________________
भोगतो त्याची चुक कायदा, तो तर ज्याची चुक असेल त्यालाच पकडणार. हा कायदा एक्झेक्ट (तंतोतंत) आहे आणि त्यात कोणी बदल करू शकेल असे नाहीच. जगात असा कुठलाही कायदा नाही कि, जे कोणाला दुःख देऊ शकेल. सरकारचा कायदा सुद्धा दु:ख नाही देवू शकत !
हा चहाचा कप जर तुमच्या हातातून पडला तर तुम्हाला दु:ख होते? स्वतः फोडला तर सहन करावे लागते का? आणि जर तो कप तुमच्या मुलाच्या हातून फूटला तर दुःख, चिंता व जळजळ होते. स्वत:च्याच चुकीने झाले असे समजलो तर दुःख किंवा चिंता होईल का? हे तर दुसऱ्यांचा दोष काढून दु:ख आणि चिंता ओढवून घेतो आणि विनाकारण रात्रं-दिवस चीडचीड ऊभी करतो आणि वरून असे वाटते कि, मला खूप सहन करावे लागते.
आपली स्वत:ची चुक असेल तरच समोरचा काही बोलणार ना? म्हणून चुक मिटवुन टाका ना! ह्या जगात कुठलाही जीव कुठल्याही जीवाला त्रास देवू शकत नाही, असे स्वतंत्र जग आहे, कुणी त्रास देत असेल त्याचे कारण आधी आपण दखल केली होती म्हणून. ती चुक संपवा म्हणजे त्याचा हिशोब राहणार नाही.
प्रश्नकर्ता : ही थियरी जर बरोबर समजली तर सर्व प्रश्नांचे मनात समाधान राहिल.
दादाश्री : समाधान नाही, एक्झेक्ट तसेच आहे. हे जुळवून काढलेले नाही. बुद्धिपूर्वकची ही गोष्ट नाही, परंतु ज्ञानपूर्वकची आहे.
आजचा गुन्हेगार-लुटारू का लुटला जाणारा?
वर्तमानपत्रात रोज येते कि, 'आज टॅक्सीत दोन माणसांनी एकाला लूटले, अमुक फ्लॅटच्या बाईसाहेबांना बांधून लूटले.' हे वाचून आपण, चिडायला नको कि, मी देखील लूटलो गेलो, तर? हा विकल्प च गुन्हा आहे. त्यापेक्षा तू तुझ्या सहजतेतच वाग, ना! तुझा हिशोब असेल तर तो