Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 8
________________ ५. महावीरांच्या दृष्टीने 'वीर' कोण ? (महावीरजयंती विशेषांक, दैनिक 'प्रभात', एप्रिल २००९) जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भ. महावीर' यांची ऐतिहासिकता निर्विवादपणे दृढमूल झाली आहे. इसवी सन पूर्व ५९९ मध्ये 'मगध' (अथवा मतांतराने 'विदेह') जनपदातील 'क्षत्रियकुंड' गणराज्यात ‘ज्ञातृ' कुळातील राजा 'सिद्धार्थ' व 'त्रिशलादेवी' यांच्या पोटी 'चैत्र शुद्ध त्रयादशीच्या मध्यरात्री भ. महावीरांचा जन्म झाला. या तेजस्वी बालकाचे नाव 'वर्धमान' असे ठेवले. त्यांना 'महावीर' हे विशेषण का लावले गेले याविषयी त्यांच्या बालपणातील शौर्य व धाडसाच्या कथा परंपरेने नोंदविलेल्या आहेत. वर्धमान बालपणापासूनच ज्ञान-प्रतिभासंपन्न, एकांतप्रिय व चिंतनशील होते. वयाच्या २८ व्या वर्षी, मातापित्यांच्या मृत्यूनंतर आपले जेष्ठ बंधू नंदिवर्धन यांच्या अनुमती यांनी साधुजीवनाची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी एक वर्षभर दीन-दु:खी-गरजू लोकांना विपुल दाने दिली. वयाच्या तिसाव्या वर्षी 'मार्गशीर्ष कृष्ण दशमीला' त्यांनी 'दीक्षा घेतली. त्यानंतर साडे बारा वर्षे त्यांनी कठोर तपस्या केली. 'वैशाख शुद्ध दशमीला' त्यांना केवलज्ञान' प्राप्त झाले. बोधीची चरमावस्था प्राप्त केल्यावर त्यांनी विहार करत धर्मोपदेश देण्यास आरंभ केला. त्यांच्या वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत अर्थात् 'अश्विन कृष्ण अमावस्येच्या' मध्यरात्रीपर्यंत त्यांनी प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी निरंतर उपदेश केला. जैन लोक दिवाळीच्या रात्र दीप प्रज्वलन करून त्यांचा निर्वाणोत्सव साजरा करतात. भ. महावीरांनी 'अर्धमागधी' या लोकभाषेत केलेले उपदेश त्यांच्या शिष्यांनी संकलित केले. ते सुमारे १००० वर्षे मौखिक परंपरेने जतन केले गेले. त्यानंतर म्हणजे इसवी सनाच्या पाचव्या शतकात ते गुजरातमधील 'वलभी' येथे झालेल्या श्वेतांबर साधु परिषदेत ग्रंथारूढ करण्यात आले. आज आपल्यासमोर असलेले अकरा 'अंग' ग्रंथ 'महावीरवाणी' या नावाने ओळखले जातात. पहिला अंगग्रंथ आचारांग' नावाने सुप्रसिद्ध आहे. प्राकृत भाषातज्ञांनी या ग्रंथाचा पहिला विभाग अर्धमागधी भाषेचा सर्वात प्राचीन नमुना म्हणून स्वीकारार्ह मानला आहे. या ग्रंथाचा अभ्यास करीत असताना त्यातील 'वीर' आणि ‘महावीर' या शब्दांकडे माझे लक्ष वेधले गेले. भ. महावीर स्वत: 'वीर' शब्द कोणकोणत्या संदर्भात वापरतत याची उत्सुकता लागून राहिली. त्यांचे तद्विषयक विचार या लेखात मांडले आहेत. आचारांगाची भाषाशैली उपनिषदांशी अतिशय मिळतीजुळती आहे. महावीरांच्या उपदेशाचा काळ हा वैदिक परंपरेतील उपनिषत्काळाशी निकटता राखणारा असल्याने, ही गोष्ट नैसर्गिकच आहे. ___'वीर' हा शब्द वाच्यार्थाने रणांगणावर पराक्रम गाजविणाऱ्या योद्ध्याचा वाचक आहे. आचारांगात मात्र तो मेधावी, विवेकी मुनीसाठी उपयोजित करण्यात आला आहे. 'शस्त्रपरिज्ञा' आणि 'लोकविजय' या शीर्षकांच्या अध्ययनांमध्ये त्यांनी या शब्दाचा जास्तीत जास्त उपयोग केला आहे. अर्थातच हा 'आध्यात्मिक विजय' आहे, रणांगणावरील विजय नव्हे. अत्युच्च आत्मकल्याण' हे ध्येय, उद्दिष्ट आहे. 'अहिंसेचे पालन' हा त्याचा मार्ग आहे. ते म्हणतात, 'पणया वीरा महावीहिं' - अर्थात् वीरपुरुष या महापथाला समर्पित आहेत (जसा योद्धा ध्येयपूर्तीसाठी समर्पित असतो तसे). असे वीर ‘पराक्रमी' आहेत. ते साधनेतील अडथळे, विघ्ने यावर मात करतात. बाह्य, दृष्य शत्रूवर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूद करणारा हा पराक्रम नव्हे. हा तर संयमाचा पराक्रम' आहे. आजूबाजूच्या त्रस (हालचाल करू शकणाऱ्या) जीवांना तर हा वीर जपतोच पण पृथ्वी, जल, अग्नि, वायु व वनस्पती या एकेंद्रिय जीवसृष्टीविषयीही हा जागृत, अप्रमत्त असतो. पर्यावरणाच्या सर्व घटकांचे हा प्राणपणाने रक्षण करतो. भोजन करताना, वस्त्रे परिधान करताना, मार्गक्रमण करताना तसेच मल-मूत्र विसर्जन करताना हा आजूबाजूच्या कोणत्याही स्थूल-सूक्ष्म जीवाला इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेतो. हीच ‘शस्वपरिज्ञा' अर्थात् 'विवेक' आहे सामान्य वीर हे शबूंना बंदी बनवितात, त्यात भूषण मानतात. हे आध्यात्मिक 'वीर' आपल्या उपदेशाने

Loading...

Page Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28