Book Title: Bhogte Tyachi Chuk
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/030108/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ OPoe NG दादा भगवान प्ररूपित भोगतो त्याची चुक मुळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन अनुवाद : महात्मागण 9/ G ANA ७ To) ETUN Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक : श्री अजीत सी. पटेल महाविदेह फाउन्डेशन 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेज के पीछे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८० ०१४, गुजरात. फोन - (०७९) २७५४०४०८ All Rights reserved - Dr. Niruben Amin Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Post - Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. १००० १००० प्रथम आवृत्ति : द्वितीय आवृत्ति : तृतिय आवृत्ति : चतुर्थ आवृत्ति : पंचम आवृत्ति : छठ्ठी आवृत्ति : or oram १००० १००० सितम्बर २००७ फरवरी २००९ दिसम्बर २००९ सितम्बर २०११ मार्च २०१२ अक्तुबर २०१३ ३००० भाव मूल्य : ‘परम विनय' आणि 'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : १० रुपये लेज़र कम्पोज : दादा भगवान फाउन्डेशन, अहमदाबाद. मुद्रक : महाविदेह फाउन्डेशन पार्श्वनाथ चैम्बर्स, नये रिजर्व बैन्क के पास, इन्कमटैक्स, अहमदाबाद-३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४ Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र વર્તમાનતીર્થકર . શ્રીસીમંધરસ્વામી | नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवज्झायाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो, सव्व पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २ ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ (दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके) मराठी १. भोगतो त्याची चुक ६. क्रोध २. एडजेस्ट एवरीव्हेर ७. चिंता ३. जे घडले तोच न्याय ८. प्रतिक्रमण ४. संघर्ष टाळा ९. भावना सुधारे जन्मोजन्म ५. मी कोण आहे? हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य २. सर्व दुःखों से मुक्ति २३. दान ३. कर्म का सिद्धांत २४. मानव धर्म ४. आत्मबोध २५. सेवा-परोपकार ५. मैं कौन हूँ? २६. मृत्यु समय, पहले और पश्चात ६. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी २७. निजदोष दर्शन से... निर्दोष ७. भुगते उसी की भूल २८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार ८. एडजस्ट एवरीव्हेयर २९. क्लेश रहित जीवन ९. टकराव टालिए ३०. गुरु-शिष्य १०. हुआ सो न्याय ३१. अहिंसा ११. चिंता ३२. सत्य-असत्य के रहस्य १२. क्रोध ३३. चमत्कार १३. प्रतिक्रमण ३४. पाप-पुण्य १४. दादा भगवान कौन? ३५. वाणी, व्यवहार में... १५. पैसों का व्यवहार ३६. कर्म का विज्ञान १६. अंत:करण का स्वरूप ३७. आप्तवाणी - १ १७. जगत कर्ता कौन? ३८. आप्तवाणी - ३ १८. त्रिमंत्र ३९. आप्तवाणी - ४ १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ४०. आप्तवाणी - ५ २०. प्रेम ४१. आप्तवाणी - ६ २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ४२. आप्तवाणी - ८ दादा भगवान फाउन्डेशन च्या द्वारे गुजराती आणि अंग्रजी भाषे मध्ये सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे। Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एक तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवान कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष. त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !! ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे कि, 'हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत । हे तर ए.एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत । ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही। माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो.' व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट | स्वतःचा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे कि नाही! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा कि नाही? - दादाश्री परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आता पर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुहूंना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे. हे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत. पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतू साठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेट्रन आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हांच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो. Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण 'दादा भगवान'च्या नावांनी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्व साठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या स्वमुखा ने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे. ते 'दादा भगवान' तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे. प्रस्तुत अनुवाद मध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादाजींची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा. ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश ‘जसा आहे तसा' आपल्याला गुजराती भाषेत अवगत होणार. ज्याला ज्ञानाचा गहन अर्थ समजायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे. अनुवाद संबंधी चूकांसाठी आपली क्षमा प्रार्थितो. Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय कोणत्याही प्रकारची चुक नसताना आपल्याला दुःख सहन करावे लागले तर हृदय पुन्हा पुन्हा कसे आक्रोश करून म्हणत असते की, ह्यात माझी काय चुक? ह्यात मी काय चुकीचे केले? तरी उत्तर मिळत नाही, त्यामुळे मग आपल्यातील वकील जागा होतो आणि वकीली चालू करून म्हणतो ह्यात माझी काहीच चुक नव्हती. ह्यात तर समोरच्याचीच चुक आहे ना? शेवटी असे मानुन घेतात, जस्टीफाय करतात कि, 'पण त्याने जर असे केले नसते तर मग मला असे वाईट करावे किंवा बोलावे लागले असते का!' अशा रितीने स्वत:ची चुक लपवतो आणि समोरच्याचीच चुक आहे असे सिद्ध करुन टाकतो. आणि कर्मबंधनाची श्रृंखला चालू राहते. परम पूज्य दादाश्रींनी सामान्यातील सामान्य माणसाला सर्व दृष्टिने समाधान होईल असे एक जीवन उपयोगी सूत्र दिले, की ह्या जगात चुक कोणाची? चोराची किंवा ज्याची वस्तु चोरली गेली त्याची? ह्या दोघात कोणाला भोगावे लागले? ज्याचे चोरीला गेले त्यालाच भोगावे लागते ना? जो भोगतो त्याची चुक! चोर तर पकडला जाईल आणि भोगेल तेव्हा त्याला त्याची चुकी बद्दल शिक्षा होईल परंतु आज आपल्याला आपल्या चुकीचा दंड मिळाला. आपण स्वतः भोगतो नंतर कोणाला दोष द्याचे बाकी रहातात? मग समोरचा निर्दोषच दिसतो. आपल्या हातून टी-सेट तूटला तर कोणाला सांगणार? आणि नोकराकडून तूटला तर?! हे असे आहे. घरात, व्यापार, नोकरीत सगळीकडे चुक कोणाची आहे? शोधायचे