________________
भोगतो त्याची चुक
१७
गीयरमध्ये बोट, कोणाची चुक
जो कडू भोगतो तोच कर्ता. कर्ता तोच विकल्प, एखादी मशिनरी असले ती आपण स्वतः जरी तयार केली असेल आणि त्यात गीयर व्हील असेल, त्यात आपले स्वतःचे बोट आले तर त्या मशीनीला तुम्ही लाख वेळा म्हणा कि भाऊ माझे बोट आहे, मी स्वतः तुला तयार केले आहेना ! तर ते गीयर व्हील बोट सोडून देईल का? नाही सोडणार ते तर तुम्हाला समजावून देणार कि भाऊ, ह्यात माझा काय दोष? तू भोगले म्हणून तुझी चुक. अश्याच साऱ्या मशिनरी बाहेर पण चालत असतात. ही सर्व लोकं गीयर च आहे, गीयर नसते तर संपूर्ण मुंबई शहरात कोणतीही पत्नी आपल्या पतिला दुःख देणार नाही आणि कोणताही पति आपल्या पत्नीला दुःख देणार नाही. स्वत:च्या घराला सर्व जण सुखात च ठेवणार, पण असे नाही. ही मुले - बाळे, पति - पत्नी सर्वच मशिनरी च आहेत, गीयर मात्र आहे.
डोंगराला उलट दगड माराल का?
प्रश्नकर्ता : कोणी तुम्हाला दगड मारला आणि लागला तर त्यामुळे आपल्याला इजा होते आणि खूप उद्वेग होतो.
दादाश्री : इजा होते म्हणून उद्वेग होतो, नाही का? आणि डोंगरावरुन दगड गडगडत डोक्यावर पडला आणि रक्त निघाले तर?
प्रश्नकर्ता : अशा परिस्थितीत, कर्माच्या आधीन ते आपल्याला लागणार होते म्हणून लागला, असे समजतो.
दादाश्री : मग त्या डोंगराला शिव्या द्यायला नको का? त्याच्यावर रागावणार नाही का त्या क्षणाला?
प्रश्नकर्ता : त्यात राग येण्याचे कारण राहत नाही, कारण कि समोर कोणी केले, त्याला आपण ओळखत नाही.
दादाश्री : का, तेथे शहाणपणा सुचतो? ! सहजच शहाणपण येते कि