________________
२२
भोगतो त्याची चुक हे लक्षात आले तर लक्ष्मीचंद आरामात झोपून जाईल, नाहीतर तो त्याला कितीतरी शिव्या देत राहील!
आपण एकदा सुलेमानला पैसे उधार दिले असतील आणि मग सहा महिन्यापर्यंत सुलेमान पैसे परत करत नाही तर? अरे पैसे दिले कोणी? तुझ्या अहंकाराने. त्याने (तुझ्याच अहंकाराला) पोषण दिले, म्हणून तू दयाळू होऊन पैसे दिले, तर मांडवली कर आता. सुलेमानच्या खाती जमा कर आणि अहंकारच्या खात्यात उधार ठेव.
असे पृथक्करण तर करा ज्याचा जास्त दोष तोच ह्या जगात मार खातो. मार कोण खातो? ते पाहून घ्यावे. जो मार खातो, तोच दोषी आहे.
भोगतो ह्यावरुन हिशोब निघतो कि, त्याची किती चुक होती. घरात दहा माणसे असतील, त्यातील दोघांना घर कसे चालत असेल ह्याबद्दल जरा ही कल्पना येत नाही, दोघांना घरात मदद करावी असा विचार येतो. आणि दोघे जण मदत करतात आणि एक तर दिवसभर घर कशा रितीने चालवावे त्याच्याच चिंतेत राहत असतो. आणि दोघे जण आरामात झोपले असतील. तर चुक कोणाची? वेड्या भोगतो त्याचीच, ना! चिंता करतो त्याचीच ना? जो आरामात झोपतो, त्याला काहीच नाही.
चुक कोणाची आहे? तेव्हा म्हणे कि कोण भोगत आहे, ह्याचा तपास करा. नोकराच्या हाताने दहा ग्लास फूटून गेले तर त्याचा परिणाम घरातील माणसांच्यावर होणार का नाही होणार? आता घरातील माणसात मुले असतात, त्यानां तर ते भोगण्याचे होत नसते, पण त्यांचे आई-वडील चीडचीड करतात त्यात त्याची आई थोड्यावेळानंतर झोपून जाते, परंतु त्याचे वडील हिशोब करीत राहतात. दहा गुणीले पन्नास, एवढे रुपये होतात! तो एलर्ट (जागृत), म्हणून त्याला जास्त भोगावे लागते त्यावरुन भोगतो त्याची चुक.'
चूकांना आपल्याला शोधायला जायची आवश्यकयता नाही. मोठा