Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
जैनविद्येचे विविध आयाम (स्फुट-चिंतनात्मक लेख)
भाग - २
* लेखन व संपादन *
डॉ. नलिनी जोशी प्राध्यापिका, जैन अध्यासन
सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासन
फिरोदिया प्रकाशन पुणे विद्यापीठ
ऑगस्ट २०११
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
३. जैन तत्त्व चिंतन (१ ते ४ )
(आकाशवाणी - पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५)
१. तीर्थंकरप्रणीत धर्म
आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून तीन धर्म प्रचलित आहेत. हिंदु किंवा वैदिक धर्म. जैन धर्म आणि बौद्ध धर्म. जैन धर्म हा स्वतंत्र धर्म आहे की हिंदू धर्माची शाखा आहे, या वादविवादात आज आपल्याला शिरायचं नाही. हिंदू परंपरेपेक्षा आपल्या वेगळ्या तत्त्वज्ञानानं आणि आचरणानं उठून दिसणारी जैन परंपरा, श्रमण परंपरेतील एक मुख्य विचारधारा आहे. जी मनुष्य म्हणून जन्मली, राग-द्वेष इत्यादी विकारांवर ताबा मिळवला आणि शुद्ध आचरणानं श्रेष्ठ आध्यात्मिक सामर्थ्यानं भूषित झाली, त्या व्यक्तीस 'जिन' म्हणतात. अशा जिन भगवंतांनी सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाच्या इच्छेनं प्ररित होऊन, जो उपदेश दिला, जी आचारसंहिता घालून दिली व जे तत्त्वज्ञान सांगितले, ते सर्व जैन धर्माच्या अंतर्गत येते.
जैन परंपरेनुसार, जैन धर्म अनादि आहे. जैन धर्माच्या प्रवर्तक पुरुषांना 'तीर्थंकर' म्हणतात. ऋषभदेव पहिले तीर्थंकर असून भ. महावीर हे २४ वे तीर्थंकर आहेत. तीर्थंकर हे हिंदू संकल्पनेत असलेल्या अवतारांपेक्षा वेगळे म्हेत. महावीरांचा सर्वमान्य काळ इ.स.पू. ५०० आहे. तेव्हापासून आजपर्यंत अनेक प्रभावी आचार्यांनी हा धर्म आपल्यापर्यंत पोहोचविला. वेगवेगळे जैन आचार्य आपल्या ग्रंथात 'धर्म म्हणजे काय ?' हे अनेक प्रकारे समजावून सांगतात.
धर्म हा मंगल व उत्कृष्ट आहे कारण अहिंसा, संयम व तप ही प्रमुख तत्त्वे समजावून सांगतो. जो धर्माला सदैव मनात ठेवतो, त्याला देवही वंदन करतात. वस्तूच्या मूळ स्वभावाला धर्म म्हणतात. क्षमा, मार्दव, ऋजुता, सत्य, शुचिता, संयम, तप, इ. १० प्रकारच्या गुणांनाही आत्म्याचे गुण मानतात. हे गुण धार्मिक व्यक्तीत सहजच प्रकट होतात. जीवांच्या रक्षणालाही धर्म म्हणतात. धर्म दयाप्रदान असतो. धर्म, देव अगर गुरू यांच्या नावाखाली केलेल्या हिंसेला धर्मात कधीच थारा नसतो. जास्त काय सांगावे ? जे आपल्याला प्रतिकूल आहे ते दुसऱ्यांच्या बाबतीत चुकूनसुद्धा न करणे हाच धर्म. गाजावाजा, अवडंबर न करता धर्माचरण शांततेने व सतत करीत रहावे. धर्मरूपी मा ‘विनय' हे मूळ असून, ‘मोक्ष' हे फळ आहे. धर्माचा पाया श्रद्धा आहे. ती श्रद्धा नीट पारखून ठेवलेली असेल तरच ‘सम्यक्’ बनते. धर्मपालनासाठी व्रते ग्रहण करणे आवश्यक आहे. व्रतांचे पूर्ण पालन केले की ती 'महाव्रते' होतात. 'अहिंसा' हे सर्वात प्रमुख महाव्रत आहे. इतर व्रते त्याच्या रक्षणासाठी सांगितली आहेत. जैन आचार्य आत्मचिंतनाला नवीनच खाद्य देतात. ते म्हणतात, “जीववध हा आत्मवध असून जीवदया ही वस्तुत: आपल्यावरच केलेली दया आहे. "
*************
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
(आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५)
२. जीव-विचार
विश्वातला कोणताही धर्म घ्या, त्याची दोन अंगे असतात. एक अंग तत्त्वज्ञानाचे असते तर दुसरे आचरणाचे. हा संबंध शरीर आणि चैतन्य यांच्या दृष्टांताने स्पष्ट करण्यात येतो. आचरण हे शरीर असले तर तत्त्वज्ञान हा प्राण. बाह्य आचरणात देश-काल-परिस्थितीनुसार काही ना काही बदल अपरिहार्य आहे. तत्त्वचिंतनाची धारा मात्र सतत अक्षुण्णच रहाते. प्रत्येक भारतीय दर्शनानं आपापल्या विशिष्ट तत्त्वप्रणाली निश्चित केल्या आहेत. तत्त्वांची अगर पदार्थांची गणना केली आहे. जैन धर्मानेही ७ अगर ९ तत्त्वांच्या रूपाने ही मीमांसा केली आहे.
___ मुख्यत: सर्व सृष्टी ही दोन विभागात विभागता येते. जीव व अजीव म्हणजेenergy & matter. नऊ तत्त्वांपैकी पहिले तत्त्व जीव अगर आत्मा आहे. अजीव अगर जीव यांना तत्त्वे म्हणून समान दर्जा दिला आहे. जीव हे अनंत आहेत. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. ज्ञानचेतना अगर बोधशक्ती हे जीवाचे असाधारण लक्षण आहे. त्याला उपयोग' हा पारिभाषिक शब्द दिला आहे. आज आपण जीवतत्त्वाचा अधिक विस्ताराने परामर्श घेऊ.
जीवांचे मुख्य प्रकार दोन. संसारी आणि मुक्त. संसारी म्हणजे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात सरत जाणारे. मुक्त म्हणजे जन्म-मृत्यू चक्रातून सुटलेले. सिद्ध आणि अर्हत् दोन्ही मुक्त जीवच आहेत. परंतु त्यांच्या कार्यात फरक्आहे. अर्हत् किंवा तीर्थंकर हे जीवनकालात काही काळ तरी उपदेश व मार्गदर्शन करतात. संसारी जीवांचे त्रस व स्थावर म्हणजे हालचाल करू शकणारे (अर्थात् जागा सोडू शकणारे) व जागा सोडू न शकणारे असे दोन भेद असतात. शावर जीव पाच प्रकारचे असतात. पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक व वनस्पतिकायिक. याचा अर्थ आपण नीट समजून घेऊ. गैरसमज असा आहे की जलकायिक जीव म्हणजे पाण्यातील जंतू इ. होत. जैन धर्मातील हे पाण्यातले जीव नसून, ज्यांची शरीरे खुद्द पाणीच आहे असे जीव. हीच गोष्ट पृथ्वीकायिक इ. जीवांची आहे. या सर्वांना एकच इंद्रिय असते व ते म्हणजे स्पर्श. ज्यांना हिंदू दर्शने 'पंचमहाभूते' मानतात त्यांना जैन दर्शन एजेंयि जीव' संबोधतो.
त्रस म्हणजे जागा बदलू शकणाऱ्या जीवांचे दोन इंद्रियवाले, तीन इंद्रियवाले इ. भाग केले आहेत. गांडुळासारख्या प्राण्यांना स्पर्श व रसना ही दोनच इंद्रिये असतात. मुंगी, ढेकूण, कीटकांना स्पर्श, रसना व घ्राण ही तीन झंय असतात. डास, मधमाशी इ. जीवांना चक्षू इ. चार इंद्रिये असतात. गाय, घोडा इ. पृष्ठवंशीय प्राण्यांना श्रवण धरून पाच इंद्रिये असतात. मनुष्य, देव व अधोलोकातील जीवांना पाच इंद्रियांखेरीज मन व विचारशक्तीही असते. 'निगोद' हा सूक्ष्म जीवप्रकार असतो. सर्व जीवांच्या मिळून ८४ लक्ष योनी मानल्या आहेत. आत्मकल्याण करून घेण्याची सर्वात अधिक क्षमता अगर सामर्थ्य मनुष्य योनीत आहे. त्याचबरोबर हेही खरे आहे की संयम व विवेकाच्या अभावी जास्तीत जास्त क्रूर कर्मे करून अधोगतीला जाण्यासही मानवच उद्युक्त होतात. जैनांचा हा जीवविचार विज्ञानाच्या कसोटीवर कस उतरतो हा प्रश्न वेगळा पण चिंतनाला प्रेरक ठरणारा मात्र नक्कीच आहे !
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
(आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५)
३. अजीव-विचार
जैन दर्शनातील 'जीव' विचारानंतर आपण 'अजीव' द्रव्याचा परामर्श घेणार आहोत. जैन तत्त्वज्ञानानुसार हे दृश्य विश्व सत्य अगर वास्तव असून तो सहा द्रव्यांचा समुदाय आहे. ही सहा द्रव्ये म्हणजे जीव, धर्म, अधर्म, आकाश, काल आणि पुद्गल - होत. यातील 'जीव' वगळता उरलेली पाच द्रव्ये अजीव आहेत. पुद्गल हे पहिले अजीव द्रव्य आहे. ज्यांच्या लहानमोठ्या संघातांनी जगातील निरनिराळे अचेतन पदार्थ बनलेले आहेत त्या अणूंना ‘पुदगल' म्हणतात. त्यांच्या ठिकाणी सतत परिस्पंद व परिणाम या क्रिया सुरू असतात. परिस्पंद म्हणजे नुसती हालचाल तर परिणाम म्हणजे त्यांच्या गुणात व पर्यायात म्हणजे अवस्थांमध्ये झालेले बदल. प्रत्येक पुद्गलाच्या ठिकाणी स्पर्श,स, गंध व वर्ण (रूप) हे गुण असतातच. वैशेषिकांनी मांडलेल्या परमाणुवादापेक्षा जैनांचा परमाणुवाद ग्रीक तत्त्वज्ञानस अधिक जवळचा आहे. परमाणूंच्या संघातांना ‘स्कंध' म्हणतात. पुद्गलांचे स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर असे फरक आहेत कर्माचे सुद्धा अतिशय सूक्ष्म परमाणूच असतात. मृत्यूनंतर जीव हा स्वत:च्या सूक्ष्मतर कार्मण शरीरास घेऊनच दुसऱ्या शरीरात प्रवेशतो.
'धर्म' आणि 'अधर्म' नावाच्या स्वतंत्र तत्त्वांचा विचार जैन दर्शनाने केला आहे. याचा अर्थ सदाचार अगर दुराचार असा नाही. ह्या द्रव्यांनी सर्व लोकाकाश भरून टाकले आहे. यांचे वर्णन आधुनिक परिभाषेतmotion & intertia असे करता येईल. धर्मद्रव्य गतीस सहायक आहे. ते गतीस प्रेरणा देत नाही तर नुसती मदत करते. पाणी, काही माशांना ढकलत नाही, फक्त त्यांच्या गतीला वाव देते. अधर्मद्रव्य हे स्थितीचे उदासीन कारण आहे. स्थितिशील पदार्थांना एका ठिकाणी स्थिर रहाण्यास ते मदत करते. वृक्षाची सावली काही प्रवाशाला रोखून ठेवीत नाही पण सथला निवास सुखकर करण्यास मदत करते. म्हणजे ही स्थिति-गतींना आधारभूत तत्त्वे आहेत. ___चौथे अजीव तत्त्व 'आकाश' (space) हे आहे. सर्व द्रव्य-पदार्थांना अवकाश करून देणे, त्यांच्या अवगाहनास सहाय्य करणे हे आकाशाचे कार्य. आकाशाचे लोकाकाश आणि अलोकाकाश असे दोन भाग मानले. लोकाकाशसहा द्रव्यांनी भरून गेले आहे तर अलोकाकाश नुसतीच अखंड पोकळी आहे. तेथे पदार्थांची गती वा स्थिती शक्य नाही आत्तापर्यंत वर्णिलेली 'जीव' द्रव्य धरून पाच द्रव्ये 'अस्तिकाय' म्हणून संबोधली आहेत. 'पंचास्तिकाय' नावाच्या ग्रंथात त्याचे सविस्तर वर्णन आहे. 'काल' (time) हे सहावे द्रव्य आहे. त्याला लांबी, रुंदी, उंची अशी अनेक परिमाणे किंवा मिती नसतात. कालाचे अणू जणूकाही आडव्या दोऱ्यात मणी ओवावे तसे एकापुढे एक असतात. पदार्थांच्य मध्ये झालेले बदल अगर विकार आपल्याला जाणवून देण्यासाठी आधार-तत्त्व म्हणजे काल. पदार्थात बदल झाला तरी हाच तो पदार्थ' अशी ओळखही काळामुळेच पडते. दिवस, रात्र, महिना, वर्ष अशी गणती म्हणजे व्यवहारातील काळ होय. मुळात तो अखंड आहे.
जैनांचा षड्द्रव्यविचार संक्षेपाने अशा प्रकारचा आहे.
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
(आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५)
४. उत्तराध्ययनातील विशेष विचार
जैन साहित्यातील प्राचीन ग्रंथ 'अर्धमागधी' नावाच्या प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. हिंदू धर्मात जे स्थान 'भगवद्गीते'ला आहे, बौद्ध धर्मात जे स्थान ‘धम्मपद' ग्रंथाला आहे किंवा ख्रिश्चन धर्मात जे स्थान बायबल'ला आहे तेच स्थान जैन धर्मात 'उत्तराध्ययन' नावाच्या ग्रंथास आहे. ही साक्षात् ‘महावीरवाणी' समजली जाते. याच्या महत्त्वाछे यास 'मूलसूत्र' असे म्हणतात. जैन समाजात या लोकप्रिय ग्रंथाचा आजही खूप अभ्यास केला जातो. यातील मोजके विचार आपल्या अधिक विचारार्थ आपल्या पुढे ठेवीत आहे.
