Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 16
________________ एकंदरीत वैदिक परंपरेत ईश्वर संकल्पनेविषयीची जी संभ्रमावस्था दिसते ती जैन परंपरेत दिसत नाही. कारण जैन परंपरेने देवलोकातील देव व मोक्षगामी परमात्मा या दोन्हीही सर्वथा वेगळ्या मानल्या आहेत. * कर्मसिद्धांत दोन्ही परंपरांनी कर्मसिद्धांताला महत्त्व दिले आहे. परंतु जैन परंपरेत त्याचे विश्लेषण व उपयोजन अतिशय सुसंबद्धपणे, तार्किकतेने व विस्ताराने केले आहे. वैदिक परंपरेत संचित, प्रारब्ध व क्रियमाण हे तीन शब्द मुख्यतः येतात. १२ भगवद्गीतेत कर्म, विकर्म आणि अकर्म या शब्दांचा वारंवार उपयोग केला आहे. १३ पण त्यातून कर्मसिद्धांताचे एकत्रित चित्र व स्वरूप मुळीसुद्धा स्पष्ट होत नाही. याउलट षट्खंडागमासारख्या प्राचीनतम ग्रंथातून, कर्मसिद्धांताच्या विवेचनाला सुरवात होऊन, पुढे पुढे दिगंबर व श्वेतांबर दोघांनीही यावर आधारित असे स्वतंत्र कर्मग्रंथच निर्माण केले. किंबहुना जैन साहित्यात कर्मसाहित्याची एक शाखाच निर्माण झाली. जैन दर्शनात असलेली सात तत्त्वांची साखळी, कर्मांच्या आधारेच जोडलेली आहे. जीव व अजीव यांच्या संयोग व वियोगाने कर्मांचा आस्रव, बंध, संवर, निर्जरा व मोक्ष होत असतो. जैन सिद्धांतानुसार प्रत्येक जीव हा, आपापल्या प्रत्येक कर्माचा कर्ता व भोक्ता असल्यामुळे, त्यात मध्यस्थी करणाऱ्या ईश्वराला कोणतेही स्थान नाही. 'त्यामुळे साहजिकच कर्मसिद्धांत अधिकाधिक पल्लवित झाला. १४ * पूर्वजन्म व पुनर्जन्मविषयक धारणा दोन्ही परंपरेत या धारण समान असल्या तरी, जैन परंपरेवर यांचा पगडा इतका दृढ आहे की, प्रत्येक जैन चरितग्रंथात आणि कथाग्रंथात अनिवार्यपणे पूर्वभवांचे व पश्चात्भवांचे वर्णन येतेच. कर्मसिद्धांत अग्रभागी असल्यमुळे पूर्वभव व पश्चातभवांचे वर्णन हा कथांचा अविभाज्य भाग ठरला. याउलट पूर्वजन्म व पुनर्जन्म मानले असले तरी वैदिक परंपरेतील कथाप्रधान ग्रंथांमध्ये पूर्वभव व पश्चात्भव यांच्या चित्रणावर भर दिलेला दिसत नाही. * दान संकल्पना * वैदिक व जैन दोन्ही परंपरेतील दान संकल्पनेत साम्य असूनही त्यांचे अविष्कार मात्र आपापल्या सिद्धांतांना अनुसरून वेगवेगळे झाले आहेत. दोन्ही परंपरेत दान हे धर्माचे आणि पुण्यप्राप्तीचे साधन आहे. दानाने मिळणारे जास्तीत जास्त फळ हे स्वर्गप्राप्ती आहे. नित्यदानाचे महत्त्व दोन्ही परंपरांमध्ये दिसते. परंतु नैमित्तिक आणि यदानांचा विचार ब्राह्मण परंपरेत दिसतो. ब्राह्मण परंपरेत 'ज्ञानदानाला' एक विशिष्ट पवित्र दर्जा दिलेला दिसतो. जैन परंपरेत 'अहिंसा' व सर्वजीवरक्षणाच्या भावनेतून 'अभयदानाचा' महिमा वर्णिलेला दिसतो. 'ग्रहण, पर्वकाळ, श्राद्ध, तीर्थक्षेत्र इ. प्रसंगी विशेष दान करावे', असे निर्देश ब्राह्मण परंपरेत आढळतात. तीथींचे व क्षेत्रांचे पावित्र्य, पितृलोक आणि तर्पण इ. संकल्पना जैन शास्त्रात बसत नसल्यामुळे, सागारधर्मामृतकाराने अशा प्रकारच्या दानांचा स्पष्टपणे विरोध केला आहे. जैन परंपरेने दान संकल्पनेला केवळ पुण्य संकल्पनेपर्यंत मर्यादित ठेवलेले नाही. दानाला सैद्धांतिक आधारही दिले. सम्यक्त्वाच्या आठ अंगामध्ये वात्सल्य व प्रभावनेच्या रूपाने १५, श्रावकाचारात अतिथीसंविभागव्रताच्या रूपानेद्द्, साधुआचारात उपदेशरूपाने ७, दान - शील-तप-भाव या चतुष्टयीतून धर्माच्या व्यावहारिक रूपाने“, प्रत्याख्यानाच्या क्रियेमध्ये अभयदानाच्या रूपानें, आठकर्मातील वेदनीय, अंतराय व तीर्थंकरनामकर्माच्या रूपाने २० जैनसिद्धांत व आचारात दानाचे असलेले अनन्य साधारण स्थान स्पष्ट दिसते. परिणामी अहिंसा व तपाइतकेच, दान हेही जैन परंपरेचे वैशिष्ट्य बनले.

Loading...

Page Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25