Book Title: Bhogte Tyachi Chuk
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 9
________________ संपादकीय कोणत्याही प्रकारची चुक नसताना आपल्याला दुःख सहन करावे लागले तर हृदय पुन्हा पुन्हा कसे आक्रोश करून म्हणत असते की, ह्यात माझी काय चुक? ह्यात मी काय चुकीचे केले? तरी उत्तर मिळत नाही, त्यामुळे मग आपल्यातील वकील जागा होतो आणि वकीली चालू करून म्हणतो ह्यात माझी काहीच चुक नव्हती. ह्यात तर समोरच्याचीच चुक आहे ना? शेवटी असे मानुन घेतात, जस्टीफाय करतात कि, 'पण त्याने जर असे केले नसते तर मग मला असे वाईट करावे किंवा बोलावे लागले असते का!' अशा रितीने स्वत:ची चुक लपवतो आणि समोरच्याचीच चुक आहे असे सिद्ध करुन टाकतो. आणि कर्मबंधनाची श्रृंखला चालू राहते. परम पूज्य दादाश्रींनी सामान्यातील सामान्य माणसाला सर्व दृष्टिने समाधान होईल असे एक जीवन उपयोगी सूत्र दिले, की ह्या जगात चुक कोणाची? चोराची किंवा ज्याची वस्तु चोरली गेली त्याची? ह्या दोघात कोणाला भोगावे लागले? ज्याचे चोरीला गेले त्यालाच भोगावे लागते ना? जो भोगतो त्याची चुक! चोर तर पकडला जाईल आणि भोगेल तेव्हा त्याला त्याची चुकी बद्दल शिक्षा होईल परंतु आज आपल्याला आपल्या चुकीचा दंड मिळाला. आपण स्वतः भोगतो नंतर कोणाला दोष द्याचे बाकी रहातात? मग समोरचा निर्दोषच दिसतो. आपल्या हातून टी-सेट तूटला तर कोणाला सांगणार? आणि नोकराकडून तूटला तर?! हे असे आहे. घरात, व्यापार, नोकरीत सगळीकडे चुक कोणाची आहे? शोधायचे असले तर तपास करावा की ह्यात भोग कोणाला भोगावे लागतात? त्याचीच चुक. चुक आहे तो पर्यंतच भोगायचे. जेव्हा चुक संपून जाते, तेव्हा ह्या जगातील कोणतीही व्यक्ति, कोणताही संयोग आपल्याला दुःख देऊ शकणार नाही. प्रस्तुत संकलनात दादाश्रींनी जो भोगतो त्याची चुक' चे विज्ञान उघड केले आहे की, ज्याला उपयोगात आणल्याने आपला पूर्ण गुंता सोडवता येणार, असे अमूल्य ज्ञानसूत्र आहे! - डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद

Loading...

Page Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38