Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 7
________________ आणि भवस्थिती यांचे सविस्तर वर्णन तत्त्वार्थसूत्रात येते. सारांश काय ? तर जैन दर्शनाचा पूर्वजन्म - पुनर्जन्मावर १०० टक्के विश्वास आहे. त्याला त्यांनी सत्ताशास्त्रीय आणि ज्ञानशास्त्रीय आधार दिला आहे. कर्मसिद्धांताच्या विस्तृत आणि सूक्ष्म मांडणीत ही संकल्पना कौशल्याने गुंफली आहे. अध्यात्माच्या दृष्टीनेही पुनर्जन्माची उपपत्ती लावली आहे. समग्र जैन कथावाङ्मय व चरित्रे पूर्वजन्मपुनर्जन्माने भरलेली आहेत. आधुनिक मानसशास्त्रीय संशोधकही पुनर्जन्माची सिद्धी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र विशिष्ट 'case-study ' पुनर्जन्म सुचवीत असला तरी व्यापक सार्वत्रिक सिद्धांतात अजून तरी त्याचे रूपांतर झालेले दिसत नाही.

Loading...

Page Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28