________________
भोगतो त्याची चुक
याचा न्याय कोणता?
हे जग नियमाच्या आधीन चालते, हे खोटं नाही. ह्याचे 'रेग्यूलेटर ऑफ द वर्ल्ड' पण आहे. आणि सतत ह्या जगाला रेग्यूलेशन (नियम) मध्ये च ठेवत असते.
बस स्टँडवर कुणी एक बाई ऊभी आहे. आता बस स्टँडवर ऊभे राहणे हा काही गुन्हा म्हणायचा? एवढ्यात बाजूनी, एक बस येते, ती बस ह्या बस स्टॉपवर चढते. कारण कि त्या ड्रायव्हरच्या हातून स्टीयरिंगवरचा ताबा गेला आहे. त्या बसने येवून फूटपाथवर चढून त्या बाईला चिरडून टाकली, आणि बस स्टँडलाही तोडून टाकले. तेथे पाचशे माणसाचा समूह एकत्र झाला. त्या लोकांना सांगितले कि याचा न्याय करा, तर ते लोक म्हणतील कि, 'बिचारी त्या बाईची काही चुक नसतांना मरुन गेली. ह्यात बाईचा काय गुन्हा? हा ड्रायव्हर नालायक आहे.' त्यानंतर चार-पांच अक्कलवंत माणसे एकत्र येऊन म्हणतात, 'हे असे कसले बस ड्रायव्हर, ह्यानां तर तुरुंगातच घातले पाहिजे. असच करायला हवे! बाई, बस स्टँडवर ऊभी राहिलेली, ह्या बिचारीचा काय दोष?' अरे वेड्या! तिचा गुन्हा तुम्हाला माहित नाही. तिचा गुन्हा होता, म्हणूनच तर ती मेली. आणि ह्या ड्रायव्हरचा गुन्हा तर जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा, त्याच्यावर जेव्हा केस चालू होईल आणि त्या केसचा सफल निकाल लागला आणि जर अपराधी ठरला, तर अपराधी, अन्यथा त्याला निरपराधी म्हणून सोडून देतील? त्या बाईचा गुन्हा आज पकडला गेला. अरे, हिशोबा शिवाय कोणी मारणार का? त्या बाईने मागचा हिशोब आज पूर्ण केला. असे समजून जायचे, बाईने भोगले म्हणजे ती तिची चुक. नंतर मग तो ड्रायव्हर पकडला जातो तेव्हा त्याची चुक. आज जो पकडला गेला तो गुन्हेगार.
तर कित्येक जण काय म्हणतात? कि जर परमेश्वर असता तर असे घडलेच नसते. म्हणजेच परमेश्वरासारखी काही वस्तु ह्या संसारात आहे असे वाटतच नाही. त्या बाईचा काय गुन्हा होता? हा परमेश्वर ह्या जगात नाहीच!