________________
२३
भोगतो त्याची चुक न्यायाधीशांना आणि वकीलांना पण शोधायला जायची गरज नाही. त्यापेक्षा हे सूत्र दिले, हे थर्मोमीटर कि भोगतो त्याची चुक'. तो जर एवढे पृथक्करण करीत करीत पुढे गेला तर तो सरळ मोक्षाला जाईल.
चुक, डॉक्टरची कि रोग्याची? डॉक्टरांनी रोग्याला इंजेक्शन दिले नंतर डॉक्टर घरी जाऊन आरामात झोपून गेला, आणि त्याला तर इंजेक्शन संपूर्ण रात्र भर दुःखत होते, ह्यात चुक कोणाची? रोग्याची! आणि डॉक्टर तर त्याचे भोग भोगेल तेव्हा त्याची चुक पकडली जाईल.
लहान मुलीसाठी डॉक्टरांना घरी बोलविले आणि डॉक्टरांनी येऊन पाहिले कि तिची नाडी चालत नाही. तेव्हा डॉक्टर काय म्हणतो? मला कशासाठी बोलावले? अरे जेव्हा तुम्ही हात लावला त्याच वेळेला ती गेली. नाहीतर नाडी तर चालत होती. पण मग डॉक्टर व्हिजीट फीचे शंभर रुपये घेऊन जातो. आणि वरुन रागवतो ! अरे! रागावायचे असेल तर पैसे घेऊ नको आणि जर पैसे घेत आहेस तर रागवू नको. पण नाही, फी तर घ्यायचीच ना? तर पैसे द्यावे लागतात. असे जग आहे. म्हणून न्याय शोधू नका ह्या काळात !
प्रश्नकर्ता : असे पण घडते कि माझ्याकडून औषध घ्यायचे आणि मलाच वरुन रागवायचे.
दादाश्री : हो असे घडते, तरी समोरच्या व्यक्तिला गुन्हेगार समजाल, तर तुम्ही गुन्हेगार व्हाल. अशाप्रकारे निसर्ग न्यायच करीत आहे.
ऑपरेशन करतांना पेशन्ट मरुन गेला तर चुक कोणाची?!
चिकट मातीत बूट घालून फिरलात आणि पडलात, तर दोष कोणाचा? वेड्या तुझाच! एवढे समजत नाही का उघड्या पायाने फिरलात तर बोटं मातीत रुतणार आणि पडणार नाही! ह्यात दोष कोणाचा? मातीचा, बूटाचा का तुझा? भोगतो त्याची चुक. एवढे जर पूर्णपणे समजलात तर तुम्ही