Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 26
________________ सिद्धहस्त लेखक म्हणून प्रसिद्धी पावत आहेत. परंतु त्यांच्या लेखनाला 'जैन साहित्य' म्हणण्यापेक्षा 'धर्माने जैन असलेल्या मराठी व्यक्तींनी लिहिलेले साहित्य' असेच म्हणावे लागते. समकालीन मराठी जैन कथांबाबतचा पेच असा आहे की कथेत कर्मकांड, पारिभाषिकता, आचार आणि जैन पुराणकथा घुसल्या की दर्जेदार मराठी साहित्याच्या दृष्टीने रसवत्ता घसरते आणि कथावस्तू आणि मांडणी उत्तम अली की तिला 'जैन' का म्हणावे असा संभ्रम पडतो. जैनांनी, जैनांचे, जैनांसाठी मराठी साहित्य संमेलन जरूर भवावे परंतु, 'मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात समकालीन जैन साहित्याचे योगदान किती आहे ?' याची पक्षपातरहित समीक्षा इतरांकडून अवश्य करून घ्यावी. **********

Loading...

Page Navigation
1 ... 24 25 26 27 28