________________
२६
भोगतो त्याची चुक
मूळ चुक कुठे आहे?
चुक कोणाची? जो भोगतो त्याची ! चुक कोणती? तेव्हा म्हणतो कि 'मी चंदुभाई आहे' ही मान्यता च तुमची चुक आहे कारण कि, ह्या जगात दोषी कुणीच नाही. म्हणजे कोणी गुन्हेगार ही नाही, असे सिद्ध होते.
बाकी ह्या जगात कोणी काही करू शकेल असे नाही. पण जे हिशोब होऊन गेले आहे, ते सोडणार नाहीत. जे घोटाळ्याचे हिशोब झाले आहेत, ते घोटाळ्यावाले फळ दिल्या शिवाय राहणार नाहीत. परंतु आता नव्याने घोटाळे करू नका, आता थांबून जा. जेव्हापासून तुम्हाला हे लक्षात आले, तेव्हापासूनच थांबून जा. जूने घोटाळे तर होऊन गेले, ते तर आपल्याला फेडावे लागतीलच परंतु आता नवीन होणार नाही ते पहायचे आहे. जबाबदारी संपूर्ण आपलीच आहे ! परमेश्वराची जबाबदारी नाही. परमेश्वर ह्यात हात घालणार नाही. म्हणून परमेश्वर पण त्याला माफ करू शकणार नाही. कित्येक भक्त असे म्हणतात कि, 'मी पाप करीत आहे आणि परमेश्वर मला माफ करेल का?' परमेश्वराजवळ त्याला माफी नाही, दुसऱ्या लोकाकडे. दयाळू लोकांकडे, त्याला माफी असते च. दयाळू व्यक्तिला सांगितले कि, 'साहेब, मी तर तुमची फार मोठी चुक केली', तर लागली ते माफ करतात.
दुःख देत आहे तो मात्र निमित्त आहे. परंतु मूळात चुक स्वतःचीच आहे. फायदा करतात तो ही निमित्त आहे. आणि जो नुकसान करवतो, तो पण निमित्तच असतो. पण हा सगळा आपलाच हिशोब आहे, म्हणून हे सारे असे होते.
आम्ही तुम्हाला मोकळेपणानी सांगतो कि तुमच्या बाउन्ड्रीत ( हद्दीत ) कोणालाही ही बोट घालण्या इतकी शक्ति नाही आणि जर तुमची चुक असेल तर, कुणी पण बोट घालू शकेल. अरे, काठी सुद्धा मारेन. 'आम्ही' तर ओळखून गेलो कि कोण गुद्दा मारीत आहे. सारे तुमचे आणि तुमचेच आहे! तुमचा व्यवहार कुणी खराब केला नाही. तुमचा व्यवहार तुम्हीच खराब