Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 15
________________ ८. प्राकृत म्हणजे काय ? जैनांनी प्राकृत का शिकावे ? (तीर्थंकर' मासिक पत्रिका, मुंबई, जुलै २००६) संपूर्ण जगात सुमारे २००० भाषा बोलल्या जातात. विद्वानांनी त्या भाषांचे वेगवेगळे १२ गट केले आहेत. त्यापैकी एका गटाला भारोपीय (इंडो-युरोपियन) भाषागट असे म्हटले जाते. संस्कृत, प्राकृत आणि पालीया भाषा या परिवारात येतात. “प्राकृत' ही काही पालीसारखी एक, एकजिनसी भाषा नाही. इ.स.पू. ५०० पासून इ.स. १२०० पर्यंतच्या प्रदीर्घ काळात भारतात ज्या विविध बोलीभाषा बोलल्या जात होत्या, त्या सर्व “प्राकृत' नावाच्या अंतर्ग येतात. “संस्कृत' ही भाषा वेदकाळापासून जवळजवळ १७ व्या शतकापर्यंत सर्व भारतीयांची ज्ञानभाषा होती. सर्व प्रकारच्या कला व विद्यांचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने संस्कृत भाषेच्या माध्यमातून होत होते. धार्मिक साहित्य, गीत, खगोल, ज्योतिष, नाट्यशास्त्र, वास्तू व शिल्पशास्त्र, वैद्यक अशा विविध ज्ञानशाखांचे सुप्रसिद्ध व उत्कृष्ट शास्त्रग्रंथ संस्कृत भाषेतच लिहिलेले दिसून येतात. एक गोष्ट अगदी खरी आहे की वर्णाश्रमव्यवस्थेचा पगडा भारतीय समाजावर असल्याने आणि हजारो वर्षांची पुरुषप्रधान संस्कृती येथे सर्रास रूळलेली असल्याने संस्कृतमधून शिक्षण घेणे व संस्कृतमधून लोकव्यवहार करणे हे अगदी आत्ताआत्तापर्यंत फक्त उच्चवर्णीयांची (ती सुद्धा पुरुषांची) मक्तेदारी होती. उच्चनीचतेवर आधारित जातिव्यवस्थ बांधलेला बहुजनसमाज व स्त्रिया, ही हजारो वर्षे काय करीत होत्या ? ते रोजच्या व्यवहारात, बाजारात, स्वयंपामरात, सामाजिक जीवनात कोणत्या भाषेचा वापर करीत होते ? या प्रश्नाचे उत्तर आहे - 'विविध प्राकृत भाषांमध्ये म्हणजे बोलीभाषांमध्ये, मातृभाषांमध्ये ते बोलत होते'. प्राकृत भाषांचे व्याकरणाचे नियम जाचक नव्हते. उच्चारणाच्या बाबतीत शिथिलता होती. वेगवेगळ्या प्रांतातील भौगोलिक, सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळी शब्दसंपत्ती (Vocabulary) होती. प्रत्येक व्यवसायानुसारही भाषांमध्ये फरक होता. कुंभार, लोहार, सुतार असे बारा बलुतेदार थोडी थोडी वेगळ्या धाटणीची बोली बोलत होत स्त्रियांचे स्वयंपाकघर, सण, वार, उत्सव इत्यादी प्रसंगी या भाषांचा वापर होत असे. विनोद करणे, एकमेकांवर मनापासूनप्रेम करणे आणि क्रोधाच्या भरात अपशब्द इ. उच्चारणे, भांडणे या मानवी मनातील अगदी मूलभूत प्रेरणा आहेत. त्याच्या प्रकटीकरणासाठी अतिशय सुसंस्कृत अशा संस्कृत भाषेचा वापर या देशातील लोकांनी फारच कमी प्रमाणात केला दिसतो. या भावनांना प्राकृतद्वारेच वाट मिळे. भारतातल्या सर्व बोलीभाषांना मिळून 'प्राकृत' असे नाव असले तरी ती प्रांतानुसार, व्यवसायानुसार विविध प्रकारची होती. या प्राकृत बोलीभाषाच खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांच्या मातृभाषा' आहेत. यांचे शिक्षण आईपासून मिळते. त्यांचा पगडा खोलवर असतो. सहसा त्या विसरत नाहीत. आरंभीच्या काळात, प्राकृत बोलीभाषांमध्ये लिहिण्याचा प्रघात नव्हता. हळूहळू त्यातही पुस्तकांची रचना होऊ लागली. मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री व अपभ्रंश या प्राकृत भाषांमध्ये प्रामुख्याने ग्रंथरचना झालेली दिसते. ___भ. बुद्धांनी धर्मोपदेशासाठी ‘पाली' भाषा निवडली. तिचे साम्य ‘मागधी' भाषेशी होते. भ. महावीरांनी आपले सर्व धर्मोपदेश ‘अर्धमागधी' नावाच्या भाषेतून केले. आपला धर्म जनसामान्यांपर्यंत जाऊन पोहोचावा ही त्यामागची भावना होती. धर्म हा आत्म्याशी निगडित असल्याने त्यांना संस्कृतची मक्तेदारी व पुरोहितवर्गाची मध्यस्थी मोडू काढायची होती. ___ श्वेतांबरीयांचे ४५ किंवा ३२ धर्मग्रंथ अर्धमागधी भाषेत आहेत. दिगंबर जैन पंथीयांचे सर्वात प्रचीन धर्मग्रंथ 'शौरसेनी' नावाच्या प्राकृतमध्ये लिहिलेले आहेत. हरिभद्र, हेमचंद्र, जिनेश्वर, मुनिचंद्र, देवेंद्र अशा अनेकानेकवेतांबर

Loading...

Page Navigation
1 ... 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28