Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04 Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 4
________________ कोणाही भारतीयाने ती वैज्ञानिक अंगाने विकसित केली नाहीत, परिणामी गुरुत्वाकर्षणाच्या शोधाशी न्यूटनचेचनाव निगडित राहिले. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जेव्हा सामान्य माणसांसाठी लिखाण करतात तेव्हा ते पाजञ्जलयोग आणि गीता वारंवार उद्धृत करतात. नोबेलप्राईझ विनर अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन जेव्हा नवा अर्थविषयक सिद्धान्त शोधतात तेव्हा चार्वाकांच्या मताचा विशेषत्वाने विचार करतात. 'पाणी' या विषयावर सध्या जगभरात सेमिनार्स आणि कॉन्फरन्सेस् चालू आहेत. अपेक्षा अशी आहे की अपकायाविषयीचा मूलगामी आणि सूक्ष्म विचार करणाऱ्या जैन ग्रंथांचा पार्श्वभूमी म्हणून तरी निदान संदर्भ दिला जावा. याचाच अर्थ असा की जैन धर्मातील मूलगामी आणि सूक्ष्म विचार, जैन धर्माच्या अभ्यासकांनी विविध विज्ञानशाखांमध्ये संशोधन करणाऱ्या प्रगत संशोधकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत अन्वयार्थ उलगडून सांगण्यासाठी तरी त्यांच्यापुढे जायला हवेत. आपण जर आपल्या मुलांना जैन धर्मातील धारणा समजावून सांगितल्या तर आजची जैन युवा पिढी त्यांच्या संपर्कात असलेल्या संशोधक युवा पिढीपर्यंत त्या धारणा पोहोचवत राहील. सौरऊर्जा : सोलर हीटर व सोलर कुकर ही दोन साधने पूर्णत: सौरऊर्जेवर चालतात. वर्षातील जवळजवळ दहा ते अकरा महिने ती आपण वापरू शकतो. सूर्याची वाया जाणारी उष्णता त्यात वापरली जाते. ही साधने वापरणे हे पूर्णतः अहिंसेचेच पालन आहे. शिवाय विजेची बचत होतेच. जे जे अनुदिष्ट आहे त्याचा वापर करण्याच्या जैन तत्त्वाचेही पालन होते. प्रत्येक जैन घरात निरपवादपणे दिसलीच पाहिजे अशी ही उपकरणे आहेत. विशेष नोंद घेण्याजोगी गोष्ट अशी की, कुमारपालप्रतिबोध नावाच्या जैन ग्रंथात ‘सूर्यपाकरसवती' अर्थात् सूर्याच्या उष्णतेवर बनविलेल्या चवदार स्वयंपाककलेचा उल्लेख येतो. उत्सर्ग समिति आणि कचरा : जैन शास्त्रानुसार समिति पाच आहेत. ईर्या, भाषा, एषणा, आदाननिक्षेप आणि उत्सर्ग अशी त्यांची नावे आहेत. प्रासुक स्थंडिल भूमीवर मलमूत्र विसर्जन करणे, हे शहरी जीवनशैलीशी सुसंगत नाही. परंतु कचरा बाहेर फेकणे हाही उत्सर्गच होय. घरातील रोजचा ओला कचरा वापरून उत्तम फुलबाग फुलते. बागकामात कराव्या लागणाऱ्या हिंसेचा विचार येथे न केलेला बरा. कारण ओला कचरा उघड्यावाघड्यावर सडून कुजून लाखो बॅटरया निर्माण करतो. त्यापेक्षा ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करण्याचे तंत्र शिकून घेणे केव्हाही फायदेशीर आहे. यामुळे ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन, पर्यावरणरक्षण आणि उत्सर्गसमितीचे पालन होऊन घरच्याघरी शुद्ध भाजीपालाही मिळेल. एकेंद्रियविषयक मान्यता : ___ जैन शास्त्रानुसार पृथ्वी, अप, तेज, वायु व वनस्पति हे एकेंद्रिय आहेत. जैन शास्त्रानुसार या सर्वांना एकच स्पर्शनेंद्रिय आहे. जैन शास्त्रात ही मान्यता कशी आली असेल ? सर्व सजीव जगण्याकरता एकेंद्रियांचा वापर करतात. सजीव हे सजीवांवरच जगू शकतात. निर्जीव वस्तू खाऊन जगू शकत नाहीत. द्वींद्रिय इ. जीव आणि हे चार एकेंद्रिय जीव पृथ्वी, अप् इ. एकेंद्रियांचा आहार करतात. त्याअर्थी हेही जिवंत असले पाहिजे. द्विन्द्रियांपेक्षा ते अप्रगत आहेत. म्हणून त्यांना एकेन्द्रिय मानले आहे. माती, पाणी, वायु इ. वैज्ञानिकांना सजीव वाटते की नाही, हा खरा प्रश्न आहे. माती व पाण्याच्या सूक्ष्म कणाच्या अथवा थेंबाच्या आधारे लाखो सूक्ष्म बॅक्टेरिया जगत असतात असे वैज्ञानिक म्हणतात. परंतु खुद्द माती अथवा पाणी सजीव असल्याचा निर्वाळा आतापर्यंत दिला जात नव्हता. दि. १.९.२००९ च्या दैनिक सकाळमध्ये डॉ. कर्वे यांच्या आलेल्या लेखानुसार, 'सूक्ष्म जीव हे दगड, मातीPage Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25