Book Title: Bhogte Tyachi Chuk
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 34
________________ २५ भोगतो त्याची चुक आहेत. म्हणून विद्यार्थी विरुद्ध होतात. मुले तर चांगलीच आहेत पण शिक्षक आणि आई-वडील तर पक्के घनचक्कर आहेत. आणि वडीलमाणसं तर जुनेच धरुन बसतात. मग मुले त्यांचा विरोध करणार च ना? सध्या आईवडीलांचे चारित्र्य असे नसते कि, मुले त्याच्या विरूद्ध होणार नाही. ह्यात वडीलमाणसांचे चारित्र्य कमी झाले आहे. आणि म्हणूनच त्यांची मुले त्यांच्या विरोध करतात. चुकी बद्दल दादांची शिकवण ‘भोगतो त्याची चुक' हा सिद्धांत मोक्षाला घेऊन जाईल. कोणी विचारले कि, मला माझ्या चूका कशा ओळखाव्यात? तेव्हा आम्ही त्याला शिकवतो कि तुला जिथे जिथे दुःख भोगावे लागत आहे, ही तुझी चुक. तुझी काय चुक झाली असेल, ते असे भोगायची वेळ आली ते शोधून काढ. असे तर संपूर्ण दिवसभर भोगावे लागते, तर शोधून काढायला हवे कि कोण-कोणत्या चूका झाल्या आहेत. भोगत असतांनाच लक्षात येते कि, ह्या चूका आपल्या. जर कधी आमची चुक झाली तर आम्हाला टेन्शन होते ना! आम्हाला समोरच्याची चुक कशाप्रकारे समजणार? समोरच्याचे 'होम' (शुद्धात्मा) आणि 'फॉरिन' (पुद्गल-प्रकृति) वेगळे दिसतात. समोरच्याचे फॉरिनमध्ये चूका झाल्या, गुन्हे झाले तर आम्ही काहीच बोलणार नाही, परंतु होममध्ये जर काही झाले तर आम्हाला त्याला जागृत करावे लागेल, मोक्षाला जातांना कसली अडचण यायला नको. आत खूप वस्ती आहे. त्यात कोण भोगतो त्याची जाणीव होते. कधी अहंकार भोगत असतो, तर ती अहंकाराची चुक आहे. कधी मन भोगते, तर ती मनाची चुक आहे. कित्येकदा चित्त भोगते तेव्हा चित्ताची चुक आहे. हे तर स्वत:च्या चूकां मधून 'स्वतः' वेगळे राहू शकतो असे आहे. गोष्ट समजून घ्यावी लागेल ना?

Loading...

Page Navigation
1 ... 32 33 34 35 36 37 38