________________ भोगतो त्याची चुक 'हा खिसा कापला, त्यात चूक कोणाची? ह्याचा खिसा कापला गेला नाही आणि तुझाच का कापला गेला? तुमच्या दोघात सध्या कोण भोगत आहे?"भोगतो त्याची चूक.' 'भोगतो त्याची चूक' हा सिद्धांत मोक्षाला घेवून जाईल. जर कोणी विचारले की मी माझ्या चूका कशा ओळखू? तेव्हा आम्ही त्याला शिकवतो की, 'तुला जिथे जिथे दुख भोगावे लागत आहे, तिथे तुझीच चुक. तुझी अशी काय चूक झाली असेल, की असे भोगायची वेळ आली, ते तु शोधून काढ.' हे तर दिवसभर भोगावे लागत आहे. म्हणून शोधून काढायला हवे की काय काय चूका झाल्या आहेत. आपण आपल्या चूकांमुळे बांधले गेलो आहोत, लोकांनी आपल्याला बांधलेलेच नाही. चुक सुधारली की मुक्त! - दादाश्री ISBN 978-81-99933241 9788189-933241 Printed in India dadabhagwan.org Price Rs10