________________
* ध्यान व योगावरही ‘योगसार' लघुग्रंथ.
(६) सुखबोधा टीकेतील प्राकृत कथा : (११ वे शतक) * देवेंद्रगणींची उत्तराध्ययनसूत्रावरील टीका. त्यात अनेक कथा. * दीर्घकथा, मध्यमकथा व लघुकथांचे भांडार. * प्राकृत अभ्यासकांचा लोकप्रिय ग्रंथ.
(७) पाइयलच्छीनाममाला आणि देशीनाममाला :
* यापैकी पहिला धनपालकृत ग्रंथ (१० वे शतक) प्राकृत भाषेचा अमरकोश.
* दुसरा हेमचन्द्रकृत ग्रंथ (१२ वे शतक) वैशिष्ट्यपूर्ण ३९७८ देशी शब्दांचा अर्थसहित संग्रह.
* संस्कृतपासून न बनलेल्या शब्दांचा एकमेवाद्वितीय शब्दकोश .
* प्राकृत साहित्याचा विषयानुसारी आढावा *
* ‘चण्ड' या जैन आचार्यांचे पहिले प्राकृत व्याकरण, 'नमो अरिहंताणं' ने आरंभ (३ रे -४ थे शतक), पुढे हेमचंद्रांनी विस्तारले.
* संस्कृत-प्राकृत वैयाकरणांनी हैमशब्दानुशासन गौरविले, अभ्यासले. (१२ वे शतक)
* नय व अनेकान्तवादावरील एकमेव प्राकृत ग्रंथ - सिद्धसेन दिवारकृत सन्मति - तर्क.
* ‘सन्मति-तर्क' - श्वेतांबर, दिगंबर दोहोंना आदरणीय (७ वे शतक). हा एकमेव ग्रंथ सोडून इतर सर्व न्यायप्रमाण- स्याद्वाद - अनेकान्तवादावरील साहित्य संस्कृतात.
* षट्खंडागमावरील वीरसेनकृत धवला टीका (७वे - ९ वे शतक) शौरसेनी गद्याचा खंडनमंडनशैलीत वापर. अभूपूर्व तार्किक शैलीतला विशालकाय ग्रंथ.
* प्राकृतमधील (अपभ्रंशातील) पहिले 'पुराण' - पुष्पदन्तकृत 'महापुराण' (९ वे शतक). सहाव्या सातव्या शतकापासू संस्कृत पुराणांची दिगंबरीय परंपरा.
* अपभ्रंशात दिगंबरीयांचे विपुल चरित (चरिउ ) लेखन. 'करकंडचरिउ' आणि 'जसहरचरिउ' लोकप्रिय. स्वयंभूदेवाच 'पउमचरिउ' विशेष प्रसिद्ध. बरीचशी चरित्रे अनुकरणात्मक आणि अनाकर्षक.
* संस्कृतच्या तुलनेत प्राकृत शास्त्रीय ( लाक्षणिक) साहित्य अत्यंत अल्प व नगण्य. 'अंगविज्जा' निमित्तशास्त्रावर आधारित परंतु अत्यंत दुर्बोध. ठक्कुर फेरू (१४ वे शतक) चा एकमेव अपवाद वगळता नोंद घेण्याजोगे शास्त्रीय लेखन प्राकृतात नाही.
* प्राकृत छंदांचे सोदहरण विवेचन करणारे ग्रंथ पुढील तीन जैन कवींचे - स्वयंभूछंदस् (८ वे - ९ वे शतक) नंदिताढ्य (१० वे शतक), हेमचंद्र (१२ वे शतक) प्राकृत छंदांचा इतका सविस्तर विचार संपूर्ण भारतीय साहित्यात दुसरा नही. * शिलालेखांमध्ये खारवेल सम्राटाचे हाथीगुंफा (ओरिसा) येथील प्राकृत शिलालेख अशोक शिलालेखांखालोखाल महत्त्वाचे. दक्षिण भारतातील दिगंबरीय शिलालेखांचे संग्रह प्रकाशित. श्वेतांबरीय मुनि जिनविजय, जयन्तविजय आणि विजयधर्मसूरिकृत लेखसंग्रह उल्लेखनीय.
* ऐतिहासिक प्रबंधसाहित्यात संस्कृत - प्राकृत मिश्रित 'विविधतीर्थकल्प' (जिनप्रभसूरि - १४ वे शतक) विशेष महत्त्वाचा. इतर प्रबंध पूर्णतः संस्कृतात.
* सुभाषित संग्रहात जयवल्लभकृत 'वज्जालग्ग' (१३ वे शतक) हा प्राकृत सुभाषितांचा खजिना. केवळ संकलनात्मक ग्रंथ. महाराष्ट्री मुक्तककाव्य 'गाथासप्तशती' (गाहासत्तसई) च्या तुलनेत कितीतरी उत्तरकालीन व काव्यदृष्ट्यादुय्यम . * संस्कृत नाटकात प्राकृतभाषांचा विपुल वापर. प्रायः सर्वच्या सर्व नाटके जैनेतरांची. संपूर्ण प्राकृत नाटेक (सट्टके)