Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 04 Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 3
________________ झोप यांमध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर ठेवते ती व्यक्ती रात्रिभोजनत्याग व्रताचे अंशत: तरी पालन करते असे म्हणावे लागेल. गरम करून गार केलेले व गाळलेले पाणी पिणे व पावसाळ्याच्या चार महिन्यात कटाक्षाने ऊनोदरी, उपवास इ. करणे हे आरोग्याला फायदेशीर आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. वैज्ञानिक पद्धती : विज्ञानात सर्वात महत्त्वाचे असते ते निरीक्षण. अनेक निरीक्षणे नोंदवून त्या प्रयोगांच्या आधारे सर्व परिस्थितीत लागू पडेल असा सर्वसामान्य सिद्धान्त शोधून काढला जातो. त्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितींना अॅप्लाय केला जाता तो सिद्धान्त जीवनोपयोगी असेल तर त्याच्या आधारे विविध उपकरणेही तयार केली जातात. विजेचा मूलगामी शोध लागल्यावर अशीच विविध उपकरणे तयार झाली. भौतिकशास्त्रात जसे संशोधन होते तसेच संशोधन समाजविज्ञान व मानसशास्त्रातही होत असते. जैन शास्त्राने आरंभापासूनच उद्घोषिलेला अहिंसातत्त्वाचा सिद्धान्त महात्मा गांधींनी अशाच प्रकारे समाजविज्ञान व मानसशास्त्रात अॅप्लाय केला. महात्मा गांधींचा जैन धर्माशी असलेला निकटचा संबंध आणि अभ्यास सुपरिचित आहेच. त्यांचे ‘सत्याचे प्रयोग' सुद्धा असेच प्रसिद्ध आहेत. अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग धरून त्यांनी संपूर्ण भारतीय मनांवर त्यांचा पगडा बसविला. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या तत्त्वांचा समयोचित वापर केला. कवी म्हणतो - दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।। अनेकान्तवाद आणि सापेक्षतावाद : जर्मन संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन हा सापेक्षतावादाचा जनक आहे, हे सर्वविश्रुत आहे. जैन शास्त्रात सांगितलेल्या अनेकान्तवाद' या शब्दाचे इंग्रजी भाषांतर सुद्धा Theory of Relativity of Truth असे केले जाते. जैन परंपरेविषयी आईनस्टाईनने काढलेले गौरवोद्गारही सुप्रसिद्ध आहेत. परंतु “जैनांचा अनेकान्तवाद त्यालसापेक्षतावाद शोधून काढण्याच्या आधी माहीत होता की नंतर", याविषयी खुलासा आतापर्यंत झालेला नाही. ह्या सिद्धान्ताचे रूपांतर त्याने E=mc या सूत्रात केले. (यातील E= Energy, m-mass आणि c=velocity) हे सूत्र शोधून काढल्यावर त्याच्या आधारे पुढील वैज्ञानिक संशोधनास चालना मिळाली. दुर्दैवाने हे नमूद करावेसे वाटते की अनेकान्तवदाचा जैन सिद्धान्त मात्र विचारापुरताच मर्यादित राहिला. म्हणजे वैज्ञानिक उपकरणे बनविण्यासाठी तो वापरणे तर दूरच पण सांप्रदायिक भेद मिटविण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला गेला नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम : ___विश्वात असलेली विशिष्ट नियमितता कोणत्या नियमानुसार आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न न्यूटन या शास्त्रज्ञाने केला. त्याने गती, क्रिया, प्रतिक्रिया, गुरुत्वाकर्षण इ. अनेक विषयांसंबंधीची महत्त्वाची सूत्रे शोधली. भूगोल व खगोलविषयक अनेक रहस्ये त्याने उलगडली. न्यूटनपूर्वी सुमारे २५०० वर्षापासून प्रचलित असलेल्या जैन परंपरेत आपल्या दृश्य विश्वाची उपपत्ती लावून सहा द्रव्यांमध्ये त्याची विभागणी केलेली दिसते. जगातील कोणत्याही धर्माने न सांगितलेली दोन तत्त्वे या सहा द्रव्यात समाविष्ट आहेत. ती तत्त्वे म्हणजे गतिशील पदार्थांना गतिशील ठेवणारे 'धर्म' तत्त्व आणि स्थितिशील पदार्थांना स्थितिशील ठेवणारे 'अधर्म तत्त्व'. अवकाशस्थ सर्व ग्रहगोलांना गतिशील ठेवूनही विशिष्ट नियंत्रणात राखणारी ही दोन द्रव्ये आहेत. दुर्दैव असे की ती धार्मिक ग्रंथांतच मयादित राहिली. स्मरणशक्ती व पाठांतराने ती पुढील पिढ्यांना पोहोचवली. बहुधा 'धर्म' व 'अधर्म' या शब्दांनी संभ्रमावस्था निर्माण केली असावी. ती तत्त्वे वैज्ञानिक नसून बहुधा नैतिक मानली गेली असावी. त्यातील पारिभाषिकता विसरली.Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25