________________
१८
भोगतो त्याची चुक नाही येत ! असे हे सारे डोंगरच आहेत. हे नेहमीच दगड फेकत असतात. शिव्या देत असतात. चोरी करत असतात हे सर्व डोंगरच आहेत. चेतन नाहीत. असे हे जर समजले तर काम होणार.
गुन्हेगार दिसतो, ते तुमचे क्रोध-मान-माया-लोभ, हे जे आतले शत्रू आहेत ते दाखवतात. 'स्व'च्या दृष्टि (शुद्धात्मा दृष्टि)ने गुन्हेगार दिसत नाही, क्रोध-मान-माया-लोभ दाखवत असतात. ज्याला क्रोध-मान-मायालोभ नाही, त्याला कोणी गुन्हेगार दाखविणारा नसतोच ना! आणि त्याला कोणी गुन्हेगार दिसत पण नाही. वास्तवात पहाता गुन्हेगारा सारखा कोणीच नाही. हे तर क्रोध-मान-माया-लोभ घुसले आहेत आणि ते 'मी चंदुभाई आहे' असे मानल्याने ठाण मांडून आहेत. 'मी चंदुभाई आहे' (वाचकांनी येथे स्वतःचे नांव समजायचे) ही मान्यता सुटली म्हणजेच क्रोध-मान-माया-लोभ जात राहतिल. तरी पण घर रिकामे करायला त्यांना थोडा वेळ लागेल, कारण बऱ्याच दिवसापासून ठाण मांडून आहे
ना!
ही तर संस्कारी पद्धत प्रश्नकर्ता : एक तर तो स्वतः दुःख भोगत आहे, आता तो तर स्वत:च्या चुकीमुळे दुःख भोगत आहे. तेथे इतर लोक दीड शहाणे होऊन येतात. अरे, काय झाले, काय झाले? तर ह्यात त्यांचा काय संबंध आहे? तो त्याच्या चुकीमुळे भोगत आहे. तुम्हाला त्याचे दुःख घेता येणार नाही.
दादाश्री : असे आहे कि, जे विचारपूस करायला येतात, बघायला येतात ना ते फार उच्च संस्काराच्या नियमांच्या आधाराने येतात. विचारपूस करायची म्हणजे काय तर तेथे जाऊन त्या माणसाला विचारतात, कसे आहात भाऊ? आता तुम्हाला कसे वाटते? तेव्हा तो म्हणतो, 'चांगले आहे आता' त्याच्या मनात असे विचार येतात की ओहोहो.... माझी एवढी मोठी वेल्यू (किंमत) ! कितीतरी लोक मला बघायला येतात. त्यामुळे तो आपले दु:ख विसरुन जातो.