________________
२०
भोगतो त्याची चुक करून गेला, त्याला लोक गुन्हेगार समजतील, कोर्ट देखील चोरी करतो त्यालाच गुन्हेगार समजते.
__म्हणून हे बाहेरच्या गुन्ह्यांना थांबविण्यासाठी लोकांनी आतले गुन्हे चालू केले. जेणे करुन ते परमेश्वराचे गुन्हेगार ठरतील, असे गुन्हे चालू केले. अरे वेड्या, परमेश्वराचा गुन्हेगार होऊ नको. इथे गुन्हे झाले तर काही हरकत नाही. दोन महिने जेलमध्ये राहून परत येता येईल. परंतु परमेश्वराचा गुन्हेगार तू होऊ नको, आपल्याला समजले हे? ही तर सूक्ष्म गोष्ट आहे, जर ही गोष्ट समजलात तर काम होऊन जाईल. 'भोगतो त्याची चुक', हे पुष्कळ माणसांना आता समजले आहे. कारण हे सर्वजण काही असे तसे आहेत का? खूप विचारशील लोक आहेत. आपण त्यांना एकदा समजावून सांगितले आहे. आता सासूला सून दुःख दे दे करीत असेल आणि जर सासूनी एकदा हे सूत्र ऐकले असेल कि 'भोगतो त्याची चुक'. त्यामुळे सून तिला जेव्हा जेव्हा दुःख देत असेल तेव्हा ती लागलीच समजून जाईल कि ही माझी चुक असणार म्हणूनच ती दुःख देते ना? तर त्याचे निराकरण होईल. नाही तर योग्य निराकरण होणार नाही आणि वैर वाढत जाईल.
समजणे अवघड तरी वास्तविकता दुसऱ्या कोणाची चुक नाही. जी काही चुक आहे ती चुक आपलीच आहे. आपल्या चुकीमुळे हे सारे ऊभे राहिले. ह्याचा आधार काय? तेव्हा म्हणात 'आपलीच चुक.'
प्रश्नकर्ता : उशीरा उशीरा का होईना पण लक्षात येत आहे.
दादाश्री : उशीरा समजते ना हे खूप चांगले. एका बाजूने गात्र (शरीर) शिथिल होत जातात, आणि एका बाजूने हे समजायला लागते. असे काम होते! आणि जेव्हा गात्र मजबूत असतील, त्या घटकेला समजले असते तर?
आम्ही 'भोगतो त्याची चुक' असे सांगितले आहे ना? ते सर्व शास्त्रांचा सार दिला आहे. तुम्ही मुंबईला गेलात तर हजारो घरांत मोठ्या