Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 13
________________ ७. जैन साहित्याची संक्षिप्त ओळख (महावीरजयंती विशेषांक दैनिक 'प्रभात', एप्रिल २०११) इसवी सन पूर्व पाचव्या शतकापासून, इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकापर्यंत जैन आचार्यांनी, जैन धर्माच्या अनुषंगाने, विविध भारतीय भाषांमध्ये आणि विविध वाङ्मयप्रकारांमध्ये प्रचंड साहित्याची निर्मिती केलेली दिसेत भ. महावीरांचे प्रारंभिक उपदेश ‘अर्धमागधी' भाषेत निबद्ध आहेत. श्वेतांबर परंपरेने महावीर-निर्वाणानंतर सुमारे 200 वर्षे हे उपदेश मौखिक परंपरेने जपले. त्यानंतर ते लिखित स्वरूपात आणले. लिपिबद्ध केले, ग्रंथारूढ केले. यप्रदीर्घ कालावधीत त्या उपदेशात थोडी-थोडी भाषिक परिवर्तने येत गेली. नवनवीन ग्रंथकारांनी आपल्या रचना त्यात साविष्ट केल्या. इ.स.५०० नंतर हे भर पडण्याचे काम थांबले. अर्धमागधी भाषेतील ४५ ग्रंथ ‘महावीरवाणी' नावाने संबोको जाऊ लागले. श्वेतांबर परंपरेतील स्थानकवासी' संप्रदाय यापैकी ३२ ग्रंथांनाच 'महावीरवाणी' मानतो. __ दिगंबर परंपरेने आपले सर्व प्रारंभिक लेखन शौरसेनी' नावाच्या प्राकृत भाषेतून प्रथमपासूनच लिखित स्वरूपात आणले. शौरसेनी भाषेतील सुमारे १५ प्राचीन ग्रंथांना दिगंबर-परंपरा ‘आम्नाय' अगर ‘आगम' म्हणून संबोधते. त्यातील विषय मुख्यत: सैद्धांतिक, तत्त्वज्ञानात्मक, आध्यात्मिक आणि आचारप्रधान आहेत. 'शौरसेनी' भाषेच्या पाठोपाठ दिगंबरांचे साहित्य प्रामुख्याने संस्कृत भाषेत लिहिलेले दिसते. मूळ ग्रंथांवरील टीका, तत्त्वज्ञानन्याय, चरित (चरित्र), पुराण, चम्पूकाव्य, गणित - असे विविधांगी साहित्य जैनांनी अभिजात संस्कृतात रचले. आठव्या-नवव्या शतकापासून दिगंबरांनी 'अपभ्रंश' नावाच्या समकालीन प्राकृत भाषेत चरिते, पुराणे, दोहे यांची रचना केली. श्वेतांबर आचार्य इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून 'महाराष्ट्री' नावाच्या प्राकृत भाषेमध्ये ग्रंथरचना करू लागले. जैन पद्धतीने लिहिलेले पहिले रामायण ‘पउमचरिय' याच भाषेत आहे. चरिते-महाकाव्ये-खण्डकाव्ये याबरोब्लम श्वेतांबरांनी फार मोठ्या प्रमाणावर उपदेशप्रधान कथाग्रंथांची रचना केली. ही 'महाराष्ट्री' भाषा जैनेतरांनीलिहिलेल्या महाराष्ट्रीपेक्षा वेगळी आणि अर्धमागधी भाषेने प्रभावित अशी आहे. मधूनमधून शौरसेनी भाषेची झलकही त्यात दिसते. जैनांच्या महाराष्ट्री भाषेला, भाषाविद् 'जैन महाराष्ट्री' असे नामाभिधान देतात. कोणत्याही भारतीययक्तीला आकृष्ट करील असे अनुपमेय कथांचे भांडार आज जैन महाराष्ट्री' या प्राकृत भाषेत उपलब्ध आहे. स्व. दुर्गलाई भागवत यांनी ज्याप्रमाणे पालि भाषेतील 'जातककथा' मराठीत प्रथम आणल्या, त्याप्रमाणे अर्धमागधी आणि महाराष्ट्री भाषेतील जैन कथा मराठीत आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'जैन अध्यासन' आणि 'सन्मति-तीर्थ' संस्था यांच्या सहयोगाने सध्या चालू आहे. पाच खंड प्रकाशित झाले आहेत. __१६-१७ व्या शतकानंतर आजपावेतो जैनांनी, विशेषत: दिगंबर जैनांनी मराठीत लिहिलेल्या ग्रंथांची संख्याही विशेष लक्षणीय आहे. आधुनिक कन्नड भाषेतील साहित्याला जैन कवींनी आरंभीच्या काळात मोलाचे योगदान केले आधुनिक गुजराती भाषेतील प्रारंभीच्या ग्रंथरचनेतही श्वेतांबर जैन आचार्यांचा मोलाचा वाटा आहे, असे आढळूयेते. सारांश काय ? - तर संख्येने अल्प असलेल्या जैन साहित्यिकांनी संस्कृतबरोबरच विविध प्राकृत बोलीभाषातून ग्रंथरचना करून भारतीय साहित्याला आपले महत्त्वाचे योगदान दिले. 'आचारांग' नावाच्या ग्रंथाची शैली उपनिषदम्या भाषेशी जवळीक साधते - तीही बोलीभाषेतून ! 'ऋषिभाषित' या अर्धमागधी ग्रंथात ब्राह्मण, बौद्ध आणि जैन अशा एकूण ४५ ऋषींचे विचारधन संकलित केलेले आहे. उत्तराध्ययन' हा जैन ग्रंथ आणि बौद्धांचे ‘धम्मपद' यात विलक्षा साम्य आहे. 'ज्ञाताधर्मकथा' ग्रंथातील कथा व दृष्टांत एकाहून एक सरस आहेत. 'तत्त्वार्थसूत्र' हा ग्रंथ संस्कृत्सूत्रांमध्ये निबद्ध असा अनुपमेय दार्शनिक ग्रंथ आहे. 'षट्खंडागम' हा आद्य दिगंबर ग्रंथ ‘कर्मसिद्धांत' आणि 'आध्यात्मिक विकासाच्या श्रेणी' या विषयांना वाहिलेला आहे. 'गोम्मटसार' या दिगंबर ग्रंथात जीवसृष्टीचा सूक्ष्म विचार ग्रथित केला आहे. महावीराचार्यांचा ‘गणितसार' ग्रंथ शास्त्रीय ग्रंथनिर्मितीतला मुकुटमणी आहे. हरिभद्रांचे प्राकृत भाषेतील 'धूर्ताख्यान'-व्यंग-उपहासाचा अजोड नमुना आहे. 'वसुदेवहिंडी' हे बोलीभाषेतले पहिले कथाप्रधान प्रवासवर्णन

Loading...

Page Navigation
1 ... 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28