Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 10
________________ माझ्या जीवा - एकासन ब्यासन, बेला, तेला जमेल तेवढेच कर तप । डोळ्यात तेल घालून दिवा, अंत:करणामध्ये जप ।। (ज्ञानदीप) सैरावैरा कुठे धावतोस, ठेच लागली पुढं बघ । बंद दार आहे पुढं, परत जरा मागे वळ ।। (प्रतिक्रमण) तुझे ज्ञान नुसती माहिती, पक्के ध्यानी धरून चल । ज्ञान तुझ्यात होईल प्रकट, शुद्ध केलंस तरच मन ।। (त्रिरत्न) ती भलत्यावर ठेवू नको, श्रद्धा मोठंच आहे बळ ।। (सम्यक्त्व) नीट पारखून ठेव स्वत:वर, सारे दूर करून सल ।। (शल्योद्धार) दर क्षणी, दर पावली, थोडा पुढं पुढं सर । प्रवास हळू झाला तरी, नक्की भेटेल शाश्वत घर ।। (गुणस्थाने अगर श्रेणी) वेळेवारी सारा पसारा, आता आवरून सावरून नीघ । मागे वळून पाहू नको, श्रद्धांजलीचीही रीघ ।। (अनासक्ती) दुसरे कंटाळण्याच्या आधी, बऱ्या बोलानं मुक्काम हलव ।। (पंडितमरण) इतकं सोपं समजू नको, कर्मोदयाचंच हवं पाठबळ ।। (संलेखना) ६) कषायांवर नियंत्रण : आपल्याला सर्वांना पाठ आहेत ही नावं ! घडाघडा म्हणून दाखवतो. क्रोध, मान, माया, लोभ, त्यांच्यावर राज्य मोहाचं, त्याच्या मुळाशी राग-द्वेष, त्यांना जिंकणारे जिन, आत्म्याला कसणारे कषाय. कषाय म्हणजे काढा अगर चहा. वैदिक दर्शनात षड्रिपु - काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, जैन दर्शनात अनंतानुबंधी ते संज्वलन से एकूण १६ प्रकार सांगितले आहेत. आपण आहोत सामान्य संसारी श्रावक. संपूर्ण वीतरागी, निर्विकार, मध्यस्थ अशी पत्नी, माता कोणाला तरी रूचेल काय ? आपल्यात कषाय रहाणारच. परंतु संज्वलनाच्या दिशेनं प्रवासाचा यत्न व्हावा' हीच सदिच्छा ! ७) स्वावलंबन : महावीरांनी सांगितलेले स्वावलंबन मुख्यत: आध्यात्मिक स्वावलंबन आहे. जगन्नियंता, तारणहार, अवतारधारी ईश्वर जैन दर्शनात संमत नाही. 'अप्पा कत्ता विकत्ता य' असे हे स्वावलंबन आहे. घरात आपण साधा पाण्याचा ग्लासही दुसऱ्याकडे सतत मागत असू, कुठलीच कामे स्वत:ची स्वत: करीत नसू, आजी-आजोबांची निंदा करीत असू, कोणतेही मत स्वतंत्रपणे मांडू शकत नसू तर हे काय स्वावलंबन झालं ? एकंदरीत शारीरिक व बौद्धिक पापणा जवळ असेल तर आत्म्याच्या स्वावलंबनाच्या गोष्टी आपण करू शकतो काय ? ८) अपरिग्रह : 'परि + ग्रह' म्हणजे चोहोबाजूने ग्रहण करणे. तत्त्वार्थसूत्रानुसार वस्तू म्हणजे परिग्रह नसून आसक्ती हा परिग्रह आहे. 'मुर्छा परिग्रहः' अपरिग्रहाचा आज आपल्याला उपयुक्त अर्थ लावू या. सामान्य माणसानं अपरिग्रही व्हायचं तरी कसं? धान्याचा साठा करणं हा जरी परिग्रह, तरी कीड मुळीच लागू न देता, कण न् कण मुखी घालणं हाच अपरिग्रह ! ।।१।।

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25