या संसारात प्राण्यांना चार गोष्टी अतिशय दुर्मिळ आहेत. मनुष्यजन्म प्राप्त होणे, सद्धर्माचे श्रवण करणे, धर्मावर अतूट श्रद्धा व संयमासाठी लागणारे सामर्थ्य या त्या चार गोष्टी आहेत. राग अर्थात् आसक्ती आणि द्वेष या दोन विकारांच्या द्वारे मनुष्य सतत कर्ममलाचा संचय करत असतो. हे त्याचे काम दोन्ही द्वारांनी माती खाणाऱ्या गुळासारखे असते. साधूने कशाचाही लेशमात्र संचय करू नये. पक्ष्याप्रमाणे सदैव विचरण करावे. तीन व्यापारी भांडवल घेऊन व्यापाराला निघाले. एकाने नफा कमावला. दुसरा भांडवलासह परत आला. तिसऱ्याने भांडवलही गमावले. मनुष्यत्व हे भांडवल आहे. देवगति ही लाभरूप आहे. मनुष्ययोनी गमावली तर नरक किंवा तिर्यंच गती प्राप्त होते. प्रवासाल निघालेला माणूस वाटेतच घर बांधून राहू लागला तर त्याला इच्छित स्थळाची प्राप्ती कशी होणार ? माणसानेही
आत्मकल्याणाचे ध्येय सोडून उपभोगांच्या विषयात रममाण होऊ नये. भ. महावीर आपला प्रमुख शिष्य जो गौतम त्यास म्हणतात – “हे गौतमा, काळाच्या ओघात पिवळी पाने जशी झाडावरून आपोआप गळून पडतात, तसे मानवी जीवन आहे. तु क्षणभरही बेसावध राह नकोस. सिंह जसा हरणाला पकडून फरफटत घेऊन जातो, त्याप्रमाणे मृत्यू मनुष्यावर झडप घालतो. अशा वेळी नातेवाईक, मित्र, शेजारी उपयोगी पडू शकत नाहीत. फक्त त्याचे कर्म तेवेढत्या कर्त्याच्या मागे जाते. पढलेले वेद आम्हाला तारणार नाहीत. ब्राह्मण भोजने घालणे हा काही मोठा धर्माचा मार्गनाही. श्राद्ध वगैरे करणारे पत्रसुद्धा गेलेल्या जीवाचे काहीच बरेवाईट करू शकत नाहीत."
'अमुक अमुक मी मिळवले. अमुक अमुक मिळवायचे राहिले'-अशा विचारात तू गुंतून राहशील तर मृत्यू तुला कधी गाठेल याचा पत्ताही लागणार नाही. जसजसा माणसाला लाभ होतो, तसतसा त्याचा लोभ वाढतच जातो. दोन कवड्यांची आरंभी इच्छा करणारा माणूस, सोन्यारूपाचे पर्वत मिळूनही तृप्त होतच नाही. जरामरणाच्या प्रवाहात वेगाने वाहन जाणाऱ्या जीवास धर्म हेच द्वीप, तीच गती व तेच शरणस्थान आहे.
भ. महावीरांनी जातिसंस्थेस प्राधान्य देणाऱ्या समाजातील मान्य विचारांवर घणाघाती प्रहार केले. ते म्हणतात, 'केवळ मुंडन केल्याने कोणी श्रमण होत नाही, समभाव ठेवल्याने श्रमण होतो. ओंकाराच्या जपाने नव्हे तर मलमज्ञानाने ब्राह्मण होतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हा जो तो आपल्या कर्मांनी होतो, केवळ जन्माने नव्हे.'
**********
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
४. जैन दर्शनातील ‘पुनर्जन्म' संकल्पना
('जैन-जागृति' मासिक पत्रिका, मे २०११)
परंपरेने 'आस्तिक' मानलेल्या भारतीय दर्शनांनी ज्याप्रमाणे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म या संकल्पना मांडल्या आहेत, त्याचप्रमाणे नास्तिक' समजलेल्या जैन दर्शनानेही या संकल्पना सर्वस्वी मान्य केल्या आहेत.
जगत् अथवा विश्व अनादि-अनंत मानल्यामुळे आणि सृष्टिनियामक ईश्वराचे अस्तित्व नाकारल्यामुळे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्माला जैन दर्शनात अनन्यसाधारण महत्त्व लाभले. जीव (soul) आणि अजीव (matter) अशी दोन स्वतंत्र तत्त्वे मानली तरी कर्मांना पुद्गल किंवा परमाणुरूप मानून जैनांनी 'कषाय' आणि 'लेश्या' यांच्या मदतीने त्यांच्यातील अनादि संपर्क मान्य केला.
सत्ताशास्त्रीय दृष्टीने जीव (individual soul) हे एक गुण-पर्यायात्मक द्रव्य आहे. पुद्गलमय कर्म हेही गुणपर्यायात्मक द्रव्य आहे. यांच्या संपर्कामुळे जीवाला मिळणाऱ्या विविध गतींमधील शरीरे हे जीवाचे जणू पर्यायच आहेत. जन्म-मरणाचे अव्याहत चालू असलेले चक्र हे 'पुनर्जन्मा'चेच चक्र आहे.
जैन दर्शनात शरीरांचे पाच प्रकार सांगितले आहेत. शरीर हे जीवाचे क्रिया करण्याचे साधन आहे. औदारिक, वैक्रिय, आहारक, तैजस आणि कार्मण अशी पाच प्रकारची शरीरे एकूण असतात. त्यापैकी तैजस आणि कार्मण ही शरीरे जीवसृष्टीतील प्रत्येक जीवाशी अविनाभावाने संबद्ध आहेत. त्यातही कार्मण' शरीर हे वारंवार जन्म घेण्यास कारण ठरणारे मूलभूत शरीर आहे. ते अत्यंत सूक्ष्म आहे. पूर्वकृत कर्मांचा भोग (विपाक) आणि नवीन कर्मबंधंचे अर्जन - ही घटना प्रत्येक जीवात सतत घडत असते. 'उत्तराध्ययन' या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे राग (आसक्ती) आणि द्वेष हे सर्व कर्मांचे बीज आहे. ___आपली गति, जाति, लिंग, गोत्र आणि सर्व शारीरिक-मानसिक वैशिष्ट्ये पूर्वकृत कर्मानुसारच ठरत असतात. अनादि काळापासून एकेंद्रिय ते पंचेंद्रिय सृष्टीत भ्रमण करणारा जीव कर्मांचा पूर्ण क्षय करेपर्यंत सतत नवनवे जन्मधारण करीतच रहातो. कर्मांचे चक्र हे पुनर्जन्मांचेच चक्र आहे. जगातील प्रत्येक जीव अशा प्रकारे इतर अनंत जीवांच्य संपर्कात अनेकदा येऊन गेलेला आहे. जैन दर्शनाच्या दृष्टीने अनंत पुनर्जन्म ‘कविकल्पना' नसून वस्तुस्थिती अहे.
पुनर्जन्माच्या वस्तुस्थितीला पुरावा आहे का ? अर्थातच आहे. जैन दर्शनानुसार ज्ञान पाच प्रकारचे आहे. मतिश्रुत-अवधि-मन:पर्याय आणि केवल. त्यापैकी मतिज्ञान' हे इंद्रिये व मनाच्या सहाय्याने होणारे ज्ञान आहे. गर्भजन्मो जन्मणाऱ्या, पंचेंद्रिय संज्ञी (मनसहित) जीवाला विशिष्ट परिस्थितीत 'जातिस्मरण' नावाचे ज्ञान होऊ शकते. लेश्या, अध्यवसाय आणि परिणाम यांच्या विशुद्धीमुळे, मतिज्ञानाला आवृत करणाऱ्या कर्मांचा क्षयोपशम झाल्यास जातिस्मरण' अर्थात् पूर्वजन्माचे स्मरण होते. मानवांना तर ते होऊ शकतेच पण पशुपक्ष्यांनाही होऊ शकते. पूर्वजन्म-पुनमांचा हा व्यक्तिनिष्ठ पुरावा आहे. ____ बौद्ध धर्मातील 'जातककथा' या देखील अशाच प्रकारच्या पूर्वजन्मावर आधारित वृत्तांतआहे. जैन साहित्यातील शेकडो कथांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक कथांमधे पूर्वजन्म-पुनर्जन्मांचे कथन असते. पातंजल योगसूत्रातील.३९ (अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथान्त: संबोध:) आणि ३.१८ (संस्कारसाक्षात्करणात्पूर्वजातिज्ञानम्) या सूत्रांमधे जातिस्मरणचे उल्लेख आहेत. ____ जैन अध्यात्मात, आध्यात्मिक विकासाच्या १४ पायऱ्या (श्रेणी) आहेत. त्यांना ‘गुणस्थान' म्हणतात. त्यापैकी ४ थ्या पायरीवरील व त्यापुढे प्रगती केलेल्या जीवांना पूर्वजन्मांचे स्मरण' खात्रीने होत असते.
'अवधि' आणि 'केवल' ज्ञानाच्या धारक व्यक्ती आपली एकाग्रता केंद्रित करून इतर व्यक्तींचे पूर्वजन्म व पुनर्जन्म जाणू शकतात. अशा प्रकारे पुनर्जन्माची सिद्धी दुसऱ्याकडूनही होऊ शकते.
प्रत्येक गतीत (देव-मनुष्य-नरक-तिर्यंच) आणि जातीत (एकेंद्रिय ते पंचेंद्रिय) जन्मलेल्या जीवाची कायस्थिती
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आणि भवस्थिती यांचे सविस्तर वर्णन तत्त्वार्थसूत्रात येते.
सारांश काय ? तर जैन दर्शनाचा पूर्वजन्म - पुनर्जन्मावर १०० टक्के विश्वास आहे. त्याला त्यांनी सत्ताशास्त्रीय आणि ज्ञानशास्त्रीय आधार दिला आहे. कर्मसिद्धांताच्या विस्तृत आणि सूक्ष्म मांडणीत ही संकल्पना कौशल्याने गुंफली आहे. अध्यात्माच्या दृष्टीनेही पुनर्जन्माची उपपत्ती लावली आहे. समग्र जैन कथावाङ्मय व चरित्रे पूर्वजन्मपुनर्जन्माने भरलेली आहेत.
आधुनिक मानसशास्त्रीय संशोधकही पुनर्जन्माची सिद्धी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र विशिष्ट 'case-study ' पुनर्जन्म सुचवीत असला तरी व्यापक सार्वत्रिक सिद्धांतात अजून तरी त्याचे रूपांतर झालेले दिसत नाही.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
५. महावीरांच्या दृष्टीने 'वीर' कोण ?
(महावीरजयंती विशेषांक, दैनिक 'प्रभात', एप्रिल २००९)
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भ. महावीर' यांची ऐतिहासिकता निर्विवादपणे दृढमूल झाली आहे. इसवी सन पूर्व ५९९ मध्ये 'मगध' (अथवा मतांतराने 'विदेह') जनपदातील 'क्षत्रियकुंड' गणराज्यात ‘ज्ञातृ' कुळातील राजा 'सिद्धार्थ' व 'त्रिशलादेवी' यांच्या पोटी 'चैत्र शुद्ध त्रयादशीच्या मध्यरात्री भ. महावीरांचा जन्म झाला. या तेजस्वी बालकाचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. त्यांना 'महावीर' हे विशेषण का लावले गेले याविषयी त्यांच्या बालपणातील शौर्य व धाडसाच्या कथा परंपरेने नोंदविलेल्या आहेत. वर्धमान बालपणापासूनच ज्ञान-प्रतिभासंपन्न, एकांतप्रिय व चिंतनशील होते. वयाच्या २८ व्या वर्षी, मातापित्यांच्या मृत्यूनंतर आपले जेष्ठ बंधू नंदिवर्धन यांच्या अनुमती यांनी साधुजीवनाची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी एक वर्षभर दीन-दु:खी-गरजू लोकांना विपुल दाने दिली.
वयाच्या तिसाव्या वर्षी 'मार्गशीर्ष कृष्ण दशमीला' त्यांनी 'दीक्षा घेतली. त्यानंतर साडे बारा वर्षे त्यांनी कठोर तपस्या केली. 'वैशाख शुद्ध दशमीला' त्यांना केवलज्ञान' प्राप्त झाले. बोधीची चरमावस्था प्राप्त केल्यावर त्यांनी विहार करत धर्मोपदेश देण्यास आरंभ केला. त्यांच्या वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत अर्थात् 'अश्विन कृष्ण अमावस्येच्या' मध्यरात्रीपर्यंत त्यांनी प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी निरंतर उपदेश केला. जैन लोक दिवाळीच्या रात्र दीप प्रज्वलन करून त्यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात.
भ. महावीरांनी 'अर्धमागधी' या लोकभाषेत केलेले उपदेश त्यांच्या शिष्यांनी संकलित केले. ते सुमारे १००० वर्षे मौखिक परंपरेने जतन केले गेले. त्यानंतर म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात ते गुजरातमधील 'वलभी' येथे झालेल्या श्वेतांबर साधु परिषदेत ग्रंथारूढ करण्यात आले. आज आपल्यासमोर असलेले अकरा 'अंग' ग्रंथ 'महावीरवाणी' या नावाने ओळखले जातात.
पहिला अंगग्रंथ आचारांग' नावाने सुप्रसिद्ध आहे. प्राकृत भाषातज्ञांनी या ग्रंथाचा पहिला विभाग अर्धमागधी भाषेचा सर्वात प्राचीन नमुना म्हणून स्वीकारार्ह मानला आहे. या ग्रंथाचा अभ्यास करीत असताना त्यातील 'वीर' आणि ‘महावीर' या शब्दांकडे माझे लक्ष वेधले गेले. भ. महावीर स्वत: 'वीर' शब्द कोणकोणत्या संदर्भात वापरतत याची उत्सुकता लागून राहिली. त्यांचे तद्विषयक विचार या लेखात मांडले आहेत.
आचारांगाची भाषाशैली उपनिषदांशी अतिशय मिळतीजुळती आहे. महावीरांच्या उपदेशाचा काळ हा वैदिक परंपरेतील उपनिषत्काळाशी निकटता राखणारा असल्याने, ही गोष्ट नैसर्गिकच आहे.
___'वीर' हा शब्द वाच्यार्थाने रणांगणावर पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्याचा वाचक आहे. आचारांगात मात्र तो मेधावी, विवेकी मुनीसाठी उपयोजित करण्यात आला आहे. 'शस्त्रपरिज्ञा' आणि 'लोकविजय' या शीर्षकांच्या अध्ययनांमध्ये त्यांनी या शब्दाचा जास्तीत जास्त उपयोग केला आहे. अर्थातच हा 'आध्यात्मिक विजय' आहे, रणांगणावरील विजय नव्हे. अत्युच्च आत्मकल्याण' हे ध्येय, उद्दिष्ट आहे. 'अहिंसेचे पालन' हा त्याचा मार्ग आहे. ते म्हणतात, 'पणया वीरा महावीहिं' - अर्थात् वीरपुरुष या महापथाला समर्पित आहेत (जसा योद्धा ध्येयपूर्तीसाठी समर्पित असतो तसे). असे वीर ‘पराक्रमी' आहेत. ते साधनेतील अडथळे, विघ्ने यावर मात करतात.
