________________
भोगतो त्याची चुक
१२
आहे, आणि पहाणाऱ्यानी मी त्याला मदत करू शकत नाही, मी (त्याला) मदत करायला हवी, ह्या पद्धतिने पहायचे.
ह्या जगाचा नियम असा आहे कि जे डोळ्याने पाहिले, त्याला चुक म्हणतात आणि निसर्गाचा नियम असा आहे कि, जो भोगतो आहे, त्याची चुक आहे.
परिणाम येईल तिथे, ज्ञान का बुद्धि ?
प्रश्नकर्ता : वर्तमानपत्रात वाचले कि, औरंगाबादला असे झाले, मोरबीला असे झाले तर त्याचा आपल्यावर जो परिणाम होतो, ते आता (आत्मज्ञान प्राप्तीनंतर) वाचले तर काहीच परिणाम झाला नाही, तर त्याला काय जडता म्हणतात?
दादाश्री : परिणाम होत नाही, त्यालाच ज्ञान म्हणतात. प्रश्नकर्ता : आणि परिणाम होतो त्याला काय म्हणतात ?
दादाश्री : त्याला बुद्धि म्हणतात. म्हणजेच संसार म्हणतात. बुद्धिने मनुष्य इमोशनल ( भावूक) होणार. पण कार्यसिद्धि काहीच होणार नाही.
येथे (लढाईच्या वेळी) पाकीस्तानातून बाँब टाकण्यासाठी सगळे येत होते, ते आपले लोक ते पेपरात वाचतात कि त्या तेथे बॉंब पडला, तर ईथे भिती वाटायला लागते. हे सारे जे परिणाम करणारे आहे, ती त्यांची बुद्धि आहे. आणि ही बुद्धिच हा संसार ऊभा करीत आहे. ज्ञान परिणाम मुक्त ठेवते, पेपर वाचला, तरी परिणाम मुक्त राहिल. परिणाम मुक्त म्हणजे आपल्याला काही स्पर्शत नाही. आपल्याला तर फक्त जाणायचे व पहायचे च आहे (ज्ञाता-द्रष्टा रहायचे आहे).
ह्या वर्तमानपत्राचे काय करायचे? जाणायचे आणि पहायचे बस ! म्हणजे पूर्ण सविस्तर लिहले असेल त्याला जाणणे म्हणतात, आणि सविस्तर नसेल तेव्हा त्याला पाहिले म्हणतात, ह्यात कोणाचाच दोष नाही.