________________
२४
भोगतो त्याची चुक मोक्षाला जाणार. जे दुसऱ्यांची चुक पहातात ते साफ खोटे आहे. आपल्या चुकीमुळे निमित्त मिळते. पण हे जीवित निमित्त मिळाले तर त्याला वचका भरतो. पण मग काटा लागला तर काय करणार? चार रस्त्यावर काटे पडलेले आहेत आणि हजारो माणसे तेथून जातात, पण कोणालाही काटा टोचत नाही, परंतु चंदु तेथून गेला आणि काटा वाकडा असेल तर तो त्याच्या पायात घुसेल. व्यवस्थित शक्ति तर कशी आहे? काटा लागायचा असेल त्यालाच लागेल. त्यासाठी सर्व संयोग एकत्र करतो, परंतु ह्यात निमित्ताचा काय दोष?
जर एखादा माणसाने औषध फवारल्यावर खोकला येत असेल तर त्यां साठी भांडण-तंटा होईल, परंतु जेव्हा मिरच्याची फोडणी उडते आणि खोकला येतो तर कोणी तक्रार करतो का? हे तर जो पकडला जातो त्याच्या वर चिडायचे. जर हकीकत समजून घेण्याचा प्रयत्न केला कि, करणार कोण आहे? आणि कशामुळे होते? तर मग राहिल का भानगड? बाण मारणाऱ्याची चुक नाही. बाण लागला कोणाला? त्याची चुक आहे. बाण मारणारा जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याची चुक. आता तर बाण ज्याला लागला तो पकडला गेला आहे, तो पहिला गुन्हेगार आहे. दूसरा तर जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा त्याची चुक.
मुलांच्याच चूका काढतात सारे? तुम्हाला शिकता शिकता काही अडचणी आल्या का? प्रश्नकर्ता : अडचणी तर आल्या होत्या.
दादाश्री : त्या तुमच्याच चुकीमुळे, ह्यात मास्तराची कि इतर कोणाची चुक नव्हती.
प्रश्नकर्ता : ही मुले शिक्षकां समोर वादविवाद करतात, ते कधी सुधारणार?
दादाश्री : जो भुलचे परिणाम भोगतो त्याची चुक. हे गुरूजीच असे