बाह्य, दृष्य शत्रूवर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूद करणारा हा पराक्रम नव्हे. हा तर संयमाचा पराक्रम' आहे. आजूबाजूच्या त्रस (हालचाल करू शकणाऱ्या) जीवांना तर हा वीर जपतोच पण पृथ्वी, जल, अग्नि, वायु व वनस्पती या एकेंद्रिय जीवसृष्टीविषयीही हा जागृत, अप्रमत्त असतो. पर्यावरणाच्या सर्व घटकांचे हा प्राणपणाने रक्षण करतो.
भोजन करताना, वस्त्रे परिधान करताना, मार्गक्रमण करताना तसेच मल-मूत्र विसर्जन करताना हा आजूबाजूच्या कोणत्याही स्थूल-सूक्ष्म जीवाला इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेतो. हीच ‘शस्वपरिज्ञा' अर्थात् 'विवेक' आहे
सामान्य वीर हे शबूंना बंदी बनवितात, त्यात भूषण मानतात. हे आध्यात्मिक 'वीर' आपल्या उपदेशाने
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
अनेक प्राणिमात्रांना बंधनांपासून मुक्त करतात. भ. महावीर म्हणतात, ‘णारतिं सहते वीरे, वीरे णो सहते रतिं' अर्थात् हे वीरपुरुष संयम साधनेतील स्वत:ची ‘अरति' आणि असंयमातील 'रति' दोन्हीही सहन करत नाहीत. माध्यस्थवृत्ति धारण करतात.
__ अत्यंत मोजका, नीरस आणि रुक्ष आहार ते स्वीकारतात. स्वत: अन्न शिजवीत नाहीत. इतरांनी त्यांच्यासाठी बनवलेल्या आहारातील अगदी मोजकी भिक्षा जीवननिर्वाहापुरती ग्रहण करतात. वीराचे लक्षण सांगताना भ. महावीर म्हणतात, 'जागर-वेरोवरए वीरे' अर्थात् हा वीर सदैव अहिंसेविषयी जागृत आणि वैरभावापासून दूर असतो.
मेधावी, निश्चयी व विवेकी साधक ‘आत्मगुप्त' असतो म्हणजेच कुशल सेनापतीप्रमाणे स्वत:ला शाबूत ठेऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो. स्वत:च्या मनात डोकावणाऱ्या क्रोध, अहंकार, कपट, लोभ या भावनवर मात करतो. हा वीर क्षेत्रज्ञ' असतो म्हणजेच रणांगणाचा जाणकार आणि रणनीतीत कुशल असतो. भगवद्गीतेतही क्षेत्रक्षेत्रज्ञ अध्यायात शरीराला 'क्षेत्र' आणि आत्म्याला क्षेत्रज्ञ' म्हटले आहे.
आचारांगात 'वीर्य' आणि 'पराक्रम' हे शब्द वारंवार उपयोजिले आहेत. हा पराक्रम अर्थातच संयमात आणि आत्मविजयात दडलेला आहे. 'महावीरा विप्परक्कमंति' अशी शब्दयोजनाही आढळून येते.
साधनेचा मार्ग कितीही खडतर असला तरी ते वीर मनाची प्रसन्नता घालवीत नाहीत. खिन्न, विमनस्क होत नाहीत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक साधकाची वाटचाल ‘एकट्याने करावयाची मार्गक्रमणा' आहे. યેથી૪ મનુભૂતી પ્રત્યેાવી સ્વતંત્ર સ્વતંત્ર માટે. હા સામુદ્રાયિક મા નાહી. મ. મહાવીર સ્ફળતાત દુરyવરો મયાધીરા अणियट्टगामीणं' - अर्थात् येथे कोणी सोबती नाही आणि खरा वीर मार्गावरून पुन्हा फिरत नाही.
आचारांग ग्रंथातील शेवटचे अध्ययन ‘उपधानश्रुत' म्हणून प्रसिद्ध आहे. भ. महावीरांच्या उपदेशांचा संग्रह करणाऱ्या प्रभावी आचार्यांनी ते लिहिले असावे. त्यांनी सांगितलेली 'वीराची लक्षणे' त्यांच्या चरित्रातून कशी दिसम्त ते सांगून अखेरीस म्हटले आहे -
'सूरो संगामसीसे वा, संवुडे तत्थ से महावीरे । पडिसेवमाणे फरुसाई, अचले भगवं रीइत्था ।।'
प्रतिक्षणी अहिंसेचे पालन करण्यात दक्ष असलेले हे तीर्थंकर गेली २६०० वर्षे महावीर' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेली आध्यात्मिक पराक्रमाची लक्षणे त्यांनी स्वत: तंतोतंत पाळली म्हणून तर त्यांच्याच शब्त सांगायचे तर, ‘एस वीरे पसंसिए' अर्थात् या वीराची एवढी प्रशंसा झाली !!!
**********
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
६. महावीरवाणीतून भेटलेले महावीर
( स्वाध्याय शिबिर, महावीर प्रतिष्ठान, पुणे, विशेष:
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर 'भ. महावीर' यांची ऐतिहासिकता निर्विवादपणे दृढमूल झाली आहे. इसवी सन पूर्व ५९९ मध्ये 'मगध' (अथवा मतांतराने 'विदेह' ) जनपदातील 'क्षत्रियकुंड' गणराज्यात 'ज्ञातृ' कुळातील राजा 'सिद्धार्थ' व 'त्रिशलादेवी' यांच्या पोटी 'चैत्र शुद्ध त्रयादशीच्या' मध्यरात्री भ. महावीरांचा जन्म झाला. या तेजस्वी बालकाचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. त्यांना 'महावीर' हे विशेषण का लावले गेले याविषयी त्यांच्या बालपणातील शौर्य व धाडसाच्या कथा परंपरेने नोंदविलेल्या आहेत. वर्धमान बालपणापासूनच ज्ञान- प्रतिभासंपन्न, एकांतप्रिय चिंतनशील होते. वयाच्या २८ व्या वर्षी, मातापित्यांच्या मृत्यूनंतर आपले जेष्ठ बंधू नंदिवर्धन यांच्या अनुमतीनेत्यांनी साधुजीवनाची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी एक वर्षभर दीन-दुःखी - गरजू लोकांना विपुल दाने दिली.
वयाच्या तिसाव्या वर्षी ‘मार्गशीर्ष कृष्ण दशमीला' त्यांनी 'दीक्षा' घेतली. त्यानंतर साडे बारा वर्षे त्यांनी कठोर तपस्या केली. 'वैशाख शुद्ध दशमीला' त्यांना 'केवलज्ञान' प्राप्त झाले. बोधीची चरमावस्था प्राप्त केल्यावर त्यांनी विहार करत धर्मोपदेश देण्यास आरंभ केला. त्यांच्या वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत अर्थात् 'अश्विन कृष्ण अमावस्येच्या' मध्यरात्रीपर्यंत त्यांनी प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी निरंतर उपदेश केला. जैन लोक दिवाळीच्या रात्री दीप प्रज्वलन करून त्यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात.
व्याख्यान,
मे २०११)
भ. महावीरांनी 'अर्धमागधी' या लोकभाषेत केलेले उपदेश त्यांच्या शिष्यांनी संकलित केले. ते सुमारे १००० वर्षे मौखिक परंपरेने जतन केले गेले. त्यानंतर म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात ते गुजरातमधील 'वलभी' येथे झालेल्या श्वेतांबर साधु परिषदेत ग्रंथारूढ करण्यात आले. आज आपल्यासमोर असलेले अकरा 'अंग' ग्रंथ 'महावीरवाणी' या नावाने ओळखले जातात.
'आचारांगसूत्र' हा अर्धमागधी भाषेतील सर्वात प्राचीन व पहिला अंगग्रंथ आहे. याची भाषा गद्यपद्यमय आहे. उपनिषदांच्या शैलीशी मिळतीजुळत्या अशा सूत्रमय, तत्त्वचिंतनात्मक विचारांनी हा ग्रंथ पुरेपूर भरला आहे. खेर तर ‘आचारांग’ म्हणण्यापेक्षा 'विचारांग' शीर्षकच त्याला शोभून दिसेल. गृहस्थावस्थेचा त्याग करून, आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय अहिंसेच्या आधारे प्रत्यक्षात उतरविणाऱ्या प्रबुद्ध, विवेकी साधकाचे चिंतनोन्मेष व उद्गार या ग्रंथात शब्दबद्ध केलेले आहेत. 'नत्थि कालस्स णागमो ।' 'सव्वेसिं जीवियं पियं' अथवा 'सुत्ता अमुणी, सया मुणो जागरंति' अशा सोप्या, छोट्या वाक्यांना महावीरांच्या वाणीचा 'परतत्त्वस्पर्श' झाल्याने, ते आध्यात्मिकांसाठीदीपस्तंभ ठरले आहेत. संपूर्ण अहिंसा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक हालचाल, व्यवहार, अन्नग्रहण, वस्त्रग्रहण, मलमूत्रविसर्जन, तपस्या, तितिक्षा कशी करावी त्याचे हे 'प्रॅक्टिकल गाइडबुक' आहे. गूढगहन सिद्धांत, अवघड तत्त्वचर्चा, विश्कपत्तीची मीमांसा, ज्ञानाची मीमांसा यांना स्थान न देता जीवन जगण्याच्या ध्येयप्रधान शैलीवर भर दिलेला असतो.
‘सूत्रकृतांग’ या ग्रंथात महावीरांच्या जीवनाचा वेगळाच पैलू दिसतो. स्व-सिद्धान्त आणि पर-सिद्धान्त यात नोंदवले आहे. नियतिवाद, अज्ञानवाद, जगत्कर्तृत्ववाद, लोकवाद यांच्या सिद्धांतांचे मंडन व निरसन आहे. पंचाखादी, षष्ठभूतवादी, अद्वैतवादी अशा विविध मतांची नोंद आहे. स्वतःच्या सिद्धान्तांचे नीट मंडनही केले आहे. खंडन करताना कलह, वितंडवाद, कठोरता, उपहास या शस्त्रांचा वापर केलेला नाही. अनेकान्तवादी दृष्टी ठेवून स्वत:चे सिद्धांत ठामपणे मांडले आहेत. 'आर्द्रकीय' आणि 'नालन्दीय' अध्ययनात आलेले संवाद त्या काळच्या दार्शनिक विचारप्रवाहांवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहेत. सूत्रकृतांगाची जमेची बाजू हीच आहे.
‘स्थानांग’ आणि ‘समवायांग' ह्या ग्रंथातून महावीरांच्या प्रतिभेचा आणखी वेगळा पैलू दिसतो. हे ग्रंथ कोशवजा आहेत. 'एक संख्या असलेल्या गोष्टी' स्थानांगाच्या पहिल्या अध्ययनात, 'दोन संख्यायुक्त' दुसऱ्या अध्ययत याप्रमाणे दहा अध्ययनांची रचना आहे. त्या काळची दहा आश्चर्ये, दीक्षा घेण्याची दहा कारणे, दहा महानद्या, दहा
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
प्रख्यात नगरींची नावे अशा सांस्कृतिक, ऐतिहासिक व भौगोलिक गोष्टींची नोंद यात आहे. दहाच्या पुढील विविध संख्यांचा विचार समवायांगात केला आहे. २४ तीर्थंकरांची नावे, १८ प्रकारच्या लिपींची नावे, ६४ व ७२ कलांची (विद्यांची) नावे आणि जैन धर्मासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती यातन मिळते.
चाळीस प्रदीर्घ प्रकरणांनी बनलेला व्याख्याप्रज्ञप्ति' किंवा 'भगवती' हा ग्रंथ ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. हा ग्रंथ अनेक संवाद आणि प्रश्नोत्तरांनी नटलेला आहे. गौतम गणधर आणि भ. महावीर यांची सिद्धांतविषयक चर्चा खूपच उद्बोधक आहे. महावीरांच्या पूर्वीचा पार्श्वनाथप्रणीत निग्रंथ धर्म कशा स्वरूपाचा होमते यातूनच समजते. महावीरांच्या अनेक वर्षावासांची (चातुर्मासांची) हकीगत यात नोंदवली आहे. महावीर व त्यांचा विरोधक शिष्य 'गोशालक' यांची अनोखी भ्रमणगाथा यातूनच उलगडत जाते. अंग, वंग, मलय, लाढ, वत्स, काशी, कोशल इ. १६ जनपदांचा उल्लेख प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. महाभारत जसे अनेक संस्करणे होत होत वाढत गेले तसा हा ग्रंथ उत्तरवर्ती काळात भर पडत पडत बृहत्काय झाला असावा. महावीरांच्या समकालीन इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा हा ग्रंथ जैनविद्येच्या अभ्यासकांनी खूप प्रशंसिला आहे.
‘ज्ञातृधर्मकथा' ग्रंथाच्या पूर्वभागात महावीरांनी सांगितलेले प्रतीकात्मक दृष्टान्त आणि दीर्घकथा त्यांच्या विहारकाळातील लोकाभिमुखतेकडे आपले लक्ष वेधून घेतात. हा ग्रंथ नक्कीच जनसामान्यांसाठी आहे. आठ प्रकाच्या कर्मांचा सिद्धांत भोपळ्याला दिलेल्या आठ लेपांच्या दृष्टांतातून मांडला आहे. प्रत्येकी पाच अक्षता देऊन चासुनांची परीक्षा घेण्याची कथा, वाड्.मयीन दृष्ट्या सरस व रंजक तर आहेच परंतु अखेरीस 'पाच महाव्रतांचे साधूने कसेपालन करावे' असा बोधही दिला आहे. 'द्रौपदीने पाच पतींना का वरले ?' हे स्पष्ट करण्यासाठी तिच्या तीन पूर्वजमांचा सांगितलेला वृत्तांत एका वेगळ्या अद्भुत विश्वात घेऊन जातो. 'मल्ली' नावाच्या अध्ययनात तीर्थंकरपद प्राप्त केलेया सुंदर, बुद्धिमान व वैराग्यसंपन्न स्त्रीची अप्रतिम कथा रंगविली आहे. तेतलीपुत्र नावाचा मंत्री आणि सोनाराची कन्या 'पोट्टिला' यांच्या विवाहाची, वितुष्टाची आणि पोट्टिलेच्या आध्यात्मिक प्रगतीची कथा अशीच मनोरंजक आहे. तत्त्वचिंतक महावीरांचे हे गोष्टीवेल्हाळ रूप नक्कीच स्तिमित करणारे आहे.