असले तर तपास करावा की ह्यात भोग कोणाला भोगावे लागतात? त्याचीच चुक. चुक आहे तो पर्यंतच भोगायचे. जेव्हा चुक संपून जाते, तेव्हा ह्या जगातील कोणतीही व्यक्ति, कोणताही संयोग आपल्याला दुःख देऊ शकणार नाही. प्रस्तुत संकलनात दादाश्रींनी जो भोगतो त्याची चुक' चे विज्ञान उघड केले आहे की, ज्याला उपयोगात आणल्याने आपला पूर्ण गुंता सोडवता येणार, असे अमूल्य ज्ञानसूत्र आहे! - डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक निसर्गाच्या न्यायालयात... ह्या जगात न्यायाधीश ठिक-ठिकाणी आहेत, परंतु कर्म जगाचा नैसर्गिक न्यायाधीश तर एकच आहे, जो 'भोगतो त्याची चुक' हा एकच न्याय आहे. त्या प्रमाणे संपूर्ण जग चालत आहे आणि भ्रांतिच्या न्यायाने हा संपूर्ण संसार ऊभा आहे. एक क्षण सुद्धा जग कायद्या शिवाय राहत नाही. बक्षिस द्यायचे असेल त्याला बक्षिस देते. दंड द्यायचा असेल त्याला दंड देते परंतु कायद्याचा बाहेर चालत नाही. कायदेशीरच आहे, संपूर्ण न्यायपूर्वकच आहे. परंतु समोरच्या व्यक्तिच्या दृष्टिला दिसत नसल्याने समजत नाही. ती दृष्टि निर्मळ होईल तेव्हा न्याय दिसतो. स्वार्थदृष्टि असेल, तोपर्यंत न्याय कसा दिसणार ? ब्रह्मांडच्या स्वामी नी का भोगावे? हे संपूर्ण जग ‘आपल्या' मालकीचे आहे. आपण ‘स्वतः’ ब्रह्मांडाचे मालक आहोत तरीसुद्धा आपण दु:ख, का म्हणून भोगायचे ते शोधून काढ ना?! हे तर आपण आपल्या चुकीने बांधलेलो आहोत, इतर लोकांनी येवून बांधले नाही. ती चुक संपताच मुक्त, आणि खरोखर तर मुक्तच आहोत. परंतु चुकीमुळे बंधन भोगतो आहोत. हो स्वत:च न्यायाधीश, आणि स्वत:च गुन्हेगार आणि स्वत:च Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक २ वकील, तो न्याय कोणत्या बाजूला करेल? स्वत:च्या बाजूलाच. म्हणजे स्वतः आपल्या इच्छे प्रमाणेच न्याय करणार ना? तो स्वतः सतत चूकाच करतो. अशा रितीने नेहमी जीव बांधलेला असतो. येथील न्यायाधीश म्हणतात कि, तुमची चुक झाली आहे. मग आतला वकील वकीलात करतो ह्यात माझा काय दोष? असे करीत स्वत:च बंधनात येतो. स्वत:च्या आत्महितासाठी समजून घ्यायला हवे कि कोणाच्या दोषाचे हे बंधन आहे, जो भोगतो त्याचाच दोष. साध्या सरळ (लोक) भाषेत सांगायचे म्हणजे हा अन्याय आहे, परंतु परमेश्वराच्या भाषेचा न्याय तर असेच म्हणतो कि, ‘जो भोगतो त्याची चुक' ह्या न्यायालयात बाहेरच्या न्यायाधीशाचे कामच नाही. जगाच्या वास्तविकतेचे रहस्यज्ञान लोकांच्या लक्षात च नाही आणि ज्याच्यामुळे सतत भटकावे लागते, त्या अज्ञान - ज्ञानाची सर्वांना माहिती आहे. हा खिसा कापला, ह्यात चुक कोणाची? त्याचा खिसा नाही कापला आणि तुमचा च का कापला ? तुमच्या दोघां पैकी, सध्या भोगतो कोण? भोगतो त्याची चुक. 'दादां'नी ह्या ज्ञानात 'जसे आहे तसे' पाहिले कि, भोगतो त्याचीच चुक आहे. सहन करायचे कि समावून घ्यायचे? लोक सहनशक्ति वाढविण्याचे म्हणतात पण ती कुठपर्यंत रहाते? ज्ञानाची दोरी तर थेटपर्यंत पोहचते. सहनशक्तिची दोरी कुठपर्यंत पोहचणार? सहनशक्तिची मर्यादा असते. ज्ञान अमर्यादित असते. हे 'ज्ञान'च असे आहे कि किंचित्मात्र सहन करावे लागत नाही. सहन करणे म्हणजे लोखंडाला डोळ्यानेच पाहून वितळून टाकायचे. म्हणजे शक्ति हवी, जेव्हा ज्ञानाने किंचित्मात्र सहन केल्याशिवाय परमानंदा बरोबर मुक्ति ! आणि हे लक्षात ही येते कि हा तर हिशोब पूर्ण होत आहे, आणि मुक्त होत आहोत. जो दुःख भोगतो त्याची चुक आणि सुख भोगतो तर ते त्याचे बक्षिस.. परंतु भ्रांतिचा कायदा निमित्ताला पकडतो. परमेश्वराचा कायदा-रियल (खरा) Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक कायदा, तो तर ज्याची चुक असेल त्यालाच पकडणार. हा कायदा एक्झेक्ट (तंतोतंत) आहे आणि त्यात कोणी बदल करू शकेल असे नाहीच. जगात असा कुठलाही कायदा नाही कि, जे कोणाला दुःख देऊ शकेल. सरकारचा कायदा सुद्धा दु:ख नाही देवू शकत ! हा चहाचा कप जर तुमच्या हातातून पडला तर तुम्हाला दु:ख होते? स्वतः फोडला तर सहन करावे लागते का? आणि जर तो कप तुमच्या मुलाच्या हातून फूटला तर दुःख, चिंता व जळजळ होते. स्वत:च्याच चुकीने झाले असे समजलो तर दुःख किंवा चिंता होईल का? हे तर दुसऱ्यांचा दोष काढून दु:ख आणि चिंता ओढवून घेतो आणि विनाकारण रात्रं-दिवस चीडचीड ऊभी करतो आणि वरून असे वाटते कि, मला खूप सहन करावे लागते. आपली स्वत:ची चुक असेल तरच समोरचा काही बोलणार ना? म्हणून चुक मिटवुन टाका ना! ह्या जगात कुठलाही जीव कुठल्याही जीवाला त्रास देवू शकत नाही, असे स्वतंत्र जग आहे, कुणी त्रास देत असेल त्याचे कारण आधी आपण दखल केली होती म्हणून. ती चुक संपवा म्हणजे त्याचा हिशोब राहणार नाही. प्रश्नकर्ता : ही थियरी जर बरोबर समजली तर सर्व प्रश्नांचे मनात समाधान राहिल. दादाश्री : समाधान नाही, एक्झेक्ट तसेच आहे. हे जुळवून काढलेले नाही. बुद्धिपूर्वकची ही गोष्ट नाही, परंतु ज्ञानपूर्वकची आहे. आजचा गुन्हेगार-लुटारू का लुटला जाणारा? वर्तमानपत्रात रोज येते कि, 'आज टॅक्सीत दोन माणसांनी एकाला लूटले, अमुक फ्लॅटच्या बाईसाहेबांना बांधून लूटले.' हे वाचून आपण, चिडायला नको कि, मी देखील लूटलो गेलो, तर? हा विकल्प च गुन्हा आहे. त्यापेक्षा तू तुझ्या सहजतेतच वाग, ना! तुझा हिशोब असेल तर तो Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक घेऊन जाईल. नाहीतर कोणी बापही विचारणार नाही. म्हणून तू निर्भय होऊन रहा. हे वर्तमानपत्रवाले तर, लिहतील म्हणून काय आपण घाबरून जायचे? हे तर थोड्या कमी प्रमाणात घटस्फोट (डायवोर्स) करतात, हे ठीक आहे, तरी जास्त प्रमाणात फारकत व्हायला लागले तर सर्वांच्या शंकेला स्थान मिळेल कि आपली पण फारकत झाली तर? एक लाख माणसे ज्या जागी लूटले गेले तेथे पण तू घाबरू नको. तेथे कोणी बापही तुमचे उपरी नाही. लूटणारा भोगतो का लूटला गेला तो भोगतो? कोण भोगतो ते पाहून घ्यावे. कोणी ठग भेटला आणि तो लूटून गेला, मग रडायचे नाही, पुढे आपली प्रगती चालू ठेवायची! जग दुःख भोगण्यासाठी नाही, सुख भोगण्यासाठी आहे. ज्याचा जेवढा हिशोब असेल तेवढा मिळतो. कित्येक जण केवळ सुखच भोगत आहेत. ते कशामुळे? कित्येक जण फक्त दुःखच भोगत आहेत ते कशामुळे? त्यांनी आपला तसा हिशोब आणलेला असतो म्हणून. _ 'हे' एकच सूत्र घरी लिहून ठेवले असेल तर मग भोगत असताना जाणून घ्या कि ही चुक कोणाची? म्हणून कित्येक घरात, मोठ्या अक्षराने भिंती वर लिहन ठेवलेले असते कि 'भोगतो त्याची चुक.' पुन्हा हे कधी विसरणारच नाही! संपूर्ण आयुष्यभर जर कोणी माणसाने हे सूत्र वापरले, यथार्थपणे समजून जर वापरले तर गुरु करायची आवश्यकता नाही. आणि हेच सूत्र त्याला मोक्षाप्रत घेऊन जाईल असे आहे. ___ अजब वेल्डिंग झाली ही 'भोगतो त्याची चुक', हे तर खूप मोठे सूत्र म्हटले जाते, ते संयोगानुसार, काही काळच्या हिशोबाने शब्दांची वेल्डिंग (सांधणी) झाली आहे. वेल्डिंग झाल्या शिवाय कामाला येणार नाही ना! वेल्डिंग व्हायला हवी. Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक हा शब्द वेल्डिंग बरोबर च आहे त्याच्यावर एक मोठे पुस्तक लिहिले जाईल एवढे यात सार आहे! ___ 'भोगतो त्याची चुक' एवढेच म्हटले, तर एका बाजूचे संपूर्ण कोडे नाहीसे होते आणि दुसरे 'व्यवस्थित' म्हटले तर दुसऱ्या बाजूचे कोडे नाहीसे होते. जे स्वत:ला दुःख भोगावे लागते आहे त्यात त्याचा स्वत:चाच दोष आहे! दुसऱ्या कोणाचा दोष नाही. जो दुःख देतो त्याची चुक नाही. दुःख देतो त्याची चुक संसारात, आणि जो भोगतो त्याची चुक हे परमेश्वराच्या कायद्यात. प्रश्नकर्ता : दु:ख देणाऱ्याला तर भोगावे लागते ना? दादाश्री : नंतर, तो जेव्हा भोगणार त्याचवेळी त्याची चुक गणली जाईल. परंतु आज तुमचीच चुक पकडली गेली. चुक, वडीलांची कि मुलाची? एक बाप आहे, त्याचा मुलगा रात्री दोन वाजता आला. तशी पन्नास लाखाची पार्टी, एकूलता एक मुलगा? बाप आहे तो वाट पहात बसलेला कि, मुलगा आला कि नाही? आणि मुलगा येतो तेव्हा झोकांड्या खात घरात शिरतो. बाप पाच-सात वेळा सांगायला गेला तेव्हा तो ओरडला. त्यामुळे तो परत फिरला. मग आपल्या सारखे म्हणणार ना बोलू नका, त्याला राहू दे ना? तुम्ही तुमचे झोपून जा शांत. तर म्हणेल, 'मुलगा तर माझा ना'? जसा काही त्याच्या पोटातून निघाला आहे?! त्यामुळे तो येऊन झोपतो. मग मी त्यांना विचारले 'मुलगा झोपून गेला कि मग तुम्ही झोपणार कि नाही?' तेव्हा म्हणतो 'मला कशी झोप येणार?' हा गधडा दारु पिऊन येवून झोपून जातो. मी काय त्याच्यासारखा मूर्ख आहे? मी म्हणालो 'तो तर शहाणा आहे' त्याला त्याचे काही दुःख होत आहे का? त्यानंतर मी त्यानां म्हटले 'जो भोगतो त्याची चुक' तो भोगतोय का तुम्ही भोगता? तेव्हा ते म्हणाले 'भोग तर मी च भोगतोय संपूर्ण रात्रभर जागून...' Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक मी म्हणालो त्याची चुक नाही, ही तुमचीच चुक आहे. तुम्ही मागच्या जन्मात त्याला लाडावून ठेवले म्हणून त्याचा परिणाम आहे हा. तुम्ही लाडावून ठेवले म्हणून तो ह्या जन्मी माल तुम्हाला परत करत आहे. ही दुसरी तीन मुलं चांगली आहेत, त्याचा आनंद तू का घेत नाही? ह्या सर्व आपणच निर्माण केलेल्या अडचणी आहेत. नीट समजून घेण्यासारखे आहे हे जग! त्या म्हाताऱ्या माणसाच्या मुलाला मी एक दिवस विचारले, 'अरे तुझ्या वडीलांना तुझ्या वागण्याने खूप दुःख होते आणि तुला त्या बद्दल काहीच वाटत नाही?' मुलगा म्हणाला मला कसले दुःख, वडील खूप पैसा कमावून बसले आहेत तेव्हा मला कसली चिंता? मी तर मजा करतोय. म्हणजे ह्या बाप आणि मुलात भोगतो कोण? बापच, म्हणजे बापाचीच चुक. 'भोगतो त्याची चुक.' हा मुलगा जुगार खेळत असेल, वाटेल ते करीत असेल. परंतु, त्याचे भाऊ तर आरामात झोपून जातात ना? त्याची आई पण शांत व्यवस्थित झोपली आहे ना! आणि हा कमनशीबी म्हातारा एकटाच का जागत असतो? म्हणून त्याची चुक. त्याची काय चुक? तर ह्या म्हाताऱ्याने ह्या मुलाला मागच्या जन्मी बिघडवले होते. म्हणून त्या मागच्या जन्माचे ऋणानुबंध झाले आहेत, म्हणून ह्या जन्मी त्याचा बदला घेतला जातो. असे भोग भोगावे लागतात आणि मुलगा त्याची चुक भोगेल जेव्हा त्याची चुक पकडली जाईल. ह्या दोघातून कोणाला त्रास होत आहे? ज्याला त्रास होतो त्याचीच चुक. हा इतका एकच कायदा समजून घेतला तर संपूर्ण मोक्षमार्ग मोकळा होईल! मग त्या बापाला मी म्हटले. आता तो नीट व्यवस्थित वागेल ह्यासाठी मार्ग काढायला हवा. त्याला कसा फायदा होईल व नुकसान होणार नाही असाच फायदाचा विचार करावा. आणि तसे वागावे मानसिक त्रास करून घ्यायचा नाही. त्यासाठी शारीरिक श्रम, ते सगळे करायचे, पैसे आपल्या जवळ असतील तर द्यावे, पण मानसिकतेला दुर्लक्ष करावे. Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक ७ नाहीतर आपल्या येथे कायदा काय आहे? 'भोगतो त्याची चुक. ' मुलगा दारु पिऊन आला आणि आरामात झोपून गेला. आणि तुम्हाला संपूर्ण रात्र झोप आली नाही तेव्हा तुम्ही मला म्हणाल कि हा गाढवासारखा झोपून गेला. अरे, तुम्ही भोगत आहात ती तुमची चुक आहे, असे मी सांगून देतो. तो भोगेल तेव्हा त्याची चुक. प्रश्नकर्ता : आई-वडील मुलांच्या चूका सहन करतात ते, तर ममता आणि जबाबदारीमुळे भोगतात ना? दादाश्री : फक्त ममता आणि जबाबदारी नाही पण मुख्य कारण चुक त्यांची आहे. ममते शिवाय दूसरी पण अनेक कारणे असतात ना. परंतु, तुम्ही भोगता म्हणून तुमची चुक आहे. म्हणून कोणाचे दोष काढू नका. नाहीतर पुढच्या जन्मासाठीचा हिशोब बांधला जाईल पुन्हा ! म्हणजे दोघांचे कायदे वेगवेगळे आहेत. निसर्गाच्या कायद्याला मान्य कराल तर तुमचा रस्ता अगदी सरळ होतो. आणि सरकारच्या कायद्याला मान्य कराल तर गोंधळून जाल. प्रश्नकर्ता: पण दादा ती चुक त्याला स्वत:ला लक्षात यायला हवी ना? दादाश्री : नाही, त्याला स्वतःला लक्षात येणार नाही. ती चुक दाखविणारा हवा. तो त्याचा विश्वासू असायला हवा. एक वेळा चुक दिसली, म्हणजे दोन-तीन वेळात त्याला अनुभवात येईल. म्हणून आम्ही सांगितले होते कि, नाही समजले तर एवढे लिहून ठेवा घरात कि ‘जो भोगतो त्याची चुक. ' आपल्याला सासू खूप खूप त्रास देत असेल, रात्री झोप येत नसेल, तेव्हा सासूला पाहायला गेलो तर ती झोपून गेलेली असते, अगदी घोरत असेल तर असे समजून घ्या कि चुक आपलीच आहे. सासू तर आरामात झोपून गेली. 'भोगतो त्याची चुक' तुम्हाला ही गोष्ट आवडली कि नाही? तर 'भोगतो त्याची चुक' एवढेच जर समजले तर घरात एक ही भांडण-तंटा होणार नाही. Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक पहिले जीवन जगायला शिका. घरात भांडणे कमी होतील, मग दुसरी गोष्ट शिकायची! समोरचा नाही समजत तर? प्रश्नकर्ता : कित्येक जण असे असतात कि आपण कितीही चांगले वागलो तरी ते समजत नाही. दादाश्री : ते जर समजत नसतील तर त्यात आपलीच चुक आहे. तर ती व्यक्ति समजून घेणारी का नाही मिळाली आपल्याला? त्याच्याशीच आपली गाठ का पडली? ज्या ज्या वेळी आपल्याला काही पण भोगावे लागते ते आपल्या चुकीचाच परिणाम आहे. प्रश्नकर्ता : तर आपण असे समजायचे कि माझे कर्मच असे आहेत? दादाश्री : खरोखर. आपल्या चुकीशिवाय आपल्याला भोग भोगावे लागत नाही. ह्या जगात असा कोणी नाही जो आपल्याला किंचित्मात्र दुःख देणार आणि जर कोणी दुःख देणारा आहे तर ते आपलीच चुक आहे. समोरच्याचा दोष नाही. ते तर निमित्त आहे. म्हणून जो भोगतो त्याची चुक? पति-पत्नी आपसात खूप भांडत असतील आणि दोघे झोपायला गेल्यानंतर आपण गुपचुप पहायला गेलो तर ती बाई तर बिनधास्त झोपलेली असते. आणि तो भाऊ एक सारखा कुस बदलत असेल तर आपण समजावे कि ह्या माणसाचीच चुक आहे सगळी, ती बाई भोगत नाही. ज्याची चुक असेल तोच भोगतो. त्यावेळेला जर तो भाऊ झोपलेला असेल आणि ती बाई जागत असेल तर समजावे कि त्या बाईचीच चुक आहे. 'भोगतो त्याची चुक', हे तर फार मोठे विज्ञान आहे! सारे जग निमित्तालाच दोष देत आहे. Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक याचा न्याय कोणता? हे जग नियमाच्या आधीन चालते, हे खोटं नाही. ह्याचे 'रेग्यूलेटर ऑफ द वर्ल्ड' पण आहे. आणि सतत ह्या जगाला रेग्यूलेशन (नियम) मध्ये च ठेवत असते. बस स्टँडवर कुणी एक बाई ऊभी आहे. आता बस स्टँडवर ऊभे राहणे हा काही गुन्हा म्हणायचा? एवढ्यात बाजूनी, एक बस येते, ती बस ह्या बस स्टॉपवर चढते. कारण कि त्या ड्रायव्हरच्या हातून स्टीयरिंगवरचा ताबा गेला आहे. त्या बसने येवून फूटपाथवर चढून त्या बाईला चिरडून टाकली, आणि बस स्टँडलाही तोडून टाकले. तेथे पाचशे माणसाचा समूह एकत्र झाला. त्या लोकांना सांगितले कि याचा न्याय करा, तर ते लोक म्हणतील कि, 'बिचारी त्या बाईची काही चुक नसतांना मरुन गेली. ह्यात बाईचा काय गुन्हा? हा ड्रायव्हर नालायक आहे.' त्यानंतर चार-पांच अक्कलवंत माणसे एकत्र येऊन म्हणतात, 'हे असे कसले बस ड्रायव्हर, ह्यानां तर तुरुंगातच घातले पाहिजे. असच करायला हवे! बाई, बस स्टँडवर ऊभी राहिलेली, ह्या बिचारीचा काय दोष?' अरे वेड्या! तिचा गुन्हा तुम्हाला माहित नाही. तिचा गुन्हा होता, म्हणूनच तर ती मेली. आणि ह्या ड्रायव्हरचा गुन्हा तर जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा, त्याच्यावर जेव्हा केस चालू होईल आणि त्या केसचा सफल निकाल लागला आणि जर अपराधी ठरला, तर अपराधी, अन्यथा त्याला निरपराधी म्हणून सोडून देतील? त्या बाईचा गुन्हा आज पकडला गेला. अरे, हिशोबा शिवाय कोणी मारणार का? त्या बाईने मागचा हिशोब आज पूर्ण केला. असे समजून जायचे, बाईने भोगले म्हणजे ती तिची चुक. नंतर मग तो ड्रायव्हर पकडला जातो तेव्हा त्याची चुक. आज जो पकडला गेला तो गुन्हेगार. तर कित्येक जण काय म्हणतात? कि जर परमेश्वर असता तर असे घडलेच नसते. म्हणजेच परमेश्वरासारखी काही वस्तु ह्या संसारात आहे असे वाटतच नाही. त्या बाईचा काय गुन्हा होता? हा परमेश्वर ह्या जगात नाहीच! Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ १० भोगतो त्याची चुक घ्या!!! ह्या लोकांनी असा निष्कर्ष काढला! अरे असे कशासाठी? परमेश्वराचे वाईट का बोलतात? त्यांना आपले घर रिकामे का करायला लावता? परमेश्वरचे घर रिकामे करायला निघालात! अरे, हा परमेश्वर नसता तर राहिले काय ह्या जगात? ह्या लोकांना कसे वाटते कि परमेश्वराचे चालत नाही. लोकांचा देवावरचा विश्वास उडून जाईल. अरे, असे नाही. हे सर्व हिशोब तर मागच्या जन्मांपासून चालुच आहे. हा फक्त एका जन्मातील हिशोब नाही. आज त्या बाईची चुक झाली म्हणून भोगावे लागले. हा सर्व न्यायच आहे. ती बाई चिरडली गेली हा पण न्यायच आहे, म्हणून कायदेशीरच आहे हे जग. थोडक्यात ही गोष्ट अशी आहे. जर का ड्रायव्हरची चुक असेल तर सरकारचा कडक कायदा असता, तर त्या माणसाला तिथल्या तिथे उभे करून गोळ्या घालून खलास करतील. पण असे तर सरकार ही म्हणत नाही. कारण कि असे मारून टाकायचे नाही, वास्तवात तो गुन्हेगार नाही, त्याने हा नवीन गुन्हा केला आहे, तो गुन्हा तो नंतर भोगणार. परंतु त्याने तुम्हाला गुन्ह्यातून मुक्त केले. तुम्ही गुन्ह्यातून मुक्त झालात. तो गुन्ह्याने बांधला गेला. म्हणून त्याला सद्बुद्धि देऊन सांगायचे कि गुन्ह्यात अडकू नकोस. एक्सिडन्ट म्हणजे तर... ह्या कलियुगात एक्सिडन्ट (अकस्मात) आणि इन्सिडेन्ट (घटना) असे असतात कि मनुष्य गोंधळून जातो. अकस्मात म्हणजे काय? टु मेनी कॉझीझ एट ए टाईम (असंख्य कारणे एकाच वेळी) आणि घटना म्हणजे काय? सो मेनी कॉझीझ एट ए टाईम (बरीच कारणे एकाच वेळी), म्हणूनच आम्ही काय सांगतो कि 'भोगतो त्याची चुक' आणि तो जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याची चुक समजली जाईल! हे तर जो पकडला गेला त्याला चोर म्हणतात. जसे त्या ऑफिसमधून एकाला पकडले तर त्याला चोर म्हणतात, पण म्हणून काही ऑफिसमध्ये इतर कुणी चोर नाही? Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक प्रश्नकर्ता : सगळेच आहेत. दादाश्री : पकडले जात नाही तोपर्यंत ते सावकार. निसर्गाचा नियम तर कोणी उघड केलाच नाही. निकाल तिथून च येणार ना! शॉर्ट कट! 'भोगतो त्याची चुक' हे एकच वाक्य समजल्याने संसाराचे ओझे बऱ्याच प्रमाणात कमी होते. परमेश्वराचा कायदा तर काय म्हणतो कि ज्या क्षेत्रात, ज्या काळात जो भोगतो तो स्वत:च गुन्हेगार आहे. तेथे कोणाला, वकीलाला पण विचारण्याची आवश्यकता नाही. आता कोणाचा खिसा कापला गेला तर त्या कापणाऱ्याच्या आनंदाचा भाग असतो, तो तर मस्तपैकी जिलेबी खात असेल, हॉटेलात बसून चहापाणी आणि नाष्टा करीत असेल. आणि त्याच वेळी ज्याचा खिसा कापला गेला तो भोगत असेल. म्हणून ‘भोगतो त्याची चुक'. त्याने कधीतरी चोरी केली असणार म्हणून आज पकडला गेला म्हणून तो चोर आणि त्या चोराला, तर जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा त्याला चोर म्हणला जाईल. मी तुमची चुक शोधण्यासाठी राहणारच नाही. संपूर्ण जग समोरच्याचीच चुक पहात असते. स्वतः भोगत असतो पण चुक समोरच्याचीच पहात असतो. त्यामुळे तर उलट गुन्हे दुप्पट होत राहतात आणि व्यवहारात गुंतागुंती पण वाढत जाते ही गोष्ट समजलात तर गुंता कमी होत जातो. मोरबीचा पूर आला, काय कारण? मोरबीला पूर आला आणि जे काही झाले, ते कोणी केले? ते शोधून काढायला हवे? कोणी केले हे? म्हणून एकच शब्द आम्ही लिहिला आहे कि, ह्या जगात चुक कोणाची आहे? हे स्वत:ला समजण्यासाठी एका वस्तुला दोन पद्धतिने समजायला हवे. 'भोगतो त्याची चुक.' ही गोष्ट भोगणाऱ्यानी समजायची Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक १२ आहे, आणि पहाणाऱ्यानी मी त्याला मदत करू शकत नाही, मी (त्याला) मदत करायला हवी, ह्या पद्धतिने पहायचे. ह्या जगाचा नियम असा आहे कि जे डोळ्याने पाहिले, त्याला चुक म्हणतात आणि निसर्गाचा नियम असा आहे कि, जो भोगतो आहे, त्याची चुक आहे. परिणाम येईल तिथे, ज्ञान का बुद्धि ? प्रश्नकर्ता : वर्तमानपत्रात वाचले कि, औरंगाबादला असे झाले, मोरबीला असे झाले तर त्याचा आपल्यावर जो परिणाम होतो, ते आता (आत्मज्ञान प्राप्तीनंतर) वाचले तर काहीच परिणाम झाला नाही, तर त्याला काय जडता म्हणतात? दादाश्री : परिणाम होत नाही, त्यालाच ज्ञान म्हणतात. प्रश्नकर्ता : आणि परिणाम होतो त्याला काय म्हणतात ? दादाश्री : त्याला बुद्धि म्हणतात. म्हणजेच संसार म्हणतात. बुद्धिने मनुष्य इमोशनल ( भावूक) होणार. पण कार्यसिद्धि काहीच होणार नाही. येथे (लढाईच्या वेळी) पाकीस्तानातून बाँब टाकण्यासाठी सगळे येत होते, ते आपले लोक ते पेपरात वाचतात कि त्या तेथे बॉंब पडला, तर ईथे भिती वाटायला लागते. हे सारे जे परिणाम करणारे आहे, ती त्यांची बुद्धि आहे. आणि ही बुद्धिच हा संसार ऊभा करीत आहे. ज्ञान परिणाम मुक्त ठेवते, पेपर वाचला, तरी परिणाम मुक्त राहिल. परिणाम मुक्त म्हणजे आपल्याला काही स्पर्शत नाही. आपल्याला तर फक्त जाणायचे व पहायचे च आहे (ज्ञाता-द्रष्टा रहायचे आहे). ह्या वर्तमानपत्राचे काय करायचे? जाणायचे आणि पहायचे बस ! म्हणजे पूर्ण सविस्तर लिहले असेल त्याला जाणणे म्हणतात, आणि सविस्तर नसेल तेव्हा त्याला पाहिले म्हणतात, ह्यात कोणाचाच दोष नाही. Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक प्रश्नकर्ता : काळाचा दोष खरा ना? दादाश्री : काळाचा दोष कसला? 