________________
भोगतो त्याची चुक
प्रश्नकर्ता : काळाचा दोष खरा ना?
दादाश्री : काळाचा दोष कसला? 'भोगेल त्याची चुक' काळ तर बदलतच राहणार ना? चांगल्या काळात आपण नव्हतो का? चोवीस तीर्थंकर होते, तेव्हा आपण नव्हतो का?
प्रश्नकर्ता : होतो.
दादाश्री : तर त्यावेळी आपण चटणी खाण्यात (विषयविकारा मध्ये) मग्न झालो. त्याच्यात काळ काय करणार बिचारा? काळ तर आपोआप येतच राहणार ना! दिवसा काम नाही केले तर रात्र तर येवून ऊभी रहाते कि नाही रहात?
प्रश्नकर्ता : राहते.
दादाश्री : मग रात्री दोन वाजता कोणाला चणे आणायला पाठविले, दुप्पट भाव दिला तरी कोणी देईल का?
लोकांना वाटते, हा उलटा न्याय आता एक साईकलवाला जात आहे, तो बरोबर डाव्या बाजूने जात आहे आणि एक स्कूटरवाला विरुद्ध दिशेने आला. चुकीच्या बाजूने आला आणि त्याचा पाय मोडून टाकला. आता भोग कोणाला भोगायला लागले?
प्रश्नकर्ता : साईकलवाल्याला, ज्याचा पाय तूटला त्याला.
दादाश्री : हो, ह्या दोघात कोणाला भोगणे आले आज. त्याने म्हटले, ज्याचा पाय मोडला त्याला. त्याला आज मागचा हिशोब मिळाला, ह्या स्कूटरवाल्याच्या निमित्ताने. त्या स्कूटरवाल्याला आता काहीच भोग नाही. तो तर जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याचा गुन्हा सिद्ध होईल. पण आज जो 'भोगतो त्याची चुक.'
प्रश्नकर्ता : ज्याला लागले त्याचा काय गुन्हा?