साधुधर्म कितीही आदर्श असला तरी सामान्य गृहस्थांना कठोर संयमपालन शक्य नसल्याने महावीरांनी त्यांच्यासाठी उपासकधर्म, श्रावकधर्म अथवा गृहस्थधर्मही समजावून सांगितला. 'आनंद' नावाच्या श्रावकाने श्रावकवेत घेऊन आपला परिग्रह व आसक्ती कशी क्रमाक्रमाने कमी केली त्याचा वृत्तांत पहिल्या अध्ययनात विस्ताराने येतो वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील स्त्रीपुरुषांच्या या हकिगती तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकतात. सर्वसामान्यांम झेपेल अशा धार्मिक आचरणाचा उपदेश देणारे वेगळेच महावीरांचे दर्शन ‘उपासकदशा' नावाच्या या ग्रंथातून होते
'अंतगडदशासूत्र' ह्या ग्रंथाचे पर्युषणकाळात वाचन करण्याचा परिपाठ आहे. यातील अर्जुनमाळी आणि बन्धुमती यांची कथा अतिशय रोचक आहे. महाभारतातील काही प्रमुख व्यक्तिरेखांची हकिगत या ग्रंथात येते. कृण, वासुदेव, देवकी, अरिष्टनेमी, द्वीपायन ऋषि, द्वारकेचा विनाश अशा अनेकविध कथा यात येतात. स्त्रियांनी केलेल्या कठोर तपश्चर्यांची वर्णने आश्चर्यकारक आहेत. “अनुत्तरोपपातिकदशा” या ग्रंथाचे स्वरूपही सामान्यत: असेचआहे. 'प्रश्नव्याकरण' ग्रंथात प्रश्न व त्यांची उत्तरे असावीत. आज उपलब्ध असलेल्या प्रश्नव्याकरणाचे स्वरूप मात्र पूर्ण सैद्धांतिक आहे.
___ विपाकश्रुत' ग्रंथात चांगल्या कर्मांचे सुपरिणाम आणि वाईट कर्मांचे दुष्परिणाम कथांच्या माध्यमातून सांगितेल आहेत. 'दृष्टिवाद' नावाच्या बाराव्या अंगग्रंथाचा लोप झाला असे जैन परंपरा सांगते.
भ. महावीरांनी त्यांच्या निर्वाणापूर्वी सतत तीन दिवस ज्याचे कथन केले तो ग्रंथ ‘उत्तराध्ययनसूत्र' नावाने ओळखला जातो. गीता, धम्मपद, बायबल, कुराण अथवा गुरुग्रंथसाहेबाचे त्या त्या धर्मात जे आदरणीय स्थान आहे तेच स्थान श्वेतांबर जैन परंपरेत उत्तराध्ययनसूत्राचे आहे. यात तत्त्वज्ञान, जगत्-मीमांसा, कर्मविज्ञान, ज्ञानमीमांसा, कथा, संवाद, आचरणाचे नियम इ. अनेक गोष्टींचा समावेश आहे. श्रमणपरंपरेची अनेक वैशिष्ट्ये या ग्रंथातून फ्रट होतात.
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
वर वर्णन केलेल्या ग्रंथांचा सामग्याने, एकत्रित विचार केला तर महावीरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक आयाम त्यातून प्रकट होतात. आचारांगातून शुद्ध तत्त्वचिंतक महावीर प्रकटतात. सूत्रकृतांगात ते विविध दार्शनिक विचप्रवाहांच्या खंडनमंडनात मग्न दिसतात. स्थानांग-समवायांगात त्यांची कोशविषयक प्रतिभा प्रकट होते. व्याख्याप्रज्ञप्तीतून ते अनेक समकालीन ऐतिहासिक तथ्यांवर प्रकाश टाकतात. ज्ञातासूत्रातून त्यांच्या कथा व दृष्टान्तरचनेचे कौशल्य फ्रट होते. उपासकदशेत ते गृहस्थोपयोगी धार्मिक आचार सांगतात. विपाकश्रुत ग्रंथातून ते कर्मसिद्धान्ताचे व्यावहरिक परिणाम दर्शवितात तर 'उत्तराध्ययनसूत्र' त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचा कळसाध्याय आहे.
जैन परंपरा अवतारवादावर विश्वास ठेवत नाही. भ. महावीर काही पुन्हा अवतरणार नाहीत पण महावीरवाणीतून आपण आपापल्या कुवतीनुसार त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पुन:पुन: वेध मात्र घेऊ शकतो.
**********
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
७. जैन साहित्याची संक्षिप्त ओळख
(महावीरजयंती विशेषांक दैनिक 'प्रभात', एप्रिल २०११)
इसवी सन पूर्व पाचव्या शतकापासून, इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकापर्यंत जैन आचार्यांनी, जैन धर्माच्या अनुषंगाने, विविध भारतीय भाषांमध्ये आणि विविध वाङ्मयप्रकारांमध्ये प्रचंड साहित्याची निर्मिती केलेली दिसेत भ. महावीरांचे प्रारंभिक उपदेश ‘अर्धमागधी' भाषेत निबद्ध आहेत. श्वेतांबर परंपरेने महावीर-निर्वाणानंतर सुमारे 200 वर्षे हे उपदेश मौखिक परंपरेने जपले. त्यानंतर ते लिखित स्वरूपात आणले. लिपिबद्ध केले, ग्रंथारूढ केले. यप्रदीर्घ कालावधीत त्या उपदेशात थोडी-थोडी भाषिक परिवर्तने येत गेली. नवनवीन ग्रंथकारांनी आपल्या रचना त्यात साविष्ट केल्या. इ.स.५०० नंतर हे भर पडण्याचे काम थांबले. अर्धमागधी भाषेतील ४५ ग्रंथ ‘महावीरवाणी' नावाने संबोको जाऊ लागले. श्वेतांबर परंपरेतील स्थानकवासी' संप्रदाय यापैकी ३२ ग्रंथांनाच 'महावीरवाणी' मानतो.
__ दिगंबर परंपरेने आपले सर्व प्रारंभिक लेखन शौरसेनी' नावाच्या प्राकृत भाषेतून प्रथमपासूनच लिखित स्वरूपात आणले. शौरसेनी भाषेतील सुमारे १५ प्राचीन ग्रंथांना दिगंबर-परंपरा ‘आम्नाय' अगर ‘आगम' म्हणून संबोधते. त्यातील विषय मुख्यत: सैद्धांतिक, तत्त्वज्ञानात्मक, आध्यात्मिक आणि आचारप्रधान आहेत. 'शौरसेनी' भाषेच्या पाठोपाठ दिगंबरांचे साहित्य प्रामुख्याने संस्कृत भाषेत लिहिलेले दिसते. मूळ ग्रंथांवरील टीका, तत्त्वज्ञानन्याय, चरित (चरित्र), पुराण, चम्पूकाव्य, गणित - असे विविधांगी साहित्य जैनांनी अभिजात संस्कृतात रचले. आठव्या-नवव्या शतकापासून दिगंबरांनी 'अपभ्रंश' नावाच्या समकालीन प्राकृत भाषेत चरिते, पुराणे, दोहे यांची रचना केली.
श्वेतांबर आचार्य इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून 'महाराष्ट्री' नावाच्या प्राकृत भाषेमध्ये ग्रंथरचना करू लागले. जैन पद्धतीने लिहिलेले पहिले रामायण ‘पउमचरिय' याच भाषेत आहे. चरिते-महाकाव्ये-खण्डकाव्ये याबरोब्लम श्वेतांबरांनी फार मोठ्या प्रमाणावर उपदेशप्रधान कथाग्रंथांची रचना केली. ही 'महाराष्ट्री' भाषा जैनेतरांनीलिहिलेल्या महाराष्ट्रीपेक्षा वेगळी आणि अर्धमागधी भाषेने प्रभावित अशी आहे. मधूनमधून शौरसेनी भाषेची झलकही त्यात दिसते. जैनांच्या महाराष्ट्री भाषेला, भाषाविद् 'जैन महाराष्ट्री' असे नामाभिधान देतात. कोणत्याही भारतीययक्तीला आकृष्ट करील असे अनुपमेय कथांचे भांडार आज जैन महाराष्ट्री' या प्राकृत भाषेत उपलब्ध आहे. स्व. दुर्गलाई भागवत यांनी ज्याप्रमाणे पालि भाषेतील 'जातककथा' मराठीत प्रथम आणल्या, त्याप्रमाणे अर्धमागधी आणि महाराष्ट्री भाषेतील जैन कथा मराठीत आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'जैन अध्यासन' आणि 'सन्मति-तीर्थ' संस्था यांच्या सहयोगाने सध्या चालू आहे. पाच खंड प्रकाशित झाले आहेत. __१६-१७ व्या शतकानंतर आजपावेतो जैनांनी, विशेषत: दिगंबर जैनांनी मराठीत लिहिलेल्या ग्रंथांची संख्याही विशेष लक्षणीय आहे. आधुनिक कन्नड भाषेतील साहित्याला जैन कवींनी आरंभीच्या काळात मोलाचे योगदान केले आधुनिक गुजराती भाषेतील प्रारंभीच्या ग्रंथरचनेतही श्वेतांबर जैन आचार्यांचा मोलाचा वाटा आहे, असे आढळूयेते.
सारांश काय ? - तर संख्येने अल्प असलेल्या जैन साहित्यिकांनी संस्कृतबरोबरच विविध प्राकृत बोलीभाषातून ग्रंथरचना करून भारतीय साहित्याला आपले महत्त्वाचे योगदान दिले. 'आचारांग' नावाच्या ग्रंथाची शैली उपनिषदम्या भाषेशी जवळीक साधते - तीही बोलीभाषेतून ! 'ऋषिभाषित' या अर्धमागधी ग्रंथात ब्राह्मण, बौद्ध आणि जैन अशा एकूण ४५ ऋषींचे विचारधन संकलित केलेले आहे. उत्तराध्ययन' हा जैन ग्रंथ आणि बौद्धांचे ‘धम्मपद' यात विलक्षा साम्य आहे. 'ज्ञाताधर्मकथा' ग्रंथातील कथा व दृष्टांत एकाहून एक सरस आहेत. 'तत्त्वार्थसूत्र' हा ग्रंथ संस्कृत्सूत्रांमध्ये निबद्ध असा अनुपमेय दार्शनिक ग्रंथ आहे. 'षट्खंडागम' हा आद्य दिगंबर ग्रंथ ‘कर्मसिद्धांत' आणि 'आध्यात्मिक विकासाच्या श्रेणी' या विषयांना वाहिलेला आहे. 'गोम्मटसार' या दिगंबर ग्रंथात जीवसृष्टीचा सूक्ष्म विचार ग्रथित केला आहे. महावीराचार्यांचा ‘गणितसार' ग्रंथ शास्त्रीय ग्रंथनिर्मितीतला मुकुटमणी आहे. हरिभद्रांचे प्राकृत भाषेतील 'धूर्ताख्यान'-व्यंग-उपहासाचा अजोड नमुना आहे. 'वसुदेवहिंडी' हे बोलीभाषेतले पहिले कथाप्रधान प्रवासवर्णन
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
आहे.
भ. महावीरांच्या २६१० व्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिलेली ही कृतज्ञतेची साहित्यिक भावांजली !! जय जिनेंद्र
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
८. प्राकृत म्हणजे काय ? जैनांनी प्राकृत का शिकावे ?
(तीर्थंकर' मासिक पत्रिका, मुंबई, जुलै २००६)
संपूर्ण जगात सुमारे २००० भाषा बोलल्या जातात. विद्वानांनी त्या भाषांचे वेगवेगळे १२ गट केले आहेत. त्यापैकी एका गटाला भारोपीय (इंडो-युरोपियन) भाषागट असे म्हटले जाते. संस्कृत, प्राकृत आणि पालीया भाषा या परिवारात येतात. “प्राकृत' ही काही पालीसारखी एक, एकजिनसी भाषा नाही. इ.स.पू. ५०० पासून इ.स. १२०० पर्यंतच्या प्रदीर्घ काळात भारतात ज्या विविध बोलीभाषा बोलल्या जात होत्या, त्या सर्व “प्राकृत' नावाच्या अंतर्ग येतात.
“संस्कृत' ही भाषा वेदकाळापासून जवळजवळ १७ व्या शतकापर्यंत सर्व भारतीयांची ज्ञानभाषा होती. सर्व प्रकारच्या कला व विद्यांचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने संस्कृत भाषेच्या माध्यमातून होत होते. धार्मिक साहित्य, गीत, खगोल, ज्योतिष, नाट्यशास्त्र, वास्तू व शिल्पशास्त्र, वैद्यक अशा विविध ज्ञानशाखांचे सुप्रसिद्ध व उत्कृष्ट शास्त्रग्रंथ संस्कृत भाषेतच लिहिलेले दिसून येतात.
एक गोष्ट अगदी खरी आहे की वर्णाश्रमव्यवस्थेचा पगडा भारतीय समाजावर असल्याने आणि हजारो वर्षांची पुरुषप्रधान संस्कृती येथे सर्रास रूळलेली असल्याने संस्कृतमधून शिक्षण घेणे व संस्कृतमधून लोकव्यवहार करणे हे अगदी आत्ताआत्तापर्यंत फक्त उच्चवर्णीयांची (ती सुद्धा पुरुषांची) मक्तेदारी होती. उच्चनीचतेवर आधारित जातिव्यवस्थ बांधलेला बहुजनसमाज व स्त्रिया, ही हजारो वर्षे काय करीत होत्या ? ते रोजच्या व्यवहारात, बाजारात, स्वयंपामरात, सामाजिक जीवनात कोणत्या भाषेचा वापर करीत होते ? या प्रश्नाचे उत्तर आहे - 'विविध प्राकृत भाषांमध्ये म्हणजे बोलीभाषांमध्ये, मातृभाषांमध्ये ते बोलत होते'.
प्राकृत भाषांचे व्याकरणाचे नियम जाचक नव्हते. उच्चारणाच्या बाबतीत शिथिलता होती. वेगवेगळ्या प्रांतातील भौगोलिक, सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळी शब्दसंपत्ती (Vocabulary) होती. प्रत्येक व्यवसायानुसारही भाषांमध्ये फरक होता. कुंभार, लोहार, सुतार असे बारा बलुतेदार थोडी थोडी वेगळ्या धाटणीची बोली बोलत होत स्त्रियांचे स्वयंपाकघर, सण, वार, उत्सव इत्यादी प्रसंगी या भाषांचा वापर होत असे. विनोद करणे, एकमेकांवर मनापासूनप्रेम करणे आणि क्रोधाच्या भरात अपशब्द इ. उच्चारणे, भांडणे या मानवी मनातील अगदी मूलभूत प्रेरणा आहेत. त्याच्या प्रकटीकरणासाठी अतिशय सुसंस्कृत अशा संस्कृत भाषेचा वापर या देशातील लोकांनी फारच कमी प्रमाणात केला दिसतो. या भावनांना प्राकृतद्वारेच वाट मिळे.
