________________
भरपूर स्वयंपाक करणं हा जरी परिग्रह,
तरी अपुरं अन्न न करणं, अन्
शिळं न उरण्याची खबरदारी घेणं हाच अपरिग्रह ! ||२ || नवनवीन फॅशनचे कपडे घेत रहाणं,
हा जरी परिग्रह, तरी जुन्याचा लोभ लचका न ठेवता, वेळेवारी देऊन टाकत रहाणं, हाच अपरिग्रह ! ||३ || आरडाओरडा करून, धपाटे घालून मुलांना अभ्यासाला बसविणं,
हा जरी परिग्रह, तरी मुलांच्या बुद्धीच्या मर्यादा ओळखून, त्यांना रेसच्या घोड्यासारखं न पळविणं, व
इतर हुषार मुलांचा द्वेष न करणं, हाच अपरिग्रह ॥ ४ ॥ जीव टाकून, जीव लावून, मुलं मुलं करून,
लाड करणं व वळण लावणं हा जरी परिग्रह,
तरी म्हातारपणची काठी म्हणून, डोळे लावून न बसणं, हाच खरा अपरिग्रह ।।५ ।
स्वत:च्या भोगोपभोगांची तजवीज हा जरी परिग्रह, तरी कोणाचे हिसकावून न घेण्याची जाण,
व गरजूंना एक टक्का तरी देण्याची वृत्ती, हा अपरिग्रह || ६ || जीवन सुखकर करायला, खूपशी साधनं जमविणं,
हा जरी परिग्रह, तरी त्यातलं एखाद-दुसरं नसलं,
किंवा मोडलं, तरी निभावून नेता येणं हाच अपरिग्रह || ७ ||
घाण्याच्या बैलासारखं, उपजीविकेच्या साधनांमागं,
चक्राकार फिरत रहाणं हा जरी परिग्रह, तरी
दिवसाकाठी तासभर तरी स्वतंत्रपणे चिंतन, वाचन हाच अपरिग्रह ॥८ ॥
९) पर्यावरण रक्षण व ऊर्जाबचत :
आधुनिक युगाचे परवलीचे शब्द आहेत हे ! त्यासाठी आपण सौर ऊर्जा, ठिबक सिंचन, पाणी अडवा-पाणी जिरवा, वृक्षारोपण, वनसंवर्धन असे हजारो कार्यक्रम राबवीत असतो. जैन दर्शनानं या सर्व चळवळींना संपूर्णत: तत्त्वज्ञानाचाच पाया प्राप्त करून दिला आहे. जैन दृष्टीनं पंचमहाभूते ही जड व परमाणूंपासून बनलेली नसून, एकेंद्रिय जीव आहेत. पृथ्वीकायिक, अप्कायिक, तेजस्कायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक जीवांशी आपण कसे वर्तन करतो, काय बिनधास्त खेळ करतो ते जरा काव्यमय पद्धतीनं मांडते. वेष कवितेचा असला तरी गाभा तत्त्वांचा आहे, हे सूज्ञांस सांगणे नलगे !
'आंदण'
सर्व जगच जणू आंदण घेतल्यासारखे वागतो आपण ।
त्रस - स्थावर जीवांपैकी, स्थावरांचंच एवढं कथन । आता हे पृथ्वीकायिक जीव पृथ्वीकायिक जीव आपल्या पायाखालचा मामला । कसंही करून कुचला, खणा, काढा, उचला ।।
-