________________
भोगतो त्याची चुक घेऊन जाईल. नाहीतर कोणी बापही विचारणार नाही. म्हणून तू निर्भय होऊन रहा. हे वर्तमानपत्रवाले तर, लिहतील म्हणून काय आपण घाबरून जायचे? हे तर थोड्या कमी प्रमाणात घटस्फोट (डायवोर्स) करतात, हे ठीक आहे, तरी जास्त प्रमाणात फारकत व्हायला लागले तर सर्वांच्या शंकेला स्थान मिळेल कि आपली पण फारकत झाली तर? एक लाख माणसे ज्या जागी लूटले गेले तेथे पण तू घाबरू नको. तेथे कोणी बापही तुमचे उपरी नाही.
लूटणारा भोगतो का लूटला गेला तो भोगतो? कोण भोगतो ते पाहून घ्यावे. कोणी ठग भेटला आणि तो लूटून गेला, मग रडायचे नाही, पुढे आपली प्रगती चालू ठेवायची!
जग दुःख भोगण्यासाठी नाही, सुख भोगण्यासाठी आहे. ज्याचा जेवढा हिशोब असेल तेवढा मिळतो. कित्येक जण केवळ सुखच भोगत आहेत. ते कशामुळे? कित्येक जण फक्त दुःखच भोगत आहेत ते कशामुळे? त्यांनी आपला तसा हिशोब आणलेला असतो म्हणून.
_ 'हे' एकच सूत्र घरी लिहून ठेवले असेल तर मग भोगत असताना जाणून घ्या कि ही चुक कोणाची? म्हणून कित्येक घरात, मोठ्या अक्षराने भिंती वर लिहन ठेवलेले असते कि 'भोगतो त्याची चुक.' पुन्हा हे कधी विसरणारच नाही!
संपूर्ण आयुष्यभर जर कोणी माणसाने हे सूत्र वापरले, यथार्थपणे समजून जर वापरले तर गुरु करायची आवश्यकता नाही. आणि हेच सूत्र त्याला मोक्षाप्रत घेऊन जाईल असे आहे.
___ अजब वेल्डिंग झाली ही 'भोगतो त्याची चुक', हे तर खूप मोठे सूत्र म्हटले जाते, ते संयोगानुसार, काही काळच्या हिशोबाने शब्दांची वेल्डिंग (सांधणी) झाली आहे. वेल्डिंग झाल्या शिवाय कामाला येणार नाही ना! वेल्डिंग व्हायला हवी.