Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 25
________________ देखील जैनेतरांची आहेत. ___* आधुनिक भारतीय बोलीभाषा आणि जैन साहित्य * * कन्नड भाषेच्या प्राथमिक साहित्यात पंप, पोन्न आणि रन्न या जैन आचार्यांचे मोलाचे योगदान आहे. * मराठीतील पहिले शब्द, पहिले वाक्य आणि १५-१६ व्या शतकातील चरित-पुराण रचना हे जैनांचे मराठीतील योगदान आहे. * प्राचीन गुजराथी आणि प्राचीन हिंदीमध्ये असलेल्या जैनांच्या रचना या अपभ्रंशाच्या अंतिम अवस्था आहेत. * बाकीच्या भारतीय बोलीभाषांतील जैन साहित्याचा अभ्यास नसल्यामुळे त्याविषयी विधान करू शकत नाही. * खऱ्या अर्थाने अस्सल जैन प्राकृत साहित्याचा लेखाजोखा * (१) प्राकृत म्हणजे बोलीभाषेत धर्मोपदेश असावा' हा भ. महावीरांनी घातलेला दंडक जैन परंपरेने पाळला. इ.स.— ५०० पासूनइ.स. १५०० पर्यंत सतत त्या त्या काळच्या प्राकृत भाषेत साहित्यरचना केल्या. आधुनिक भारतीय बोलीभाषांमध्येही ग्रंथरचना करीत राहिले. 'अर्धमागधी-शौरसेनीपासून आधुनिक बोलीभाषांपर्यंतचा भाषाशास्त्रीय प्रवास कसा झाला ?' याचे प्रभावी साधन केवळ जैन वाड्.मयामुळेच उपलब्ध होऊ शकले. (२) अतिशय समृद्ध कथासाहित्य हे प्राकृत भाषांचे बलस्थान आहे. त्या प्रामुख्याने जैन महाराष्ट्रीत श्वेतांबर आचामी लिहिलेल्या आहेत. त्यातील सुमारे १०० कथा अतिशय चित्तवेधक व संस्कृतपेक्षा वेगळ्या आहेत. बाकीच्या भारंभार कथा रटाळ, केवळ उपदेशप्रधान, दीक्षा आणि वैराग्याच्या वर्णनांनी भरलेल्या आहेत. जैन सोडून इतरांना त्यातून काहीही रसनिष्पत्ती होत नाही. अनेक कथांतून वर्णिलेले चमत्कार, मंत्र-तंत्र आणि अद्भुतता जैन तत्त्वज्ञानाच्या गाभ्याशी विसंगत आहे, असेही दिसते. लेखात वर्णन केलेले चार-सहा कथाग्रंथच वाड्.मयीन व सांस्कृतिक दृष्टने अस्सल आहेत. जी गोष्ट कथाग्रंथांची, तीच चरितग्रंथांची आहे. चार-सहा निवडक चरितांचा अपवाद वगळता अजैनांनाच काय जैनांनाही त्यात रस वाटणे शक्य नाही. (३) दिगंबर शौरसेनी ग्रंथ जवळजवळ सर्वच सिद्धांत, तत्त्व व आचारप्रधान आहेत. कुन्दकुन्दांचे काही ग्रंथ व योगीन्दुदेवांचा परमात्मप्रकाश हे शुद्ध आध्यात्मिक ग्रंथ समग्र भारतीय आध्यात्मिक साहित्याला योगदानस्वरूप ओह. (४) दर्शनक्षेत्रातील अग्रगण्य जैन ग्रंथ तत्त्वार्थसूत्र' आणि 'षड्दर्शनसमुच्चय' हे आहेत. परंतु ते संस्कृतमधे आहेत. भारतीय दार्शनिक परंपरेत केवळ याच दोन ग्रंथांची दखल घेतली गेली. (५) प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या शिक्षणपरंपरेत समाविष्ट झालेला आणि नाव घेण्यासारखा एकही शास्त्रीय अथवा लाक्षणिक ग्रंथ प्राकृत साहित्यात आढळत नाही. निमित्तशास्त्र, आयुर्वेद, गणित, खगोल, योग, ज्योतिष, अर्थशास्त्र या सर्व विषयातील अग्रगण्य ग्रंथ संस्कृतमधे आहेत आणि प्रामुख्याने जैनेतरांचेच आहेत. दोन-चार अपदा असतीलही परंतु प्राकृत बोलीभाषा लाक्षणिक-शास्त्रीय साहित्य लिहायला अनुकूल नव्हत्या असेच म्हणावे लागेल. (६) आधुनिक भारतीय बोलीभाषांचा विचार करताना आपण मराठीतील समकालीन जैन साहित्याचा विचार करू. मराठी साहित्य गेल्या काही दशकात सर्वार्थाने समृद्ध होत चालले आहे. श्री. निर्मलकुमार फडकुले, विलास सावे, जोहरापुरकर, मा.प.मंगुडकर, शांतिलाल भंडारी, अशोक जैन, सुरेश भटेवरा, सुरेखा शहा हे काही निवऊ आणि मला माहीत नसलेले इतरही अनेक जैन लेखक-लेखिका मराठीत लेखन करीत आहेत. ते आपापल्या अभ्यासविषयात

Loading...

Page Navigation
1 ... 23 24 25 26 27 28