची वाक्ये, शब्दयोजना वगैरेत पुष्कळच साम्य केवळ धम्मपदातच नव्हे तर इतर पाली व जैन प्राकृत ग्रंथातही आढळून येते. वरील साम्यस्थळे पहाणाऱ्यास कदाचित् असे वाटेल की दोन्ही ग्रंथ अगदी एका साच्यातून काढलेले दिसतात. काव्यमयता, सामान्य सदाचार, नीतिनियम, सुभाषितांची पखरण, जाता जाता सामाजिक परिस्थितीवर केलेले भाष्य इत्यादि बाबतीत दोन्ही ग्रंथात समानता असली तरी त्यांचे अंतरंग मात्र वेगळे आहे. धम्मपदापेक्षा उत्तराध्ययनाचे मल जाणवलेले वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न येथे करते. उत्तराध्ययनात प्रत्येक अध्ययनाचा उद्देश, प्रतिपाद्य व पार्श्वभूमी निरनिराळी आहे. विषयांची अथवा कल्पनांची कोठेही पुनरावृत्ती नाही. काही अध्ययने केवळ उपदेशपर, काही तत्त्व व सिद्धांतप्रधान, काही कथात्मक, काही संवादात्मक तर काही सर्वस्वी आचारप्रधान आहेत. जैन विचारांचा कणा असलेले प्रायः सर्व सिद्धांत विविध अध्ययनात गोवले आहेत. विनय, परीषह, चतुरंग, अकाम-सकाम मरण, अष्ट प्रवचनमाता, सामाचारी, मोक्षमार्गगति, तपोमार्ग, कर्मप्रकृति, लेश्या आणि जीवाजीवविभक्ति ही काही नावे देखील उत्तराध्ययनाच्या मौलिक सिद्धांतदृष्टीवर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत. वस्तुत: धम्मपदातून देखील त्रिरत्न, पंचशील, चार आर्यसत्ये, द्वादशनिदान, प्रतीत्यसमुत्पाद इ. प्रमुख बौद्ध सिद्धांतांचे मार्गदर्शन आपण अपेक्षितो. परंतु 1-2 गोष्टींचा अपवाद वगळता धम्मपद बौद्ध तत्त्वज्ञानाच्य गाभ्याला स्पर्श करू शकलेले नाही असेच म्हणावेसे वाटते. कदाचित् साध्या-सोप्या भाषेत सदाचरणाचा उपदेश हेच धम्मपदामागचे प्रयोजन असू शकेल. क्लिष्ट, पारिभाषिक शब्दयोजनेचा अभाव, साधे, सोपे नैतिक विचार आणि सुंदर भाषा यामुळे धम्मपदाला विलक्षण लोकप्रियता मात्र लाभली. धम्मपदाची संस्कृत, तिबेटी व चिनी संस्करणेही झाली. सिलोन, ब्रह्मदेश, थायलंड कंबोडिया ह्या देशातील तरुण भिडूंचा व गृहस्थाश्रमी उपासकांचाही हा नित्य पाठांतरातील ग्रंथ आहे. उत्तराध्ययनाच्या जैन अभ्यासकांनी पाली भाषेतील 'धम्मपदा'चा जरूर विशेष अभ्यास करावा यासाठी हा लेखन प्रपंच !! **********