'भोगेल त्याची चुक' काळ तर बदलतच राहणार ना? चांगल्या काळात आपण नव्हतो का? चोवीस तीर्थंकर होते, तेव्हा आपण नव्हतो का? प्रश्नकर्ता : होतो. दादाश्री : तर त्यावेळी आपण चटणी खाण्यात (विषयविकारा मध्ये) मग्न झालो. त्याच्यात काळ काय करणार बिचारा? काळ तर आपोआप येतच राहणार ना! दिवसा काम नाही केले तर रात्र तर येवून ऊभी रहाते कि नाही रहात? प्रश्नकर्ता : राहते. दादाश्री : मग रात्री दोन वाजता कोणाला चणे आणायला पाठविले, दुप्पट भाव दिला तरी कोणी देईल का? लोकांना वाटते, हा उलटा न्याय आता एक साईकलवाला जात आहे, तो बरोबर डाव्या बाजूने जात आहे आणि एक स्कूटरवाला विरुद्ध दिशेने आला. चुकीच्या बाजूने आला आणि त्याचा पाय मोडून टाकला. आता भोग कोणाला भोगायला लागले? प्रश्नकर्ता : साईकलवाल्याला, ज्याचा पाय तूटला त्याला. दादाश्री : हो, ह्या दोघात कोणाला भोगणे आले आज. त्याने म्हटले, ज्याचा पाय मोडला त्याला. त्याला आज मागचा हिशोब मिळाला, ह्या स्कूटरवाल्याच्या निमित्ताने. त्या स्कूटरवाल्याला आता काहीच भोग नाही. तो तर जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याचा गुन्हा सिद्ध होईल. पण आज जो 'भोगतो त्याची चुक.' प्रश्नकर्ता : ज्याला लागले त्याचा काय गुन्हा? Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ १४ भोगतो त्याची चुक दादाश्री : त्याचा गुन्हा, मागच्या जन्मीचा हिशोब, तो आज पूर्ण झाला. कोणत्याही हिशोबा शिवाय कोणाला कोणतेही दुःख होत नाही. ही त्याच्यी हिशोब भरपाई करण्याची वेळ आली म्हणून तो पकडला गेला. नाहीतर एवढ्या मोठ्या दुनियेत दुसरा कोणी का नाही पकडला गेला. तुम्ही नीडर होऊन कसे फिरू शकता? तर म्हणे, जेव्हा आपला हिशोब असेल तेव्हा तसे घडेल. हिशोब बाकी नसेल तर काय होणार? असे म्हणतात ना, आपले लोक? प्रश्नकर्ता : आपल्याला भोगावे लागणार नाही, ह्यासाठी उपाय काय? दादाश्री : मोक्षात जायचे, किंचित्मात्र कोणाला दुःख द्यायचे नाही. कोणी आपल्याला दुःख दिले तर आपण जमा करून टाकायचे. म्हणजे आपले वहीखाते चोख होतील, आता पुन्हा कोणाला द्यायचे नाही, नवीन व्यापार सुरु करायचा नाही, आणि जुना हिशोब बाकी असेल तर मांडवली करुन टाकायची म्हणजे हिशोब पूर्ण होतो. प्रश्नकर्ता : तर ज्याचा पाय मोडला आहे, त्या भोगत असलेल्या माणसाने असे समजावे कि ही माझीच चुक आहे, आणि म्हणून त्याने त्या स्कूटरवाल्या विरुद्ध काहीच करायला नको? दादाश्री : काही करायचे नाही, असे नाही. आम्ही काय सांगतोय कि मानसिक परिणाम बदलायला नको. व्यावहारिक जे होत असेल ते होऊ द्यायचे, पण मानसिक राग-द्वेष व्हायला नको. ज्याला आपली चुक आहे, असे समजते त्याला राग-द्वेष होणार नाही. व्यवहारात आपल्याला पोलीसवाला म्हणेल कि नांव सांगा तर आपण सांगायला हवे. व्यवहार सर्व करायला हवे, परंतु नाटकीय रित्या (ड्रामेटिक), राग-द्वेष करायचा नाही. आपल्याला आपली चुक आहे' असे समजल्यानंतर त्या स्कूटरवाल्या बिचाऱ्याचा काय दोष? हे जग तर उघड्या डोळ्याने पहात आहे, म्हणून त्याला पुरावा तर द्यावाच लागेल. परंतु आपल्याला त्याच्या Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक १५ बद्दल राग-द्वेष व्हायला नको. कारण कि त्याची ती चुक नाहीच. आपण तसा आरोप करतो कि ती त्याचीच चुक आहे, ते तुमच्या दृष्टिने ते अन्याय दिसते. पण वास्तवात तुमच्या दृष्टित, फरक असल्यामुळे तुम्हाला अन्याय दिसतो. प्रश्नकर्ता : बरोबर आहे. दादाश्री : कोणी तुम्हाला दुःख देत असेल तर ती त्याची चुक नाही. पण जर तुम्ही दुःख भोगत असाल तर ती तुमची चुक आहे. हा निसर्गाचा कायदा आहे. जगाचा कायदा कसा? दुःख देतो, त्याची चुक. ही सुक्ष्म गोष्ट समजली तर खुलासा होईल, व माणसांचे सर्व समाधान होईल. उपकारी, कर्मापासून मुक्त करविणारा हे तर तिच्या (सूनेचा) मनात बसलेले कि माझी सासू मला त्रास देते. असे ती रात्रं-दिवस लक्षात ठेवेल का ती विसरुन जाईल ? प्रश्नकर्ता : लक्षात ठेवेल. दादाश्री : रात्रं-दिवस लक्षात ठेवेल. नंतर शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होईल. मग दुसऱ्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार होणार नाही. त्यामुळे तिला काय समजावतो कि, बाकीच्यांना का चांगली सासू मिळाली? आणि तुला का चांगली सासू नाही मिळाली? तुला का अशी मिळाली? हा मागच्या जन्मीचा तुझा हिशोब आहे. तो पूर्ण कर. तो कशा रितीने पूर्ण करायचा ते दाखविले, तर ती सुखी होईल. कारण कि दोषित तिची सासू नाही, ‘भोगतो त्याची चुक' आहे म्हणजे समोरच्या व्यक्तिचा दोष उडून जातो. कोणाचा दोष नाही. दोष काढणाऱ्याचा दोष आहे. जगात दोषी कुणीच नाही. सगळे जण आपआपल्या कर्माच्या उदयाने आहेत. जे सर्व भोगत आहेत, तो आज गुन्हा करत नाही. मागच्या जन्मीच्या कर्माच्या फलस्वरूपात होत आहे सर्व. आज तर त्याला पश्चाताप होत असेल, परंतु Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ १६ भोगतो त्याची चूक पूर्वी (मागच्या जन्मात) कोन्ट्रेक्ट (करार) झालेला आहे तर आता काय करु शकतो? तो पूर्ण केल्यावरच सुटका आहे. ह्या जगात जर तुम्हाला कधी कोणाची चुक शोधून काढायची असेल तर जो भोगतो त्याची चुक आहे. सून सासूला दुःख देते किंवा सासू सूनेला दुःख देत आहे, ह्यात कोणाला भोगावे लागते? सासूला. तर सासूची चुक आहे. सासू सूनेला दुःख देत असेल, तर सूनेने एवढे समजायला हवे कि ह्यात माझीच चुक आहे. हे दादाजींच्या ज्ञानाच्या आधाराने समजायला हवे कि, चुक असेल, म्हणूनच ती शिव्या देते. अर्थात् सासूचा दोष काढायला जावू नये. त्या सासूचा दोष काढल्याने गुंता वाढतो. कॉम्प्लेक्स (गुंतागुंती) होत असते आणि सासूला सून त्रास देत असेल तर सासूने दादाजींच्या ज्ञानाने समजायला हवे कि भोगतो त्याची चुक. ह्या हिशोबाने मलाच निभावून घ्यायला हवे. सासू सूनेशी भांडली असेल तरीसुद्धा सून सुखात असते आणि सासूलाच भोगावे लागते तेव्हा चुक सासूचीच! आपण जावेला सतावले आणि आपल्याला भोगावे लागले तर आपलीच चुक. आणि असे काही केले नसेल तरी ती भांडायला आली तर ते मागच्या जन्मीचे काही बाकी असेल, ते परत फेडण्यात आले. तेव्हा तुम्ही पुनः चुक करू नका, नाहीतर पुनः भोगावे लागेल! अर्थात् सुटका करून घ्यायची असेल तर जे जे काही कडूगोड येईल (शिव्या वगैरे) ते जमा करून टाका, म्हणजे तुमचा हिशोब पूर्ण होईल. ह्या जगात हिशोबा शिवाय दृष्टिला दृष्टि ही मिळत नाही! तर काय बाकी सगळे हिशोबा शिवाय होणार का? तुम्ही जेवढे-जेवढे ज्याला-ज्याला दिले असेल तेवढे-तेवढे ते तुम्हाला परत देतील. तेव्हा तुम्ही खुश होवून जमा करून टाका. आणि म्हणा बरं झालं! आता वहीखाता पूर्ण होईल! आणि जर चुक कराल तर परत भोगावे लागेलच! आपण 'भोगतो त्याची चुक' हे सूत्र प्रकाशित केले आहे. लोकांनां खूप आश्चर्य वाटते कि, खरे संशोधन केले आहे हे. Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक १७ गीयरमध्ये बोट, कोणाची चुक जो कडू भोगतो तोच कर्ता. कर्ता तोच विकल्प, एखादी मशिनरी असले ती आपण स्वतः जरी तयार केली असेल आणि त्यात गीयर व्हील असेल, त्यात आपले स्वतःचे बोट आले तर त्या मशीनीला तुम्ही लाख वेळा म्हणा कि भाऊ माझे बोट आहे, मी स्वतः तुला तयार केले आहेना ! तर ते गीयर व्हील बोट सोडून देईल का? नाही सोडणार ते तर तुम्हाला समजावून देणार कि भाऊ, ह्यात माझा काय दोष? तू भोगले म्हणून तुझी चुक. अश्याच साऱ्या मशिनरी बाहेर पण चालत असतात. ही सर्व लोकं गीयर च आहे, गीयर नसते तर संपूर्ण मुंबई शहरात कोणतीही पत्नी आपल्या पतिला दुःख देणार नाही आणि कोणताही पति आपल्या पत्नीला दुःख देणार नाही. स्वत:च्या घराला सर्व जण सुखात च ठेवणार, पण असे नाही. ही मुले - बाळे, पति - पत्नी सर्वच मशिनरी च आहेत, गीयर मात्र आहे. डोंगराला उलट दगड माराल का? प्रश्नकर्ता : कोणी तुम्हाला दगड मारला आणि लागला तर त्यामुळे आपल्याला इजा होते आणि खूप उद्वेग होतो. दादाश्री : इजा होते म्हणून उद्वेग होतो, नाही का? आणि डोंगरावरुन दगड गडगडत डोक्यावर पडला आणि रक्त निघाले तर? प्रश्नकर्ता : अशा परिस्थितीत, कर्माच्या आधीन ते आपल्याला लागणार होते म्हणून लागला, असे समजतो. दादाश्री : मग त्या डोंगराला शिव्या द्यायला नको का? त्याच्यावर रागावणार नाही का त्या क्षणाला? प्रश्नकर्ता : त्यात राग येण्याचे कारण राहत नाही, कारण कि समोर कोणी केले, त्याला आपण ओळखत नाही. दादाश्री : का, तेथे शहाणपणा सुचतो? ! सहजच शहाणपण येते कि Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ १८ भोगतो त्याची चुक नाही येत ! असे हे सारे डोंगरच आहेत. हे नेहमीच दगड फेकत असतात. शिव्या देत असतात. चोरी करत असतात हे सर्व डोंगरच आहेत. चेतन नाहीत. असे हे जर समजले तर काम होणार. गुन्हेगार दिसतो, ते तुमचे क्रोध-मान-माया-लोभ, हे जे आतले शत्रू आहेत ते दाखवतात. 'स्व'च्या दृष्टि (शुद्धात्मा दृष्टि)ने गुन्हेगार दिसत नाही, क्रोध-मान-माया-लोभ दाखवत असतात. ज्याला क्रोध-मान-मायालोभ नाही, त्याला कोणी गुन्हेगार दाखविणारा नसतोच ना! आणि त्याला कोणी गुन्हेगार दिसत पण नाही. वास्तवात पहाता गुन्हेगारा सारखा कोणीच नाही. हे तर क्रोध-मान-माया-लोभ घुसले आहेत आणि ते 'मी चंदुभाई आहे' असे मानल्याने ठाण मांडून आहेत. 'मी चंदुभाई आहे' (वाचकांनी येथे स्वतःचे नांव समजायचे) ही मान्यता सुटली म्हणजेच क्रोध-मान-माया-लोभ जात राहतिल. तरी पण घर रिकामे करायला त्यांना थोडा वेळ लागेल, कारण बऱ्याच दिवसापासून ठाण मांडून आहे ना! ही तर संस्कारी पद्धत प्रश्नकर्ता : एक तर तो स्वतः दुःख भोगत आहे, आता तो तर स्वत:च्या चुकीमुळे दुःख भोगत आहे. तेथे इतर लोक दीड शहाणे होऊन येतात. अरे, काय झाले, काय झाले? तर ह्यात त्यांचा काय संबंध आहे? तो त्याच्या चुकीमुळे भोगत आहे. तुम्हाला त्याचे दुःख घेता येणार नाही. दादाश्री : असे आहे कि, जे विचारपूस करायला येतात, बघायला येतात ना ते फार उच्च संस्काराच्या नियमांच्या आधाराने येतात. विचारपूस करायची म्हणजे काय तर तेथे जाऊन त्या माणसाला विचारतात, कसे आहात भाऊ? आता तुम्हाला कसे वाटते? तेव्हा तो म्हणतो, 'चांगले आहे आता' त्याच्या मनात असे विचार येतात की ओहोहो.... माझी एवढी मोठी वेल्यू (किंमत) ! कितीतरी लोक मला बघायला येतात. त्यामुळे तो आपले दु:ख विसरुन जातो. Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक १९ गुणाकार भागाकार एकंदर ही बेरीज वजाबाकी, हे दोन्ही नेचरल एडजेस्टमेन्ट आहेत. आणि गुणाकार भागाकार हा माणूस बुद्धिने करीत असतो. म्हणजे रात्री झोपल्यानंतर मनात विचार करतो कि हे सर्व प्लॉट महाग पडणार आहे. म्हणून अमूक ठिकाणी स्वस्त आहेत ते घेऊ या, आपण तो गुणाकार करतो मनात. म्हणजे सुखाचा गुणाकार करतो, आणि दु:खाचा भागाकार करतो. तो सुखाचा गुणाकार करतो म्हणून पुन्हा त्याला भयंकर दुःख प्राप्त होते. आणि दुःखाचा भागाकार करतो तरी पण दुःख कमी होत नाही ! सुखाचा गुणाकार करणार कि नाही? असे होईल तर चांगले, असे असेल तर उत्तम ! करतो कि नाही करत?! आणि ही बेरीज वजाबाकी होत आहे, ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. जसे कि दोनशे रुपये हरवले गेले किंवा व्यापारात पाच हजाराचे नुकसान झाले, ही नेचरल एडजेस्टमेन्ट आहे कोणी आपला खिसा कापून दोन हजार रुपये घेऊन गेला ती पण नेचरल एडजेस्टमेन्ट आहे ! जो भोगतो त्याची चुक हे गॅरंटीने आम्ही ज्ञानदृष्टिने पाहून आम्ही गॅरंटीने सांगतो. प्रश्नकर्ता : असे म्हणतात कि सुखाचे गुणाकार करतात ह्यात चुकीचे काय? दादाश्री : गुणाकार करायचे असतील तर दुःखाचे करा. सुखाचे कराल तर खूप मोठ्या संकटात याल. गुणाकार करण्याची आवड असेल तर दु:खाचा करा. मी जर एका माणसाला थप्पड मारली तर त्याने मला दोन थप्पड मारल्या तर ते चांगले झाले, असेच दुसरा कोणी मारणारा भेटला तर चांगले. ह्या समजने आपले ज्ञान वाढत जाते. पण जर दुःखाचा गुणाकार नाही जमला तर बंद करून ठेवा. परंतु सुखाचा गुणाकार मात्र करूच नका. झाले परमेश्वराचे गुन्हेगार ‘भोगतो त्याची चुक' ही परमेश्वराची भाषा ! आणि येथे तर जो चोरी Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ २० भोगतो त्याची चुक करून गेला, त्याला लोक गुन्हेगार समजतील, कोर्ट देखील चोरी करतो त्यालाच गुन्हेगार समजते. __म्हणून हे बाहेरच्या गुन्ह्यांना थांबविण्यासाठी लोकांनी आतले गुन्हे चालू केले. जेणे करुन ते परमेश्वराचे गुन्हेगार ठरतील, असे गुन्हे चालू केले. अरे वेड्या, परमेश्वराचा गुन्हेगार होऊ नको. इथे गुन्हे झाले तर काही हरकत नाही. दोन महिने जेलमध्ये राहून परत येता येईल. परंतु परमेश्वराचा गुन्हेगार तू होऊ नको, आपल्याला समजले हे? ही तर सूक्ष्म गोष्ट आहे, जर ही गोष्ट समजलात तर काम होऊन जाईल. 'भोगतो त्याची चुक', हे पुष्कळ माणसांना आता समजले आहे. कारण हे सर्वजण काही असे तसे आहेत का? खूप विचारशील लोक आहेत. आपण त्यांना एकदा समजावून सांगितले आहे. आता सासूला सून दुःख दे दे करीत असेल आणि जर सासूनी एकदा हे सूत्र ऐकले असेल कि 'भोगतो त्याची चुक'. त्यामुळे सून तिला जेव्हा जेव्हा दुःख देत असेल तेव्हा ती लागलीच समजून जाईल कि ही माझी चुक असणार म्हणूनच ती दुःख देते ना? तर त्याचे निराकरण होईल. नाही तर योग्य निराकरण होणार नाही आणि वैर वाढत जाईल. समजणे अवघड तरी वास्तविकता दुसऱ्या कोणाची चुक नाही. जी काही चुक आहे ती चुक आपलीच आहे. आपल्या चुकीमुळे हे सारे ऊभे राहिले. ह्याचा आधार काय? तेव्हा म्हणात 'आपलीच चुक.' प्रश्नकर्ता : उशीरा उशीरा का होईना पण लक्षात येत आहे. दादाश्री : उशीरा समजते ना हे खूप चांगले. एका बाजूने गात्र (शरीर) शिथिल होत जातात, आणि एका बाजूने हे समजायला लागते. असे काम होते! आणि जेव्हा गात्र मजबूत असतील, त्या घटकेला समजले असते तर? आम्ही 'भोगतो त्याची चुक' असे सांगितले आहे ना? ते सर्व शास्त्रांचा सार दिला आहे. तुम्ही मुंबईला गेलात तर हजारो घरांत मोठ्या Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक अक्षरात 'भोगतो त्याची चुक' लिहिलेले असते. म्हणजे हातातून पेला पडतो त्यावेळेला मुलं समोरासमोर बघून म्हणता. 'अग आई, तुझीच चुक आहे', मुलं पण समजून जातात! बरं का! मुलगा आईला म्हणतो, 'तुझा चहेरा उतरलेला आहे. ती 'तुझी चुक आहे.' कढी खारट झाली म्हणजे आपण समजून घ्यायचे कि कोणाचे तोंड बिघडले? हो, त्याची चुक आहे. वरण सांडले तर पहायचे कोणाचे तोंड बिघडले? तर ती त्याची चुक आहे. भाजी तिखट झाली कि आपण सर्वांच्या तोंडा कडे बघावे, कोणाचा चेहरा बिघडलेला आहे? तर त्याचीच चुक आहे ती. ही चुक कोणाची? 