________________
प्रख्यात नगरींची नावे अशा सांस्कृतिक, ऐतिहासिक व भौगोलिक गोष्टींची नोंद यात आहे. दहाच्या पुढील विविध संख्यांचा विचार समवायांगात केला आहे. २४ तीर्थंकरांची नावे, १८ प्रकारच्या लिपींची नावे, ६४ व ७२ कलांची (विद्यांची) नावे आणि जैन धर्मासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती यातन मिळते.
चाळीस प्रदीर्घ प्रकरणांनी बनलेला व्याख्याप्रज्ञप्ति' किंवा 'भगवती' हा ग्रंथ ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. हा ग्रंथ अनेक संवाद आणि प्रश्नोत्तरांनी नटलेला आहे. गौतम गणधर आणि भ. महावीर यांची सिद्धांतविषयक चर्चा खूपच उद्बोधक आहे. महावीरांच्या पूर्वीचा पार्श्वनाथप्रणीत निग्रंथ धर्म कशा स्वरूपाचा होमते यातूनच समजते. महावीरांच्या अनेक वर्षावासांची (चातुर्मासांची) हकीगत यात नोंदवली आहे. महावीर व त्यांचा विरोधक शिष्य 'गोशालक' यांची अनोखी भ्रमणगाथा यातूनच उलगडत जाते. अंग, वंग, मलय, लाढ, वत्स, काशी, कोशल इ. १६ जनपदांचा उल्लेख प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. महाभारत जसे अनेक संस्करणे होत होत वाढत गेले तसा हा ग्रंथ उत्तरवर्ती काळात भर पडत पडत बृहत्काय झाला असावा. महावीरांच्या समकालीन इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा हा ग्रंथ जैनविद्येच्या अभ्यासकांनी खूप प्रशंसिला आहे.
‘ज्ञातृधर्मकथा' ग्रंथाच्या पूर्वभागात महावीरांनी सांगितलेले प्रतीकात्मक दृष्टान्त आणि दीर्घकथा त्यांच्या विहारकाळातील लोकाभिमुखतेकडे आपले लक्ष वेधून घेतात. हा ग्रंथ नक्कीच जनसामान्यांसाठी आहे. आठ प्रकाच्या कर्मांचा सिद्धांत भोपळ्याला दिलेल्या आठ लेपांच्या दृष्टांतातून मांडला आहे. प्रत्येकी पाच अक्षता देऊन चासुनांची परीक्षा घेण्याची कथा, वाड्.मयीन दृष्ट्या सरस व रंजक तर आहेच परंतु अखेरीस 'पाच महाव्रतांचे साधूने कसेपालन करावे' असा बोधही दिला आहे. 'द्रौपदीने पाच पतींना का वरले ?' हे स्पष्ट करण्यासाठी तिच्या तीन पूर्वजमांचा सांगितलेला वृत्तांत एका वेगळ्या अद्भुत विश्वात घेऊन जातो. 'मल्ली' नावाच्या अध्ययनात तीर्थंकरपद प्राप्त केलेया सुंदर, बुद्धिमान व वैराग्यसंपन्न स्त्रीची अप्रतिम कथा रंगविली आहे. तेतलीपुत्र नावाचा मंत्री आणि सोनाराची कन्या 'पोट्टिला' यांच्या विवाहाची, वितुष्टाची आणि पोट्टिलेच्या आध्यात्मिक प्रगतीची कथा अशीच मनोरंजक आहे. तत्त्वचिंतक महावीरांचे हे गोष्टीवेल्हाळ रूप नक्कीच स्तिमित करणारे आहे.
साधुधर्म कितीही आदर्श असला तरी सामान्य गृहस्थांना कठोर संयमपालन शक्य नसल्याने महावीरांनी त्यांच्यासाठी उपासकधर्म, श्रावकधर्म अथवा गृहस्थधर्मही समजावून सांगितला. 'आनंद' नावाच्या श्रावकाने श्रावकवेत घेऊन आपला परिग्रह व आसक्ती कशी क्रमाक्रमाने कमी केली त्याचा वृत्तांत पहिल्या अध्ययनात विस्ताराने येतो वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील स्त्रीपुरुषांच्या या हकिगती तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकतात. सर्वसामान्यांम झेपेल अशा धार्मिक आचरणाचा उपदेश देणारे वेगळेच महावीरांचे दर्शन ‘उपासकदशा' नावाच्या या ग्रंथातून होते
'अंतगडदशासूत्र' ह्या ग्रंथाचे पर्युषणकाळात वाचन करण्याचा परिपाठ आहे. यातील अर्जुनमाळी आणि बन्धुमती यांची कथा अतिशय रोचक आहे. महाभारतातील काही प्रमुख व्यक्तिरेखांची हकिगत या ग्रंथात येते. कृण, वासुदेव, देवकी, अरिष्टनेमी, द्वीपायन ऋषि, द्वारकेचा विनाश अशा अनेकविध कथा यात येतात. स्त्रियांनी केलेल्या कठोर तपश्चर्यांची वर्णने आश्चर्यकारक आहेत. “अनुत्तरोपपातिकदशा” या ग्रंथाचे स्वरूपही सामान्यत: असेचआहे. 'प्रश्नव्याकरण' ग्रंथात प्रश्न व त्यांची उत्तरे असावीत. आज उपलब्ध असलेल्या प्रश्नव्याकरणाचे स्वरूप मात्र पूर्ण सैद्धांतिक आहे.
___ विपाकश्रुत' ग्रंथात चांगल्या कर्मांचे सुपरिणाम आणि वाईट कर्मांचे दुष्परिणाम कथांच्या माध्यमातून सांगितेल आहेत. 'दृष्टिवाद' नावाच्या बाराव्या अंगग्रंथाचा लोप झाला असे जैन परंपरा सांगते.
भ. महावीरांनी त्यांच्या निर्वाणापूर्वी सतत तीन दिवस ज्याचे कथन केले तो ग्रंथ ‘उत्तराध्ययनसूत्र' नावाने ओळखला जातो. गीता, धम्मपद, बायबल, कुराण अथवा गुरुग्रंथसाहेबाचे त्या त्या धर्मात जे आदरणीय स्थान आहे तेच स्थान श्वेतांबर जैन परंपरेत उत्तराध्ययनसूत्राचे आहे. यात तत्त्वज्ञान, जगत्-मीमांसा, कर्मविज्ञान, ज्ञानमीमांसा, कथा, संवाद, आचरणाचे नियम इ. अनेक गोष्टींचा समावेश आहे. श्रमणपरंपरेची अनेक वैशिष्ट्ये या ग्रंथातून फ्रट होतात.