________________
भोगतो त्याची चुक
निसर्गाच्या न्यायालयात...
ह्या जगात न्यायाधीश ठिक-ठिकाणी आहेत, परंतु कर्म जगाचा नैसर्गिक न्यायाधीश तर एकच आहे, जो 'भोगतो त्याची चुक' हा एकच न्याय आहे. त्या प्रमाणे संपूर्ण जग चालत आहे आणि भ्रांतिच्या न्यायाने हा संपूर्ण संसार ऊभा आहे.
एक क्षण सुद्धा जग कायद्या शिवाय राहत नाही. बक्षिस द्यायचे असेल त्याला बक्षिस देते. दंड द्यायचा असेल त्याला दंड देते परंतु कायद्याचा बाहेर चालत नाही. कायदेशीरच आहे, संपूर्ण न्यायपूर्वकच आहे. परंतु समोरच्या व्यक्तिच्या दृष्टिला दिसत नसल्याने समजत नाही. ती दृष्टि निर्मळ होईल तेव्हा न्याय दिसतो. स्वार्थदृष्टि असेल, तोपर्यंत न्याय कसा दिसणार ?
ब्रह्मांडच्या स्वामी नी का भोगावे?
हे संपूर्ण जग ‘आपल्या' मालकीचे आहे. आपण ‘स्वतः’ ब्रह्मांडाचे मालक आहोत तरीसुद्धा आपण दु:ख, का म्हणून भोगायचे ते शोधून काढ ना?! हे तर आपण आपल्या चुकीने बांधलेलो आहोत, इतर लोकांनी येवून बांधले नाही. ती चुक संपताच मुक्त, आणि खरोखर तर मुक्तच आहोत. परंतु चुकीमुळे बंधन भोगतो आहोत.
हो स्वत:च न्यायाधीश, आणि स्वत:च गुन्हेगार आणि स्वत:च