भारतातल्या सर्व बोलीभाषांना मिळून 'प्राकृत' असे नाव असले तरी ती प्रांतानुसार, व्यवसायानुसार विविध प्रकारची होती. या प्राकृत बोलीभाषाच खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांच्या मातृभाषा' आहेत. यांचे शिक्षण आईपासून मिळते. त्यांचा पगडा खोलवर असतो. सहसा त्या विसरत नाहीत.
आरंभीच्या काळात, प्राकृत बोलीभाषांमध्ये लिहिण्याचा प्रघात नव्हता. हळूहळू त्यातही पुस्तकांची रचना होऊ लागली. मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री व अपभ्रंश या प्राकृत भाषांमध्ये प्रामुख्याने ग्रंथरचना झालेली दिसते. ___भ. बुद्धांनी धर्मोपदेशासाठी ‘पाली' भाषा निवडली. तिचे साम्य ‘मागधी' भाषेशी होते. भ. महावीरांनी आपले सर्व धर्मोपदेश ‘अर्धमागधी' नावाच्या भाषेतून केले. आपला धर्म जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचावा ही त्यामागची भावना होती. धर्म हा आत्म्याशी निगडित असल्याने त्यांना संस्कृतची मक्तेदारी व पुरोहितवर्गाची मध्यस्थी मोडू काढायची होती.
___ श्वेतांबरीयांचे ४५ किंवा ३२ धर्मग्रंथ अर्धमागधी भाषेत आहेत. दिगंबर जैन पंथीयांचे सर्वात प्रचीन धर्मग्रंथ 'शौरसेनी' नावाच्या प्राकृतमध्ये लिहिलेले आहेत. हरिभद्र, हेमचंद्र, जिनेश्वर, मुनिचंद्र, देवेंद्र अशा अनेकानेकवेतांबर
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
जैन आचार्यांनी आपले धार्मिक, लौकिक,कथाप्रधान व उपदेशप्रधान ग्रंथ 'जैन महाराष्ट्री' या भाषेतून अनेक शक्के लिहिले आहेत. 'गाथासप्तशती'सारखे शृंगारिक मुक्तकाव्य महाराष्ट्री प्राकृतमधील सौंदर्याचा अद्वितीय अलंकार आहे. दिगंबर आचार्यांनी इ.स.च्या १० व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत अनेक प्रकारचे चरित्रग्रंथ 'अपभ्रंश' नावाच्या भाषेतून लिहिले. ही अपभ्रंश भाषा पूर्वीच्या प्राकृत भाषातूनच हळूहळू विकसित झाली होती.
आज आपण अनेक परदेशी भाषा अतिशय उत्साहाने शिकून त्यात प्राविण्य मिळवत आहोत. ही गोष्ट स्पृहणीय व अभिनंदनीय आहेच. परंतु त्याचबरोबर प्रत्येक जैन माणसाने (खरे तर अजैन माणसानेही) प्राकृत भाषांची तोंडकख करून घेतली पाहिजे.
__गुजराथी, मारवाडी, राजस्थानी, पंजाबी, हिंदी, मराठी, बंगाली, आसामी इ. आजच्या सर्व बोलीभाषा याच प्राकृतातून निघाल्या आहेत.
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
९. जैन साहित्यातील कथाभांडार
(भाषण, आकाशवाणी पुणे केंद्र, जून २०११)
श्रोतेहो,
आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून आत्तापर्यंत जे जे एतद्देशीय साहित्य अर्थात् वाङ्मय निर्माण झालं ते तीन भाषांमधे लिहिलेलं दिसतं. त्या भाषा म्हणजे संस्कृत, प्राकृत आणि पाली. वैदिक परंपरेचे अर्थात् हिंदधर्माचे ग्रंथ प्रामुख्यानं संस्कृतात आहेत. बौद्ध धर्माचं आरंभीचं साहित्य ‘पाली' भाषेत आहे. नंतरचं साहित्य संस्कृतात आहे. बौद्ध धर्म भारताबाहेर पसरल्यावर त्या त्या प्रांतांमधल्या प्रादेशिक भाषांत व लिपींमध्ये बौद्ध साहित्याचं लेखन झालं.
प्राकृत' या ऋग्वेदकाळापासून आम समाजात प्रचलित असलेल्या बोली भाषा आहेत. त्या प्रांतानुसार, लोकांच्या व्यवसायानुसार वेगवेगळ्या होत्या. आरंभी त्या केवळ दैनंदिन बोलचालीपुरत्याच मर्यादित होत्या. झवी सनापूर्वी ६ व्या शतकात भ. महावीर आणि भ. गौतम बुद्धांनी आपापले धर्मोपदेश अर्धमागधी आणि पाली या लोकभाषांमधे दिले. पहिल्यांदा काही शतकं ते तोंडी परंपरेनं पाठ करून जपले गेले. नंतर नंतर बोली भषांचं स्वरूप बदलत गेलं आणि स्मरणशक्तीही क्षीण होऊ लागली. परिणामी इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर प्राकृत साहित्य ग्रंथबद्ध होऊ लागलं. धार्मिक ग्रंथांखेरीज लौकिक ग्रंथांचीही निर्मिती होऊ लागली.
‘पाली' ही भाषा ‘मागधी' भाषेवर आधारित अशी प्राकृत भाषाच आहे. परंतु ‘पाली'चा स्वतंत्रपणं आणि विस्तारानं खूप अभ्यास झाला. शब्दकोषही बनले. इतर प्राकृत भाषांचा अभ्यास त्या मानानं नंतर झाला. त्यामुळं 'प्राकृत' या नावातून ‘पाली' भाषा वगळण्याचा प्रघात पडला.
साहित्य अर्थात् वाङ्मयामध्ये अनेक प्रकार व अनेक विषय समाविष्ट असतात. त्यापैकी जैनांनी लिहिलेल्या प्राकृत साहित्यातील कथाभांडाराचा आज आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. ___अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, अपभ्रंश आणि संस्कृत या पाच भाषांमध्ये जैनांनी जवळजवळ १५ शतके अर्थात् दीड हजार वर्ष सातत्यानं लेखन केलं. त्यापैकी महाराष्ट्री भाषेत तर कथांची खाणच उपलब्ध आहे. तोंडी परंपरेनं चालत आलेल्या कथा तर त्यात नोंदवलेल्या आहेतच परंतु क्लिष्ट विषय सोपा करून समजावून सांगण्यासठी नवनवीन कथांची निर्मिती देखील केलेली दिसते.
'कथा' हा एकच वाङ्मयप्रकार किती विविध रूपांनी नटून अवतरतो त्याची गणतीच नाही. कधी चार ओळींची छोटीशी चातुर्यकथा दिसेल तर कधी ४०० पानांची दीर्घकथा ! आत्ता आपण जिला कादंबरी म्हणतो क्लिा प्राकृतमधे कहा' अर्थात् 'कथा'च म्हटलं आहे. प्राकृत साहित्यात आख्यानं, उपाख्यानं, दृष्टांतकथा, रूपककथा, अद्भुतकथा, बोधकथा, प्रश्नोत्तररूपकथा, प्राणी-पक्षी-कथा यांची नुसती भरमार आहे.
वेगवेगळ्या जैन आचार्यांनी कथांचं वर्गीकरण सुद्धा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारांनी सादर केलं आहे ! दशवकालिक नावाच्या ग्रंथाच्या व्याख्येत आचार्य हरिभद्रांनी कथेचे परिणाम लक्षात घेऊन वर्गीकरण केलं आहे. तप, संयम, दान, शील अशा सद्गुणांचा परिपोष करणारी कथा ‘सत्कथा' असते. अज्ञान, अंधश्रद्धा, पाखंड वाढवणारी कथा ही 'अकथा' असते. राग, द्वेष, मत्सर, सूड, चोरी इत्यादी दुर्गुणांनी समाजात विकृती निर्माण करते ती 'विकथा' होय.
तीन पुरुषार्थांवर आधारित असं कथांचं वर्गीकरण ‘कुवलयमाला' या दीर्घ काव्यकथेत आरंभी नोंदवलं आहे. धार्मिक गुणांचा विकास करते ती 'धर्मकथा'. विद्या, शिल्प, अर्थार्जनाचे उपाय, त्यासाठी केलेलं परदेशगमन इ. प्रयत्न, तसेच साम-दान (दाम)-दंड-भेद यांचा विचार जिच्यात असतो ती 'अर्थकथा' ! रूप-सौंदर्य, तारुण्य, प्रेम, स्त्रीदाक्षिण्य यांना प्रकट करते ती कामकथा'. या तिन्हींच्या मिश्रणानं तयार होते ती 'मिश्रित' अथवा 'संकीर्ण'
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
कथा. धर्मकथेचे चार उपप्रकार सांगण्यात आले आहेत. मनाला अनुकूल ती आक्षेपणी' धर्मकथा, प्रतिकूल वाटणार 'विक्षेपणी', ज्ञान वाढवणारी 'संवेगजननी' आणि वैराग्य वाढवणारी 'निर्वेदजननी' धर्मकथा होय.
स्त्री-पुरुष विलासांचे वर्णन 'रात्रिकथे'त येते. तसेच चौर्यकर्त्यांचे वर्णनही यात येते. भोजन-मेजवान्यांची रसभरित वर्णनं भोजनकथे'त येतात. स्त्रियांची रंगेलपणे केलेली वर्णने व व्यभिचार 'स्त्रीकथे'चा विषय असतो. युद्ध, हेरगिरी, कूट-कारस्थानं, बंडाळी यांची वर्णनं 'जनपदकथेत' किंवा 'राष्ट्रकथेत येतात. अशा कथा साधूसाध्वींनी रचू नयेत आणि ऐकूही नयेत - असा निर्बंध साधु-आचारात घालण्यात आला आहे. 'वसुदेवहिंडी' नावाच्या प्रवासवर्णनात्मक ग्रंथात - आख्यायिका-पुस्तक, कथाविज्ञान आणि व्याख्यान यांचं विशेष विवेचन केलं आहे.
___ जैन कथालेखकांनी, 'कथा मनोरंजक करण्यासाठी कोणते उपाय वापरावेत ?' - याचा विचार केलेला दिसतो. कथा अधिकाधिक आकर्षक बनण्यासाठी तिच्यात पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे. जसे :- संवाद, बुद्धिपरीक्षा, वाक्-कौशल्य, प्रश्नोत्तर, उत्तर-प्रत्युत्तर, प्रहेलिका, समस्यापूर्ती, सुभाषित-सूक्ती, म्हणी-वाक्प्रचार, गीत-गीतिका-गाथा अशा विविध भाषातील पद्यरचना - इत्यादी इत्यादी.
समोर असलेला श्रोतृवृंद कसा आहे, कोणत्या आर्थिक-सामाजिक स्तरातला आहे, त्याची मानसिक अवस्था व बौद्धिक पातळी कोणती आहे - हे सर्व ध्यानात घेऊन वक्त्याने कथेचा विषय निवडावा आणि निरूपणाची पद्धतही त्यानुसार ठरवावी - असे म्हटले आहे. अधम-मध्यम-उत्तम' - अशी श्रोत्यांची वर्गवारी केलेली दिसते.
___ अर्धमागधी भाषेत लिहिलेले ११ अंगग्रंथ श्वेतांबर जैन साहित्यात ‘महावीरवाणी' या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यातील सहावा ग्रंथ आहे ज्ञाताधर्मकथा'. सामान्य लोकांचा बौद्धिक स्तर लक्षात घेऊन या ग्रंथात अनेक धार्मिक तत्त्वं आणि सिद्धांत - कथा आणि दृष्टांताच्या माध्यमातून चित्रित करण्यात आली आहेत. यात एकूण १४ कथा आणि ५ दृष्टांत आहेत. प्रत्येक कथेत स्त्रियांचे चित्रण अग्रभागी असलेलं दिसतं. 'स्थापत्या' नावाची कर्तृत्ववान स्त्री, आपल्या मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय स्वतंत्रपणे आणि जबाबदारीनं घेताना दिसते. 'घरकामाची वाटणी चार सुनांमधे कशी करायची ?' हा दैनंदिन आयुष्यातला पेच सोडवण्यासाठी सासरेबुवा कोणती परीक्षा घेतात ? - याचा मनोरंजक वृत्तांत 'रोहिणी' नावाच्या कथेत येतो. चारही सुनांच्या शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेतल्या जातात. माहेरच्या मंडळींच्या समक्ष परीक्षा घेतल्याने पक्षपाताची आशंका रहात नाही. कथेच्या अखेरीस महावी पाच महाव्रते धारण केलेल्या साधूला लावून दाखवतात.
'सतत शंकाकुल असणाऱ्या माणसाचे कधी भले होत नाही' - असा बोध मोराच्या दोन अंड्यांच्या दृष्टांतातून मिळतो. 'नंदीफल' नावाच्या वृक्षाची फळे कशी खायला गोड आणि परिणामी विषारी आहेत - यासाठीचा संदर दृष्टांत इथं योजला आहे. तलावातला बेडूक आणि समुद्रातला बेडूक यांचा अप्रतिम संवाद याच ग्रंथात चित्रित करण्यात आला आहे. महाभारतात कोठेही न आलेली द्रौपदीच्या तीन पूर्वजन्मांची साखळीबद्ध कथा यात वाचायला मिळते. द्रौपदीचे अपहरण, पांडवांचे निर्वासन, पांडुमथुरा अर्थात् मदुराईची निर्मिती - असे अनेक कथाभाग्नाचकांना स्तिमित करतात.
'उत्तराध्ययन-सूत्र' हा ग्रंथ सामान्यतः ‘धम्मपद' या बौद्ध ग्रंथासारखा आहे. वेगळेपण इतकेच की त्यातले काही संवाद व आख्यानं अतिशय आकर्षक आहेत. स्वत:ला सर्व प्रजेचा नाथ' समजणारा राजा वस्तुतः स्वत: किती 'अनाथ' आहे - हे एक मुनी राजाला समजावून सांगताना दिसतात. 'राजीमती' नावाच्या अत्यंत तेजस्वी चारित्र्यवान स्त्रीचा वृत्तांत यातूनच समजतो. ___अर्धमागधी ग्रंथांवर नंतरच्या काळात जे स्पष्टीकरणात्मक साहित्य लिहिले गेले त्याला 'टीका-साहित्य' म्हणतात. हे समग्र टीकासाहित्य कथा-कहाण्यांचं जणू अक्षय भांडारच आहे. योग्य आणि अयोग्य शिष्यांसाठी सूप, चाळणी, घडा इत्यादी अनेक मनोरंजक दृष्टांत दिले आहेत. मनुष्यत्वाचे दुर्लभत्व सांगण्यासाठी जैन साहित्यात वारंवार दहा दृष्टांत दिलेले दिसतात. मंत्रवलेले फासे घेऊन द्यूत खेळणारा जुगारी, ढीगभर धान्यात मोहरीचे दाणे
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
शोधणारी म्हातारी, समुद्राच्या तळाशी गेलेले हरवलेले रत्न शोधणारा नावाडी - असे एकाहून एक सरस दृष्टान्त थे आढळतात. 'सुखबोधा' नावाच्या एका ग्रंथात तर अक्षरश: शेकडो कथा प्रसंगोपात्त सांगितल्या आहेत.
