________________
१०
भोगतो त्याची चुक घ्या!!! ह्या लोकांनी असा निष्कर्ष काढला! अरे असे कशासाठी? परमेश्वराचे वाईट का बोलतात? त्यांना आपले घर रिकामे का करायला लावता? परमेश्वरचे घर रिकामे करायला निघालात! अरे, हा परमेश्वर नसता तर राहिले काय ह्या जगात? ह्या लोकांना कसे वाटते कि परमेश्वराचे चालत नाही. लोकांचा देवावरचा विश्वास उडून जाईल. अरे, असे नाही. हे सर्व हिशोब तर मागच्या जन्मांपासून चालुच आहे. हा फक्त एका जन्मातील हिशोब नाही. आज त्या बाईची चुक झाली म्हणून भोगावे लागले. हा सर्व न्यायच आहे. ती बाई चिरडली गेली हा पण न्यायच आहे, म्हणून कायदेशीरच आहे हे जग. थोडक्यात ही गोष्ट अशी आहे.
जर का ड्रायव्हरची चुक असेल तर सरकारचा कडक कायदा असता, तर त्या माणसाला तिथल्या तिथे उभे करून गोळ्या घालून खलास करतील. पण असे तर सरकार ही म्हणत नाही. कारण कि असे मारून टाकायचे नाही, वास्तवात तो गुन्हेगार नाही, त्याने हा नवीन गुन्हा केला आहे, तो गुन्हा तो नंतर भोगणार. परंतु त्याने तुम्हाला गुन्ह्यातून मुक्त केले. तुम्ही गुन्ह्यातून मुक्त झालात. तो गुन्ह्याने बांधला गेला. म्हणून त्याला सद्बुद्धि देऊन सांगायचे कि गुन्ह्यात अडकू नकोस.
एक्सिडन्ट म्हणजे तर... ह्या कलियुगात एक्सिडन्ट (अकस्मात) आणि इन्सिडेन्ट (घटना) असे असतात कि मनुष्य गोंधळून जातो. अकस्मात म्हणजे काय? टु मेनी कॉझीझ एट ए टाईम (असंख्य कारणे एकाच वेळी) आणि घटना म्हणजे काय? सो मेनी कॉझीझ एट ए टाईम (बरीच कारणे एकाच वेळी), म्हणूनच आम्ही काय सांगतो कि 'भोगतो त्याची चुक' आणि तो जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याची चुक समजली जाईल!
हे तर जो पकडला गेला त्याला चोर म्हणतात. जसे त्या ऑफिसमधून एकाला पकडले तर त्याला चोर म्हणतात, पण म्हणून काही ऑफिसमध्ये इतर कुणी चोर नाही?