Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 12
________________ कोळसाही आपला अन् सोनंही आपलं । बोअरिंगनं छेद घेऊ, ते पाणीही आपलं ।। डोंगर उडवून सारं काही भुईसपाट करू । शेत-मळे उखणून तिथं नव्या वस्त्या सजवू ॥ नवनवीन वाणांना, भरमसाठ खतं घालू । जमीन-कस जाऊ दे खड्डयात, 'कृषि - मित्र' सत्कार घेऊ ॥ १ ॥ आता हे अप्कायिक जीव - अप्कायिक सुद्धा आहे, आपल्याच बापाचा माल । हपापाचा माल म्हणून किती किती प्याल ? वहातं पाणी साठवू, साठलेलं पाणी वाहवू । समुद्र मागे हटवू, दिमाखात कॉलनी उठवू ।। मासे म्हणजे पाण-भाजी, जाता येता खुडून घेऊ । होड्या, जहाजे चाल-चालवून नद्या, समुद्र पार करू ।। जलसंपत्ती निसर्गाची वारेमाप कशीही लुटू । मिनरलच्या नावाखाली दहा रुपये लिटर विकू ॥ २ ॥ आता हे वायुकायिक जीव - फुफ्फुसाच्या पंपांनी, हवा आत घेऊ आणि सोडू । आपली शुद्ध हवा आपण अनेक कारणांनी बिघडवू तिच्या दाबावर आपण, लहानमोठी यंत्रे बनवू । चाकात भरून हीच हवा, जमिनीवर फिरत राहू || तेजस्कायिक उपकरणांनी, हवेलाही वेठीस धरू । आपल्या मर्जीनुसार तिला गरम-गार करीत राहू ||३|| आता हे अग्निकायिक जीव - पृथ्वीकाय कोळसापासून तेजस्काय वीज बनवू । वायुकायिक पवनचक्कीनं नवनवीन कामं राबवू ॥ अप्कायापासून वीज मोठ चा कौशल्यानं निर्मू । अग्निबाण अन् अणुस्फोटांनी स्वशक्तीची स्तोत्रं गर्जू ॥ जमीन - आकाश-पाताळात लक्षावधी वहानं चालवू । आपला निसर्ग-विजय म्हणून आपली आपलीच शेखी ॥४॥ आता हे वनस्पतिकायिक जीव 1 वनस्पतींचा आपल्याबाबत आहे नाजूक मामला । प्रश्न पोटाचा आहे, जरा हळू हळू बोंबला ।। जे जे दिसलं झाडावर, गुपचूप पोटात रिचवलं । टनावरी धान्य, फळं, भाजी, दुधही खूप चापलं ।। तृणभक्षी रूचकर जीव, जिभल्या चाटत पचविले । वस्त्रं विणली, घरं बांधली, बगीचेही उभारले ॥ प्रयोगशाळेत भावभावना वनस्पतींच्या सिद्ध केल्या । आमच्या बोथट मनापर्यंत कशा बरे त्या पोहोचाव्या ?

Loading...

Page Navigation
1 ... 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25