Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04 Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 7
________________ भूगोलविषयक मान्यता : ___जैन मान्यतेनुसार मध्यलोकात जम्बूद्वीपाच्या मधोमध मेरुपर्वत आहे. जम्बूद्वीपाच्या भोवती जम्बूद्वीपाच्या दुप्पट लवणसमुद्र आहे. त्याच्याभोवती त्याच्या दुप्पट धातकीखण्ड आहे. याप्रमाणे सात द्वीप आणि सात समुद्रांची रचना आहे. याचा अर्थ ही भूगोलरचना अतिशय आखीवरेखीव व प्रमाणबद्ध आहे. मुळातच हा भूगोल फक्त पृथ्वीचा आहे, की विश्वाच्या काही भागांचा आहे की, संपूर्ण विश्वाचा आहे, याबाबत शंका येते. __ भूमितिशास्त्रानुसार बिंदू, रेखा, चौकोन व वर्तुळे या सर्व गणिती संकल्पना आहेत. पूर्ण चौकोन, पूर्ण वर्तुळ अशी एकही आकृती निसर्गात निसर्गत: दिसून येत नाही. शिवाय जैन शास्त्रानुसार विश्व कोणी निर्माण केलेले नही. विश्वाचा नियामक ईश्वर मानला असता तर कदाचित या आखीवरेखीव क्रमाची पुष्टी करता आली असती. ईश्वरासारख्या सर्वज्ञ प्राण्याखेरीज आपोआप निर्माण झालेली सृष्टी वर वर्णन केल्याप्रमाणे अतिशय सुनियोजित व प्रमाणबद्ध कशी असू शकेल ? जैन शास्त्रातील द्वीप व समुद्रांचे, समकालीन द्वीप व समुद्राशी नाते जोडण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला दिसतो. जैनांनी तो श्रद्धेने मान्य केला तरी भूगोलतज्ज्ञ तो मान्य करणार नाहीत. आहारचिकित्सा : शाकाहार ही जैनांची ओळख आहे. केवळ शाकाहारच नव्हे तर त्याच्याही अंतर्गत प्रत्येक धान्याचा, भाजीचा, फळाचा, फुलाचा केलेला सूक्ष्म विचार हे जैन ग्रंथांचे वैशिष्ट्य आहे. भावनिक, मानसिक आणि धार्मिक दृष्टीने शाकाहार हा सात्त्विक मानला जातो. साधूंना प्रायोग्य अशा आहाराचे वर्णन करणारे अनेक ग्रंथ जैन शास्त्रात 'पिण्डैषणा' शीर्षकाने प्रसिद्ध आहेत. रोजच्या आहारात नियमोपनियमांची बंधने घालून घेणे हे जैन धार्मिकतेचे मुख्य अंग बनले आहे. यात आश्चर्यकारक बाब अशी की अनासक्ती अर्थात् निरासक्तीचे तत्त्व डोळ्यासमोर ठेवले तर जैन व्यक्तीला हे कल्पते की - जो, जसा, जेव्हा, जितका शाकाहार मिळेल त्यातील थोडा व योग्य आहार घ्यावा. आपले आहाराचे नियम इतरांना त्रासदायक ठरतील असे शक्यतो घेऊ नयेत. घेतल्यास आपल्या बलबुत्यावर निभावून न्यावेत. आपल्या खाण्यापिण्याचे 'टॅबू' निर्माण करणे जैन आचारपद्धतीत बसत नाही. खाण्यापिण्याबाबत सहजता व साधेपणा ही मूल तत्त्वे आहेत. __ डाएटिशियन जो आदर्श आहार सुचवितात त्यात गाजर-दुधी भोपळा इ. चे रस, कडुनिंबाची चटणी. उकडलेल्या भाज्या, मोड आणून वाफवलेली कडधान्ये, एक ग्लास दूध, सूप, ताक, सर्व फळे इ. गोष्टींचा समावेश असतो. काही विशिष्ट व्यक्ती वगळल्यास सर्वसामान्य माणसाला असा आहार सतत घेणे अशक्य आहे. आहाराच्या चर्वितचर्वणापेक्षा अनेक उत्कृष्ट गोष्टी जैन धर्माने आम्हाला वारश्याने दिल्या आहेत. त्यांचा योग्य दिशेने अभ्यास करून त्या समाजापुढे आणणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे पूर्णत: धार्मिक आहार, पूर्णत: आरोग्यसंपन्न आहार आणि पूर्णत: तामस आहार हे तीनही अतिरेक टाळून सामान्य गृहिणीला योग्य पोषणान्ये असलेला व चवदार आहार बनवावा लागतो. उपसंहार : ___सदाचरण आणि शांततामय सहजीवन हे धर्माचे व्यावहारिक उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी जी धार्मिक मूल्ये अत्यंत उपयोगी ठरतात ती श्रद्धेनेही मान्य करण्यास काही हरकत नाही. धार्मिक ग्रंथात लिहून ठेवलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध केलीच पाहिजे असा अट्टाहासही करण्याचे काही कारण नाही. शांततामय सहजीवनासाठी जैन धर्माने समग्र जीवसृष्टिविषयक निरीक्षणे त्या-त्या काळात नोंदवून ठेवलेली आहेत. जैन धमील सणे इतर समकालीन धर्मांच्या तलनेत त्यातल्या त्यात अधिक सक्ष्म व वैज्ञानिक आहेत ही मोठीच जमेची बाजू आहे. **********Page Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25