________________
भोगतो त्याची चुक
१९
गुणाकार भागाकार
एकंदर ही बेरीज वजाबाकी, हे दोन्ही नेचरल एडजेस्टमेन्ट आहेत. आणि गुणाकार भागाकार हा माणूस बुद्धिने करीत असतो. म्हणजे रात्री झोपल्यानंतर मनात विचार करतो कि हे सर्व प्लॉट महाग पडणार आहे. म्हणून अमूक ठिकाणी स्वस्त आहेत ते घेऊ या, आपण तो गुणाकार करतो मनात. म्हणजे सुखाचा गुणाकार करतो, आणि दु:खाचा भागाकार करतो. तो सुखाचा गुणाकार करतो म्हणून पुन्हा त्याला भयंकर दुःख प्राप्त होते. आणि दुःखाचा भागाकार करतो तरी पण दुःख कमी होत नाही ! सुखाचा गुणाकार करणार कि नाही? असे होईल तर चांगले, असे असेल तर उत्तम ! करतो कि नाही करत?! आणि ही बेरीज वजाबाकी होत आहे, ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. जसे कि दोनशे रुपये हरवले गेले किंवा व्यापारात पाच हजाराचे नुकसान झाले, ही नेचरल एडजेस्टमेन्ट आहे कोणी आपला खिसा कापून दोन हजार रुपये घेऊन गेला ती पण नेचरल एडजेस्टमेन्ट आहे ! जो भोगतो त्याची चुक हे गॅरंटीने आम्ही ज्ञानदृष्टिने पाहून आम्ही गॅरंटीने सांगतो. प्रश्नकर्ता : असे म्हणतात कि सुखाचे गुणाकार करतात ह्यात चुकीचे
काय?
दादाश्री : गुणाकार करायचे असतील तर दुःखाचे करा. सुखाचे कराल तर खूप मोठ्या संकटात याल. गुणाकार करण्याची आवड असेल तर दु:खाचा करा. मी जर एका माणसाला थप्पड मारली तर त्याने मला दोन थप्पड मारल्या तर ते चांगले झाले, असेच दुसरा कोणी मारणारा भेटला तर चांगले. ह्या समजने आपले ज्ञान वाढत जाते. पण जर दुःखाचा गुणाकार नाही जमला तर बंद करून ठेवा. परंतु सुखाचा गुणाकार मात्र
करूच नका.
झाले परमेश्वराचे गुन्हेगार
‘भोगतो त्याची चुक' ही परमेश्वराची भाषा ! आणि येथे तर जो चोरी