'भोगतो त्याची चुक' समोरच्या व्यक्तिचे तोंड तुम्हाला रुसलेले दिसले तर त्यात तुमची चुक. तेव्हा त्याच्या 'शुद्धात्म्याला' उद्देशून त्याच्या नांवाची माफी माग माग करत राहिल्याने ऋणानुबंधातून सुटतो. पत्नीने तुमच्या डोळ्यात औषध टाकले आणि तुमचे डोळे दुःखले, तर ती तुमची चुक. जो सहन करेल त्याची चुक. असे 'वीतराग भगवान' म्हणतात आणि हे लोक निमित्ताला चावा घेतात. स्वत:च्या चुकीनेच मार खातात. दगड मारला त्याची चुक नाही, पण ज्याला लागले त्याची चुक. तुमच्या आजूबाजूची मुले वाटेल तशा चूका किंवा दुष्कृत्य करत असतील पण त्याचा परिणाम तुमच्या वर होत नसेल तर ती तुमची चुक नाही. परंतु जर तुमच्यावर परिणाम झाला तर ती तुमची चुक आहे हे नक्की च समजून घ्यावे! जमा-उधारीची नवीन रीत चंदुभाई आणि लक्ष्मीचंद ही दोन माणसे एकत्र आली आणि चंदुभाईने लक्ष्मीचंदवर आरोप केला कि, तुम्ही माझ्याशी वाईट वागलात. तर लक्ष्मीचंदला रात्री झोप येणार नाही, आणि चंदुभाई रात्री आरामात झोपला असेल. म्हणजे चुक लक्ष्मीचंदची. परंतु दादांचे वाक्य भोगतो त्याची चुक' Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ २२ भोगतो त्याची चुक हे लक्षात आले तर लक्ष्मीचंद आरामात झोपून जाईल, नाहीतर तो त्याला कितीतरी शिव्या देत राहील! आपण एकदा सुलेमानला पैसे उधार दिले असतील आणि मग सहा महिन्यापर्यंत सुलेमान पैसे परत करत नाही तर? अरे पैसे दिले कोणी? तुझ्या अहंकाराने. त्याने (तुझ्याच अहंकाराला) पोषण दिले, म्हणून तू दयाळू होऊन पैसे दिले, तर मांडवली कर आता. सुलेमानच्या खाती जमा कर आणि अहंकारच्या खात्यात उधार ठेव. असे पृथक्करण तर करा ज्याचा जास्त दोष तोच ह्या जगात मार खातो. मार कोण खातो? ते पाहून घ्यावे. जो मार खातो, तोच दोषी आहे. भोगतो ह्यावरुन हिशोब निघतो कि, त्याची किती चुक होती. घरात दहा माणसे असतील, त्यातील दोघांना घर कसे चालत असेल ह्याबद्दल जरा ही कल्पना येत नाही, दोघांना घरात मदद करावी असा विचार येतो. आणि दोघे जण मदत करतात आणि एक तर दिवसभर घर कशा रितीने चालवावे त्याच्याच चिंतेत राहत असतो. आणि दोघे जण आरामात झोपले असतील. तर चुक कोणाची? वेड्या भोगतो त्याचीच, ना! चिंता करतो त्याचीच ना? जो आरामात झोपतो, त्याला काहीच नाही. चुक कोणाची आहे? तेव्हा म्हणे कि कोण भोगत आहे, ह्याचा तपास करा. नोकराच्या हाताने दहा ग्लास फूटून गेले तर त्याचा परिणाम घरातील माणसांच्यावर होणार का नाही होणार? आता घरातील माणसात मुले असतात, त्यानां तर ते भोगण्याचे होत नसते, पण त्यांचे आई-वडील चीडचीड करतात त्यात त्याची आई थोड्यावेळानंतर झोपून जाते, परंतु त्याचे वडील हिशोब करीत राहतात. दहा गुणीले पन्नास, एवढे रुपये होतात! तो एलर्ट (जागृत), म्हणून त्याला जास्त भोगावे लागते त्यावरुन भोगतो त्याची चुक.' चूकांना आपल्याला शोधायला जायची आवश्यकयता नाही. मोठा Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ २३ भोगतो त्याची चुक न्यायाधीशांना आणि वकीलांना पण शोधायला जायची गरज नाही. त्यापेक्षा हे सूत्र दिले, हे थर्मोमीटर कि भोगतो त्याची चुक'. तो जर एवढे पृथक्करण करीत करीत पुढे गेला तर तो सरळ मोक्षाला जाईल. चुक, डॉक्टरची कि रोग्याची? डॉक्टरांनी रोग्याला इंजेक्शन दिले नंतर डॉक्टर घरी जाऊन आरामात झोपून गेला, आणि त्याला तर इंजेक्शन संपूर्ण रात्र भर दुःखत होते, ह्यात चुक कोणाची? रोग्याची! आणि डॉक्टर तर त्याचे भोग भोगेल तेव्हा त्याची चुक पकडली जाईल. लहान मुलीसाठी डॉक्टरांना घरी बोलविले आणि डॉक्टरांनी येऊन पाहिले कि तिची नाडी चालत नाही. तेव्हा डॉक्टर काय म्हणतो? मला कशासाठी बोलावले? अरे जेव्हा तुम्ही हात लावला त्याच वेळेला ती गेली. नाहीतर नाडी तर चालत होती. पण मग डॉक्टर व्हिजीट फीचे शंभर रुपये घेऊन जातो. आणि वरुन रागवतो ! अरे! रागावायचे असेल तर पैसे घेऊ नको आणि जर पैसे घेत आहेस तर रागवू नको. पण नाही, फी तर घ्यायचीच ना? तर पैसे द्यावे लागतात. असे जग आहे. म्हणून न्याय शोधू नका ह्या काळात ! प्रश्नकर्ता : असे पण घडते कि माझ्याकडून औषध घ्यायचे आणि मलाच वरुन रागवायचे. दादाश्री : हो असे घडते, तरी समोरच्या व्यक्तिला गुन्हेगार समजाल, तर तुम्ही गुन्हेगार व्हाल. अशाप्रकारे निसर्ग न्यायच करीत आहे. ऑपरेशन करतांना पेशन्ट मरुन गेला तर चुक कोणाची?! चिकट मातीत बूट घालून फिरलात आणि पडलात, तर दोष कोणाचा? वेड्या तुझाच! एवढे समजत नाही का उघड्या पायाने फिरलात तर बोटं मातीत रुतणार आणि पडणार नाही! ह्यात दोष कोणाचा? मातीचा, बूटाचा का तुझा? भोगतो त्याची चुक. एवढे जर पूर्णपणे समजलात तर तुम्ही Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ २४ भोगतो त्याची चुक मोक्षाला जाणार. जे दुसऱ्यांची चुक पहातात ते साफ खोटे आहे. आपल्या चुकीमुळे निमित्त मिळते. पण हे जीवित निमित्त मिळाले तर त्याला वचका भरतो. पण मग काटा लागला तर काय करणार? चार रस्त्यावर काटे पडलेले आहेत आणि हजारो माणसे तेथून जातात, पण कोणालाही काटा टोचत नाही, परंतु चंदु तेथून गेला आणि काटा वाकडा असेल तर तो त्याच्या पायात घुसेल. व्यवस्थित शक्ति तर कशी आहे? काटा लागायचा असेल त्यालाच लागेल. त्यासाठी सर्व संयोग एकत्र करतो, परंतु ह्यात निमित्ताचा काय दोष? जर एखादा माणसाने औषध फवारल्यावर खोकला येत असेल तर त्यां साठी भांडण-तंटा होईल, परंतु जेव्हा मिरच्याची फोडणी उडते आणि खोकला येतो तर कोणी तक्रार करतो का? हे तर जो पकडला जातो त्याच्या वर चिडायचे. जर हकीकत समजून घेण्याचा प्रयत्न केला कि, करणार कोण आहे? आणि कशामुळे होते? तर मग राहिल का भानगड? बाण मारणाऱ्याची चुक नाही. बाण लागला कोणाला? त्याची चुक आहे. बाण मारणारा जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याची चुक. आता तर बाण ज्याला लागला तो पकडला गेला आहे, तो पहिला गुन्हेगार आहे. दूसरा तर जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा त्याची चुक. मुलांच्याच चूका काढतात सारे? तुम्हाला शिकता शिकता काही अडचणी आल्या का? प्रश्नकर्ता : अडचणी तर आल्या होत्या. दादाश्री : त्या तुमच्याच चुकीमुळे, ह्यात मास्तराची कि इतर कोणाची चुक नव्हती. प्रश्नकर्ता : ही मुले शिक्षकां समोर वादविवाद करतात, ते कधी सुधारणार? दादाश्री : जो भुलचे परिणाम भोगतो त्याची चुक. हे गुरूजीच असे Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ २५ भोगतो त्याची चुक आहेत. म्हणून विद्यार्थी विरुद्ध होतात. मुले तर चांगलीच आहेत पण शिक्षक आणि आई-वडील तर पक्के घनचक्कर आहेत. आणि वडीलमाणसं तर जुनेच धरुन बसतात. मग मुले त्यांचा विरोध करणार च ना? सध्या आईवडीलांचे चारित्र्य असे नसते कि, मुले त्याच्या विरूद्ध होणार नाही. ह्यात वडीलमाणसांचे चारित्र्य कमी झाले आहे. आणि म्हणूनच त्यांची मुले त्यांच्या विरोध करतात. चुकी बद्दल दादांची शिकवण ‘भोगतो त्याची चुक' हा सिद्धांत मोक्षाला घेऊन जाईल. कोणी विचारले कि, मला माझ्या चूका कशा ओळखाव्यात? तेव्हा आम्ही त्याला शिकवतो कि तुला जिथे जिथे दुःख भोगावे लागत आहे, ही तुझी चुक. तुझी काय चुक झाली असेल, ते असे भोगायची वेळ आली ते शोधून काढ. असे तर संपूर्ण दिवसभर भोगावे लागते, तर शोधून काढायला हवे कि कोण-कोणत्या चूका झाल्या आहेत. भोगत असतांनाच लक्षात येते कि, ह्या चूका आपल्या. जर कधी आमची चुक झाली तर आम्हाला टेन्शन होते ना! आम्हाला समोरच्याची चुक कशाप्रकारे समजणार? समोरच्याचे 'होम' (शुद्धात्मा) आणि 'फॉरिन' (पुद्गल-प्रकृति) वेगळे दिसतात. समोरच्याचे फॉरिनमध्ये चूका झाल्या, गुन्हे झाले तर आम्ही काहीच बोलणार नाही, परंतु होममध्ये जर काही झाले तर आम्हाला त्याला जागृत करावे लागेल, मोक्षाला जातांना कसली अडचण यायला नको. आत खूप वस्ती आहे. त्यात कोण भोगतो त्याची जाणीव होते. कधी अहंकार भोगत असतो, तर ती अहंकाराची चुक आहे. कधी मन भोगते, तर ती मनाची चुक आहे. कित्येकदा चित्त भोगते तेव्हा चित्ताची चुक आहे. हे तर स्वत:च्या चूकां मधून 'स्वतः' वेगळे राहू शकतो असे आहे. गोष्ट समजून घ्यावी लागेल ना? Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ २६ भोगतो त्याची चुक मूळ चुक कुठे आहे? चुक कोणाची? जो भोगतो त्याची ! चुक कोणती? तेव्हा म्हणतो कि 'मी चंदुभाई आहे' ही मान्यता च तुमची चुक आहे कारण कि, ह्या जगात दोषी कुणीच नाही. म्हणजे कोणी गुन्हेगार ही नाही, असे सिद्ध होते. बाकी ह्या जगात कोणी काही करू शकेल असे नाही. पण जे हिशोब होऊन गेले आहे, ते सोडणार नाहीत. जे घोटाळ्याचे हिशोब झाले आहेत, ते घोटाळ्यावाले फळ दिल्या शिवाय राहणार नाहीत. परंतु आता नव्याने घोटाळे करू नका, आता थांबून जा. जेव्हापासून तुम्हाला हे लक्षात आले, तेव्हापासूनच थांबून जा. जूने घोटाळे तर होऊन गेले, ते तर आपल्याला फेडावे लागतीलच परंतु आता नवीन होणार नाही ते पहायचे आहे. जबाबदारी संपूर्ण आपलीच आहे ! परमेश्वराची जबाबदारी नाही. परमेश्वर ह्यात हात घालणार नाही. म्हणून परमेश्वर पण त्याला माफ करू शकणार नाही. कित्येक भक्त असे म्हणतात कि, 'मी पाप करीत आहे आणि परमेश्वर मला माफ करेल का?' परमेश्वराजवळ त्याला माफी नाही, दुसऱ्या लोकाकडे. दयाळू लोकांकडे, त्याला माफी असते च. दयाळू व्यक्तिला सांगितले कि, 'साहेब, मी तर तुमची फार मोठी चुक केली', तर लागली ते माफ करतात. दुःख देत आहे तो मात्र निमित्त आहे. परंतु मूळात चुक स्वतःचीच आहे. फायदा करतात तो ही निमित्त आहे. आणि जो नुकसान करवतो, तो पण निमित्तच असतो. पण हा सगळा आपलाच हिशोब आहे, म्हणून हे सारे असे होते. आम्ही तुम्हाला मोकळेपणानी सांगतो कि तुमच्या बाउन्ड्रीत ( हद्दीत ) कोणालाही ही बोट घालण्या इतकी शक्ति नाही आणि जर तुमची चुक असेल तर, कुणी पण बोट घालू शकेल. अरे, काठी सुद्धा मारेन. 'आम्ही' तर ओळखून गेलो कि कोण गुद्दा मारीत आहे. सारे तुमचे आणि तुमचेच आहे! तुमचा व्यवहार कुणी खराब केला नाही. तुमचा व्यवहार तुम्हीच खराब Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ २७ भोगतो त्याची चुक केला आहे. यू आर हॉल एन्ड सॉल रिस्पोन्सिबल फॉर यॉर व्यवहार (तुमच्या व्यवहारासाठी संपूर्णतः तुम्हीच जबाबदार आहात). न्यायधीश आहे, कॉम्प्युटरसारखा ‘भोगतो त्याची चुक' हे गुप्त तत्त्व म्हटले जाते. इथे बुद्धि थकून जाईल. जिथे मतिज्ञान काम करणार नाही ती गोष्ट 'ज्ञानी पुरुषां जवळ' उघड होते, 'जशी आहे तशी.' हे गुप्ततत्त्व फार सूक्ष्म रितीने समजून घ्यायला हवे. न्याय करणारा चेतन असेल तर, तो पक्षापक्ष पण करेल! परंतु जगाचा न्याय करणारा 'निश्चेतन चेतन' आहे. त्याला जगाच्या भाषेत समजायचे असेल तर 'कॉम्प्युटर' सारखे आहे. ह्या कॉम्प्युटरमध्ये प्रश्न टाकला तर कॉम्प्युटरची चुक पण होऊ शकते. परंतु जगाच्या न्यायात चुक कधीच होत नाही. ह्या जगाचा न्याय करणारा 'निश्चेतन चेतन' आहे, आणि वीतराग पण आहे! 'ज्ञानी पुरुष'चा एकच शब्द समजला आणि पकडून ठेवला तर मोक्षालाच जाईल. कोणाचा शब्द? ज्ञानी पुरुषांचा! त्याने कोणालाही कोणाचाही सल्ला घ्यावा लागत नाही कि ह्यात कोणाची चुक? 'भोगतो त्याची चुक'. हे विज्ञान आहे. संपूर्ण विज्ञान आहे. ह्यात तर एक अक्षर ही चुकीचे नाही. विज्ञान म्हणजे केवळ विज्ञानच आहे हे तर, संपूर्ण जगासाठी आहे. हे काही भारतीय लोकांच्यासाठीच आहे असे नाही. परदेशात सुद्धा, सगळ्यांसाठी आहे! जेथे असा अगदी निर्मळ स्वच्छ न्याय, तुम्हाला दाखवतो मग न्यायान्यायची अशी विभागणी करण्याचे कुठे राहते? ही खूप खोल वरची गोष्ट आहे. सर्व शास्त्रांचा सार मी तुम्हाला सांगतो कि, हे तर तेथील जजमेन्ट (न्याय) कशाप्रकारे चालतो, ते अगदी एक्झेक्ट सांगतो कि 'भोगतो त्याची चुक.' 'भोगतो त्याची चुक' हे वाक्य अगदीच एक्झेक्ट निघाले आहे, आमच्याकडून. ह्याचा जो वापर करेल त्याचे कल्याण होवून जाणार. जय सच्चिदानंद Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ प्राप्तिस्थान दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर संकुल, सीमंधर सिटी, अहमदाबाद- कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबाद : दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9274111393_ भुज : त्रिमंदिर, हिल गार्डन के पीछे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन के सामने, गोधरा (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामा की पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन के सामने, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 : 9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 033-32933885 चेन्नई :9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल :9425024405 इन्दौर : 9893545351 जबलपुर : 9425160428 : 9329523737 भिलाई :9827481336 पटना : 9431015601 अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786 पूना : 9422660497 जलंधर : 9814063043 U.S.A.: Dada Bhagwan Vignan Institute : 100, SW Redbud Lane, Topeka, Kansas 66606 Tel. : +1877-505-DADA (3232), Email : info@us.dadabhagwan.org U.K. : +44 330 111 DADA (3232) UAE : +971 557316937 Kenya : +254 722 722 063 Singapore : +65 81129229 Australia : +61 421127947 _New Zealand: +64 21 0376434 Website : www.dadabhagwan.org मंबई रायपुर बेंगलूर Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ भोगतो त्याची चुक 'हा खिसा कापला, त्यात चूक कोणाची? ह्याचा खिसा कापला गेला नाही आणि तुझाच का कापला गेला? तुमच्या दोघात सध्या कोण भोगत आहे?"भोगतो त्याची चूक.' 'भोगतो त्याची चूक' हा सिद्धांत मोक्षाला घेवून जाईल. जर कोणी विचारले की मी माझ्या चूका कशा ओळखू? तेव्हा आम्ही त्याला शिकवतो की, 'तुला जिथे जिथे दुख भोगावे लागत आहे, तिथे तुझीच चुक. तुझी अशी काय चूक झाली असेल, की असे भोगायची वेळ आली, ते तु शोधून काढ.' हे तर दिवसभर भोगावे लागत आहे. म्हणून शोधून काढायला हवे की काय काय चूका झाल्या आहेत. आपण आपल्या चूकांमुळे बांधले गेलो आहोत, लोकांनी आपल्याला बांधलेलेच नाही. चुक सुधारली की मुक्त! - दादाश्री ISBN 978-81-99933241 9788189-933241 Printed in India dadabhagwan.org Price Rs10