________________
भोगतो त्याची चुक
७
नाहीतर आपल्या येथे कायदा काय आहे? 'भोगतो त्याची चुक. ' मुलगा दारु पिऊन आला आणि आरामात झोपून गेला. आणि तुम्हाला संपूर्ण रात्र झोप आली नाही तेव्हा तुम्ही मला म्हणाल कि हा गाढवासारखा झोपून गेला. अरे, तुम्ही भोगत आहात ती तुमची चुक आहे, असे मी सांगून देतो. तो भोगेल तेव्हा त्याची चुक.
प्रश्नकर्ता : आई-वडील मुलांच्या चूका सहन करतात ते, तर ममता आणि जबाबदारीमुळे भोगतात ना?
दादाश्री : फक्त ममता आणि जबाबदारी नाही पण मुख्य कारण चुक त्यांची आहे. ममते शिवाय दूसरी पण अनेक कारणे असतात ना. परंतु, तुम्ही भोगता म्हणून तुमची चुक आहे. म्हणून कोणाचे दोष काढू नका. नाहीतर पुढच्या जन्मासाठीचा हिशोब बांधला जाईल पुन्हा !
म्हणजे दोघांचे कायदे वेगवेगळे आहेत. निसर्गाच्या कायद्याला मान्य कराल तर तुमचा रस्ता अगदी सरळ होतो. आणि सरकारच्या कायद्याला मान्य कराल तर गोंधळून जाल.
प्रश्नकर्ता: पण दादा ती चुक त्याला स्वत:ला लक्षात यायला हवी ना?
दादाश्री : नाही, त्याला स्वतःला लक्षात येणार नाही. ती चुक दाखविणारा हवा. तो त्याचा विश्वासू असायला हवा. एक वेळा चुक दिसली, म्हणजे दोन-तीन वेळात त्याला अनुभवात येईल.
म्हणून आम्ही सांगितले होते कि, नाही समजले तर एवढे लिहून ठेवा घरात कि ‘जो भोगतो त्याची चुक. ' आपल्याला सासू खूप खूप त्रास देत असेल, रात्री झोप येत नसेल, तेव्हा सासूला पाहायला गेलो तर ती झोपून गेलेली असते, अगदी घोरत असेल तर असे समजून घ्या कि चुक आपलीच आहे. सासू तर आरामात झोपून गेली. 'भोगतो त्याची चुक' तुम्हाला ही गोष्ट आवडली कि नाही? तर 'भोगतो त्याची चुक' एवढेच जर समजले तर घरात एक ही भांडण-तंटा होणार नाही.