Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 5
________________ (आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५) ४. उत्तराध्ययनातील विशेष विचार जैन साहित्यातील प्राचीन ग्रंथ 'अर्धमागधी' नावाच्या प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. हिंदू धर्मात जे स्थान 'भगवद्गीते'ला आहे, बौद्ध धर्मात जे स्थान ‘धम्मपद' ग्रंथाला आहे किंवा ख्रिश्चन धर्मात जे स्थान बायबल'ला आहे तेच स्थान जैन धर्मात 'उत्तराध्ययन' नावाच्या ग्रंथास आहे. ही साक्षात् ‘महावीरवाणी' समजली जाते. याच्या महत्त्वाछे यास 'मूलसूत्र' असे म्हणतात. जैन समाजात या लोकप्रिय ग्रंथाचा आजही खूप अभ्यास केला जातो. यातील मोजके विचार आपल्या अधिक विचारार्थ आपल्या पुढे ठेवीत आहे. या संसारात प्राण्यांना चार गोष्टी अतिशय दुर्मिळ आहेत. मनुष्यजन्म प्राप्त होणे, सद्धर्माचे श्रवण करणे, धर्मावर अतूट श्रद्धा व संयमासाठी लागणारे सामर्थ्य या त्या चार गोष्टी आहेत. राग अर्थात् आसक्ती आणि द्वेष या दोन विकारांच्या द्वारे मनुष्य सतत कर्ममलाचा संचय करत असतो. हे त्याचे काम दोन्ही द्वारांनी माती खाणाऱ्या गुळासारखे असते. साधूने कशाचाही लेशमात्र संचय करू नये. पक्ष्याप्रमाणे सदैव विचरण करावे. तीन व्यापारी भांडवल घेऊन व्यापाराला निघाले. एकाने नफा कमावला. दुसरा भांडवलासह परत आला. तिसऱ्याने भांडवलही गमावले. मनुष्यत्व हे भांडवल आहे. देवगति ही लाभरूप आहे. मनुष्ययोनी गमावली तर नरक किंवा तिर्यंच गती प्राप्त होते. प्रवासाल निघालेला माणूस वाटेतच घर बांधून राहू लागला तर त्याला इच्छित स्थळाची प्राप्ती कशी होणार ? माणसानेही आत्मकल्याणाचे ध्येय सोडून उपभोगांच्या विषयात रममाण होऊ नये. भ. महावीर आपला प्रमुख शिष्य जो गौतम त्यास म्हणतात – “हे गौतमा, काळाच्या ओघात पिवळी पाने जशी झाडावरून आपोआप गळून पडतात, तसे मानवी जीवन आहे. तु क्षणभरही बेसावध राह नकोस. सिंह जसा हरणाला पकडून फरफटत घेऊन जातो, त्याप्रमाणे मृत्यू मनुष्यावर झडप घालतो. अशा वेळी नातेवाईक, मित्र, शेजारी उपयोगी पडू शकत नाहीत. फक्त त्याचे कर्म तेवेढत्या कर्त्याच्या मागे जाते. पढलेले वेद आम्हाला तारणार नाहीत. ब्राह्मण भोजने घालणे हा काही मोठा धर्माचा मार्गनाही. श्राद्ध वगैरे करणारे पत्रसुद्धा गेलेल्या जीवाचे काहीच बरेवाईट करू शकत नाहीत." 'अमुक अमुक मी मिळवले. अमुक अमुक मिळवायचे राहिले'-अशा विचारात तू गुंतून राहशील तर मृत्यू तुला कधी गाठेल याचा पत्ताही लागणार नाही. जसजसा माणसाला लाभ होतो, तसतसा त्याचा लोभ वाढतच जातो. दोन कवड्यांची आरंभी इच्छा करणारा माणूस, सोन्यारूपाचे पर्वत मिळूनही तृप्त होतच नाही. जरामरणाच्या प्रवाहात वेगाने वाहन जाणाऱ्या जीवास धर्म हेच द्वीप, तीच गती व तेच शरणस्थान आहे. भ. महावीरांनी जातिसंस्थेस प्राधान्य देणाऱ्या समाजातील मान्य विचारांवर घणाघाती प्रहार केले. ते म्हणतात, 'केवळ मुंडन केल्याने कोणी श्रमण होत नाही, समभाव ठेवल्याने श्रमण होतो. ओंकाराच्या जपाने नव्हे तर मलमज्ञानाने ब्राह्मण होतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हा जो तो आपल्या कर्मांनी होतो, केवळ जन्माने नव्हे.' **********

Loading...

Page Navigation
1 ... 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28