________________
भोगतो त्याची चुक
१५
बद्दल राग-द्वेष व्हायला नको. कारण कि त्याची ती चुक नाहीच. आपण तसा आरोप करतो कि ती त्याचीच चुक आहे, ते तुमच्या दृष्टिने ते अन्याय दिसते. पण वास्तवात तुमच्या दृष्टित, फरक असल्यामुळे तुम्हाला अन्याय दिसतो.
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : कोणी तुम्हाला दुःख देत असेल तर ती त्याची चुक नाही. पण जर तुम्ही दुःख भोगत असाल तर ती तुमची चुक आहे. हा निसर्गाचा कायदा आहे. जगाचा कायदा कसा? दुःख देतो, त्याची चुक.
ही सुक्ष्म गोष्ट समजली तर खुलासा होईल, व माणसांचे सर्व समाधान होईल.
उपकारी, कर्मापासून मुक्त करविणारा
हे तर तिच्या (सूनेचा) मनात बसलेले कि माझी सासू मला त्रास देते. असे ती रात्रं-दिवस लक्षात ठेवेल का ती विसरुन जाईल ?
प्रश्नकर्ता : लक्षात ठेवेल.
दादाश्री : रात्रं-दिवस लक्षात ठेवेल. नंतर शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होईल. मग दुसऱ्या चांगल्या गोष्टीचा स्वीकार होणार नाही. त्यामुळे तिला काय समजावतो कि, बाकीच्यांना का चांगली सासू मिळाली? आणि तुला का चांगली सासू नाही मिळाली? तुला का अशी मिळाली? हा मागच्या जन्मीचा तुझा हिशोब आहे. तो पूर्ण कर. तो कशा रितीने पूर्ण करायचा ते दाखविले, तर ती सुखी होईल. कारण कि दोषित तिची सासू नाही, ‘भोगतो त्याची चुक' आहे म्हणजे समोरच्या व्यक्तिचा दोष उडून जातो.
कोणाचा दोष नाही. दोष काढणाऱ्याचा दोष आहे. जगात दोषी कुणीच नाही. सगळे जण आपआपल्या कर्माच्या उदयाने आहेत. जे सर्व भोगत आहेत, तो आज गुन्हा करत नाही. मागच्या जन्मीच्या कर्माच्या फलस्वरूपात होत आहे सर्व. आज तर त्याला पश्चाताप होत असेल, परंतु