Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 27
________________ ११. जैनांनी जपलेली ऋषिवचने (महावीर जयंतीनिमित्त 'लोकसत्ता' दैनिकात प्रकाशित, एप्रिल २०११) आपले स्वत:चे तत्त्वज्ञान, सिद्धांत, आचार-नियम, त्यावर आधारित तात्त्विक ग्रंथ, उपदेशकथा - या सर्वांचे जतन प्रत्येक धर्म आणि संप्रदाय अतिशय साक्षेपाने करीत असतो. 'आपल्या आजूबाजूच्या वैचारिक क्षेत्रात काय चालू आहे ?' त्याचा आढावा मुख्यतः, ते विचार खोडून काढण्यासाठी घेतला जातो. असे अनेक खंडन-मंडनत्मक दार्शनिक ग्रंथ भारतीय साहित्यात लिहिले गेले आहेत. आज २६१० व्या महावीरजयंतीच्या निमित्ताने अर्धमागधी भाषेत असलेल्या एका अत्यंत उदारमतवादी ग्रंथाचा परिचय करून देणार आहे. त्याचे नाव आहे - इसिभासियाई - अर्थात् 'ऋषिंची भाषिते' म्हणजेच 'वचने'. आपला भारत देश प्राचीन काळापासून 'तपोभूमि' म्हणून ख्यातकीर्त आहे. ऋषि, मुनि, तपस्वी, साधु, भिक्षु, निर्ग्रथ, अनगार, परिव्राजक, तापस, योगी, संन्यासी, श्रमण - असे अनेक वैविध्यपूर्ण शब्द भारतातल्या विरागी वृत्तीच्या साधकांचे द्योतक आहेत. 'ऋषिभाषित' या जैन ग्रंथात सर्वांचा 'ऋषि' या शब्दानेच निर्देश केलेला दिसतो. यात एकूण ४५ ऋषींच्या विचारांचे संकलन प्रस्तुत केले आहे. भारताच्या प्राचीन इतिहासावर नजर टाकली समजून येते की या ग्रंथात महाभारताच्या काळापासून होऊन गेलेल्या विचारवंतांची चिंतने नोंदवलेली आहेत. जैन परंपरेनुसार या ४५ ऋषींपैकी २० जण अरिष्टनेमींच्या काळात झाले. १५ ऋषी पार्श्वनाथांच्या काळात झाले. उरलेले १० भ. महावीरांच्या काळात झाले. ४५ अध्ययनांमध्ये (अध्यायांमध्ये ) ४५ पूजनीय व्यक्तींचे विचार दिले असून प्रत्येकात असे म्हटले आहे की, 'हे विचार अमुक अमुक अर्हत् ऋषींनी सांगितलेले आहेत'. आश्चर्याची आणि गौरवाची गोष्ट म्हणजे वर्धमान (२९) आणि पार्श्व (३१) हे दोनच ऋषी स्पष्टत: जैन परंपरेतील आहेत. वज्जीयपुत्त, महाकश्यप आणि सारिपुत्र हे तीन बौद्ध विचारधारेतील ऋषि आहेत. देव नारद, असित देवल, अंगिरस भारद्वाज, याज्ञवल्क्य, बाहुक, विदुर, वारिषेण कृष्ण, द्वैपायन, आरुणी, उद्दालक, तारायण - ही सर्व नावे वैदिक परंपरेत प्रसिद्ध आहेत. आजही यांचे उपदेश उपनिषदे, महाभारत आणि पुराणांमध्ये सुरक्षित आहेत. यापैकी काही ऋषींची नावे बौद्ध त्रिपिटक साहित्यातही आढळतात. मंखलिपुत्र, रामपुत्र, अंबष्ठ, संजय बेलट्ठिपुत्र ही अशी काही नावे आहेत की जी जैन-बौद्धांव्यतिरिक्त असलेल्या ‘आजीवक’ इ. श्रमणपरंपरेतील आहेत. आर्द्रक, वल्कलचीरी, कूर्मापुत्र, तेतलिपुत्र, भयाली - या विचारवंतांच्या कथा प्रामुख्याने जैन परंपरेतच आढळतात. ऋषींच्या संपूर्ण यादीचे अवलोकन केले की सोम, यम, वरुण, वायु आणि वैश्रमण - ही पाच नावे वैदिक परंपरेत मंत्रांच्या उपदेष्ट्यांच्या स्वरूपात दिसतात. ही पाच नावे वगळली तर उरलेले सर्व ऋषी खरोखरच प्रागैतिहासिक काळात प्रत्यक्ष होऊन गेलेल्या व्यक्ती आहेत. काल्पनिक चरित्रे नाहीत. जैन धर्मातील प्रमुख तत्त्वे, चातुर्याम धर्म, कर्मसिद्धांत आणि आचरणाचे नियम मुख्यतः 'पार्श्व' अध्ययनात येतात. विश्वाला 'शाश्वत' म्हटले असून त्याची सततची परिवर्तनशीलता नमूद केली आहे. जीव (आत्मा) आणि पुद्गल (परमाणु) यांना ‘गतिशील' म्हटले आहे. द्रव्य-क्षेत्र - काल-भाव या चतुष्टयीची चर्चा येते. चार गती, अष्ट आहे. ‘शरीर हा आत्म्याचा पाहुणा असून त्याला लागणारे सव्वाचारशेर अन्नपाणी रोजच्या रोज द्या', अशा तऱ्हेचे उद्गार ग्रंथसाहिबात आढळतात. उपासतापासाला जास्त प्राधान्य नाही. 'भिक्षाचर्य' पूर्ण वर्ज्य आहे. शीख धर्मातील पहिल्या पाच गुरूंनी आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सत्संगाबरोबरच शेती व्यवसायही केला. 'हाताने काम व मुखाने हरिनाम' याच सूत्राने शीखधर्मीय वागत होते व आहेत. याबाबत गीतेतील निष्काम कर्मयोग हा त्यांना आदर्शरूप वाटतो. आध्यात्मिक उन्नतीसाठी संसार सोडण्याची गरज भासत नाही. ग्रंथसाहिबात म्हटले आहे की,

Loading...

Page Navigation
1 ... 25 26 27 28