Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 21
________________ १०. जैन प्राकृत साहित्य : काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे (जैन - मराठी - साहित्य-संमेलनानिमित्त लिहिलेला विशेष लेख, सोलापूर, मे २०११) जैन साहित्याचा इतिहास मुख्यतः हिंदीमध्ये आणि अनेक पद्धतींनी लिहिलेला दिसतो. पार्श्वनाथ विद्याश्रम संशोधन मंदिराने आठ खंडात्मक इतिहासात सर्व प्रकारच्या प्राकृत भाषा आणि संस्कृत यांमधील इतिहास विस्तारने लिहिला आहे. डॉ. जगदीशचंद्र जैनांचा प्राकृत साहित्याचा इतिहास सर्वविश्रुत आहे. जैनांच्या संस्कृत साहित्याच इतिहासही स्वतंत्रपणे लिहिलेला आहे. डॉ. हरिवंश कोछड यांनी केवळ अपभ्रंश साहित्याचा इतिहास लिहिला आहे. इंग्रजी भाषेत असे इतिहास लेखन अत्यंत अल्प आहे. डॉ. हीरालाल जैन यांनी जैन संस्कृतीचे योगदान नोंदवितमा भाषा व विषयानुसार जैन साहित्याचा आढावा घेतला आहे. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या जैन अध्यासनाने, जैन व प्राकृत साहित्याचा इतिहास विषयानुसारी, भाषानुसारी व शतकानुसारी लिहिण्याचा प्रयत्न नुकताच केला ओह जैन इतिहास परिषदेच्या स्मरणिकेसाठी लेख लिहित असताना या कोणत्याही प्रयत्नांची पुनरावृत्ती न करता केवळ काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविण्यासाठी प्रस्तुत लेख लिहित आहे. समग्र प्रकाशित जैन साहित्याचे अनेक र्षे अवलोकन व चिंतन करून ही निरीक्षणे नोंदविलेली आहेत. वर नोंदविलेले ग्रंथ हेच याचे आधारभूत ग्रंथ आहेत. निरीक्षणे स्थूल मानाने असल्याने तळटीपा लिहिलेल्या नाहीत. महाराष्ट्र जैन प्राकृत साहित्यावरील निरीक्षणे * श्वेताम्बर जैनांचे प्राकृत साहित्य क्रमाने अर्धमागधी, जैन महाराष्ट्री व अपभ्रंश भाषेत लिहिलेले आहे. अर्धमागधी साहित्यात प्रामुख्याने ४५ आगमग्रंथांचा समावेश होतो. तिसऱ्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत लिहिलेल्या जैन महाराष्ट्री साहित्यात महाकाव्य, कथा, चरित, उपदेशपर ग्रंथ, कर्मग्रंथ, आचारप्रधान ग्रंथ आणि मुक्तक काव्याच समावेश होतो. अपभ्रंशातील साहित्य त्यामानाने अत्यंत अल्प आहे. * दिगम्बरांनी शौरसेनी आणि अपभ्रंश या प्राकृत भाषांमध्ये विपुल ग्रंथरचना केली. त्यांचे प्राचीन सैद्धांतिक साहित्य शौरसेनी भाषेत असून अपभ्रंशात प्रामुख्याने पुराण आणि चरितसाहित्य लिहिले गेले. * इसवीसनाच्या चौथ्या शतकात लिहिलेला तत्त्वार्थसूत्र हा आचार्य उमास्वातिकृत ग्रंथ जैन साहित्यातील पहिला संस्कृत ग्रंथ होय. श्वेताम्बर व दिगम्बर दोन्हीही त्यांना आपल्या संप्रदायाचे मानतात. चौथ्या शतकानंतर जैनाहित्यक्षेत्रात संस्कृतमधून लेखनास आरंभ झाला. दिगम्बरीयांनी ४ थ्या शतकानंतर संस्कृतमध्ये लिहिणे विशेष पसंत केले. व्याख्यासाहित्य आणि न्यायविषयक साहित्य यासाठी दिगम्बरीयांना संस्कृत भाषा अत्यंत अनुकूल वाटली. श्वेताम्बीय आचार्यांनी लिहिलेल्या न्याय व सैद्धांतिक साहित्याखेरीज काव्ये व चरितेही संस्कृतमध्ये आढळतात. 'जैन संस्कृत साहित्य' हा विषय या लेखाच्या कक्षेत नसल्यामुळे त्याविषयी अधिक लिहिलेले नाही. * उपलब्ध सर्व प्राकृत साहित्यामध्ये अर्धमागधी भाषेतील आचारांग (१), सूत्रकृतांग (१), ऋषिभाषित आणि उत्तराध्ययन (काही अध्ययने) हे ग्रंथ अर्धमागधी भाषेचे प्राचीनतम नमुने असल्याचा निर्वाळा भाषाशास्त्राच्या अभ्यासकांनी दिला आहे. * बोलीभाषा म्हणून शौरसेनी ही अर्धमागधीपेक्षा अधिक प्राचीन असण्याचा संभव असला तरी साहित्याच्या लिखित नमुन्यांमध्ये वरील विषिष्ट ग्रंथातील अर्धमागधी प्रथम अस्तित्वात आली असे दिसते. काही दिगम्बरीय अभ्यासक

Loading...

Page Navigation
1 ... 19 20 21 22 23 24 25 26 27 28