आधीच्या ग्रंथात बीजरूपाने आलेल्या कथा नंतर-नंतरच्या ग्रंथात अधिकाधिक सुरस करून सांगितलेल्या दिसतात. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रकार चाणक्य ऊर्फ कौटिल्य याच्या जीवनाविषयीच्या काही कथा ‘आवश्यकचूर्णी' या ६-७ व्या शतकातील ग्रंथात प्रथम आढळल्या. वैदिक अथवा हिंदू आणि बौद्ध ग्रंथात या कथा सामान्यत: आढळत नाहीत. माझे कुतूहल चांगलेच जागृत झाले. प्राकृत आणि संस्कृत साहित्यात चाणक्याचा कसून शोध घेतला. सुमो ३०-३५ ग्रंथात चाणक्याच्या अनेक कथा आढळल्या. त्याचा जन्म, जन्मगाव, आईवडील, शिक्षण, नंदाच्या भोजनशालेतील अपमान, प्रतिज्ञा, चंद्रगुप्ताचा शोध, त्याचं रक्षण आणि शिक्षण, पाटलीपुत्रावर अयशस्वी हल्ले, पर्वतकाचे सहाय्य, दोघात राज्यविभागणी, विषकन्येची योजना, राज्याचा खजिना वाढविण्याचे प्रयत्न, कडक राज्यशासन, काही निष्ठुर, निर्णय, चंद्रगुप्ताचा मृत्यू, बिंदुसाराचा राज्याभिषेक, ‘सुबन्धु' नावाच्या नंदाच्या पक्षपाती मंत्र्याने चाणक्याशी धरलेले शत्रुत्व, बिंदुसाराची नाराजी, चाणक्याची निवृत्ती, त्याने एका गोठ्यात समाधी घेणं, सुबंधूने गोठ्यास कपटानं आग लावणं, चाणक्याचे प्रायोपगमन व अखेरीस मृत्यू - या साऱ्या ठळक घटना प्रथम विखुरलेल्या कथाभागांच्या रूपानं जैन साहित्यात दिसतात. हेमचन्द्र नावाच्या आचार्यांनी त्यांचं संकलन करून सलग चरित्र १२ व्या शतकात संस्कृतात लिहिलं. दिगंबर आचार्य हरिषेण यांनी आपल्या बृहत्कथेत चाणक्याचे पूर्ण जैनीकरण करून वेगळीच कथा लिहिलेली दिसते. चाणक्याची अपूर्व बुद्धिमत्ता, कडक शासनव्यवस्था आणि निरासक्ती यामुळे जैन परंपरेनं त्याला गौरवलेलं दिसतं. डोळस संशोधकाला जैन कथा साहित्यातील असे अनेक विषय खुणावत रहातात.
११ वे-१२ वे शतक जैन कथासाहित्याचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. या काळात स्वतंत्र कथासंग्रहांची निर्मिती होऊ लागली. कथाकोषप्रकरण, आख्यानमणिकोश, कुमारपालप्रतिबोध, मनोरमाकथा ही काही सुप्रसिद्ध जैन कथाग्रंथांची नावं सांगता येतील. उपदेशप्रधान कथाग्रंथांची जणू लाट उसळलेली दिसते. उपदेशपद, उपदेशमाल धर्मोपदेशमालाविवरण, उपदेशतरंगिणी ही त्यातील काही नावं. 'कहकोसु' अर्थात् ‘कथाकोष' नावाच्या अपभ्रंश ग्रंथात तत्कालीन प्रचलित कथांचा अप्रतिम संग्रह करून ठेवला आहे.
श्रोतेहो, जैन कथासाहित्यातील काही वेचक कथारत्नांचा आता रसग्रहणात्मक आस्वाद घेऊ.
'मेखल' नावाच्या एका साध्या, अशिक्षित परंतु बुद्धिमान गवळ्याने चार भावांच्या सांपत्तिक वाटण्यांचा तंटा कसा कुशलतेने सोडवला याची कथा 'मनोरमा' कथासंग्रहात येते. घरात शूरपणा दाखवणाऱ्या सोनाराचे भित्रे स्वरूप - त्याची पत्नी कोणत्या प्रसंगानं उघड करते, हे आपल्याला 'गृहशूर' कथेतून दिसतं. परकायाप्रवेशविद्येचं वर्णन करणारी विक्रमादित्याची कथा अशीच अद्भुतरम्य आहे. 'जसजसा जास्त पैसा येईल तसतशी बुद्धी फिरत जाते' - हे स्पष्ट करणाऱ्या दोन कथा खूपच रंजक आहेत. एकीचे नाव आहे 'अनर्थकारक अर्थ' आणि दुसरीचेनाव आहे ‘पापाचा बाप कोण ?'. साधूंची टिंगलटवाळी करण्यासाठी चंडचूडाने नियम घेतला की, 'समोरच्या कुंभाराचं झळझळतं टक्कल मध्यान्हीच्या उन्हात पाडल्याशिवाय मी भोजन घेणार नाही.' हा थट्टेनं घेतलेला नियम पाळताना कोणत्या अडचणी आल्या, त्याचं कोणते फळ मिळालं, याची ही गंमतीदार कथा लहान मुलांना खूपच आवडते. वसुदेवहिंडीतील कोंकणक ब्राह्मणाची कथा, लोकांना पशुबळीपासून दूर करण्याच्या उद्देशानं लिहिली असली तरी तिची मांडणी अतिशय आकर्षक आणि कुतूहल शेवटपर्यंत टिकवून ठेवणारी आहे.
भाग्यात नसेल तर कमनशिबी माणसाला देवाचे कितीही वर मिळाले तरी त्याच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही. याउलट भाग्यात असेल तर गरीब अंध व्यक्तीसुद्धा उत्कर्षाला जाऊ शकते - असं तात्पर्य ‘प्राकृतविज्ञान-कथे'तल्या दुर्दैवी' या कथेत आढळते. श्रीपालकथेत सुरसुंदरी आणि मदनासुंदरी या दोन बहिणींची लचक गोष्ट रंगवून रंगवून सांगितली आहे. राजाला फार गर्व होतो की माझ्या मुलींना मी जन्म दिला. त्या रूपवतीगुणवती-श्रीमंत आहेत. त्यांचा भाग्यविधाता मीच आहे. मीच त्यांना योग्य पती निवडून देईन. सुरसुंदरी सतत
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
वडिलांची भलावण करते. त्यांची मर्जी संपादन करते. मदनासुंदरीचा कर्मसिद्धान्तावर दृढ विश्वास असतो. ती वडिलांना सांगते, 'माझ्या कर्मात असेल तोच नवरा मला मिळणार.' राजा रुष्ट होतो. मदनासुंदरीचं लग्न मुद्दामच एका कुष्ठरोग्याशी लावून देतो. ती पतीचे औषधोपचार करते. जोडीला सिद्धचक्राची उपासना करते. पती निरोगी होतो. स्वपराक्रमाने राज्यही मिळवतो. राजाही अखेर कर्मसिद्धान्ताचे श्रेष्ठत्व मान्य करतो.
प्राविण्य मिळवण्याच्या ७२ कला सुप्रसिद्ध आहेत. 'मतिशेखर' नावाच्या मंत्र्याने 'चौर्यकला' ही ७२ वी कला असल्याचे चातुर्याने कसे दाखवून दिले ती कथा 'प्राकृत - विज्ञान-कथे'त नमूद केली आहे. शिक्षण आणि नम्रता यांच्या जोरावर एका अश्वाधिपतीकडे नोकर म्हणून रहाणारा युवक, कोणती युक्ती करून त्याचा घरजावई झाला - याची कथा 'उपदेशपद' या कथासंग्रहात येते.
श्रोतेहो, पुण्यातील ‘सन्मति - तीर्थ' नावाच्या संस्थेमार्फत जैन प्राकृत कथांच्या मराठी अनुवादाचे काम झपाटा चालू आहे. पाच खंड प्रकाशित झाले असून सहावा खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहे. जिज्ञासूंनी याची जरूर नोंद घ्यावी.
समाजातील उच्चभ्रू वर्गापासून तळागाळापर्यंतच्या स्त्री-पुरुषांच्या सर्व प्रवृत्तींवर प्रकाश टाकणाऱ्या या कथा प्रामुख्यानं मध्ययुगीन समाजजीवनाचा जणू आरसाच आहेत. या कथांच्या प्रामाणिक अनुवादाच्या आधारे अनेक अंगांनी त्यांची समीक्षा करता येईल. यातील व्यापार-व्यापारी मार्ग व अर्थशास्त्र अतिशय लक्षणीय आहे. 'स्त्रीवादी' समीक्षकांना तर अलीबाबाची गुहा सापडल्याइतका आनंद होईल. काही ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा शोध घेता येईल. यातील पुनरावृत्त ‘मिथके' घेऊन जागतिक वाङ्मयात शोध घेता येईल. हिंदू - जैन-बौद्ध यांच्यातील परसंबंध वेगळीच सामाजिक तथ्ये उघड करतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व आबालवृद्धांचे त्या निखळ मनोरंजन करतील.
श्रोतेहो, अखेरीस एक गोष्ट आवर्जून नमूद करते की क्लिष्ट, कंटाळवाण्या, उपदेशांनी भरलेल्या, दीक्षावैराग्याचा अतिरेक असलेल्या, पूर्वजन्म - पुनर्जन्मांच्या अतिरिक्त वर्णनांनी मुख्य कथावस्तू हरवलेल्या, अतिशयोक्त जैनीकरणाने असंभाव्य वाटणाऱ्या - अशाही अनेक कथा या 'जैन कथाभांडारा'त आहेत.
राजहंसाच्या वृत्तीने आपण साररूपाने त्या ग्रहण करू या आणि त्यातील वेचक कथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून आपले सांस्कृतिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करू या !! प्रेमाने म्हणू या - जय जिनेन्द्र !!
**********
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
१०. जैन प्राकृत साहित्य : काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे
(जैन - मराठी - साहित्य-संमेलनानिमित्त लिहिलेला विशेष लेख, सोलापूर, मे २०११)
जैन साहित्याचा इतिहास मुख्यतः हिंदीमध्ये आणि अनेक पद्धतींनी लिहिलेला दिसतो. पार्श्वनाथ विद्याश्रम संशोधन मंदिराने आठ खंडात्मक इतिहासात सर्व प्रकारच्या प्राकृत भाषा आणि संस्कृत यांमधील इतिहास विस्तारने लिहिला आहे. डॉ. जगदीशचंद्र जैनांचा प्राकृत साहित्याचा इतिहास सर्वविश्रुत आहे. जैनांच्या संस्कृत साहित्याच इतिहासही स्वतंत्रपणे लिहिलेला आहे. डॉ. हरिवंश कोछड यांनी केवळ अपभ्रंश साहित्याचा इतिहास लिहिला आहे. इंग्रजी भाषेत असे इतिहास लेखन अत्यंत अल्प आहे. डॉ. हीरालाल जैन यांनी जैन संस्कृतीचे योगदान नोंदवितमा भाषा व विषयानुसार जैन साहित्याचा आढावा घेतला आहे. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या जैन अध्यासनाने, जैन व प्राकृत साहित्याचा इतिहास विषयानुसारी, भाषानुसारी व शतकानुसारी लिहिण्याचा प्रयत्न नुकताच केला ओह जैन इतिहास परिषदेच्या स्मरणिकेसाठी लेख लिहित असताना या कोणत्याही प्रयत्नांची पुनरावृत्ती न करता केवळ काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविण्यासाठी प्रस्तुत लेख लिहित आहे. समग्र प्रकाशित जैन साहित्याचे अनेक र्षे अवलोकन व चिंतन करून ही निरीक्षणे नोंदविलेली आहेत. वर नोंदविलेले ग्रंथ हेच याचे आधारभूत ग्रंथ आहेत. निरीक्षणे स्थूल मानाने असल्याने तळटीपा लिहिलेल्या नाहीत.
महाराष्ट्र
जैन
प्राकृत साहित्यावरील निरीक्षणे
* श्वेताम्बर जैनांचे प्राकृत साहित्य क्रमाने अर्धमागधी, जैन महाराष्ट्री व अपभ्रंश भाषेत लिहिलेले आहे. अर्धमागधी साहित्यात प्रामुख्याने ४५ आगमग्रंथांचा समावेश होतो. तिसऱ्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत लिहिलेल्या जैन महाराष्ट्री साहित्यात महाकाव्य, कथा, चरित, उपदेशपर ग्रंथ, कर्मग्रंथ, आचारप्रधान ग्रंथ आणि मुक्तक काव्याच समावेश होतो. अपभ्रंशातील साहित्य त्यामानाने अत्यंत अल्प आहे.
* दिगम्बरांनी शौरसेनी आणि अपभ्रंश या प्राकृत भाषांमध्ये विपुल ग्रंथरचना केली. त्यांचे प्राचीन सैद्धांतिक साहित्य शौरसेनी भाषेत असून अपभ्रंशात प्रामुख्याने पुराण आणि चरितसाहित्य लिहिले गेले.
* इसवीसनाच्या चौथ्या शतकात लिहिलेला तत्त्वार्थसूत्र हा आचार्य उमास्वातिकृत ग्रंथ जैन साहित्यातील पहिला संस्कृत ग्रंथ होय. श्वेताम्बर व दिगम्बर दोन्हीही त्यांना आपल्या संप्रदायाचे मानतात. चौथ्या शतकानंतर जैनाहित्यक्षेत्रात संस्कृतमधून लेखनास आरंभ झाला. दिगम्बरीयांनी ४ थ्या शतकानंतर संस्कृतमध्ये लिहिणे विशेष पसंत केले. व्याख्यासाहित्य आणि न्यायविषयक साहित्य यासाठी दिगम्बरीयांना संस्कृत भाषा अत्यंत अनुकूल वाटली. श्वेताम्बीय आचार्यांनी लिहिलेल्या न्याय व सैद्धांतिक साहित्याखेरीज काव्ये व चरितेही संस्कृतमध्ये आढळतात. 'जैन संस्कृत साहित्य' हा विषय या लेखाच्या कक्षेत नसल्यामुळे त्याविषयी अधिक लिहिलेले नाही.
