________________
२७
भोगतो त्याची चुक केला आहे. यू आर हॉल एन्ड सॉल रिस्पोन्सिबल फॉर यॉर व्यवहार (तुमच्या व्यवहारासाठी संपूर्णतः तुम्हीच जबाबदार आहात).
न्यायधीश आहे, कॉम्प्युटरसारखा ‘भोगतो त्याची चुक' हे गुप्त तत्त्व म्हटले जाते. इथे बुद्धि थकून जाईल. जिथे मतिज्ञान काम करणार नाही ती गोष्ट 'ज्ञानी पुरुषां जवळ' उघड होते, 'जशी आहे तशी.' हे गुप्ततत्त्व फार सूक्ष्म रितीने समजून घ्यायला हवे. न्याय करणारा चेतन असेल तर, तो पक्षापक्ष पण करेल! परंतु जगाचा न्याय करणारा 'निश्चेतन चेतन' आहे. त्याला जगाच्या भाषेत समजायचे असेल तर 'कॉम्प्युटर' सारखे आहे. ह्या कॉम्प्युटरमध्ये प्रश्न टाकला तर कॉम्प्युटरची चुक पण होऊ शकते. परंतु जगाच्या न्यायात चुक कधीच होत नाही. ह्या जगाचा न्याय करणारा 'निश्चेतन चेतन' आहे, आणि वीतराग पण आहे! 'ज्ञानी पुरुष'चा एकच शब्द समजला आणि पकडून ठेवला तर मोक्षालाच जाईल. कोणाचा शब्द? ज्ञानी पुरुषांचा! त्याने कोणालाही कोणाचाही सल्ला घ्यावा लागत नाही कि ह्यात कोणाची चुक? 'भोगतो त्याची चुक'.
हे विज्ञान आहे. संपूर्ण विज्ञान आहे. ह्यात तर एक अक्षर ही चुकीचे नाही. विज्ञान म्हणजे केवळ विज्ञानच आहे हे तर, संपूर्ण जगासाठी आहे. हे काही भारतीय लोकांच्यासाठीच आहे असे नाही. परदेशात सुद्धा, सगळ्यांसाठी आहे!
जेथे असा अगदी निर्मळ स्वच्छ न्याय, तुम्हाला दाखवतो मग न्यायान्यायची अशी विभागणी करण्याचे कुठे राहते? ही खूप खोल वरची गोष्ट आहे. सर्व शास्त्रांचा सार मी तुम्हाला सांगतो कि, हे तर तेथील जजमेन्ट (न्याय) कशाप्रकारे चालतो, ते अगदी एक्झेक्ट सांगतो कि 'भोगतो त्याची चुक.' 'भोगतो त्याची चुक' हे वाक्य अगदीच एक्झेक्ट निघाले आहे, आमच्याकडून. ह्याचा जो वापर करेल त्याचे कल्याण होवून जाणार.
जय सच्चिदानंद