________________
भोगतो त्याची चुक पहिले जीवन जगायला शिका. घरात भांडणे कमी होतील, मग दुसरी गोष्ट शिकायची!
समोरचा नाही समजत तर? प्रश्नकर्ता : कित्येक जण असे असतात कि आपण कितीही चांगले वागलो तरी ते समजत नाही.
दादाश्री : ते जर समजत नसतील तर त्यात आपलीच चुक आहे. तर ती व्यक्ति समजून घेणारी का नाही मिळाली आपल्याला? त्याच्याशीच आपली गाठ का पडली? ज्या ज्या वेळी आपल्याला काही पण भोगावे लागते ते आपल्या चुकीचाच परिणाम आहे.
प्रश्नकर्ता : तर आपण असे समजायचे कि माझे कर्मच असे आहेत?
दादाश्री : खरोखर. आपल्या चुकीशिवाय आपल्याला भोग भोगावे लागत नाही. ह्या जगात असा कोणी नाही जो आपल्याला किंचित्मात्र दुःख देणार आणि जर कोणी दुःख देणारा आहे तर ते आपलीच चुक आहे. समोरच्याचा दोष नाही. ते तर निमित्त आहे. म्हणून जो भोगतो त्याची चुक?
पति-पत्नी आपसात खूप भांडत असतील आणि दोघे झोपायला गेल्यानंतर आपण गुपचुप पहायला गेलो तर ती बाई तर बिनधास्त झोपलेली असते. आणि तो भाऊ एक सारखा कुस बदलत असेल तर आपण समजावे कि ह्या माणसाचीच चुक आहे सगळी, ती बाई भोगत नाही. ज्याची चुक असेल तोच भोगतो. त्यावेळेला जर तो भाऊ झोपलेला असेल
आणि ती बाई जागत असेल तर समजावे कि त्या बाईचीच चुक आहे. 'भोगतो त्याची चुक', हे तर फार मोठे विज्ञान आहे! सारे जग निमित्तालाच दोष देत आहे.