* उपलब्ध सर्व प्राकृत साहित्यामध्ये अर्धमागधी भाषेतील आचारांग (१), सूत्रकृतांग (१), ऋषिभाषित आणि उत्तराध्ययन (काही अध्ययने) हे ग्रंथ अर्धमागधी भाषेचे प्राचीनतम नमुने असल्याचा निर्वाळा भाषाशास्त्राच्या अभ्यासकांनी दिला आहे.
* बोलीभाषा म्हणून शौरसेनी ही अर्धमागधीपेक्षा अधिक प्राचीन असण्याचा संभव असला तरी साहित्याच्या लिखित नमुन्यांमध्ये वरील विषिष्ट ग्रंथातील अर्धमागधी प्रथम अस्तित्वात आली असे दिसते. काही दिगम्बरीय अभ्यासक
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
'शौरसेनीतून अर्धमागधी निघाली' - असा दावा करतात. परंतु अद्याप तो सर्वमान्य झालेला नाही. भरताच्या नाट्यसनात अर्धमागधी व शौरसेनी, दोन्ही बोलीभाषांची नोंद घेतलेली दिसते.
* ४५ अर्धमागधी आगमग्रंथ इसवीसनपूर्व ५०० ते इसवीसन ५०० या एक हजार वर्षाच्या काळात तयार झाले. यापैकी काही निवडक ग्रंथांनाच खऱ्या अर्थाने 'महावीरवाणी' म्हणता येते. बहुतांशी रचना या उत्तरवर्ती आचार्यमी व स्थविरांनी लिहिलेल्या आहेत. याचमुळे अर्धमागधी भाषेचे वेगवेगळे तीन स्तर श्वेताम्बर आगमांमध्ये दिसतात.
* दिगम्बर संप्रदाय असे मानतो की, कोणतेच अर्धमागधी ग्रंथ प्रमाणित महावीरवाणी' म्हणता येत नाहीत. काळाच्या ओघात अर्धमागधी भाषेत अनेक बदल झाले व भर पडली. म्हणून श्वेताम्बर आगमग्रंथ हे 'व्युच्छिन्न' झाले. याच कारणाने दिगम्बर आचार्यांनी दृष्टिवाद' या प्राचीनतम ग्रंथाच्या स्मरणाच्या आधारे शौरसेनी भाषेत नव्याने ग्रंथसना केली. त्यांना आम्नाय, आगम किंवा वेद म्हटले गेले असले तरी त्यांचे कर्तृत्व विशिष्ट विशिष्ट आचार्याकेज जाते.
* अर्धमागधी आगमग्रंथांची विभागणी अंग, उपांग, मूलसूत्र, छेदसूत्र इत्यादी प्रकारे करतात. दिगंबरीय ग्रंथांची विभागणी प्रथमानुयोग (कथानुयोग), करणानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग या चार अनुयोगांमध्ये करतात अध्ययन-परंपरेत मात्र श्वेताम्बर हे मूलसूत्रांपासून आरंभ करतात तर दिगम्बर प्रथमानुयोगापासून करतात.
* देवर्धिगणि क्षमाश्रमण यांच्या नेतृत्वाखाली, पाचव्या शतकामध्ये झालेल्या तिसऱ्या आगमवाचनेमध्ये, सर्व अर्धमागधी आगम प्रथम ग्रंथारूढ झाले म्हणजे लिखित स्वरूपात आले. त्यापूर्वी ते मौखिक परंपरेने जपलेले होते. 'षट्खंडगम' हा शौरसेनी भाषेतील पहिला दिगंबर ग्रंथ जेव्हा रचला गेला तेव्हाच म्हणजे पहिल्या शतकातच लिखित स्वरूपात अस्तित्वात आला. त्यानंतरही भगवती आराधना व कुन्दकुन्दांचे समग्र साहित्य ग्रंथारूढ स्वरूपातच प्रचलित झाले. त्यामुळे अर्थातच लिखित स्वरूपात जैन सिद्धांतविषयक साहित्य आणण्याचा पहिला मान दिगंबर परंपरेला दिला जातो.
* दिगंबरीयांच्या शौरसेनी साहित्याचे स्वरूप मुख्यत: सैद्धांतिक अर्थात् तत्त्वप्रधान आहे. श्वेतांबरीय आगमसाहित्या मात्र विषयांची विविधता दिसते. उदाहरणार्थ - आचारांग(१) हा ग्रंथ औपनिषदिक शैलीत लिहिलेला अध्यात्मप्रधान ग्रंथ आहे. स्थानांग व समवायांग हे कोशवजा ग्रंथ आहेत. व्याख्याप्रज्ञप्तीतून महावीरांचा समकालीन इतिहास समजत 'नायाधम्मकहा' ग्रंथात अनेक सरस कथा व दृष्टांत आहेत. उपासकदशा, अंतगडदशा व विपाकसूत्र हे कथाप्रधान ग्रंथ आहेत. उत्तराध्ययनात तत्त्वज्ञान, आचरण, आख्यान, संवाद यांना प्राधान्य आहे. एक उत्कृष्ट श्रमणकाव्य' म्हणूनही त्याचा गौरव केला जातो. याखेरीज उपांगांमध्ये खगोल, भूगोल व प्राणिशास्त्र, जीवशास्त्रविषयक निरीक्षणे नोंदविली आहेत. हे चार विषय दिगंबर परंपरेतील तिलोयपण्णत्ति व गोम्मटसार या दोन ग्रंथात येतात. परंतु हे दोन्हीग्रंथ अर्धमागधी उपांगग्रंथांच्या रचनेच्या काळानंतरचे आहेत.
* श्वेतांबर जैनाचार्य तिसऱ्या-चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत सातत्याने जैन महाराष्ट्री या प्राकृतभाषेत लिहित राहिले. वाड्.मयाचा प्रकार व विषय या दृष्टीने त्यात खूप विविधता राहिली. या ग्रंथांची संख्या शेकड्यंनी असली तरी वाड्.मयीन मूल्य असलेले व भारतीय संस्कृतीच्या अंतरंगावर प्रकाश टाकणारे मोजके ग्रंथ यामध्ये उहेत. एकंदरीत भारतीय साहित्याला योगदान ठरणारे ग्रंथ व त्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत -
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
(१) पउमचरियं : * चौथ्या शतकातील पहिले जैन रामायण. * ‘आर्ष प्राकृत भाषा' म्हणून भाषाशास्त्रज्ञांकडून गौरव. * वाल्मीकि रामायण लिखित स्वरूपात आल्यावर सुमारे एक-दोन शतकातच लिहिलेला ग्रंथ. * रूढ रामायणातील अतार्किक व असंभवनीय गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न. * स्त्री व्यक्तिरेखांकडे बघण्याचा विशेष सहानुभूतिपूर्ण दृष्टिकोण. * वाल्मीकींच्या तुलनेत रसवत्तेच्या दृष्टीने दुय्यम. * उत्तरवर्ती काळात अनेक दिगंबर-श्वेतांबर रामायणांना आधारभूत. * स्वयंभूदेवांचे अपभ्रंश ‘पउमचरिउ' त्या तुलनेने अधिक रसवत्तापूर्ण.
(२) वसुदेवहिंडी : * प्राचीन जैन महाराष्ट्री अर्थात् आर्ष प्राकृत भाषेचा ६ व्या शतकातील उत्कृष्ट नमुना. * भारतीय प्राचीन वाड्.मयातले पहिलेवहिले प्रवासवर्णन. * धर्मकथांबरोबरच कामकथांचा अंतर्भाव. * सकस कथाबीजे, वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या दीर्घकथा. * श्रीकृष्ण वासुदेवाचे उत्तरायुष्य व द्वारकाविनाशाची सविस्तर हकीगत. * व्यक्तिरेखांचे एकांगी चित्रण न करता समतोल लेखन. * दोन आचार्यांनी संयुक्तपणे लिहिलेला ग्रंथ. * समाजाच्या उत्तम-मध्यम-निम्न स्तरांचे सर्वांगीण दर्शन. * सहाव्या शतकातल्या भारताचे सांस्कृतिक प्रतिबिंब.
(३) हरिभद्रांचे जैन महाराष्ट्री साहित्य : (८ वे शतक-पूर्वार्ध) * धूर्ताख्यान' : समग्र भारतीय साहित्यात उठून दिसणारे, व्यंग-उपहासप्रधान शैलीतले खंडकाव्य. * रामायण-महाभारत-पुराणातील तर्कविरूद्ध व असंभाव्य गोष्टींचा यथेच्छ समाचार. * पुढे अनेक शतके प्राकृत, संस्कृत व अपभ्रंशात धूर्ताख्यानाची अनुकरणे. * 'समराइच्चकहा' : कर्मसिद्धांतावर आधारित धाराप्रवाही महाकादंबरी. * यातील समासप्रचुर भागांवर संस्कृतची छाप. * बोलीभाषेतील चपखल संवाद, देशी शब्दांचा वापर. * आवश्यकटीकेत जरूर तेथे प्राकृत कथांची योजना. * ‘उपदेशपद' : प्रचलित प्राकृत कथांचा जणू कोशच.
(४) कुवलयमाला : (८ वे शतक-उत्तरार्ध) * उद्योतनसूरिकृत अपूर्व लोकप्रिय ग्रंथ, उत्कंठावर्धक कथानके. * लिखित स्वरूपातील पहिले 'मराठी' शब्द, १८ देशीभाषांचे नमुने. * समकालीन भारतीय संस्कृतीचा जणू कोशच !
(५) परमप्पयासु-योगीन्दुदेव (काळ अंदाजे ७ वे ते ९ वे शतक) * अपभ्रंश भाषेतील शुद्ध आध्यात्मिक लघुग्रंथ.
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
* ध्यान व योगावरही ‘योगसार' लघुग्रंथ.
(६) सुखबोधा टीकेतील प्राकृत कथा : (११ वे शतक) * देवेंद्रगणींची उत्तराध्ययनसूत्रावरील टीका. त्यात अनेक कथा. * दीर्घकथा, मध्यमकथा व लघुकथांचे भांडार. * प्राकृत अभ्यासकांचा लोकप्रिय ग्रंथ.
(७) पाइयलच्छीनाममाला आणि देशीनाममाला :
* यापैकी पहिला धनपालकृत ग्रंथ (१० वे शतक) प्राकृत भाषेचा अमरकोश.
* दुसरा हेमचन्द्रकृत ग्रंथ (१२ वे शतक) वैशिष्ट्यपूर्ण ३९७८ देशी शब्दांचा अर्थसहित संग्रह.
* संस्कृतपासून न बनलेल्या शब्दांचा एकमेवाद्वितीय शब्दकोश .
* प्राकृत साहित्याचा विषयानुसारी आढावा *
* ‘चण्ड' या जैन आचार्यांचे पहिले प्राकृत व्याकरण, 'नमो अरिहंताणं' ने आरंभ (३ रे -४ थे शतक), पुढे हेमचंद्रांनी विस्तारले.
* संस्कृत-प्राकृत वैयाकरणांनी हैमशब्दानुशासन गौरविले, अभ्यासले. (१२ वे शतक)
* नय व अनेकान्तवादावरील एकमेव प्राकृत ग्रंथ - सिद्धसेन दिवारकृत सन्मति - तर्क.
* ‘सन्मति-तर्क' - श्वेतांबर, दिगंबर दोहोंना आदरणीय (७ वे शतक). हा एकमेव ग्रंथ सोडून इतर सर्व न्यायप्रमाण- स्याद्वाद - अनेकान्तवादावरील साहित्य संस्कृतात.
* षट्खंडागमावरील वीरसेनकृत धवला टीका (७वे - ९ वे शतक) शौरसेनी गद्याचा खंडनमंडनशैलीत वापर. अभूपूर्व तार्किक शैलीतला विशालकाय ग्रंथ.
* प्राकृतमधील (अपभ्रंशातील) पहिले 'पुराण' - पुष्पदन्तकृत 'महापुराण' (९ वे शतक). सहाव्या सातव्या शतकापासू संस्कृत पुराणांची दिगंबरीय परंपरा.
* अपभ्रंशात दिगंबरीयांचे विपुल चरित (चरिउ ) लेखन. 'करकंडचरिउ' आणि 'जसहरचरिउ' लोकप्रिय. स्वयंभूदेवाच 'पउमचरिउ' विशेष प्रसिद्ध. बरीचशी चरित्रे अनुकरणात्मक आणि अनाकर्षक.
* संस्कृतच्या तुलनेत प्राकृत शास्त्रीय ( लाक्षणिक) साहित्य अत्यंत अल्प व नगण्य. 'अंगविज्जा' निमित्तशास्त्रावर आधारित परंतु अत्यंत दुर्बोध. ठक्कुर फेरू (१४ वे शतक) चा एकमेव अपवाद वगळता नोंद घेण्याजोगे शास्त्रीय लेखन प्राकृतात नाही.
* प्राकृत छंदांचे सोदहरण विवेचन करणारे ग्रंथ पुढील तीन जैन कवींचे - स्वयंभूछंदस् (८ वे - ९ वे शतक) नंदिताढ्य (१० वे शतक), हेमचंद्र (१२ वे शतक) प्राकृत छंदांचा इतका सविस्तर विचार संपूर्ण भारतीय साहित्यात दुसरा नही. * शिलालेखांमध्ये खारवेल सम्राटाचे हाथीगुंफा (ओरिसा) येथील प्राकृत शिलालेख अशोक शिलालेखांखालोखाल महत्त्वाचे. दक्षिण भारतातील दिगंबरीय शिलालेखांचे संग्रह प्रकाशित. श्वेतांबरीय मुनि जिनविजय, जयन्तविजय आणि विजयधर्मसूरिकृत लेखसंग्रह उल्लेखनीय.
* ऐतिहासिक प्रबंधसाहित्यात संस्कृत - प्राकृत मिश्रित 'विविधतीर्थकल्प' (जिनप्रभसूरि - १४ वे शतक) विशेष महत्त्वाचा. इतर प्रबंध पूर्णतः संस्कृतात.
* सुभाषित संग्रहात जयवल्लभकृत 'वज्जालग्ग' (१३ वे शतक) हा प्राकृत सुभाषितांचा खजिना. केवळ संकलनात्मक ग्रंथ. महाराष्ट्री मुक्तककाव्य 'गाथासप्तशती' (गाहासत्तसई) च्या तुलनेत कितीतरी उत्तरकालीन व काव्यदृष्ट्यादुय्यम . * संस्कृत नाटकात प्राकृतभाषांचा विपुल वापर. प्रायः सर्वच्या सर्व नाटके जैनेतरांची. संपूर्ण प्राकृत नाटेक (सट्टके)
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
देखील जैनेतरांची आहेत.
