Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 16
________________ जैन आचार्यांनी आपले धार्मिक, लौकिक,कथाप्रधान व उपदेशप्रधान ग्रंथ 'जैन महाराष्ट्री' या भाषेतून अनेक शक्के लिहिले आहेत. 'गाथासप्तशती'सारखे शृंगारिक मुक्तकाव्य महाराष्ट्री प्राकृतमधील सौंदर्याचा अद्वितीय अलंकार आहे. दिगंबर आचार्यांनी इ.स.च्या १० व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत अनेक प्रकारचे चरित्रग्रंथ 'अपभ्रंश' नावाच्या भाषेतून लिहिले. ही अपभ्रंश भाषा पूर्वीच्या प्राकृत भाषातूनच हळूहळू विकसित झाली होती. आज आपण अनेक परदेशी भाषा अतिशय उत्साहाने शिकून त्यात प्राविण्य मिळवत आहोत. ही गोष्ट स्पृहणीय व अभिनंदनीय आहेच. परंतु त्याचबरोबर प्रत्येक जैन माणसाने (खरे तर अजैन माणसानेही) प्राकृत भाषांची तोंडकख करून घेतली पाहिजे. __गुजराथी, मारवाडी, राजस्थानी, पंजाबी, हिंदी, मराठी, बंगाली, आसामी इ. आजच्या सर्व बोलीभाषा याच प्राकृतातून निघाल्या आहेत.

Loading...

Page Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28