Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi
View full book text
________________
६. महावीरवाणीतून भेटलेले महावीर
( स्वाध्याय शिबिर, महावीर प्रतिष्ठान, पुणे, विशेष:
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर 'भ. महावीर' यांची ऐतिहासिकता निर्विवादपणे दृढमूल झाली आहे. इसवी सन पूर्व ५९९ मध्ये 'मगध' (अथवा मतांतराने 'विदेह' ) जनपदातील 'क्षत्रियकुंड' गणराज्यात 'ज्ञातृ' कुळातील राजा 'सिद्धार्थ' व 'त्रिशलादेवी' यांच्या पोटी 'चैत्र शुद्ध त्रयादशीच्या' मध्यरात्री भ. महावीरांचा जन्म झाला. या तेजस्वी बालकाचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. त्यांना 'महावीर' हे विशेषण का लावले गेले याविषयी त्यांच्या बालपणातील शौर्य व धाडसाच्या कथा परंपरेने नोंदविलेल्या आहेत. वर्धमान बालपणापासूनच ज्ञान- प्रतिभासंपन्न, एकांतप्रिय चिंतनशील होते. वयाच्या २८ व्या वर्षी, मातापित्यांच्या मृत्यूनंतर आपले जेष्ठ बंधू नंदिवर्धन यांच्या अनुमतीनेत्यांनी साधुजीवनाची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी एक वर्षभर दीन-दुःखी - गरजू लोकांना विपुल दाने दिली.
वयाच्या तिसाव्या वर्षी ‘मार्गशीर्ष कृष्ण दशमीला' त्यांनी 'दीक्षा' घेतली. त्यानंतर साडे बारा वर्षे त्यांनी कठोर तपस्या केली. 'वैशाख शुद्ध दशमीला' त्यांना 'केवलज्ञान' प्राप्त झाले. बोधीची चरमावस्था प्राप्त केल्यावर त्यांनी विहार करत धर्मोपदेश देण्यास आरंभ केला. त्यांच्या वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत अर्थात् 'अश्विन कृष्ण अमावस्येच्या' मध्यरात्रीपर्यंत त्यांनी प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी निरंतर उपदेश केला. जैन लोक दिवाळीच्या रात्री दीप प्रज्वलन करून त्यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात.
व्याख्यान,
मे २०११)
भ. महावीरांनी 'अर्धमागधी' या लोकभाषेत केलेले उपदेश त्यांच्या शिष्यांनी संकलित केले. ते सुमारे १००० वर्षे मौखिक परंपरेने जतन केले गेले. त्यानंतर म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात ते गुजरातमधील 'वलभी' येथे झालेल्या श्वेतांबर साधु परिषदेत ग्रंथारूढ करण्यात आले. आज आपल्यासमोर असलेले अकरा 'अंग' ग्रंथ 'महावीरवाणी' या नावाने ओळखले जातात.
'आचारांगसूत्र' हा अर्धमागधी भाषेतील सर्वात प्राचीन व पहिला अंगग्रंथ आहे. याची भाषा गद्यपद्यमय आहे. उपनिषदांच्या शैलीशी मिळतीजुळत्या अशा सूत्रमय, तत्त्वचिंतनात्मक विचारांनी हा ग्रंथ पुरेपूर भरला आहे. खेर तर ‘आचारांग’ म्हणण्यापेक्षा 'विचारांग' शीर्षकच त्याला शोभून दिसेल. गृहस्थावस्थेचा त्याग करून, आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय अहिंसेच्या आधारे प्रत्यक्षात उतरविणाऱ्या प्रबुद्ध, विवेकी साधकाचे चिंतनोन्मेष व उद्गार या ग्रंथात शब्दबद्ध केलेले आहेत. 'नत्थि कालस्स णागमो ।' 'सव्वेसिं जीवियं पियं' अथवा 'सुत्ता अमुणी, सया मुणो जागरंति' अशा सोप्या, छोट्या वाक्यांना महावीरांच्या वाणीचा 'परतत्त्वस्पर्श' झाल्याने, ते आध्यात्मिकांसाठीदीपस्तंभ ठरले आहेत. संपूर्ण अहिंसा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येक हालचाल, व्यवहार, अन्नग्रहण, वस्त्रग्रहण, मलमूत्रविसर्जन, तपस्या, तितिक्षा कशी करावी त्याचे हे 'प्रॅक्टिकल गाइडबुक' आहे. गूढगहन सिद्धांत, अवघड तत्त्वचर्चा, विश्कपत्तीची मीमांसा, ज्ञानाची मीमांसा यांना स्थान न देता जीवन जगण्याच्या ध्येयप्रधान शैलीवर भर दिलेला असतो.
‘सूत्रकृतांग’ या ग्रंथात महावीरांच्या जीवनाचा वेगळाच पैलू दिसतो. स्व-सिद्धान्त आणि पर-सिद्धान्त यात नोंदवले आहे. नियतिवाद, अज्ञानवाद, जगत्कर्तृत्ववाद, लोकवाद यांच्या सिद्धांतांचे मंडन व निरसन आहे. पंचाखादी, षष्ठभूतवादी, अद्वैतवादी अशा विविध मतांची नोंद आहे. स्वतःच्या सिद्धान्तांचे नीट मंडनही केले आहे. खंडन करताना कलह, वितंडवाद, कठोरता, उपहास या शस्त्रांचा वापर केलेला नाही. अनेकान्तवादी दृष्टी ठेवून स्वत:चे सिद्धांत ठामपणे मांडले आहेत. 'आर्द्रकीय' आणि 'नालन्दीय' अध्ययनात आलेले संवाद त्या काळच्या दार्शनिक विचारप्रवाहांवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहेत. सूत्रकृतांगाची जमेची बाजू हीच आहे.
‘स्थानांग’ आणि ‘समवायांग' ह्या ग्रंथातून महावीरांच्या प्रतिभेचा आणखी वेगळा पैलू दिसतो. हे ग्रंथ कोशवजा आहेत. 'एक संख्या असलेल्या गोष्टी' स्थानांगाच्या पहिल्या अध्ययनात, 'दोन संख्यायुक्त' दुसऱ्या अध्ययत याप्रमाणे दहा अध्ययनांची रचना आहे. त्या काळची दहा आश्चर्ये, दीक्षा घेण्याची दहा कारणे, दहा महानद्या, दहा

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28