___* आधुनिक भारतीय बोलीभाषा आणि जैन साहित्य * * कन्नड भाषेच्या प्राथमिक साहित्यात पंप, पोन्न आणि रन्न या जैन आचार्यांचे मोलाचे योगदान आहे. * मराठीतील पहिले शब्द, पहिले वाक्य आणि १५-१६ व्या शतकातील चरित-पुराण रचना हे जैनांचे मराठीतील योगदान आहे. * प्राचीन गुजराथी आणि प्राचीन हिंदीमध्ये असलेल्या जैनांच्या रचना या अपभ्रंशाच्या अंतिम अवस्था आहेत. * बाकीच्या भारतीय बोलीभाषांतील जैन साहित्याचा अभ्यास नसल्यामुळे त्याविषयी विधान करू शकत नाही.
* खऱ्या अर्थाने अस्सल जैन प्राकृत साहित्याचा लेखाजोखा * (१) प्राकृत म्हणजे बोलीभाषेत धर्मोपदेश असावा' हा भ. महावीरांनी घातलेला दंडक जैन परंपरेने पाळला. इ.स.— ५०० पासूनइ.स. १५०० पर्यंत सतत त्या त्या काळच्या प्राकृत भाषेत साहित्यरचना केल्या. आधुनिक भारतीय बोलीभाषांमध्येही ग्रंथरचना करीत राहिले. 'अर्धमागधी-शौरसेनीपासून आधुनिक बोलीभाषांपर्यंतचा भाषाशास्त्रीय प्रवास कसा झाला ?' याचे प्रभावी साधन केवळ जैन वाड्.मयामुळेच उपलब्ध होऊ शकले.
(२) अतिशय समृद्ध कथासाहित्य हे प्राकृत भाषांचे बलस्थान आहे. त्या प्रामुख्याने जैन महाराष्ट्रीत श्वेतांबर आचामी लिहिलेल्या आहेत. त्यातील सुमारे १०० कथा अतिशय चित्तवेधक व संस्कृतपेक्षा वेगळ्या आहेत. बाकीच्या भारंभार कथा रटाळ, केवळ उपदेशप्रधान, दीक्षा आणि वैराग्याच्या वर्णनांनी भरलेल्या आहेत. जैन सोडून इतरांना त्यातून काहीही रसनिष्पत्ती होत नाही. अनेक कथांतून वर्णिलेले चमत्कार, मंत्र-तंत्र आणि अद्भुतता जैन तत्त्वज्ञानाच्या गाभ्याशी विसंगत आहे, असेही दिसते. लेखात वर्णन केलेले चार-सहा कथाग्रंथच वाड्.मयीन व सांस्कृतिक दृष्टने अस्सल आहेत. जी गोष्ट कथाग्रंथांची, तीच चरितग्रंथांची आहे. चार-सहा निवडक चरितांचा अपवाद वगळता अजैनांनाच काय जैनांनाही त्यात रस वाटणे शक्य नाही.
(३) दिगंबर शौरसेनी ग्रंथ जवळजवळ सर्वच सिद्धांत, तत्त्व व आचारप्रधान आहेत. कुन्दकुन्दांचे काही ग्रंथ व योगीन्दुदेवांचा परमात्मप्रकाश हे शुद्ध आध्यात्मिक ग्रंथ समग्र भारतीय आध्यात्मिक साहित्याला योगदानस्वरूप ओह.
(४) दर्शनक्षेत्रातील अग्रगण्य जैन ग्रंथ तत्त्वार्थसूत्र' आणि 'षड्दर्शनसमुच्चय' हे आहेत. परंतु ते संस्कृतमधे आहेत. भारतीय दार्शनिक परंपरेत केवळ याच दोन ग्रंथांची दखल घेतली गेली.
(५) प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या शिक्षणपरंपरेत समाविष्ट झालेला आणि नाव घेण्यासारखा एकही शास्त्रीय अथवा लाक्षणिक ग्रंथ प्राकृत साहित्यात आढळत नाही. निमित्तशास्त्र, आयुर्वेद, गणित, खगोल, योग, ज्योतिष, अर्थशास्त्र या सर्व विषयातील अग्रगण्य ग्रंथ संस्कृतमधे आहेत आणि प्रामुख्याने जैनेतरांचेच आहेत. दोन-चार अपदा असतीलही परंतु प्राकृत बोलीभाषा लाक्षणिक-शास्त्रीय साहित्य लिहायला अनुकूल नव्हत्या असेच म्हणावे लागेल.
(६) आधुनिक भारतीय बोलीभाषांचा विचार करताना आपण मराठीतील समकालीन जैन साहित्याचा विचार करू. मराठी साहित्य गेल्या काही दशकात सर्वार्थाने समृद्ध होत चालले आहे. श्री. निर्मलकुमार फडकुले, विलास सावे, जोहरापुरकर, मा.प.मंगुडकर, शांतिलाल भंडारी, अशोक जैन, सुरेश भटेवरा, सुरेखा शहा हे काही निवऊ आणि मला माहीत नसलेले इतरही अनेक जैन लेखक-लेखिका मराठीत लेखन करीत आहेत. ते आपापल्या अभ्यासविषयात
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
सिद्धहस्त लेखक म्हणून प्रसिद्धी पावत आहेत. परंतु त्यांच्या लेखनाला 'जैन साहित्य' म्हणण्यापेक्षा 'धर्माने जैन असलेल्या मराठी व्यक्तींनी लिहिलेले साहित्य' असेच म्हणावे लागते.
समकालीन मराठी जैन कथांबाबतचा पेच असा आहे की कथेत कर्मकांड, पारिभाषिकता, आचार आणि जैन पुराणकथा घुसल्या की दर्जेदार मराठी साहित्याच्या दृष्टीने रसवत्ता घसरते आणि कथावस्तू आणि मांडणी उत्तम अली की तिला 'जैन' का म्हणावे असा संभ्रम पडतो. जैनांनी, जैनांचे, जैनांसाठी मराठी साहित्य संमेलन जरूर भवावे परंतु, 'मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात समकालीन जैन साहित्याचे योगदान किती आहे ?' याची पक्षपातरहित समीक्षा इतरांकडून अवश्य करून घ्यावी.
**********
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
११. जैनांनी जपलेली ऋषिवचने
(महावीर जयंतीनिमित्त 'लोकसत्ता' दैनिकात प्रकाशित, एप्रिल २०११)
आपले स्वत:चे तत्त्वज्ञान, सिद्धांत, आचार-नियम, त्यावर आधारित तात्त्विक ग्रंथ, उपदेशकथा - या सर्वांचे जतन प्रत्येक धर्म आणि संप्रदाय अतिशय साक्षेपाने करीत असतो. 'आपल्या आजूबाजूच्या वैचारिक क्षेत्रात काय चालू आहे ?' त्याचा आढावा मुख्यतः, ते विचार खोडून काढण्यासाठी घेतला जातो. असे अनेक खंडन-मंडनत्मक दार्शनिक ग्रंथ भारतीय साहित्यात लिहिले गेले आहेत. आज २६१० व्या महावीरजयंतीच्या निमित्ताने अर्धमागधी भाषेत असलेल्या एका अत्यंत उदारमतवादी ग्रंथाचा परिचय करून देणार आहे. त्याचे नाव आहे - इसिभासियाई - अर्थात् 'ऋषिंची भाषिते' म्हणजेच 'वचने'.
आपला भारत देश प्राचीन काळापासून 'तपोभूमि' म्हणून ख्यातकीर्त आहे. ऋषि, मुनि, तपस्वी, साधु, भिक्षु, निर्ग्रथ, अनगार, परिव्राजक, तापस, योगी, संन्यासी, श्रमण - असे अनेक वैविध्यपूर्ण शब्द भारतातल्या विरागी वृत्तीच्या साधकांचे द्योतक आहेत. 'ऋषिभाषित' या जैन ग्रंथात सर्वांचा 'ऋषि' या शब्दानेच निर्देश केलेला दिसतो. यात एकूण ४५ ऋषींच्या विचारांचे संकलन प्रस्तुत केले आहे. भारताच्या प्राचीन इतिहासावर नजर टाकली समजून येते की या ग्रंथात महाभारताच्या काळापासून होऊन गेलेल्या विचारवंतांची चिंतने नोंदवलेली आहेत. जैन परंपरेनुसार या ४५ ऋषींपैकी २० जण अरिष्टनेमींच्या काळात झाले. १५ ऋषी पार्श्वनाथांच्या काळात झाले. उरलेले १० भ. महावीरांच्या काळात झाले. ४५ अध्ययनांमध्ये (अध्यायांमध्ये ) ४५ पूजनीय व्यक्तींचे विचार दिले असून प्रत्येकात असे म्हटले आहे की, 'हे विचार अमुक अमुक अर्हत् ऋषींनी सांगितलेले आहेत'.
आश्चर्याची आणि गौरवाची गोष्ट म्हणजे वर्धमान (२९) आणि पार्श्व (३१) हे दोनच ऋषी स्पष्टत: जैन परंपरेतील आहेत. वज्जीयपुत्त, महाकश्यप आणि सारिपुत्र हे तीन बौद्ध विचारधारेतील ऋषि आहेत. देव नारद, असित देवल, अंगिरस भारद्वाज, याज्ञवल्क्य, बाहुक, विदुर, वारिषेण कृष्ण, द्वैपायन, आरुणी, उद्दालक, तारायण - ही सर्व नावे वैदिक परंपरेत प्रसिद्ध आहेत. आजही यांचे उपदेश उपनिषदे, महाभारत आणि पुराणांमध्ये सुरक्षित आहेत. यापैकी काही ऋषींची नावे बौद्ध त्रिपिटक साहित्यातही आढळतात.
मंखलिपुत्र, रामपुत्र, अंबष्ठ, संजय बेलट्ठिपुत्र ही अशी काही नावे आहेत की जी जैन-बौद्धांव्यतिरिक्त असलेल्या ‘आजीवक’ इ. श्रमणपरंपरेतील आहेत. आर्द्रक, वल्कलचीरी, कूर्मापुत्र, तेतलिपुत्र, भयाली - या विचारवंतांच्या कथा प्रामुख्याने जैन परंपरेतच आढळतात. ऋषींच्या संपूर्ण यादीचे अवलोकन केले की सोम, यम, वरुण, वायु आणि वैश्रमण - ही पाच नावे वैदिक परंपरेत मंत्रांच्या उपदेष्ट्यांच्या स्वरूपात दिसतात. ही पाच नावे वगळली तर उरलेले सर्व ऋषी खरोखरच प्रागैतिहासिक काळात प्रत्यक्ष होऊन गेलेल्या व्यक्ती आहेत. काल्पनिक चरित्रे नाहीत.
जैन धर्मातील प्रमुख तत्त्वे, चातुर्याम धर्म, कर्मसिद्धांत आणि आचरणाचे नियम मुख्यतः 'पार्श्व' अध्ययनात येतात. विश्वाला 'शाश्वत' म्हटले असून त्याची सततची परिवर्तनशीलता नमूद केली आहे. जीव (आत्मा) आणि पुद्गल (परमाणु) यांना ‘गतिशील' म्हटले आहे. द्रव्य-क्षेत्र - काल-भाव या चतुष्टयीची चर्चा येते. चार गती, अष्ट आहे. ‘शरीर हा आत्म्याचा पाहुणा असून त्याला लागणारे सव्वाचारशेर अन्नपाणी रोजच्या रोज द्या', अशा तऱ्हेचे उद्गार ग्रंथसाहिबात आढळतात. उपासतापासाला जास्त प्राधान्य नाही. 'भिक्षाचर्य' पूर्ण वर्ज्य आहे. शीख धर्मातील पहिल्या पाच गुरूंनी आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सत्संगाबरोबरच शेती व्यवसायही केला. 'हाताने काम व मुखाने हरिनाम' याच सूत्राने शीखधर्मीय वागत होते व आहेत. याबाबत गीतेतील निष्काम कर्मयोग हा त्यांना आदर्शरूप वाटतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी संसार सोडण्याची गरज भासत नाही. ग्रंथसाहिबात म्हटले आहे की,
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________ कर्मग्रंथी यांचा उल्लेख असून स्पष्ट केले आहे की प्रत्येक जीव स्व-कृत पाप-पुण्याचाच भागीदार असतो. पार्श्वयांच्या तुलनेने वर्धमानांचे विचार त्रोटक आहेत. 'आचारांग' आणि 'उत्तराध्ययन' नावांच्या ग्रंथातील अनेक विषयवस्तूंचे शाब्दिक रूपांतरण यात दिसते. म्हणूनच प्रो. शूबिंग म्हणतात की या ग्रंथाच्या रचनेचा आरंभ पार्श्वनाथांच्या कार्यकाळात (महावीरांपूर्वी 250 वर्षे) झाला असावा. आता इतर ऋषींचे विचार पाहू. इंद्रनाग' ऋषी तपोबलाचे प्रदर्शन करण्यास विरोध दर्शवितात. द्वैपायन ऋषी इच्छेला (वासनेला) अनिच्छेत परावर्तित करण्यास सांगतात. सुख-दुःखांची मीमांसा ‘सारिपुत्त' ऋषी करतात. 'श्रीगिरि' म्हणतात, 'विश्वाला माया म्हणू नका. ते सत्य आहे. अनादि-अनंत आहे'. 'तारायण' ऋषी क्रोधाचे दुष्परिणाम काव्यमयतेने रंगवितात. 'सदैव जागृत रहा, जागृत रहा, सुप्तावस्थेत जाऊ नका'-असा प्रेरक संदेश उद्दालक ऋषी देतात. क्षमा, तितिक्षा आणि मधुरवचनांचे महत्त्व 'ऋषिगिरि' स्पष्ट करतात. दुर्वचन-दुष्कर्म, सुवचन-सुकर्म आणि सत्संगती-कुसंगतीचा विचार 'अरुण' ऋषी परिणामकारकतेने मांडतात. आध्यात्मिक कृषीचे (शेतीचे) रूपक ‘पिंग' ऋषी रंगवतात.आत्मा हे क्षेत्र, तप हे बीज, संयम हा नांगर आणि अहिंसा-समिति ही बैलजोडी आहे. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र - कोणीही ही उत्कृष्ट शेती करू शकतो. 'मातंग' ऋषी देखील अशाच आध्यात्मिक शेतीचा उपदेश करतात. 'नारद ऋषी श्रवणाचे आणि आंतरिक शुद्धीचे महत्त्व सांगतात. ___जैनांनी उदार दृष्टिकोणातून जपलेल्या या ग्रंथातील विचारधन हा सर्व भारतीयांचा अनमोल ठेवा आहे. संप्रदायभेद दूर करून आपण तो ग्रंथ वाचू या.