________________
भोगतो त्याची चुक
२
वकील, तो न्याय कोणत्या बाजूला करेल? स्वत:च्या बाजूलाच. म्हणजे स्वतः आपल्या इच्छे प्रमाणेच न्याय करणार ना? तो स्वतः सतत चूकाच करतो. अशा रितीने नेहमी जीव बांधलेला असतो. येथील न्यायाधीश म्हणतात कि, तुमची चुक झाली आहे. मग आतला वकील वकीलात करतो ह्यात माझा काय दोष? असे करीत स्वत:च बंधनात येतो. स्वत:च्या आत्महितासाठी समजून घ्यायला हवे कि कोणाच्या दोषाचे हे बंधन आहे, जो भोगतो त्याचाच दोष. साध्या सरळ (लोक) भाषेत सांगायचे म्हणजे हा अन्याय आहे, परंतु परमेश्वराच्या भाषेचा न्याय तर असेच म्हणतो कि, ‘जो भोगतो त्याची चुक' ह्या न्यायालयात बाहेरच्या न्यायाधीशाचे कामच नाही.
जगाच्या वास्तविकतेचे रहस्यज्ञान लोकांच्या लक्षात च नाही आणि ज्याच्यामुळे सतत भटकावे लागते, त्या अज्ञान - ज्ञानाची सर्वांना माहिती आहे. हा खिसा कापला, ह्यात चुक कोणाची? त्याचा खिसा नाही कापला आणि तुमचा च का कापला ? तुमच्या दोघां पैकी, सध्या भोगतो कोण? भोगतो त्याची चुक. 'दादां'नी ह्या ज्ञानात 'जसे आहे तसे' पाहिले कि, भोगतो त्याचीच चुक आहे.
सहन करायचे कि
समावून
घ्यायचे?
लोक सहनशक्ति वाढविण्याचे म्हणतात पण ती कुठपर्यंत रहाते? ज्ञानाची दोरी तर थेटपर्यंत पोहचते. सहनशक्तिची दोरी कुठपर्यंत पोहचणार? सहनशक्तिची मर्यादा असते. ज्ञान अमर्यादित असते. हे 'ज्ञान'च असे आहे कि किंचित्मात्र सहन करावे लागत नाही. सहन करणे म्हणजे लोखंडाला डोळ्यानेच पाहून वितळून टाकायचे. म्हणजे शक्ति हवी, जेव्हा ज्ञानाने किंचित्मात्र सहन केल्याशिवाय परमानंदा बरोबर मुक्ति ! आणि हे लक्षात ही येते कि हा तर हिशोब पूर्ण होत आहे, आणि मुक्त होत आहोत.
जो दुःख भोगतो त्याची चुक आणि सुख भोगतो तर ते त्याचे बक्षिस.. परंतु भ्रांतिचा कायदा निमित्ताला पकडतो. परमेश्वराचा कायदा-रियल (खरा)